कोळंबी लोणचं

डिजिटल बळीराजा-2    04-Jan-2021
|

vgj_1  H x W: 0

• साहित्य: १/२ किलो कोळंबी (सोललेली आणि मधला धागा काढलेली), 1 टीस्पून. हळद, 2 टीस्पून. तिखट, 1 टेस्पून. आलं लसूण पेस्ट, 100-150 मिली मोहरी तेल, 1 टेस्पून. मोहरी, २ टीस्पून. हिंग, पाऊण कप लसणीचे मध्यम आकाराचे तुकडे, अर्धा कप आल्याचे मध्यम आकाराचे तुकडे, 3 टेस्पून. लोणचं मसाला, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस किंवा व्हाईट व्हिनेगर चवीनुसार.
 
• कोळंबीला हळद, मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट लावून किमान अर्धा तास मुरवत ठेवा. मोहरीचं तेल तापवून त्यात मुरलेली कोळंबी माध्यम आचेवर तळून घ्या. कोळंबी थोडी डार्क ब्राउन तळावीत, जेणेकरून कोळंबी क्रिस्पी होतील आणि लोणचं टिकाऊ होईल. तळणीच्या राहिलेल्या तेलात मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्या.
 
• तळलेली कोळंबी आणि फोडणी पूर्ण थंड झाली की एका भांड्यात तळलेली कोळंबी, आल्या-लसणाचे तुकडे, तिखट, मीठ आणि लोणचं मसाला प्रेमाने एकजीव करा. थोडक्यात कोळंबीला मसाजच करा. आता त्यावर फोडणीचे तेल, मोहरी घालून, मस्त लिंबू पिळा. लोणचं एकजीव करून काचेच्या सुक्या जार/बरणीत काढून घ्या.