सीताफळ प्रक्रिया उदयोग

डिजिटल बळीराजा-2    05-May-2021
|

shitafal_1  H x 
 
सीताफळ हे कोरडवाहू फळपिकातील महत्त्वाचे पिक आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत सीताफळ पिकाचा हंगाम असतो. सीताफळ हे एक नाशवंत फळ आहे त्यामुळे ते जास्त दिवस साठवता येत नाही. सीताफळ हे पक्व झाल्यानंतर जास्त दिवस साठवता येत नसल्यामुळे त्यामुळे त्यावर प्रक्रिया करुन त्यातील गर वेगळा करुन त्याची साठवुन करुन त्याचापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येतात. त्यामुळे वर्षभर सीताफळाचा आस्वाद घेता येऊ शकतो. या प्रक्रीयेमध्ये सीताफळ गर, गराची पावडर, टॉफी, जॅम, सरबत, सीताफळ टॉफी, श्रीखंड, मिल्कशेक, रबडी, सीताफळ आईस्क्रिम, सीताफळ पेये असे वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. त्यातील आपण श्रीखंड व मिल्कशेक हे पदार्थ बघणार आहोत.
 
श्रीखंड 
 
>> प्रथम पिकलेले निरोगी सिताफळ स्वच्छ धुवून घ्यावे व त्याचा गर काढावा.
>> त्यानंतर त्यात गर 100 ग्रॅम, साखर 500 ग्रॅम व 400 ग्रॅम चक्का मिसळुन मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे.
>> त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता बारीक तुकडे करून टाकावे व ते मिश्रण फ्रिजमध्ये ठेवुन थंड होण्यासाठी ठेवावे.
सीताफळ श्रीखंड_1 &nb
(सीताफळ श्रीखंड)
मिल्कशेक
>> गाईचे किंवा म्हशीचे स्वच्छ दुध गाळुन घ्यावे

>> त्यानंतर ते दुध ७०० से. तापमानास १५ मिनिटे गरम करावे

>> त्यामध्ये ०.४० टक्के सोडियम ऐल्जिनेट मिसळुन त्यात १० टक्के साखर आणि १० टक्के गर किंवा पावडर मिसळुन हे मिश्रण चांगले गाळुन घ्यावे.

>> त्यानंतर ७०० सेल्सिअस तापमानास ३० मिनिटे गरम करावे.

>> परत ते २०० अंश सेल्सिअस ते ४०० अंश सेल्सिअस तापमानाला सात मिनिटे थंड करुन मिक्सरमध्ये घुसळवुन घ्यावे.
 

सिताफळ मिल्कशेक_1 &n
 
(सिताफळ मिल्कशेक)