“ पक्षामधील बर्ड फ्ल्यु , लक्षणे व उपाय ”

डिजिटल बळीराजा-2    27-Jan-2021
|
 
vfv_1  H x W: 0
 
    बर्ड फ्ल्यू हा विषाणूजन्य आजार असून तो संसर्गजन्य व घातक असा आहे. हा आजार कोंबडीवर्गीय व बदकवर्गीय पक्षामध्ये आढळतो. या आजाराला एव्हियन इंफ्लूएंझा या नावाने ओळखले जाते. हा आजार प्रथम इटलीमध्ये सन १९०० व्या दशकात आढळला गेला. त्यानंतर सन १९६१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत या आजाराने हाहाकार माजवला त्यामुळे लाखो पक्षी संक्रमित झाले. हे शांत होत नाही तोच १९८३ मध्ये व्हर्जिनिया मध्ये कितीतरी लाख कोंड्यांना मारले गेले. जगामध्ये हाँगकाँग या देशात बर्ड फ्ल्यू हा आजार माणसांना देखील होतो हि जगातील पहिली घटना सन १९९७ मध्ये झाली याची पुष्टी मिळाली कारण तेथे १८ जणांना हा आजार झाला व त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला, त्याचबरोबर पक्षांना देखील हा आजार होऊन १५ लाख कोंबड्या मारण्यात आला. विषाणूचा नवीन स्ट्रेन H7N7 यामुळे सन 2003 साली नेदरलंड मध्ये ८४ जणांना बाधा होऊन एका जनाचा मृत्यू झाला. २०१९ साली १५५० जणांना H7N9 या नवीन स्ट्रेनची बाधा होऊन ६०० जणांचा मृत्यू झाला.
   भारतामध्ये या आजाराची नोंद प्रथम २००६ साली महाराष्ट्र गुजरात सिमेवरील असलेल्या नावापुर मध्ये होऊन तब्बल २.५ लाख कोंबड्या मारण्यात आल्या, तसेच ५ लाखापेक्षा जास्त कोंबड्यांची अंडी नष्ट करण्यात आली. आपल्या देशात हा आजार मानसांना झाला आहे हि आजपर्यंत नोंद नाही. नोंद फक्त विदेशामध्ये झालेली आढळते.
 
H व N याविषयी थोडक्यात माहिती :-
 
H म्हणजे हेमाग्युलेटीन होय. याचे १८ प्रकार आहेत.
 
N म्हणजे न्यूरामीनिडीज होय. याचे देखील ११ प्रकार आहेत.
 
H व N हे विषाणूचे प्रोटिन स्ट्रेन आहेत. या प्रकारातील H5, H7 व H10 यामुळे माणसांचा मृत्यू होण्यास कारणीभूत ठरत आहेत, आणि याच कारणामुळ H5N9 हा स्ट्रेन मानवासाठी धोकादायक ठरू शकतो.
 
प्रसाराची कारणे :-
• हा आजार विषाणूमुळे होत असल्याकारणाने याचा प्रसार विषाणूमुळेच होतो.
 
• बाधित पक्षांच्या नाक व डोळ्यामधून स्त्रवणारा स्त्रावामधून या आजाराचा प्रसार होतो.
 
• तोंडामधील लाळेमधून देखील या आजाराचा प्रसार होतो.
 
• खादय, पाणी याद्वारे देखील आजाराचा प्रसार होतो.
 
• विष्टेमधून देखील याचा संसर्ग होतो.
 
• संक्रमित पक्षाने पंख झटकले तरी या आजाराचा विषाणू इतर ठिकाणी पसरतो.

लक्षणे :-
1. बाधित पक्षांना अतिसार होतो. २. श्वासोश्वास घेताना त्रास होतो.
 
३. संक्रमित कोंबड्या या अंडी देतात पण अंड्याचे पांढरे कवच लवचिक /नरम असतात.
 
४. डोक्यावरील तुरा हा काळपट निळसर पडतो.
 
लक्षणे:-
१. या आजारग्रष्त पक्षांना ताप येतो. २. गळ्यामध्ये सूज येते.
 
३. घसा खवखव करतो. ४. श्वासोत्सवास घेण्यास त्रास होतो.
 
५. छातीमध्ये कफ होतो. ६. मळमळ होते, उलटी होते.
 
उपाय :-
• टॅमीफ्ल्यू नावाच्या गोळ्या यावर प्रभावशाली आहेत.
 
• रेलेंझा ( Relenza ), रॅपीवब (Rapivab) प्रकारच्या गोळ्या देखील डॉक्टर देतात.
 
• वरील प्रकारच्या गोळ्या या डॉक्टरांच्या मदतीनेच घ्याव्यात कारण यामुळे दुष्परिणाम देखील होण्यास मदत होईल.
 
• मेलेले पक्षी हे खोल खड्ड्यात नेऊन टाकाव्यात व त्यावर चुन्याची पावडर टाकून पुरून टाकाव्यात.
 
• ज्या भागात याचा संसर्ग झाला आहे त्याच्या सभोवतालच्या १० किमी पर्यंतचा भाग अलर्ट झोन म्हणून घोषित करावा.
मानसामध्ये कशाने प्रसार होतो
 
 संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात आल्यास माणसास बाधा होऊ शकते.
 
 याचे विषाणू हे नाकाद्वारे, डोळयावाटे, तोंडावाटे, लाळेवाटे याचार प्रसार होऊ शकतो.
 
 बाधित पक्षांचे मांस व अंडे हे कच्चे सेवन केल्यास हा आजार होऊ शकतो.
 
लक्षणे :-
1. शरीराचे तापमान हे जास्त होते. २. डोके दुखण्याचा त्रास होतो.
 
३. गळ्यात सूज येते, श्वासोश्वासास अडथळा येतो. ४.घसा देखील खवखव करतो.
 
५.खोकला येतो. ६. मळमळ , उलटी सारखा त्रास होतो.
 
उपचार
• संक्रमित कोंबड्यांचा संपर्क टाळला पाहिजे.
 
• कुक्कुटपालनास भेट शक्यतो टाळावी.
 
• मांस व अंडी खाताना / सेवन करताना ते पुर्णपणे नर्जंतुक करूनच, चांगले शिजवूनच सेवन केले पाहिजे.
 
• या आजाराची व कोरोंना आजाराची लक्षणे यात साम्य असल्यामुळे एस एम एस चा वापर केला पाहिजे म्हणजेच हात हे साबनाने / सानिटायजरने धुतले पाहिजेत, , याचा प्रसार हा नाकावाटे, तोंडावाटे लाळेवाटे होत असल्यामुळे मास्क देखील घातलाच पाहिजे. संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात येऊ नये/ संपर्क हा टाळलाच पाहिजे.
 
वरील लेखाद्वारे या आजाराची माहिती मिळण्यास तसेच कशा पद्धतीने प्रतिबंध केला पाहिजे याविषयी माहिती मिळण्यास मदतच होते.
 

vf_1  H x W: 0