सनड्राइड टोमॅटोंचं लोणचं

डिजिटल बळीराजा-2    26-Jan-2021
|

df_1  H x W: 0

प्रत्यक्षात लागणारा वेळ: ५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
• वाटीभर वाळके टोमॅटो. (कॅलिफोर्निया सनड्राइड टोमॅटोचे काप वापरले.)
• मोठा चमचाभर मोहरीगर. मोहरीगराऐवजी (किंवा बरोबर) एक मोठा चमचा कैरी लोणच्याचा तयार मसाला.
• १ चमचा तिखट
• चवीप्रमाणे मीठ
• वाटीभर किसलेला गूळ.
• अर्धी (किंवा पाव) वाटी तेल
• लहान चमचा मोहरी
• एक लहान चमचा बडीशेप
• हिंग
 
क्रमवार पाककृती:
• तेल कढवून घ्यावं. ह्यात मोहरी, बडीशेप तडतडवून हिंग घालावा.
• एका भांड्यात टोमॅटोचे काप घेऊन त्यात तिखट, गूळ, मसाले, मीठ एकत्र करावं.
• तेल कडकडीत गरम असतानाच टोमॅटॉच्या कापट्यांवर ओतून नीट कालवून घ्यावं.
 
अधिक टिपा:
हे टोमॅटो जरा चिवट आणि आंबट असतात. तेव्हा गूळ बर्र्‍यापैकी घालावा लागतो. गरम तेलामुळे (आणि वितळलेल्या गुळाच्या पाकामुळे) किंचित मऊ होतात.
ह्यात खारकांचे तुकडे आणि मनुका घातल्या तरी छान लागतील.