शेळीपालन : शेती पूरक व्यवसाय

डिजिटल बळीराजा-2    08-Jun-2020
|

 शेळीपालन_1  H
 
कोकणची भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्राच्या इतर विभागाच्या तुलनेत अतिशय वेगळी असून पशुव्यवसायामध्ये शेळीपालन हा व्यवसाय शेतकर्‍यास खात्रीशीर उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. कोकणातील शेळ्यांची सद्यस्थिती, निवड पद्धत, गोठ्यातील व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन व लसीकरण संबंधीची विस्तृत माहीती या लेखात वाचावयास मिळणार आहे.
 
भारतीयअर्थव्यवस्था मुखयत्वे शेतीवर अवलंबून आहे. तरभारतीय शेती निसर्गावर अवलंबून आहे. देशातीलएकूण शेतकर्‍यांपैकी 80 टक्के शेतकरी लहान व अल्पभूधारक आहेत. जागतिककारणामुळे शेतमालाच्या बाजारभावावर परिणाम दिसून येत आहेत. बदलत्या हवामानात शेतकर्‍यांना शेतीतून खात्रीशीर उत्पन्नाची हमी देणार्‍या शेती अथवा शेतीपूरक व्यवसायाची गरज आहे. पशुव्यवसायामध्ये शेळीपालन हा व्यवसाय शेतकर्‍यास खात्रीशीर उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. 
 
शेतकर्‍यांचीआर्थिक परिस्थिती, घरातील महिलांचा शेतीमधील सहभाग, खाद्याचे उपलब्ध स्त्रोत त्याबरोबरच शेळी पैदास आणि मटणासाठी बाजारातील मोठ्या प्रमाणात मागणी यासाठी शेळी पालन या व्यवसायास अनन्य साधारण महत्व आहे. 
 
कोकणाची भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्राच्या इतर विभागाच्या तुलनेत अतिशय वेगळी आहे . कोकण हा डोंगर उताराचा भूप्रदेश असून येथील हवामान दमट आणि उष्ण आहे. कोकणातील अति पर्जन्यमान व उष्ण दमट हवामानाच्या भूप्रदेशासाठी योग्य अशी स्थानिक शेळ्यांची जात शेळ्यांच्या कळपातून सर्वेशण करून निश्चित केलेल्या गुणधर्माच्या आधारे अधिक उत्पादन क्षमतेसाठी निवडलेल्या शेळ्यांमध्ये सुधारणा करून ‘ कोकण कन्याळ ’ हि नवीन शेळीचीसुधारितजातडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाने2010 साली प्रसारित केली आहे. सदर शेळीच्या जातीची नोंद राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन ब्यूरो यांचेकडे इंडिया गोट 1100- कोकण कन्याळ- 06022 अशी करण्यात आली आहे. या जातीच्या पैदाशीचा स्रोत दक्षिण कोकण आहे.कोकणातील कोकण कन्याळ हि जात भूमिहीन, अल्पभुधारक, सुशिक्षित बेरोजगार वर्गामध्ये अधिकच लोकप्रिय झाली आहे. ह्या शेळीच्या जातीची वैशिष्ठे खालीलप्रमाणे आहेत.
 
कोकण कन्याळ जातीची वैशिष्ठे:-
1. शेळी जात स्थानिक शेळ्यांपेक्षा चांगलीच उंच, शरीराने काटक असून आकाराने मोठी आहे.
2. कान लांब, लोंबकळणारे, चपटे आणि काळ्या रंगासह पांढरी किनार असणारे असतात.
3. चेहरा, मान आणि कानावर काळ्या रंगासह पांढरी किनार असणारे असतात.
4. डोक्यावर नाकपुड्यांपासूनकानापर्यंत दोन्ही बाजूंनी काळ्या रंगासह पांढरी किनार असते.
5. कपाळ पसरट आणि रुंद असते.
6. शिंगेगोल टोकदार मागे वळलेली, मानलांबवतोंडापासूनशेपटीपर्यंत शरीराचा जास्त लांबपणा असतो. 
7. शेपटी वरील बाजूने काळी आणि खालील बाजूने पांढरी असते.
8. मादीचा बांधा मोठा असल्यामुळे एकापेक्षा जास्त करडे (गर्भ) गर्भाशयात जोपासण्याची क्षमता आहे. नर बोकड उंच, छाती भरदार, शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असलेला आहे.
9. याशेळीजातीच्यापरिपक्व नराची सरासरी उंची 87.2 सेमी आणि मादीची 69.6 सेमी असून, छातीचा घेर नरामध्ये 87.8 सेमी. तर मादीमध्ये 73.8 सेमी आहे. शरीराची लांबी नरामध्ये 83 सेमीव मादीमध्ये 72.8 सेमी आहे.
10. डोंगर दर्‍यांच्या प्रदेशात चरावयास चालण्यासाठी आवश्यक असे मजबूत व काटक पाय, टणक वउंच खुर असे विशिष्ठ गुणधर्म असलेली कोकणातील डोंगर दर्‍यांच्या प्रदेशास योग्य अशी शेळीआहे.
 
कोकणातील शेळ्यांची सध्यस्थिती:-
सन 2012 च्या पशुगणनेनुसार कोकणात एकूण 3.16लक्ष शेळ्या आहेत. यापैकी सर्वाधिक शेळ्या ठाणे जिल्ह्यात 1.13 लक्ष असून त्याखालोखाल रायगड 0.98लक्ष, रत्नागिरी 0.66 लक्ष आणि सिंधुदुर्ग 0.39 लक्ष एवढ्या शेळ्या आहेत. सन 2003 च्या पशुगणनेनुसार कोकणामध्ये एकूण 4.61 लक्ष शेळ्या होत्या. या आकडेवारीवरून सन 2012 सालापर्यंत कोकणात शेळ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. याचे कारण शासनाने सन 1990 सालापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीमध्ये कोकणाचा समावेश केल्यामुळे कोकणात शेळ्या चराईबंदी करण्यात आली होती. त्यामुळे शेळ्यांच्या संख्येत मोठी घट झालेली आहे. आज कोकणात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळेकोकणातील चराई क्षेत्र कमी झाले आहे. रोजगार हमी योजनेपुर्वी सन 1981-82 साली कोकणात आंबा व काजू लागवडीखाली 9000 हेक्टर क्षेत्र होते. त्यामध्ये वाढ होऊन 261050 हेक्टरइतके क्षेत्रझाले आहे. या फळबाग लागवडीतील झाडे 10 वर्षापेक्षा अधिक वयाची झाली आहेत. त्यामुळेया बागेत प्रती एकर 5 शेळ्या याप्रमाणे 3263125 शेळ्या फळबागेत वाढणार्‍या झाडाझुडूपांपासूनमिळणार्‍या चार्‍यावर तसेच बागेच्या कुंपणाला चार्‍याच्या झाडाची लागवड केल्यास त्यापासून मिळणार्‍या चार्‍यावर शेळीपालन व्यवसाय करता येतो. कोकणातील अशा बागायतदार शेतकर्‍यांना चराई पद्धतीने किवा अर्ध बंदिस्त पद्धतीने शेळीपालन करण्यास मोठा वाव आहे.
 
आंबा व काजू फळझाडांचीलागवडही 10 ु 10 मीटर व 5 ु 5 मीटरअशा प्रकारची असते, अशाप्रकारच्या लागवडीमध्ये जर चारा पिके किंवाझुडुपे यांची लागवड केली तर शेळ्याना बागेत चरावयास सोपे जाऊ शकते.तसेच फळबागेतइतरत्र वाढणार्‍या झाडाझुडुपांचे व गवताचे नियंत्रण होण्यास मदत होते. तसेच शेळ्या बागेत चरल्यामुळे त्यांचे मूत्र व लेंडी बागेतच पडत असते त्याचा फळझाडाना खत म्हणून चांगला उपयोग होतो. तसेच जमिनीचा पोतसुधारतो आणि जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते. आजसेंद्रिय शेतीकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. शेळीपालनाचा सेंद्रिय शेतीसाठी उपयोग होऊ शकतो. 
 
शेळी पालनात 70 प्रतिशत खर्च हा शेळीच्या खाद्यावर होतो. शेळीच्या खाद्यात 60 प्रतिशत भाग झाडांच्या पाल्याचा असून 40 प्रतिशत भाग लागवड केलेल्या हिरव्या चार्‍याचा असतो. म्हणून शेळीच्या आहारातझाडा झुडूपांना अधिक महत्व आहे.
 
कोकणात अतिशय पाऊस पडतो, पावसामुळे दरवर्षी शेतजमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत असते. तसेच जलमार्गत आणि जलाशयात गाळ साचतो. त्यामुळे जलमार्ग बंद पडतात. जलाशयातील पाणीसाठा कमी होतो. फळबागेत वाढणार्‍या चार्‍याच्या आच्छादनामुळे जमिनीची धूप थांबण्यास प्रतिबंध होतो. तसेच त्याचा शेळ्यांना चारा म्हणून उपयोग होतो. कोकणात आंबा व काजू फळबागांमध्ये इतर गवत व झाडपाल्याचे प्रमाण जास्त असते.कोकणातील बरेच शेतकरी गवत व झाडपाल्याचे नियंत्रण करण्यासाठी त्याला जाळून टाकतात, अशा वेळी फळबागेचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. जरह्याच गवताची व झाडपाल्याची कापणी करून वाळवून साठवण करून ठेवली तर त्याचा उपयोग चाराटंचाई काळामध्ये शेळ्यांच्या आहारपोषणासाठीकरता येतो.
 
शेळ्यांची निवड कशी करावी :
किफायतशीर शेळी व्यवसायाच्या यशाचा पाया म्हणजे त्यांची पैदास; आणि पैदाशीमध्ये मोलाचा वाटा असतो तो कळपातील पैदाशीच्या नराचा. म्हणूनच 50 माद्यांच्या निवडी पेक्षा एका पैदाशीच्या नराची निवड अत्यंत महत्त्वाची असते.
 
नराची वैशिष्टे:
1.नर हा कळपातील सुदृढआणि जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा.
2.नर चपळ असावा. नर निवडताना दोन जुळ्यानरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळी वतिळीकरडे देण्याचे प्रमाण वाढते.
3.नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.
4.नर उंच, लांब, भरदारछाती असणाराव मानेवर आयाळ असणारा असावा.
5.नरात कोणतेही शारीरिक व्यंगनसावे.
6.नर जातिवंत माता-पित्यांपासून झालेला असावा.
7.नर निवडताना जातीशी साधर्म्यअसणारा, दीड ते दोन वर्षेवयाचा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्या पासून जन्माला येणारी पुढीलपिढी चांगल्या गुणवत्ते ची होईल.
 
मादीची वैशिष्टे:
1. शेळी मजबूत बांध्याची, पूर्ण वाढ झालेली, त्या जातीचे गुणधर्म असलेली असावी.
2. शेळी रुंद, चौकोनी बांध्याची असावी.
3. शेळी जुळ्या अथवा तिळ्यापैकी एक असावी.
4. पाय लांब, मांधेभरदारव मजबूत असावेत.
5. दोन सड असावेत, जोडून तिसरे लहान सड नसावे. दोन्ही सड निमुळते व एकसारखे असावेत. कास
लोंबती नसावी.
6. कोणत्याही अवयवात वैगुण्य नसावे.
7. डोळेपाणीदार आणि कातडी चमकदार असावी.
8. कटीच्या भागाचा आकार मोठा असावा.
9. शिंगे एकाच प्रकारची व न दुभंगलेली असावीत.
10. शेळी मारकी नसावी आणि मातृत्वाचे गुण असणारी असावी.
 
संगोपनातील विशिष्ठ्ये:-
अचानक हवामानात होणारे बदल शेळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. सध्याच्याकाळात शेळ्यांची काळजी घेताना गोठे, शेळ्यांचेआहारआणिआरोग्य व्यवस्थापने कडे लक्ष दिले पाहिजे.
 
गोठ्यातील व्यवस्थापन -
1) अजूनही बहुसंख्य शेळी पालकांकडे शेळ्यांसाठी स्वतंत्र गोठा दिसू नयेत नाही. इतर जनावरांच्या गोठ्यातच शेळ्या बांधणे, झाडाखाली शेळ्याबांधल्या जातात. वादळ पाऊस किंवा अतिथंडीच्या काळात शेळ्यांना घरातच दाटीवाटीने ठेवले जाते.
2)शेळ्यांचे थंडीपासून तसेच आर्द्रतायुक्त हवेपासून बचावकरण्यासाठी शेळ्यांच्या गोठ्यात ऊबदारवातावरण राहावे म्हणून साधारण 2ते3 फूट उंचीपर्यंत 100ते150 वॅटचे बल्ब लावावेत.
3)थंड गोठ्यात शेकोटी लावून तापमानवाढविता येते. बोचर्‍या वार्‍यापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्या सोबती रिकाम्या बारदानाचे पडदे लावावे.
4)शेळ्याबसण्याची जागा मलमूत्रामुळे ओली होते. ही ओलफुफ्फुसदाह, कमरेचा अर्धांग वायूतर छोटीकरडे गारठल्याने मृत्यूसुद्धा येऊ शकतो. त्यासाठी शेळ्यांना बसण्यासाठी गोठ्यात मचाण तयार करावे. मचाण हे गोठ्यातील जमिनीपासून 1 मीटर उंचावर करावे. मचाणहे बांबू, सुपारीच्या कामठ्या किंवा लाकडी पाट्या यांचा साह्याने तयार करावे जेणेकरून शेळ्यांच्या खुरांना इजा होणार नाही आणि मूत्रआणि लेंडी सरळ जमिनीवर खाली पडते आणि शेळ्यांचामचणीमुळे जमिनीती लगारवाव ओलसरपणायामुळे उद्भ्वणार्‍या त्रासापासून बचाव होतो.
5)ओलसर ठिकाणी आठवड्यातून एक दोन वेळा चुन्याची भुकटी भुरभुरावी. त्यामुळे गोठ्यात असलेले जीवाणू, विषाणूयांचाप्रादुर्भाव कमी करता येतो.
6)ऊन पडल्यानंतर शेळ्या गोठ्याच्या बाहेर काढाव्यात म्हणजे गोठे साफ करण्यास व सुकवण्यास मदत होते. तसेच गोठे साफ करताना जंतुनाशकाचा वापर करावा.
7)शेळ्यांमध्ये हगवणीची समस्या असेल तर शेळ्यांचा गोठा कोरडाव उबदार राहीलयासाठी योग्य काळजी घ्यावी म्हणजे शेळ्यांनाफुफ्फुसदाह, सर्दी, शारीरिक तापमान कमी होणे यासारख्या आजारांपासून वाचविता येईल.
 
शेळ्यांचे आहार व्यवस्थापन -
1)आपल्याकडे बहुसंख्य शेळ्या या चराऊपद्धतीने पाळल्या जातात, त्यामुळे शेळ्यांना चरावयासाठी नेताना काळजी घ्यावी.
2)हिवाळ्यात प्रामुख्याने सकाळच्यावेळी हवेत धुक्याचे प्रमाण जास्त असते, गवतावरही दवपडलेले असते. याचा विपरीत परिणाम शेळ्यांवर होतो. शेळ्यांना श्वसनाचे आजार उदा. सर्दी, खोकला, घशाचादाह, फुफ्फुसदाह होतो. गवतावरील दवामुळे ओठावर वनाकावर मावा येणे व त्याचे रूपांतर जखमांमध्ये होणे यासमस्या दिसतात. हे लक्षात घेऊन चांगले ऊनपडल्यावरच शेळ्यांना चरावयास न्यावे.
3)जर हवामान आर्द्रतायुक्त व थंड असेल तर शेळ्यांना गोठ्यामध्ये चारा द्यावा.
4)चारा उपलब्ध नसल्यास फळबागेच्या कुंपनाभोवती लागवड केलेल्या भेंड, बिवळा, शिवण, धामण, पांगारा, असाणा इत्यादी झाडांपाल्याचा वापर करावा.
5)आंबा व काजू फळबागामध्ये मोहर येण्या पूर्वी व मोहर आल्यानंतर मोहर संरक्षणासाठी कीटकनाशकांचा वापर केला जातो अशा वेळी शेळ्यांना बाहेर चरावयास सोडू नये, त्यांना जागेवर खाद्य घालावे. जेणेकरून कीटकनाशकांमुळे त्यांना विषबाधा होणार नाही. माहे मे ते ऑक्टोबर या काळामध्ये फळबागेत वाढणारा झाडपाला कापणी करूनमोठ्याप्रमाणातवाळवून भांडार गृहात साठवण करून ठेवावा. जेणेकरून फवारणीच्या काळात त्याचा उपयोगशेळ्यांना चारा म्हणून मोठ्याप्रमाणात करता येईल.
6)निसर्गतः शेळ्यांमध्ये झाडपाल्यातील टॅनीननावाचा विषारी घटक पचविण्याची क्षमताआहे. मात्र याझाडपाल्यांचा योग्य प्रमाणात शेळ्यांच्या आहारात वापर करावा. जास्त पाण्याचे प्रमाणअसले लाझाडपाला वापरताना तो थोडा सुकवून शेळ्यांना द्यावा, त्यामुळेटॅनीन नावाच्या विषारी घटकाचे प्रमाण कमी होते.
7)शेळ्यांना कुठल्याही प्रकारचा हिरवाचारा देताना पाल्याचे प्रमाण 60ते70 टक्क्यांपेक्षा जास्तअसू नये, याची दक्षता घ्यावी म्हणजे पोटफुगी, अतिसारअसेआजार होणार नाही.
8)येत्या काळात चाराटंचाई लक्षात घेऊन शेळ्यांच्या आहारासाठी भाताचापेंडा, नागलीचेकाड, सोयाबीन, तूर, हरभरायांचा भुसा, भुईमुगाचावाळलेला पाला, कडबायांची साठवणूक करून ठेवावी. शक्य असेल तेथे गिरीपुष्प, धामण, शिवण, धासरी इत्यादी पाला, तसेच शेंगावाळवून साठवून ठेवाव्यात. तसेच फळबागेतील मोकळ्या जागेमध्ये वाढणारे हिरवे गवत कापणी करून वाळवून त्याची योग्य साठवणूक करावी. त्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून चांगला उपयोग होतो.
 
प्रथोमोपचार व लसीकरण:-
1)पाऊस व थंड हवामान याप्रतिकूल परिस्थितीत शेळ्यांनाप्रामुख्याने श्वसनसंस्थेचे आजार जास्त प्रमाणात होतात. त्यातसर्दी, खोकला कायम दिसून येतो. अशा वेळी शेळ्यांचा नाकावरू नट र्पेंटाईनचा बोळा फिरवणे उपयुक्त ठरते. मात्र तरी देखील सर्दी आटोक्यातन आल्यास पशुवैद्यकांच्यासल्ल्याने प्रतिजैविकांचा वापर करण्यात यावा.
2)थंड हवामानात शेळ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व कोमट पाण्याचा पुरवठा करावा. त्यात पोटॅशियम परमँग्नेटचा योग्य प्रमाणात वापर करावा. जेणे करून पाण्याद्वारा होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल.
3)घट सर्पासारख्या रोगाचा प्रादुर्भाव शेळ्यांमध्ये फारसा दिसू नयेत नाही मात्र असा प्रादुर्भाव दिसून आल्यास आजारी शेळ्यांना ताबडतोब वेगळे करावेत. इतर शेळ्यांना लसीकरण करून घ्यावेत.
4)सध्या पीपी आररोगाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर दिसून येतो आहे. त्यासाठी लसीकरण करावे.
या आजाराची लक्षणे बर्‍याचदा बुळकांडी आजारासारखे वाटते त्यामुळे शेळ्यांना एकाचवेळी बुळकांडी व सर्दी अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
 
एच. आर. आगरे आणि डॉ. डी. जे. भगत
पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्रविभाग,
कृषी महाविद्यालय, डॉ. बा. सा. को. कृ. वि. दापोली