असे करा थंडी पासून केळी पिकाचे सरंक्षण

डिजिटल बळीराजा-2    04-Jan-2021
|

df_1  H x W: 0
 
मागील काही दिवसापासून तापमानात झालेली घट आणि ढगाळ वातावरणामुळे केळी पिकावर परिणाम झालेला दिसून येत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण नसल्यामुळे निसवणीची क्रिया मंदावली आहे. किमान तापमानात घट झाल्यामुळे केळीच्या मृग व कांदे बागांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्याच प्रमाणे वाढत्या थंडी मुळे कंदाच्या उगवणीला उशीर होणे, ऊती संवर्धित रोपे लावलेली असल्यास वाढ खुंटणे, घड निसवण्यास उशीर लागणे, पाने पिवळी पडणे व करपणे या सारख्या समस्या बागेत दिसून येतात हे टाळण्यासाठी वेळीच उपाय योजना करणे आवश्यक आहे. केळीबागेमध्ये खालील प्रमाणे उपाय योजना कराव्यात.• हिवाळ्याच्या दिवसात दिवसा पाणी देण्या ऐवजी रात्री पाणी द्यावे विशेषतः या दिवसात बागेला पाण्याचा ताण देवू नये. बांधावर तसेच बागेमध्ये ठिकठिकाणी रात्री शेकोटी पेटवून धूर करावा जेणे करून सूक्ष्म वातावरणातील उष्णता वाढते.
• थंडीच्या दिवसात थंड वाऱ्यापासून सरंक्षण करण्यासाठी बागेभोवती शेडनेट, बारदान किंवा ताटीचे कुंपण करावे. तसेच सजीव कुंपण करण्यासाठी ज्वारी,बाजरी,मका किंवा कडबा यांच्या पेंड्या पश्चिम किंवा उत्तर कडील बाजूस लावाव्यात.
• बागेतील निसवलेल्या घडांवर स्कर्टिंग पिशव्या लावाव्यात.
• करपा रोगाच्या वाढीच्या साठी किमान तापमानातील घट पोषक ठरते या करिता कार्बेन्डाझीम १० ग्रम किंवा प्रोपिकोन्याझोल १० मी.ली. अधिक स्टीकर १० लिटर पाण्यात मिश्रण करून फवारणी करावी.
• ज्या ठिकाणी नवीन कांदे बागेची लागवड केली आहे अश्या ठिकाणी प्रती झाड २०० ग्रम निंबोळी पेंड द्यावी.