ऊस

ऊसासाठी सूक्ष्मसिंचनाव्दारे पाणी व्यवस्थापन

उसाला पाणी केव्हा द्यावे? उसाला पाणी किती द्यावे? आणि उसाला पाणी कसे द्यावे? या संबंधी माहितीचा समावेश या लेखात केला आहे ..

ऊसावरील तांबेरेरा व तपकिरी ठिपकेे रोगांचे व्यवस्थापन

ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाचे व्यापारी पीक आहे. राज्यातील 10 लाख हेक्टर पेक्षा अधिकक्षेत्रफळ या पिकाने व्यापलेले आहे. ऊसाच्या वाढीतील दिर्घकालावधी लक्षात घेता. त्यावर अनेक जैविक वअजैविक घटकांचा परिणाम होताना दिसून येतो. ऊसावरील रोगांचा विचार करता सध्याच्या थंडवातावरणामुळे तांबेरा, तपकिरी ठिपके, इ. रोगांचा प्रादुर्भाव होताना आढळून येतो. थंड वातारणामुळे कोल्हापूर,सातारा,सांगली इत्यादी भागामध्ये वरील रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे पहाटेच्या दवबिंदुमुळे हवेमार्फत पसरणार्‍या रोगांचे प्रमाण वाढले आहे ..

ऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

साधारणपणे ज्या जमिनीत सातत्याने ऊस लागवड असते, सेंद्रीय खतांचा कमी वापर, रासायनिक खतांचाच वापर केला जातो, अशा जमिनीतून सूक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण जादा झाल्यामुळे जमिनीत त्यांची कमतरता भासते. ऊस उत्पादन वाढीसाठी लक्षणे ओळखून शिफारशीत मात्रेमध्ये सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा...

ऊस रोप वाटीकेतील अननस रोगाचे निर्मुलन

ऊसाची सरासरी उत्पादकता व साखर उता-यासह उत्पादनखर्च वाढीवर परिणाम करणा-या ज्या जैविक, अजैविक घटकांचा अभ्यास केला जातो. त्यातील रोग व किडी या जैविक घटकांचा परिणाम हा नक्कीच लक्षात घेणे गरजेचे आहे. ऊस वाढीच्या प्राथमिक अवस्थेतच या रोगांचा हल्ला संपुर्ण रोपवाटीकेचे नुकसान करणारा ठरतो. त्यामुळे अननस रोगाचे निर्मुलन करण्यासाठीच्या उपाययोजनांकडे शेतक-यांना लक्ष पुरवावे लागणार आहे. ..

सहकारी साखर कारखान्यातील ऊसतोडणी कामगार वाहतूक कामगारांची गरज व उपाययोजना

ऊसतोडणी आणि वाहतूक कामगारांचे काम प्रचंड मेहनतीचे असूनही त्यांना कामाचा मोबदला मात्र कमीच मिळतो. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती हलाखीचीच आहे. जोपर्यंत या कामगारांची संघटना नव्हती, तोपर्यंत मागण्यांची कोणीही दखल घेत नव्हते. आता संघटना अस्तित्वात आल्याने आंदोलन करून मागण्या मान्य करून घेतल्या जातात. मात्र त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार, साखर संघ, साखर कारखान्यांपैकी कोणीही आग्रही नाही. ..