संपादकीय

डिजिटल बळीराजा-2    07-May-2020
|
 
lockdwon_1  H x
 
लॉकडाऊनच्या काळात शेतकरी समाजाचे खूप हाल झाले. गेल्यावर्षी उत्तम पाऊस झाल्याने खूप शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळे उत्पादन घेतले.लॉकडाऊनमुळे शहरातील बाजाराची मागणी मोठ्या प्रमाणात घटली.त्यामुळे भाज्यांना फळांना बाजार नाही व अनेक शेतकऱ्यांना तयार पिके जनावरांना खायला घालावी लागली व ट्रॅक्टर फिरवून शेत जमीनदोस्त करावी लागली. या समस्येवर काही उपाय आपल्याला करता येतील.शेतमालावर प्रक्रिया करण्याचे काही लेख देत आहोत.मूल्यवर्धित शेतीमालाचे उत्पादन करिता आल्यास बरेच नुकसान कमी करता येईल.
 
मधुमक्षिका पालन ,अळिंबी लागवड ,भाजीपाला निर्जलीकरण,शेळी पालन,रेशीम पालन, दुधाचे मूल्यवर्धित उत्पादने असे अनेक पर्याय आहेत. तरी वाचकांनी आपल्या स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून 'व्हॅल्यू ऍडिशन' चा गंभीर विचार करावा व आपल्याला सोयीचा प्रक्रिया उद्योग अवश्य करण्याचा विचार करावा. तेव्हा भाजीपाला व फळे बाजारात पाठवून नुकसान करून न घेता त्यावर काही प्रक्रिया करून त्याची साठवण क्षमता वाढवून मूल्यवर्धित उत्पादने करण्याचा विचार करावा. मूल्यवर्धित क्रियेसाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापिठाशी संपर्क साधून तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ – 02426(243202/243259)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ -02452(234150/228601/229000)
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ -02358 (284393/9423874267)
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ – 0712(2511784/2511785/2511787)
 
 
श्री.रवीन्द्र भोसले
संपादक बळीराजा मासिक