जनावरांच्या आहारात खनिजमिश्रणांचे महत्व

डिजिटल बळीराजा-2    05-May-2021
|

animal_1  H x W 
 
खनिजद्रव्यांचे थोडक्यात महत्व:
 
१. खनिजमिश्रणे हि नवजात वासराच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची असतात.
२. जनावरांच्या हाडांना बळकटी देण्याचे कार्य खनिज मिश्रणांमार्फत केले जाते.
३. पचनासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खनिजद्रव्ये महत्वाचे कार्य करत असतात.
४. खनिजमिश्रणे गर्भाशयातील वासराच्या वाढीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतात.
५. खनिजद्रव्ये उदा. कॅल्शिअम व फॉस्फोरस हाडांच्या निर्माणासाठी व त्यांच्या मजबुतीसाठी कार्य करत असतात.
६. खनिजद्रव्यांच्या आहारातील समावेशामुळे प्रजनन शक्तीस बळकटी मिळून दोन वेतांमधील अंतर कमी केले जाऊ शकते.
७. खनिजमिश्रणांच्या नियमित सेवनाने जनावराच्या गाभण न राहणे अथवा जनावर वारंवार उलटणे..इ. समस्यांवर मात करता येते.
८. जनावरांच्या वेतानंतर येणारा शारीरिक ताण भरून काढण्यासाठी खनिजमिश्रणे महत्वाची भूमिका बजावत असतात.
९. खनिजमिश्रणे जनावरांच्या दुग्धोदपादनात महत्वाचे कार्य करत असतात.
१०. शारीरिक जखमा व झीज भरून काढण्यासाठी.
११. जनावरांना दीर्घ काळापर्यंत उत्पादनक्षम बनवून ठेवण्यासाठी.
खनिजमिश्रणांच्या कमतरतेमुळे होणारे आजार:
 
१. रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे.
२. जनावर वेळेवर माजावर न येणे.
३. गाभण राहण्यासंदर्भातील अडचणी उद्भवणे.
४. जनावरांच्या कार्यक्षमतेत किंवा उत्पादनात घट येणे.
५. पचनक्रियेसंबंधित अडचणी उद्भवणे.
६. न्यूमोनिया सारख्या गंभीर रोगाची लागण होणे.
७. जनावरांमधील वंध्यत्व किंवा वांझपणासंबंधी तक्रारी उद्भवणे.
८. वयात येण्यासाठी होणार विलंब.
९. जनावरांमधील रक्तक्षय.
१०. वर न पाडण्यासंदर्भातील अडचणी उद्भवणे.
११. स्तनदाह (कासदाह).
१२. हाडांचे आजार.
१३.गर्भपात.
१४. अशक्त किंवा मेलेले वासरू जन्माला येणे.
१५. अंडाशयासंबंधित विकार उद्भवणे.
१६. जनावरांमधील हगवण.
१७. गर्भाशयातील दाह किंवा जळजळ.
१८. जनावरांमधील गलगंड...इ.लक्षणे व आजार खनिजमिश्रणांच्या कमतरतेमुळे दिसून येतात.
 
खनिजमिश्रणे व त्यांचे विशिष्ट कार्ये:
 
१. कॅल्शिअम (Ca): दुग्धोत्पादन वाढीसाठी, हाडांच्या वाढीसाठी. आणि स्नायूंच्या कार्यासाठी.
२. फॉस्फोरस (P): हाडांच्या वाढीसाठी व त्यांच्या देखभालीसाठी. दुग्धोत्पादन व स्नायूंच्या देखभालीसाठी.
३. सेलेनियम (Se): वार अडकणे, गर्भाशयाचा दाह, बीजांडकोशाच्या सुरळीत कार्यासाठी, सांधा निखळणे व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी.
४. कोबाल्ट (Co): प्रजननासंबंधित तक्रारी, जीवनसत्व निर्मिती (B12) प्रतिकारशक्ती, उत्पादनवाढीसाठी. (लोकर व दूध)..इ.
५. सोडियम (Na): शरीरद्रव्यांच्या सामू नियंत्रणासाठी (उदा. रक्त, प्रोटोप्लासम..इ.), पाणी संतुलन व दुग्धोपादनासाठी. स्नायू व मज्जातंतूच्या कार्यासाठी.
६.पोटॅशिअम (K): मज्जासंस्थेच्या कार्यासाठी, पाणी संतुलनासाठी...इ.
७. मँगनीज (Mn): गर्भाच्या वाढीसाठी, स्तनवृद्धीसाठी, दूध उत्पादन आणि दीर्घकाळ माजासाठी.
८. कॉपर (Cu): हिमोग्लोबीन निर्मितीसाठी, प्रजनन, केराटिन संश्लेषणासाठी (केस व लोकर उत्पादनासाठी), पोटासंबंधित आजारासाठी.
९.झिंक. (Zn): प्रजनन, वासरांच्या वाढीसाठी, आणि पोटाच्या तक्रारीसाठी... इ.
तर अश्या रीतीने जनावरांच्या आहारात वरील खनिजद्रव्यांचा समावेश केल्यास जनावरांचे विविध आजार व लक्षणांपासून संरक्षण केले जाऊ शकते.