सुधारीत व आधुनिक पद्धतीने फुलांचे पॅकिंग व वितरण

डिजिटल बळीराजा-2    04-Jan-2021
|
बरीच शेतकरी आणि गार्डनर्स (माळी) व्यावसायिक आधारावर फुले उगवतात. भारतात प्रत्येक अंगणात फुले असतात. फुलांचा वापर हा सर्व स्तरातील लोकांमध्ये मोठया प्रमाणात केला जातो. अलिकडे फुलशेती हा व्यावसायिक दृष्टया अतिशय महत्वाचा आणि फायदेशीर व्यवसाय होत असल्याचे दिसून येत आहे. फुलपिकांमध्ये गुलाब, शेवंती, झेंडु, झिनिया, ऍस्टर, निशीगंध, गीलारडिया, ग्लॅडिओलस, मोगरा, जाई, जुई या पिकांची शास्त्रीय पद्धतीने लागवड करुन भरपुर उत्पादन घेता येईल. अलीकडे हरितगृहामध्ये फुलशेती बहरु लागली आहे. हरितगृहामुळे आता बाराही महिने बाजारात फुलांचा पुरवठा करणे शक्य झाले आहे. फुलांना योग्य ती बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांचे काढणीपश्च्यात व्यवस्थापण अतिशय महत्वाचे आहे. फुलांचे उत्पादन मुख्यत्वेकरुन परदेशी निर्यात करण्याच्या दृष्टीकोनातुन आणि स्थानिक बाजारपेठेचा देखील विचार करुन मोठया प्रमाणात केला जातो. हरितगृहातील फुलशेती परदेशी बाजारपेठेसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे विविध देशांच्या कोणत्याही सिझनमधील मागणीनुसार फुलांची प्रतवारी, पॅकिंग करुन त्या त्या देशात फुले पाठविली जातात. फुलांचे उत्पादन मोठया प्रमाणावर होत असले तरी मात्र, फुलांचे पॅकिंग हे मागणीनुसार नाही त्यामुळे फुलांचे बरेच नुकसान होते. सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या फुलांची बाजारपेठेपर्यंत ने-आण गोणपाटातुन किंवा बांबुच्या टोपलीतुन केली जाते, त्यामुळे फुलाची प्रत चांगली राखली जात नाही आणि पर्यायाने बाजारपेठेत किंमत मिळत नाही. त्यासाठी सुधारीत पद्धतीने फुलांचे पॅकिंग व वितरण करणे फार महत्वाचे आहे. पॅकिंगबद्दल पाहायचे म्हटले तर सध्याच्या प्रचलित परिस्थीतीनुसार फुले बाजारपेठेत पाठवताना सहजासहजी आणि स्वस्त दराने उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर केला जातो.
उदा. १) गोणपाटाच्या पिशव्या किंवा जाड कापडाच्या ताडपत्रीच्या पिशव्या
२) फक्त फुलांच्या जुडया बांधुन
3) बांबुच्या टोपल्या किंवा करंडया
 
 
cvgbhj_1  H x W

अशा प्रकारच्या साधनांचा वापर पॅकींगसाठी केल्यास बहुतांश फुले बाजारपेठेत नेताना अथवा नेल्यानंतर लवकर खराब होतात, फुलांना ताजेपणा दिसत नाही आणि त्यामुळे बाजारपेठेत उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित किंमत मिळत नाही. फुलांना सामाजिक व धार्मिक प्रतिष्ठा लाभल्यामुळे सर्व प्रकारच्या महत्वाच्या कार्यात फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे फुलांची काढणी करताना ३० ते ४५ सेमी लांब फुलांची दांडी ठेवणे आवश्यक असते. 
 
- सुधारीत प्रकारचे पॅकिंग करण्यासाठी पुढीलप्रमाणे पॅकिंगची साधने वापरतात.
 
१) कोरुगेटेड फायबर बॉक्सेस सी.एफ.बी. बॉक्सेस
२) पॉलिथीन पिशव्या
३) वापरलेल्या /नवीन फळांची/ चहाची खोकी
४) पॉलिथीन शीट किंवा पेपर
५) प्लॅस्टिक क्रेट/खोकी


   cvgbhjd_1  H x
 

        cvgbhjdfc_1  H  
 
        cvgbhjdfce_1  H 
 
वरीलप्रमाणे पॅकिंगसाठी साहित्य वापरल्यास उत्पादकाला थोडाफार ज्यादा खर्च करावा लागतो. मात्र त्यामुळे फुले बाजारपेठेत अधिक सुरळित आणि सुस्थितीमध्ये पाठविता येतात व पर्यायाने बाजारपेठेत फुलांना किंमतदेखील चांगली मिळते. पॉलिथीनचे साहित्य वापरताना ७.५ सेमी. रुंदीचे शीट वापरल्यास फुलांची हाताळणी योग्य प्रकारे करता येते आणि त्यापासुन किंमतही चांगली मिळते. तसेच फुलांचे दांडे सुक्रोजच्या पाण्यात किंवा सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणात ४ ते ६ तास ठेवल्यास ५ ते २ दिवसांनी फुलांचे आयुष्यमान वाढविता येते. फुलांचे पॅकिंग ३ टप्प्यात करतात.
 
१. जुडया/गड्डी बांधणी : जातीपरत्वे ठराविक संख्येच्या फुलांच्या पानांचे व फुलांचे नुकसान टाळुन जुडया बांधाव्यात. दांडीच्या खालचा भाग (बुंधा) रबर बँडचा वापर करुन घट्ट बांधावा.

c9_1  H x W: 0
 
२. कागद गुंडाळणेः जुडया बांधल्यानंतर वर्तमानपत्राच्या कागदामध्ये जुडया गुंडाळाव्यात व पॉलिथीन पेपरचा वापर केल्यास त्यामध्ये पाणी साचुन राहत असल्याने बुरशी वाढुन फुले खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पॉलिथीन पेपरचा वापर टाळावा.

c9e_1  H x W: 0
 
३. कोरुगेटेड बॉक्सेस पॅकिंग : फुले निर्यात करण्यासाठी कोरुगेटेड बॉक्सेसचे काही प्रकार विकसित असुन त्यामध्ये फुलांची पॅकिंग करुन फुले बाजारपेठेत पाठवावी.
 
c9et_1  H x W:

c9ets_1  H x W: 
 
वर्तमानपत्राने/ कागदाने (टिश्यु पेपर) गुंडाळलेली फुले अलगद फुलांचे नुकसान न होऊ देता बॉक्समध्ये भरावीत, नाजुक फुलांचे नुकसान होऊ नये म्हणुन पेटीच्या दोन्ही बाजुस २ ते ३ से.मीचा लाकडी भुसा अथवा कागदी तुकडयांचा थर दयावा.
 
वितरणः फुलांचे पॅकींग झाल्यानंतर सर्व प्रकारची फुले बाजारामध्ये पाठविली जातात. यामध्ये झेंडु, गुलाब, ऍस्टर, ग्लॅडिओलस आणि निशीगंधासारखी फुले वर्षभर उपलब्ध होतात. विक्रीसाठी हा माल मुंबई, सुरत, दिल्ली, बडोदा यांसारख्या मोठया व मेट्रो शहरात पाठवला जातो. परदेशी निर्यातीसाठी शीतवाहनातुन वाहतुक करुन हवाई मार्गाने निर्यातदारांना पाठविला जातो.

डॉ. गोंडाणे एस.पी. आणि डॉ. कादरी आय. ए.
कृषि महाविद्यालय, कांचनवाडी, औरंगाबाद.