पौष्टिक पपई लाडू

डिजिटल बळीराजा-2    04-Jan-2021
|

BGH_1  H x W: 0
 

• साहित्य- १ कप पपईचा पल्प, १ कप डेसिकेटेड कोकोनट, १ मोठा चमचा चिरलेला गूळ, २ मोठे चमचे मिल्क पावडर, १/२ चमचा वेलची पूड, सजावटीसाठी बदाम-पिस्ता काप.
• पॅनमध्ये पपईचा पल्प घालून मध्यम आचेवर शिजवा. नंतर त्यात गूळ घाला. गूळ घातल्यावर मिश्रण पातळ होईल.
• मिश्रण थोडं घट्ट होत आलं की डेसिकेटेड कोकोनट घाला. मग पूर्ण पाणी सुकेपर्यंत पल्प शिजवा.
• मिश्रण सतत ढवळत राहा. नाहीतर मिश्रण तळाला लागण्याची शक्यता असते. मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करा.
• मिश्रण थोडं कोमट असतानाच, त्यात मिल्क पावडर, वेलची पूड (आवडत असल्यास घाला, कारण पपईची नैसर्गिक चव असणारच आहे) घालून एकजीव करा.
• फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा.
• नंतर काढून मिश्रणाचे लाडू वळा आणि डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवा. वरून पिस्ता-बदाम काप लावून सजवा (सजावटीसाठी चांदीचा वर्खही लावू शकता).
• मस्त पौष्टिक असे हे पपईचे लाडू लहान मुलांना खाऊ घाला आणि मोठ्यांनीही खा.