मणिपाल टेक्नोलॉजीज द्वारे उत्तर प्रदेशमधील दुर्गम भागात बँकिंग सेवा सुरु करण्यात आली

डिजिटल बळीराजा-2    28-Feb-2021
|
मणिपाल- मणिपाल टेक्नोलॉजीज लिमिटेडने उत्तर प्रदेश सरकारबरोबर बचत गटातील ८००० महिलांना उत्तर प्रदेश राज्य ग्रामीण आजीविका मिशन (युपीएसआरएलएम) च्या माध्यमातून बँकिंग संवाददाता सखी म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार बरोबर करार केला.
 
एमटीएलणे ग्रामीण विकास मंत्री राजेंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती कंपनीने दिली. या युपीएसआरएलएम च्या प्रकल्पाद्वारे राज्यातील ७५ जिल्ह्यातून सुमारे ५८००० ग्रामीण स्त्रियांना बी. सी. सखी किंवा बँकिंग एजंट म्हणून प्रशिक्षण देण्याचे या मिशनचे उदिष्ट आहे असे सांगितले.
 
युपी च्या सर्व ७५ जिल्ह्यातील ग्रामीण भागात डोअर- स्टेप बँकिंग सर्विसेस सुरु करून खेड्यांमध्ये बँकिंग सेवांमध्ये वाढ करणे हे या प्रकल्पाचे उदिष्ट्य आहे. यामुळे या ग्रामीण महिलांना बचत गटाचे घरगुती उत्पन्न वाढवून डीजीटल आर्थिक तंत्रज्ञानात त्यांचे शिक्षण हि होईल.
 
एमटीएलचे उपाध्यक्ष राजेश शेट म्हणाले, आमचा सुरक्षित आणि वापरण्यास सुलभ अश्या या तंत्रज्ञानाचा उपयोग आता उत्तर प्रदेशातील ग्रामीण महिलांना अनेक बँकिंग सेवा पुरवण्यासाठी तसेच त्यांचे उद्योजक कौशल्य जास्तीत जास्त लोकांना दाखविण्यासाठी मदत करेल. ग्रामीण भारतातील डीजीटल पेमेंटचा वापर, तसेच अनेक नवीन सेवा दारावर पुरवतील , असे बदल घडवून आणणाऱ्या बी सी सखीस या बदल घडवून आणणाऱ्याएजंट म्हणून काम करतील., तसेच ते हेही म्हणाले कि, एमटीएल भारतातील ९०००० गावामध्ये डिजिटल पेमेंट सेवा पुरवत आहेत. कर्नाटक सहित संपूर्ण ग्रामीण भारतातील ८.५ लाख व्यापारी व्यतिरिक्त २.३ कोटी लोक्संखेमध्ये आमच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बी सी सखी डीजीटल पेमेंट आणि बँकिंग सेवा पुरवत आहेत.
 
राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (एनआरएलएम) च्या पुढाकाराने , प्रत्येक बीसी सखीला पहिल्या सहा महिन्यांसाठी २४,००० रुपयांची मदत मिळेल. त्यांना गावात अखंड बँकिंग सेवा देण्यासाठी एकात्मिक पीओएस डिव्हाईस क्याश बॉक्स , बनावट चलन डिटेक्टर डिव्हाईस इत्यादी विशिष्ठ प्रशिक्षण दिले जाईल. सध्याच्या साथीच्या काळात सुरक्षा आणि स्वच्छता राखण्यासाठी , ग्राहकांच्या प्रमाणीकरणासाठी contactless iris scanner देखील प्रदान करण्यात येतील.
 
एनआरएलएम च्या पुढाकाराने स्थानिक महिलांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने बँकिंग आणि इतर डिजिटल पेमेंट सेवा ग्रामीण ग्रामपंचायतींमध्ये प्रदान करण्यासाठी एनआरएलएम चे हे एक मोठे पाऊलआहे जेणेकरून ग्रामस्थांना मुलभूत बँकिंग आणि पेमेंट सेवे साठी लांब पल्ल्याची गरज भासू नये.