आंबा पिकातील फळगळ करणे व उपाययोजना

डिजिटल बळीराजा-2    05-May-2021
|

mango_1  H x W: 
 
ब-याच वेळेस हवामानातील अचानक बदलामुळे फळाची गळ होते. फळ गळती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आंब्याची फळगळ होण्यामागे अनेक कारणे आहेत. महत्त्वाचे कारणे समजवून उपाययोजना केल्यास आंब्याचे फळगळ पासून नुकसान टाळता येईल.
 
आंब्यामधील फळगळीची खालील प्रमुख कारणे आहेत ;
 
१) अत्रद्रव्यांची कमतरता : आंब्याच्या बागेत रासायनिक व सेंद्रिय खताचा खूप कमी वापर केल्यास फळे पोसण्यासाठी अत्रद्रव्यांचा पुरवठा कमी झाल्यामुळे फळांची गळ खूप मोठ्या प्रमाणात होते.
 
२) उष्ण हवामानाचा परिणाम : साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर दिवसा चांगले उन पडून तापमान वाढण्यास सुरुवात होते व तसेच कोरड्या व गरम हवेचे झोत सुरु होतात. या इत्यादी बाबी लहान व कोवळ्या फळास हनिकारक ठरतात. जास्त तापमानामुळे फळातील ऑझीन या प्रकारातील संजीवकाचे प्रमाण खूप कमी होऊन आंब्यामधील फळगळ खूप मोठ्या प्रमाणात होते.
 
३) पाण्याची कमतरता : आंबा फळाच्या वाढीचा काळ हा साधारणत: फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यत असतो. याकाळात आपल्याकडील हवेतील आर्द्रता खूपच कमी असते आणि तापमान खूपच जास्त असते. त्यामुळे वातावरणातील तापमान ४० अंश सें. पेक्षा जास्त असते. अशावेळी जर आंब्याच्या बागेस कमी प्रमाणात पाणी दिले गेले किंवा न दिल्यामुळे फळगळ खूपच मोठ्या प्रमाणात होते.
 
४) किडींचा प्रादुर्भाव: आंब्याच्या मोहोरावर व फळांवर तुडतुड्यांचा फ़ार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तुडतुडे विशेषत: मोहरातील तसेच कोवळ्या पानातील रस शोषुन घेतल्यामुळे पाने वेडीवाकडी होतात आणि मोहर व लहान फळे गळून पडतात. या किडीची एक पिढी पूर्ण होण्यासाठी साधारणत: १७ ते २० दिवस लागतात. तुडतुडे आपल्या शरीरातून मधासारखा चिकट प्रदार्थ पानावर, मोहरावर आणि फळावर सोडतात त्यामुळे त्यावर काळ्या बुरशीची वाढ होवून मोहर काळा पडतो. यालाच शेतकरी मोहर जळाला किंवा खार पडणे असे म्हणतात परिणामत: त्यामुळे फळधारणा होत नाही व उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.
 
५) रोगांचा प्रादुर्भाव : बाल्यावस्थेतील मोहोर तसेच लहान फळांवर भुरी, करपा, शेंडे मर असे रोग येऊन फळांची खूप मोठ्या प्रमाणावर गळ होते. भुरी रोग मोहोरावर, फळावर मोहोराच्या दांड्यावर आलेल्या राखट बुरशीमुळे ओळखता येतो. करपा या रोगामुळे मोहोराचे शेंडे करपणे, पाने करपणे किंवा फळावर करपल्यासारखे काळे ठिपके येणे यामुळे ओळखता येतो . अशा या रोगामुळे फळांची व मोहोराची खूप मोठ्या प्रमाणात गळ होते. ढगाळ वातावरण व मध्यम तापमान हे रोग येण्यास जास्त कारणीभूत ठरतात.

आंब्यामधील फळगळीची व्यवस्थापन –
 
१) हवा रोधक झाडे : बागेच्या भोवताली हवा रोखण्यासाठी शेवरी, रेनटी(Rain tree) इत्यादी झाडे लावावे. त्यामुळे गरम हवा रोखली जावून लहान लहान फळांना उन्हाच्या तीव्रतेपासून वाचविणे सोपे होते.
 
२)आच्छादन :उन्हाळ्यात बागेस पाणी दिले तरी जमीन लवकर कोरडी होते , तसेच जेथे पाण्याची उपलब्धता कमी आहे तेथे जास्त नुकसान होते. अशा बागेत वाळलेला काडीकचरा किंवा उसाचे पाचट यांचे संपूर्ण झाडाखाली ५ ते ८ इंच थर होईल असे आच्छादन करावे .त्यामध्ये वाळवी लागू नये म्हणून १०० ग्रम लिंडेन पावडर टाकावी आणि त्यावर थोडीसी आजूबाजूची माती टाकावी. पाचटामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल व गवत वाढणार नाही परिणामी फळगळीवर नियंत्रण राखता येईल.
 
३) संजीवकाची फवारणी : रोग व किडीचा प्रादुर्भाव लक्षात घेवून न त्याच बरोबर वाढते तापमान, गरम हवा इत्यादी बाबींचा विचार करून खालील प्रमाणे फवारणी करावी.
 
पहिली फवारणी – १०० पाण्यात १.५ ग्रम एनएए (१५ पीपीएम) + गंधक २५० ग्रम + थायोमिथोक्झाम ४० ग्रम + युरिया १ किलो.
दुसरी फवारणी – १०० लिटर पाण्यात १.५ ग्रम एन.ए.ए (१५ पीपीएम) + कार्बोंडेझीम १०० ग्रम + युरिया १ किलो या प्रमाणात १ ते २ फवारण्या १५ ते २० दिवसाच्या अंतराने कराव्यात.