हरबरा पिकाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

डिजिटल बळीराजा-2    27-Mar-2021
|
राज्यात ऐन उन्हाळ्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे कडधान्य पिकामध्ये हरभरा या पिकाचे ज्या शेतकऱ्यांनी ऊस व कपाशी हे पीक काढल्यानंतर उशिरा पेरणी साधारण डिसेंम्बर महिन्यात केली असेल अश्याच शेतकऱ्यांचे या पावसामुळे नुकसान होऊ शकते.
 
तरी शेतकरी बंधूनी हरबरा पिकाचे नुकसान टाळण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात:
 
१) जो हरभरा सध्या काढणी करिता तयार झाला असेल तो कापणी करून सुरक्षित ठिकाणी हवेशीर पसरून ठेवावा, किंवा कापणी झाल्यानंतर हरभरा गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.
 
2) जो हरभरा सध्या घाटे भरलेल्या अवस्थेत व हिरवा असेल असा हरबरा बाजारामध्ये हिरवा हरभरा खाण्यासाठी विकावा.
 
3) उशिरा पेरलेल्या हरभरा पिकावर पाऊस व आद्रता वाढल्यामुळे बुरशी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे,हे टाळण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी.
 
4) काढणीनंतर तयार झालेले हरभरा धान्य चांगले वाळवून साठवणूक करणे.