भात प्रक्रिया उद्योग

डिजिटल बळीराजा-2    10-Jun-2020
|
 
13_1  H x W: 0
 
पारंपारीक पद्धतीने भात उत्पादन घेऊन तांदूळ म्हणून विकण्यापेक्षा शेतकर्याला भातास विविध प्रकारच्या प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ करणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर कसे ंठरते व शेतमालाचे मूल्यवर्धन करणे कसे गरजेचे आहे या विषयी माहितीचा समावेश या लेखात केला आहे.
 
भातास प्रक्रिया करुन मुल्यवर्धन : पारंपारीक पद्धतीने भात उत्पादन घेऊन तांदूळ म्हणून विकण्यापेक्षा शेतकर्याला भातास विविध प्रकारच्या प्रक्रिया करुन त्यापासून विविध पदार्थ करणे आर्थिक दृष्ट्या अधिक फायदेशिर ठरते व शेतमालाचे मूल्यवर्धन होते.
 
भातास विविध प्रकारच्या प्रक्रिया करुन त्यापासून विविध पदार्थ प्रक्रियेद्वारे केले जातात.
 
अ. पोहा तयार करणे :
‘पोहा‘ तयार करण्याचा उद्योग हा पारंपारीक आहे. पारंपारीक पद्धतीने ‘जाड‘ व ‘पातळ‘ असे दोन्ही प्रकारचे पोहे तयार करतात. या पद्धतीमध्ये अर्ध उकडा पद्धतीने तांदूळ शिजवल्यानंतर अथवा पाण्यात भिजवून भट्टीमध्ये दाब देऊन भरडला जातो. परंतु, यास खर्च, वेळ, मजुर जास्त लागतात तसेच, गुणवत्ता राखली जात नाही. यावर संशोधन करुन म्हैसुर येथील सी.एफ.टी.आर.आय. यासंस्थेने सुधारीत पोहा तयार करण्याची पद्धत शोधली आहे.
 

1_1  H x W: 0 x 
 
केंद्र सरकारच्या लघु उद्योग मंत्रालयाने निर्देशित केलेल्या विविध लघुउद्योगामध्ये (पोहा उद्योगास) लघुउद्योगाचा दर्जा देऊन ‘पंतप्रधान ग्रामोद्योग रोजगार योजनेत‘ त्याचा समावेश केला आहे.
    
हा उद्योग निर्मितीसाठी येणारा खर्च व त्याचा सर्वसाधारण ताळेबंद खालील प्रमाणे
खादी व ग्रामोद्योग आयोग, सुक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारे निश्चित केलेले अंदाजपत्रक (पोहा तयार करणे उद्योग)
 

2_1  H x W: 0 x
 
 
 

3_1  H x W: 0 x
 
 
 
टिप : वरील आकडे स्थळानुसार बदलु शकतात.जर बांधकाम न करता भाड्याने जागा घेतल्यास
अ.प्रकल्पाचा खर्च कमी होवू शकतो
ब. नफ्यामध्ये वाढ होवू शकते.
क. भांडवल खर्चाच्या व्याजात बचत होवू शकते.
 
ब) मुरमुरा तयार करणे :
भातापासून उत्तम प्रकारचे मुरमुरे व लाह्या तयार करता येतात. मुरमुरे तयार करण्याची सर्वसाधारणपणे पद्धती खालील प्रमाणे.


4_1  H x W: 0 x

खादी व ग्रामोद्योग आयोग, सुक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारे निश्चित केलेले अंदाजपत्रक (मुरमुरा तयार करणे उद्योग)
 

5_1  H x W: 0 x
 
 

6_1  H x W: 0 x
 
 
 
टिप :
1.वरील आकडे स्थळानुसार बदलु शकतात
2.जर बांधकाम न करता भाड्याने जागा घेतल्यास
अ.प्रकल्पाचा खर्च कमी होवू शकतो
ब. नफ्यामध्ये वाढ होवू शकते.
क. भांडवल खर्चाच्या व्याजात बचत होवू शकते.
3. भातास आंबवण प्रक्रिया करुन मुल्यवर्धन : इडली, डोसा व ढोकळा तयार करणे

7_1  H x W: 0 x 
 
4. भातास प्रक्रिया करुन इतर पदार्थ बनविणे : लाह्या, चकली, कुरडई व पापड, ई. पदार्थ तयार करणे

8_1  H x W: 0 x 
 
5. भाताचे तयार मिश्रण करुन मुल्यवर्धन : ईडली पीठ, तांदळाचे पीठ व लहान मुलांसाठी
सहाय्यक अन्न बनवणे

9_1  H x W: 0 x 
 
 
10_1  H x W: 0
 
इडली मिश्रण : आजच्या धावत्या युगात पारंपारीक पद्धतीने इडली तयार करणे व त्यासाठी लागणारा वेळ काढणे अवघड होते. यावर उपाय म्हणजे इडली तयार मिश्रण हे होय.
 
पूरक अन्न तयार करणे

11_1  H x W: 0  
 
6) भातपिकापासून विविध कलात्मक वस्तू तयार करुन मुल्यवर्धन - 
भाताच्या झाडापासून आणि त्याच्या इतर भागांपासून अनेक शोभेच्या, कलात्मक वस्तू तयार करता येतात. उदा. पोकळ खोडापासून नळ्या करुन त्यांच्या सुंदर माळा तयार केल्या जातात. मुंडावळ्या, पडदे आणि झारण्या इत्यादींसाठीही याचा वापर केला जातो. चिकणमाती किंवा शेणात भातपिकाचा कोंडा मिसळून कलात्मक भांडी खेड्यात पाहावयास मिळतात. शिवाय चटई, हॅट व दोर बनविण्यासाठी भाताचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. भारतीय कलाकारांनासुद्धा रंगरंगोटी आणि पेन्टिंगच्या कलासाधनेत हे एकमेव कलात्मक माध्यम म्हणून वापरावे लागते; व त्यातूनच पुडे कॅलेंडर्स, पोस्टर्स, आकृत्या, मॉडेल्स इत्यादींच्या प्रतिकृती उदयास येतात.

12_1  H x W: 0  
 
7) भातशेतीचा मत्स्यशेतीसाठी उपयोग करुन मुल्यवर्धन:
अनेक शेतकरी उपलब्ध जमीन आणि पाण्यापासून जास्त नफा मिळविण्याच्या दृष्टीने मत्स्यशेतीव्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. पाणथळ जमिनीत आणि भातखाचरांमध्ये तर मत्स्यशेतीव्यवसाय फायदेशीर ठरलेला आहे. समुद्रकाठच्या किंवा खारेपाटाच्या जमिनीत भातशेती करणारे उत्पादक भातखाचरात चिवनी, जिताडी, बोईट, कोळंबी, चिंबोरी, न्हावी उर्फ घोण्या, शिवडा उर्फ चिपटा, करवाल, खरबी, पोच्या, खवली, मुर्या वरम (काटेरी), तेटी, पितोली, इत्यादी जातींच मासे वाढवितात. मोठी भातखाचरे आहेत. अशा ठिकाणी अनेक मत्स्यकास्तकर जलद वाढणार्या माशांचे मत्स्यबीज साठवून मत्स्यशेती करीत आहेत. या व्यवसायाकडे मच्छिमारशिवाय शेतकरीदेखील आकर्षित होऊ लागले आहेत. तेव्हा खाचरातील भातशेती करणार्या उत्पादकांनी आपल्या भातशेतीबरोबरच मत्स्यशेतीचासुद्धा फायदा करुन घ्यावा.
 
8) अळिंबीच्या (मशरुम) लागवडीत भाताच्या काडाचा उपयोग करुन मुल्यवर्धन: 
भरपूर प्रथिने, जीवनसत्वे,आणि उच्च दर्जाची पौष्टिकता या गुणधर्मामुळे अळिंबी लोकांना आवडू लागली आहे. यासाठी भातपिकाच्या काडाचा वापर यात केला जातो. ‘व्हलवेरिएल्ला स्पेसीज‘ ही भाताच्या काडावर येणारी अळिंबीची जात होय. याजातीस लागवडीस 300 ते 400 सें.ग्रे. तपमान लागते. भाताच्या काडाच्या 2 ते 2ेेंं फुट लांब व 6 ते 8 इंच व्यासाच्या पेंड्या तयार कराव्या लागतात. त्या थंड पाण्यात 8 ते 10 तास भिजवून, नंतर गरम पाण्यात (700 ते 800 सें.ग्रे.) अर्धा तास भिजवून, निर्जंतूक करुन थंड झाल्यावर प्लॅटफॉर्मवर पेंढ्याचे उभे-आडवे चार थर देतात. प्रत्येक थरावर कडेने स्पॉन (बी) पेरतात व त्यावर प्लॅस्टिकचे आवरण झाकतात.

13_1  H x W: 0  
 
15 ते 20 दिवसांनी आवरण काढल्यावर पाण्याची फवारणी करतात. त्यानंतर 2 ते 3 दिवसांत अळिंबीचे पीक दिसू लागते. एक महिन्याला असे 2 ते 3 वेळेस पीक मिळते. की अळिंबी बाजरात ताजी व वाळवलेली विकली जाते.
9) भाताच्या भुशाच्या राखेचे मुल्यवर्धन:
भातपिकाच्या भुशात खनिज घटकांची संख्या 30 आहे. यात सिलिका हे प्रमुख आहे.कच्च्या विटा तयार करताना मातीच्या चिखलात गवताचे तुकडे व भाताचा भुस्सा वापरतात. चिनी मातीचे पाईप, विटा, नळ्या, टँक, पाण्याच्या नळ्या वगैरेंत लाईनिंग (गिलावा) करण्यासाठी भाताच्या भुशाच्या राखेचा वापर करता येईल.
 
10) भातकाडाच्या आच्छादनाचा वापर :
नाजूक पदार्थांच्या संरक्षणासाठीसुद्धा त्याचा वापर केलेला आढळतो. यामध्ये प्रामुख्याने शोभेच्या वस्तू एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेताना पेंढ्याचा वापर त्यात केलेला आढळतो. काचेचे साहित्य, त्याचप्रमाणे नाजूक भांड्याच्या पॅकिंगसाठी पेंढ्याचा वापर करतात. काही फळभाज्यांच्या आयाती-निर्यातीमध्ये पेंढ्याचा वापर त्यांच्या खोक्यांतून डालग्यांतून, पाट्यातून अथवा टोपल्यांतून केलेला पाहावयास मिळतो. कोकणामध्ये तर प्रत्येक घराघरांतून, माळ्यांवर आंबे पिकविण्यासाठी पेंढ्याचा वापर आच्छादन म्हणून ‘आंब्याची अढी‘ घालण्यासाठी केलेला दिसून येतो.
 
अवर्षणप्रवण भागात पाणी साठवून ठेवणे आणि पाण्याचे व्यवस्थापन मर्यादित काळात करण्यासाठी अलीकडे आच्छादनाचा वापर केलेला पाहावयास मिळतो. बाष्पीभवनामुळे जमिनीतील सुमारे 70 टक्के ओल उडून जात असते. ती थोपवून धरण्यासाठी शेतातील निरुपयोगी काडी, कचरा, धसकटे, गवत तुरकाड्या यांबरोबर भाताचे निकृष्ट काड वापरले जातात. हे पदार्थ पिकाच्या दोन ओळीत जमिनीवर हेक्टरी 5 टन पसरावे. आच्छादनाच्या वापरामुळे 25 ते 30 मि.मी. ओलाव्याची बचत होते. अशा रितीने अवर्षणकाळात कोरडवाहू शेतीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भातकाडाचे आच्छादन अनमोल ठरते.
 
 
डॉ. एन. व्ही. काशिद,
प्रभारी अधिकारी,
कृषि संशोधन केंद्र,
वडगांव (मावळ), जि. पुणे.
फोन : 9422851505