सानेन शेळी पालन,

डिजिटल बळीराजा-2    03-Mar-2021
|
मा. संपादक
बळीराजा, मासिक, पुणे
नुकतीच एक बातमी वाचली की आपल्या राज्याच्या पशुसंवर्धन मंत्र्यानी सानेन ह्या परदेशी जातीच्या शेळीचे पशुपालकाच्या घरी पालन करण्याचे ठरविले आहे. त्याकरीता परदेशातून ही जनावरे मोठी रक्कम देवून आणली जाणार आहेत. ही शेळी निश्चीतच भरपूर दूध देते पण सध्या आपल्याकडे ठाणबंद शेळीपालन हे रामभरोसे ह्या सदरात मोडेल असे चालू आहे , ह्या मापदंडाने पालन केले तर ते घातक ठरून ऊत्कृष्ठ जेनेटीक मटेरीयल वाया जाईल . पशुसंवर्धन मंत्र्यानी मी नमूद केलेल्या बाबींचा गंभीरपणे विचार करून त्या अंमलात आणण्याकरीता विचार करावा. अगदी प्राथमिक व महत्वाची बाब म्हणजे शेळीचा चारा.. येथे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जाते. शेळीला द्विदल (पान)चारा हा ८०% दिलाच पाहिजे . तरच ती टिकेल. पशुपालक तोंडाने म्हणतात की शेळीला झाडपाला (हा ९५% च्या वर द्विदल वर्गात मोडतो) लागतो .पण पालनात तो एकदल ( जसे हिरवा / कोरडा मका , ज्वारी, बाजरी ,कडवळ , पात वर्गातील वेगवेगळ्या जातीची गवते , सुखा कडबा, इत्यादि ) दिला जातो.ह्यामुळे शेळीची तब्येत सर्व बजूने खालावते व तीचे पालन तोट्यात जाते. शेळीला झाडपाला म्हणजेच द्विदल चारा आवडतो असे म्हटले किवा सांगीतले जाते पण ते चूक आहे ... ( ह्याला जबाबदार प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तसेच कन्सलटंट आहेत) पण शेळीचा नैसर्गिक आहारच मुळी झाडपाला किवा द्विदल चारा आहे. ( जसे सुबाभूळ, शेवरी, लुसर्न , तुती, जास्वंद, मोहरी, बोर, शेवगा, हतगा, दशरथ,वाल , चवळी, स्टायलो, इत्यादी) ह्याची चारा शेती करता येते .द्विदल चाऱ्यामध्ये कडू, आंबट , खारट, तुरट , तिखट ह्या चवींचा चारा जास्त असतो म्हणून तिचे दूध औषधी असते . गेली ५४ वर्षे मी भारतभर पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन कार्य करतो आहे. आपले शेळीपालन पंध्दत सुधारणे आवश्यक आहे.
 
डॅा वासुदेव सिधये
कांचन गल्ली, लॅा कॅालेज रोड, एरंडवणे, पुणे ४
मो ९१-९३७०१४५७६०
दि २८.०२.२०२१