डाळिंब प्रक्रिया उद्योग व औषधी उपयोग

डिजिटल बळीराजा-2    28-May-2020
|
 
dalimb_1  H x W
 
प्रक्रिया उद्योग
 
डाळींब फळांच्या रसापासून तयार केलेल्या पेयांना भारतभर वर्षभर मागणी असून ते श्रमपरिहारक, उत्साहवर्धक असून त्याचे विविध औषधी उपयोगही आहेत. सदर रसात 12 ते 16 टक्के सहज पचणारी साखर व जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर आहे. या फळांपासून सरबत, जॅम अशासारखे टिकाऊ पदार्थही करता येणे शक्य झाले आहे. डाळिंबापासून साली दाणे वेगळे करण्यासाठी यंत्र विकसित झाले असून त्याची क्षमता ताशी 150 कि. डाळींब सोलण्याची आहे. तसेच या लेखात डाळींबापासून विविध पदार्थ कसे करावे या विषयी सखोल माहितीचा समावेश केला आहे.
 
डाळिंब फळांच्या रसापासून तयार केलेल्या पेयांना भारतभर वर्षभर मागणी असून ते श्रमपरिहारक, उत्साहवर्धक असून त्याचे विविध औषधी उपयोगही आहेत. सदर रसात 12 ते 16 टक्के सहज पचणारी साखर व जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर आहे. या फळांपासून सरबत, जॅम यासारखे टिकाऊ पदार्थही करता येणे शक्य झाले आहे. डाळिंबापासून सालं व दाणे वेगळे करण्यासाठी यंत्र विकसित झाले असून त्याची क्षमता ताशी 150 कि. डाळिंब सोलण्याची आहे. तसंच या लेखात डाळिंबापासून विविध पदार्थ कसे करावे याविषयी सखोल माहितीचा समावेश केला आहे.
 
डाळिंब फळांच्या रसापासून तयार केलेल्या पेयांना भारतभर वर्षभर मागणी असते. या पेयाचे आहारमूल्यसुद्धा चांगले असते. डाळिंबाच्या रसापासून चांगल्या प्रतीचे कर्बयुक्त पेय तयार केल्यास त्याला फार मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. डाळिंबापासून अगदी कमी खर्चात अनारदाणा तयार करता येतो या शिवाय त्याचा उपयोग प्रामुख्याने भाज्यांमध्ये अन्न शिजवताना चिंच, आमसुलाऐवजी वापरता येतो. त्यामुळे भाज्यांची चव सुधारते व त्या स्वादिष्ट, रुचकर लागतात.
 
डाळिंबाचा रस थंड, श्रमपरिहारक व उत्साहवर्धक असून, त्याचे विविध औषधी उपयोगही आहेत. डाळिंबाच्या रसात 12 ते 16 टक्के सहज पचणारी साखर व जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर आहे. फळांपासून डाळिंब सरबत आणि जॅम यासारखे अनेक टिकाऊ पदार्थही करता येणे शक्य आहे.
 
डाळिंब फळांच्या रसापासून तयार केलेल्या पेयांना भारतभर वर्षभर मागणी असते. या पेयांचे आहारमूल्यसुद्धा चांगले असते. डाळिंबाच्या रसापासून चांगल्या प्रतीचे कर्बयुक्त पेय तयार केल्यास त्याला फार मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. डाळिंबापासून अगदी कमी खर्चात अनारदाणा तयार करता येतो. या शिवाय त्याचा उपयोग प्रामुख्याने भाज्यांमध्ये अन्न शिजवताना चिंच, आमसुलाऐवजी वापरता येतो. त्यामुळे भाज्यांची चव सुधारते त्या स्वादिष्ट, रुचकर लागतात. या व्यतिरिक्त डाळिंब व त्याच्या घटकांचा औषधी उपयोग म्हणून उपयोग करण्यात येतो.
 
डाळिंब दाणे सोलणी यंत्र
 
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड व्यापारी तत्वावर केली जात आहे. डाळिंबाच्या पौष्टिक व आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे हे फळ निर्यातक्षम झाले आहे. निर्यातीच्या दृष्टीने गोठवलेल्या डाळिंबाच्या दाण्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे. डाळिंबापासून दाणे वेगळे करणे अत्यंत किचकट व खर्चिक काम आहे. यासाठी डाळिंबापासून दाणे वेगळे करण्यासाठी या विभागाने यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामध्ये अखंड डाळिंब टाकले की, साल व दाणे वेगवेगळे होतात. या यंत्राची क्षमता ताशी 150 किलो डाळिंब फळे सोलण्याची आहे, या यंत्राची कार्यक्षमता 80 ते 85 टक्के एवढी आहे.
 
डाळिंबाचा रस
 
डाळिंबातील दाणे काढण्यापूर्वी फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. दाणे काढण्यासाठी डाळिंबाच्या देठाकडील व फुलाग्राकडील भाग कापून काढला जातो. फळांचे कापून चार भाग करून त्यातील दाणे, साल व पापुद्रे वेगळे करून घेतात. दाणे सोलणी मशिनच्या सहाय्याने सोलल्यास डाळिंबाचे 85 ते 90 टक्के दाणे चांगल्या स्थितीत मिळतात. दाणे काढल्यानंतर दाबयंत्रात अल्प दाबाने त्यांचा रस काढला जाऊ शकतो.
 
डाळिंबाच्या फळामध्ये सरासरी 60 ते 70 टक्के दाणे निघतात. पूर्ण पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्यापासून 75 ते 85 टक्के रस निघतो. डाळिंबाच्या रसामध्ये 78% पाणी, 2% प्रथिने, 2% स्निग्ध पदार्थ, 15% साखर, 1% खनिज आणि 0.3 ते 0.4% आम्लतेचे प्रमाण जातीनुसार असते. रस 80 ते 85 अंश सेल्सिअस तापमानास 15 मिनिटे तापवून थंड करावा. रात्रभर भांड्यात ठेवून तो न हलविता वरचा रस सायफन पद्धतीने काढून रस बाटल्यांत भरतात. रस भरण्यापूर्वी स्वच्छ केलेल्या बाटल्या 30 मिनिटे उकळत्या पाण्यात गरम करून निर्जंतुक केल्या जातात. रस 80 अंश ते 85 अंश से. ला 25 ते 30 मिनिटे उकळून तो रस निर्जंतुक गरम बाटल्यात भरून क्राऊन कॉर्किंग मशिनच्या सहाय्याने बूच (टोपण) बसवून बंद केला जातो. सोडियम बेन्झाएटसंरक्षक 600 मिलिग्रॅम प्रति किलो रसायनाचा वापर करून रस टिकविता येतो.
 
2) डाळिंब सरबत
 
डाळिंबाच्या रसामध्ये 13 टक्के ब्रिक्स व 0.8 टक्के आम्लता गृहीत धरून डाळिंब रसाचे सरबत तयार करण्यासाठी डाळिंबाचा रस, 15 टक्के साखर व 0.25 टक्के सायट्रिक अ‍ॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थ वापरावेत. यात डाळिंबाचा रस, 15 टक्के साखर व 0.25 टक्के सायट्रिक अ‍ॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थ वापरावेत. यात डाळिंबाचा रस 1 किलो, साखर 1 किलो 370 ग्रॅम, तांबडा खाद्य रंग जरुरीप्रमाणे टाकावा. मोठ्या पातेल्यात पाणी वजन करून घ्यावे. त्यात साखर टाकून ती पूर्ण विरघळली जाईल, या पद्धतीने ढवळावे. तयार होणारा साखरेचा पाक पातळ मलमल कापडातून दुसर्‍या पातेल्यात गाळून घ्यावा. त्यात डाळिंबाचा रस टाकून तो मोठ्या चमच्याने एकजीव करावा. दोन ग्लासमध्ये थोडे सरबत घेऊन एकामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड व दुसर्‍यात जरुरीप्रमाणे खाद्य रंग टाकून चमच्याच्या सहाय्याने पूर्ण विरघळून घ्यावे व नंतर सरबतात टाकून एकजीव करावे. हे सरबत 200 मिली आकारमानाच्या बाटल्यास भरून बाटल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवाव्यात.
 
3) डाळिंब स्क्वॅश
 
डाळिंबाचा रस काढून तो पातळ मलमल कापडातून गाळून घ्यावा. हा रस स्क्वॅश तयार करण्यासाठी वापरावा. डाळिंब रसात 13 टक्के ब्रीक्स व 0.8 टक्के आम्लता गृहीत धरून स्क्वॅश तयार करण्यासाठी 25 टक्के डाळिंबाचा रस, 45 टक्के साखर व 1 टक्का सायट्रिक अ‍ॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थाचे प्रमाण पुढीलप्रमाणे वापरावे.
 
साहित्य : डाळिंबाचा रस 1 किलो, साखर 1 किलो 70 ग्रॅम, पाणी 1.2 किलो, सायट्रिक अ‍ॅसिड 32 ग्रॅम, तांबडा खाद्य रंग जरुरीप्रमाणे व सोडियम बेन्झोएट 2.6 ग्रॅम घ्यावे.
 
प्रक्रिया : मोठ्या पातेल्यात पाणी वजन करून घ्यावे. त्यात सायट्रिक अ‍ॅसिड व साखर टाकून पूर्ण विरघळून घ्यावे. हे द्रावण पातळ मलमल कापडातून दुसर्‍या पातेल्यात गाळून घ्यावे. त्यात डाळिंबाचा रस टाकून चमच्याने एकजीव करावा. हे द्रावण मंदाग्नी शेगडीवर गरम करून घ्यावे. थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवावे.
1)दोन ग्लासमध्ये थोडा थोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये सोडियम बेन्झोएट व दुसर्‍यामध्ये जरुरीप्रमाणे तांबडा खाद्य रंग टाकून ते चमच्याने विरघळून घ्यावे. दोन्ही विरघळलेले द्रावण स्कॅशमध्ये टाकून ते चमच्याने एकजीव करावे.
 
2)निर्जंतुकीकरण करून घेतलेल्या बाटल्यांमध्ये हा स्क्वॅश भरून त्यांना ताबडतोब झाकण (बूच) बसवून त्या हवाबंद कराव्यात. स्क्वॅशच्या बाटल्या थंड व कोरड्या हवामानात ठेवून त्यांची साठवण करावी. हा स्क्वॅश वापरताना एकास तीन भाग पाणी घेऊन चांगले हलवून एकजीव करावा व नंतर तो पिण्यासाठी वापरावा.
 
3)डाळिंब सिरप
 
डाळिंबाच्या रसात 13% ब्रिक्स व 0.8% आम्लता गृहीत धरून डाळिंब सिरप तयार करण्यासाठी 25% डाळिंब रस, 65% साखर व 1.5% सायट्रिक अ‍ॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थांचे प्रमाण वापरावे.
 
साहित्य : डाळिंबाचा रस 1 किलो, साखर 2 किलो 470 ग्रॅम, पाणी 4.78 किलो, सायट्रिक अ‍ॅसिड 52 ग्रॅम, तांबडा खाद्य रंग जरूरीप्रमाणे व सोडियम बेन्झोएट 2.6 ग्रॅम घ्यावे. 
 
प्रक्रिया : एका पातेल्यात पाणी वजन करून घ्यावे. त्यात सायट्रिक अ‍ॅसिड टाकून पूर्ण विरघळून घ्यावे व नंतर त्यात डाळिंब रस टाकावा व साखर टाकून चमच्याने हलवून शक्य तेवढी साखर विरघळून घ्यावी. पातेले मंदाग्नी शेगडीवर ठेवून साखर पूर्ण विरघळेपर्यंत सिरप स्टीलच्या मोठ्या चमच्याने किंवा पळीने सतत हलवत राहवे. सिरपमध्ये साखर पूर्ण विरघळल्यानंतर पातेले शेगडीवरनू खाली उतरून घ्यावे. दोन ग्लासमध्ये थोडे थोडे सिरप घेऊन एकामध्ये सोडियम बेन्झोएट व दुसर्‍यामध्ये जरूरीप्रमाणे तांबडा खाद्य रंग विरघळून सिरपमध्ये टाकून एकजीव करावे. निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये सिरप भरून त्यांना ताबडतोब झाकण (बूच) बसवून त्या हवाबंद कराव्यात. सिरपची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.
 
4)डाळिंब वाईन
 
उत्तम प्रतिची वाईन तयार करण्यासाठी रसामधील विद्राव्य घटकांचे प्रमाण 22 अंश ब्रिक्स (टीएसएस) असावे लागते. परंतु डाळिंबाच्या रसाचा ब्रिक्स 12 ते 14 असतो म्हणून अशा रसात गरजेनुसार साखर मिसळून त्याचा ब्रिक्स 22 अंश प्रमाणित करणे आवश्यक आहे. नंतर सायट्रिक अ‍ॅसिड टाकून आम्लता 0.7% करावी. तसेच रसात 0.05 ग्रॅम प्रति 100 मिली. डायअमोनियम हायड्रोजन फॉस्फेट टाकावे. अशा प्रकारे तयार झालेला रस 80.85 सें. तापमानाला पाश्चरायझेशन करून त्यात 20-30 मिनिट गरम करून थंड करावा. 2 ते 4% यीस्टचे मुरवण घालावे. हे मिश्रण 22 अंश -24 अंश सें. तापमानाला साधारणपणे त्याचा ब्रिक्स 5 ते 6 होईपर्यंत व अल्कोहोलचे प्रमाण 8 ते 10 टक्के होईपर्यंत आंबवावे. याकरिता साधारण 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागतो. नंतर या आंबविलेल्या रसामध्ये 0.1% बेन्टोनाईट टाकून सेट्रिफ्युज करावे म्हणजे आपणास शुद्ध स्वरूपात वाईन मिळेला. तयार झालेली वाईन थंड तापमानास साधारणपणे एक महिन्यापर्यंत मुरण्याकरिता ठेवतात. यालाच एजिंग असे म्हणतात. या कालावधीत वाईनची चव व प्रत सुधारते.
 
मृदुला डाळिंब वाइनसाठी उपयुक्त 
 
मृदुला जातींच्या डाळिंबाच्या रसापासून उत्तम प्रतीची वाइन तयार करता येऊ शकते. प्रायोगिक तत्वावर एक लिटर डाळिंबाची वाइन तयार करण्याकरिता साधारणत: 45 ते 50रुपये एवढा खर्च आल्याचे दिसून आले आहे.
 
मृदुला जातीच्या डाळिंबापासून चांगल्या प्रतीची वाइन तयार करण्याकरिता रसाचा ब्रिक्स 22 अंश, सामू (पी.एच.) 3.5 किंवा अ‍ॅसिडीटी 0.7% तसेच सायक्रोमॉयसीस यीस्टचे कल्चर डायअमोनियम हायड्रोजन फॉस्फेट 0.05%, आंबवण्याचे तापमान 22 अंश सें. इत्यादी बाबी चांगल्या समजल्या जातात. वाईनमध्ये असणारे ग्लुकोज टॉलरन्स फॅक्टर व फेनॉल्स रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास व पर्यायाने हृदयविकारापासून रक्षण करण्यास मदत करतात. वाईनमध्ये असणार्‍या रासायनिक घटकांमुळे शरीरात फ्रिरॅडिकल्स तयार होण्यास प्रतिबंध होतो. अशाप्रकारे वाइनमध्ये औषधी गुणधर्मसुद्धा बर्‍यापैकी आहेत.
 
5)कार्बोनेटेड पेय
 
फळांच्या रसापासून तयार केलेल्या पेयांना भारतात वर्षभर मागणी असते. या पेयांचे आहारमूल्यसुद्धा चांगले असते. परंतु याचबरोबर कृत्रिम खाद्यपदार्थ वापरून त्यापासून पेय बनवण्याचा व्यवसाय भारतात फार मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. आहारदृष्ट्या अशा प्रकारच्या पेयाचे पोषणमूल्य जवळ जवळ काहीच नसते. डाळिंबाच्या रसापासून चांगल्या प्रतीचे कर्बयुक्त पेय तयार केल्यास त्याला फार मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. चांगल्या प्रतीचीे कर्बयुक्त पेय तयार केल्यास त्याला फार मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. चांगल्या प्रतीची डाळिंब फळे निवडून ती पाण्यात धुवून, दाणे वेगळे करावेत. हे दाणे मलमल कापडात ठेवून, दाबून त्याचा रस काढून तो सेंट्रिफ्यूज करावा म्हणजे डाळिंब रसात 550 ग्रॅम साखर व 10 ग्रॅम सायट्रिक अ‍ॅसिड टाकून त्याचा 55 ते 56 अंश ब्रिक्सचा सिरप तयार करावा. कर्बयुक्त पेय तयार करण्याकरिता 43 मिली सिरप 200 मिलीच्या बाटलीत घेऊन त्यात अ‍ॅटोमॅटिक कार्बोरेशन मशिनच्या सहाय्याने थंड पाणी व 85 एलबीएस दाबाने कार्बनडाय ऑक्साईड टाकून बाटली हवाबंद करावी. अशाप्रकारे तयार केलेल्या कर्बयुक्त पेयात रस 10 ते 11%, साखर 12 ते 14% व आम्ल 0.3 ते 0.4% व थंड पाणी 73 ते 74% असे घटकद्रव्याचे प्रमाण असते.
 
अनारदाना
 
अनारदाना प्रामुख्याने रशियन जातीच्या आंबट डाळिंबापासून करतात. पिकलेल्या डाळिंबाचे दाणे सूर्याच्या उष्णतेने वाळवून त्यापासून अनारदाना बनवितात. परंतु, प्रयोगांती असे दिसून आले आहे, की आपणाकडे उपलब्ध असलेल्या कमी आंबट जातीपासून (गणेश, मृदुला)सुद्धा चांगल्या प्रकारचा अनारदाना करता येऊ शकतो. याकरिता प्रथम डाळिंबाची फळे निवडून ती स्वच्छ धुवून साल काढून, दाणे वेगळे करावेत. नंतर डाळिंबाच्या दाण्यात 5% सायट्रिक आम्ल मिसळून ते सूर्यप्रकाशात 3 ते 4 दिवस किंवा कॅबिनेट ड्रायरमध्ये 55 अंश ते 60 अंश सें. तापमानाला 14 16 तास सुकवून अनारदाना तयार होतो. तयार झालेला अनारदाना प्लॅस्टिक पिशव्यात भरून त्याची साठवण किंवा विक्री करावी. अनारदान्याची साधारणत: 20 टक्क्यांपर्यंत उत्पादन म्हणजे 10 किलो डाळिंबापासून 2 किलो अनारदाना मिळू शकतो व उत्पादन खर्च साधारणत: 130 रुपये प्रति किलो एवढा येतो. अर्थात हे अर्थशास्त्र छोट्या प्रमाणावर केलेल्या संशोधनावर आधारित आहे. मोठ्या प्रमाणावर अनारदान्याचे उत्पादन केल्यास उत्पादन खर्च निश्चितच कमी येईल. यात शंका नाही. अनारदानाचा उपयोग प्रामुख्याने भाज्यांमध्ये अन्न शिजवताना चिंच, आमसुलाऐवजी वापरता येतो. त्यामुळे भाज्यांची चव सुधारते व त्या स्वादिष्ट, रुचकर लागतात.
 
8) सालींपासून पावडर
 
डाळिंब फळाचा खाण्यासाठी उपयोग केल्यानंतर साल टाकून दिली जाते. परंतु अलीकडील काळात सालीचासुद्धा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. डाळिंब फळांपासून साल वेगळी करून त्याचे लहान लहान तुकडे करून ते सौर कुटीत साधारणपणे 15 ते 25 तास सुकविले असता, त्या तुकड्यांची दळून पावडर तयार करता येते. तसेच टेपवर्मवर उपाय म्हणून आणि पोटाच्या आजारावर, खोकला आणि कफ यावर उपाय म्हणून डाळिंबाच्या पावडरचा काढा किंवा अर्क वापरला जातो. डाळिंबाच्या पावडरचा उपयोग कातडी कमावण्याच्या कारखान्यामध्ये आणि रंगाच्या कारखान्यामध्येसुद्धा केला जातो. तसेच विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधे, टुथ पावडर आणि सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी डाळिंबाची पावडर वापरली जाते. 
 
डाळिंबाचे औषधी उपयोग
 
डाळिंब फळावर प्रक्रिया करून विविध पेय बनवली जातात. या शिवाय सौंदर्य प्रसाधने, विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये डाळिंबाच्या पावडरचा वापर केला जातो. या फळाची साल आमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे. डाळिंबाचे काही औषधी गुणधर्म असून त्याचा उपयोग रोजच्या व्यवहारातही करता येऊ शकतो.
 
डाळिंबाच्या फळामुळे शरीरातील उष्णता व ताप शमतो, तसेच जठराग्नी प्रदिप्त होतो. डाळिंबाच्या दाण्यातील विशिष्ट गुणधर्मामुळे कृमी नाश व उलटी-मळमख देखील थांबू शकते. आंबट-गोड फळे खाल्ल्यास वायूविकार दूर होतो.
 • डाळिंबाचे फळ खाल्ल्याने अरूची, अतिसार, मुरडा, जळजळ, छातीतील आग, बेचैन वाटणे या तक्रारी दूर होतात.
 • उन्हाळ्यातील प्रवासात दुखणारे डोळे, उष्णता, डोळे लाल होणे यावर उपाय म्हणून डाळिंब सरबत प्यावे, त्यामुळे तहानही शमते.
 • डाळिंबाचा रस अपचन, आतड्याने विकार, आमाशय, फुप्फुस व हृदयासाठी हितकारक असतो. डाळिंब रसाने तोंडाची दुर्गंधी, दातातून येणारे रक्त बंद होते व कंठ मोकळा होतो.
 • डाळिंबाचा रस किंवा सुकी साल 5 ग्रॅम काढून त्यात थोडा कापूर घालून दिवसातून दोन वेळा पाण्याबरोबर घेतल्याने खोकला बंद होतो.
 • डाळिंबाची साल 50 ग्रॅम पाण्यात टाकून उकळावे, गाळाचे व आमातीसार व मुरडा या विकारासाठी घ्यावे.
 • डाळिंबाच्या रसात मूळव्याध कमी करण्याचे गुणधर्म आहेत. डाळिंबाची पाने वाटून बंद डोळ्यावर चपट्या लगद्या ठेवाव्यात, त्यामुळे डोळे दुखण्याचे थांबते.
 • डाळिंब हे तुरट, आंबट, मधूर, दाहशामक, व तृप्तीकारक फळ व रस पित्तशामक आहे.
 • दमेकरी रुग्णांनी वापरल्यास दम्याची तीव्रता कमी होते.
 • डाळिंबाची फुले हिरड्यांचा रक्तस्राव थांबवतात, हिरड्यांना बलवान बनवतात.
 • डाळिंबात अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आहे. तसेच स्वादुपिंडाच्या रोगावर गुणकारी आहे. प्रोस्टेट ग्लॅण्डचा कॅन्सर घालवण्याची क्षमता डाळिंब रसातसुद्धा आहे.
 • डाळिंब रसात ब-2 जीवनसत्व व प्रथिने विपुल प्रमाणात असल्यामुळे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत होते.
डॉ. विक्रम कड, प्रा. ए.पी. पाटील, डॉ. जितेंद्र ढेमरे
म. फु. कृ. विद्यापीठ, राहुरी