गहू पिकासाठी मार्गदर्शिका

डिजिटल बळीराजा-2    24-Mar-2021
|
सध्याच्या परिस्थितीत बऱ्याच अंशी गहू पक्व झालेला असून उशिरा पेरलेला गहू मात्र चीक अवस्थेत आहे, अशा वेळी अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे खालील प्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.
 
१) पक्व झालेला व वादळामुळे लोळलेला गहू मजुरांकडून कापणी करून सुरक्षित ठिकाणी वाळवून ठेवावा, व वातावरण निवळताच मळणी करावी.
 
२) उशिरा पेरलेल्या चीक अवस्थेतील गव्हास उंदराचा उपद्रव होण्याची शक्यता असल्याने , बाजारात उपलब्ध उंदीरनाशक अमिशांचा वापर करावा.
 
३) उशिरा (जानेवारीत पेरलेला) गव्हामध्ये वादळामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असते, अशावेळी प्रादुर्भाव दिसून येताच मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची 3 ग्रँम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.