पी. आर. दादा पाटील यांची महाराष्ट्र राज्य सरकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड

डिजिटल बळीराजा-2    27-Jan-2021
|

Dada Patil_1  H
 
 
माजी मंत्री कै. राजाराम बापू पाटील यांचे अत्यंत जवळचे सहकारी ही पी. आर. दादांची ओळख आहे. राजाराम बापूंचे चिरंजीव नामदार जयंतरावजी पाटील यांनी सूत्रे हातात घेतल्यावर बापूंचे विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी पी.आर. दादा पाटील यांनी बापूंनी सुरू केलेला राजाराम बापू पाटील सह. साखर कारखाना याचे नेतृत्व स्वीकारले. जयंतरावांच्या पाठिंब्यामुळे पी.आर. दादा गेली 26 वर्षे कारखान्याचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अवघ्या 12,000 सभासदांचा हा कारखाना उत्तम चालवून साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी अशा तीन युनीटचे उत्कृष्ट व्यवस्थापन त्यांनी केले. सभासदांचे ऊसाचे एकरी उत्पन्न वाढविण्याठी ऊस विकास कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी केली. त्यांच्या या प्रयत्नांची राजरामबापू कारखान्याच्या 3200 पेक्षा जास्त सभासदांना एकरी 100 टनाहून जास्त उत्पादन मिळते. वसंतदादा साखर संस्थेच्या ऊस उत्पादनाचे अनेक पुरस्कार कारखान्याच्या सभासदांनी मिळवले आहेत. कारखान्याचे विद्राव्य खत प्रकल्प, बायोफर्टीलायझर प्रकल्प उत्तम सुरू आहेत. श्री. पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू कारखाना ऊस गाळपामध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
श्री. पी. आर. दादा हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे आहेत. शेकडो शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, व्यापारी, सप्लायर्स सर्वांशी गोड बोलून उत्तम संबध ठेवून कामे करून घेणे ही त्यांची खासियत आहे. मा. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना उत्तम सुरू आहे. 15 वर्षांपासून कारखान्याच्या सर्व ऊस उत्पादक सभासदांची बळीराजा मासिकाची वर्गणी कारखान्याच्या स्वनिधीतून भरली जाते. याचे फायदे दृष्य स्परूपात अनुभवले जातात. सभासद शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पन्न खूपच वाढले आहे. ऊसाबरोबर, आंतरपिके, भाजीपाला, पशुपालन, जोडधंदे असे अनेक उपक्रम एकरी 100 टनाहून जास्त ऊसाचे उत्पन्न घेतात. आज वाळवा तालुक्याचे शेतकऱ्यांचे उत्पन्न भारतात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.
 
या यशाचे श्रेय मा. जयंतरावजी पाटील यांचे नेतृत्व आणि पी. आर. दादा पाटील यांचे नवनवीन योजनांची यशस्वी अंमलबजावणी करणे याला आहे.
 
महाराष्ट्र राज्य सह साखर कारखाना संघ ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी कारखान्यांची शिखर संस्था आहे. साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी व सहकारी साखर कारखानदारीला पी. आर. पाटील यांच्या अनुभवाचा खूप फायदा मिळणार आहे. बळीराजा परिवारातर्फे पी. आर. दादा पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील नव्या जबाबदारीसाठी खूप खूप शुभेच्छा!