कृषी प्रक्रिया उदयोग स्थापनेसाठी पंकृविमिनी दालमिल एक पर्याय

डिजिटल बळीराजा-2    28-May-2020
|
 
dal_1  H x W: 0
 
कृषीमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित मालामध्ये रुपांतर केल्यास शेतकर्याचे उत्पन्नच वाढणार नाही तर सोबतच ग्रामिण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यासाठी ग्रामिण स्तरावर चालू शकेल असा छोटा यंत्रसंच असणे खेड्यातील जनतेच्या हिताचे आहे. कडधान्यावर प्रक्रिया करून कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करण्याकरीता कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. पं दे कृ वि अकोला अंतर्गत पंकृवि मिनीदाल (3 अश्वशक्ती) विकसीत करण्यात आली असून ग्रामिण भागातील युवकांना कृषी प्रक्रिया उद्योग कसा फायदेशीर होईल या संबंधीची माहिती या लेखात दिली आहे.
 
कृषिमालावर प्रक्रिया व त्याचे मुल्यवर्धन हया महत्वाच्या बाबी आहेत. ज्या शेतक-याचा नफा वाढवू शकतात तसेच मालाची होणारी हाताळणी व वाहतूकी दरम्यान होणारे नुकसान ब-याच प्रमाणत कमी करू शकतात. ग्रामिण भागातील युवकांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देउन कृषीप्रक्रिया उदयोग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे.
 
कोणत्याही विकसीत देशाची संपन्नता व समृध्दता हि त्या देशाच्या ग्रामिण भागावर अवलंबून असते आणि ग्रामिण भाग जर स्वयंपूर्ण असेल तरच ते शक्य होते. बेरोजगारी, कमी रोजगारी इत्यांदीमुळे ग्रामिण भाग विशेषत: तरूण वर्ग खचून जातो व त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. ग्रामिण भागातील बेरोजगारी, मेहनत करूनही मिळणारी कमी मजूरी, कुटुंबामध्ये वाटणी झाल्यामुळे नावावर येणारी कमी जमीन या उलट शहरी भागामध्ये कामाच्या उपलब्ध संधी, अधिक उत्पन्न, चांगल्या सुख-सोयी, शिक्षण सुविधा इत्यादी कारणांमुळे ग्रामिण भागातील लोक शहरांकडे स्थलांतरीत होेत आहेत. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवून देणा-या रोजगाराच्या संधी शोधणे आणि त्यासुध्दा खेडयातच निर्माण होणे अति गरजेचे आहे. रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध होण्यासाठी सम प्रमाणात विस्तार व कृषिमालामध्ये विविधता असणे आवश्यक आहे. हरीतक्रांतीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये भारत देश स्वयंपूर्ण बनलेला आहे.
 
कोणत्याही पिकाच्या अति जास्त उत्पादनामुळे त्या पिकाचा बाजारभाव कमी होतो व शेतक-याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये माल विकावा लागतो. अन्नधान्यासारख्या मालाची वाहतूक व साठवण तसेच काढणी पश्चात नुकसान न होता भारतीय वातावरणात जास्त काळ टिकवून ठेवणे महागात जाते. वरील मालावर प्रक्रिया केल्यास त्यांचे मोठे आकारमान कमी होते व वाहतूक व साठवणूकीचा खर्च वाचतो. प्रक्रियीत मालाला कच्च्या मालापेक्षा कमी जागा तर लागतेच शिवाय कच्च्या मालाचे मुल्यवर्धन होउन उपजिविकेचे/उदरनिर्वाहाचेसाधन निर्माण होते. ग्राहकसुध्दा वेळेमध्ये होणारी बचत, साठविण्यासाठी लागणारी कमी जागा, मालाची उपयुक्तता इत्यादी कारणांमुळे मुल्यवर्धीत-प्रक्रियीत मालाला पसंती देतात.
 
ग्रामिण उदयोगिकीकरण केल्यास ग्रामिण भागातून शहराकडे स्थलांतरकरणा-या मनुष्यबळाचे स्थलांतर थांबविता येइल तसेच ग्रामिण भागाचा विकास व सामाजिक-आर्थिक जिवनमान उंचावण्यास हातभार लागेल. कृषीमालावर प्रक्रिया करून मुल्यवर्धीत मालामध्ये रूपांतर केल्यास शेतक-याचे उत्पन्नच वाढणार नाहीतर सोबतच ग्रामिण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होइल. म्हणूनच प्रक्रिया हा एकूण आर्थिक विकासासाठी एक महत्वाचा विभाग मानल्या जातो. कापणी पश्चात प्रक्रिया हि रूपांतर, मुल्यवर्धन व नुकसान टाळणारी एक महत्वाची पायरी आहे. यासोबतच ग्रामिण भागामध्ये अशा कृषिप्रक्रिया उदयोगस्थापन केल्यामुळे अन्नधान्याचे मोठया प्रमाणात होणारे नुकसान कमी करता येते.ग्रामिण स्तरावरील कृषी मालाची प्रक्रिया कापणी पश्चात नुकसानच कमी करणार नाही तर स्थानिक लोकांसाठी दोन्हीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अतिरिक्त रोजगार निर्माण करते. अन्नधान्यावरील प्रक्रिया हि मुल्यवर्धनामधील महत्वाची पायरी आहे.

dal 2_1  H x W: 
 
सदयस्थितीत तुरीचे भरघोस उत्पादन झाले असून प्रक्रियेकरीता मोठया प्रमाणात कच्चामाल उपलब्ध आहे.
 
पंकृवि मिनीदाल मिल (3 अश्वशक्ती)
 
कृषि प्रक्रियक होण्यासाठी दाळवर्गीय धान्य फारच उत्तम साधन आहे. त्यासाठी ग्रामिण स्तरावर चालू शकेल असा छोटा यंत्रसंच असणे खेडयातील जनतेच्या हिताचे आहे. कडधान्यावर प्रक्रिया करून कच्च्यामालाचे मुल्यवर्धन करण्याकरीता कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. पं दे कृ वि अकोला अंतर्गत पंकृवि मिनीदाल (3 अश्वशक्ती)विकसीत करण्यात आली. या दालमील मध्ये कडधान्याच्या दाळी व मोगर तयार करता येतात तसेच रोलर बदलवून गहू सफाई, काळया ज्वारीला व मुगाला चकाकी आणता येते. चाळण्या बदलल्यास पंकृवि मिनीदाल मील यंत्र वेगवेगळया प्रकारचे धान्य सफाई करण्याकरीता उपयोगात आणता येते. या यंत्रामध्ये दाळीचा उतारा तुरीकरीता 72-75 टक्के तर मुग व उडीदा करीता 75-78 टक्कयांपर्यंत मिळतो. पंकृवि मिनीदाल (3 अश्वशक्ती) यंत्राची किंमत रू. 72,000/-आहे.
 
पंकृवि मिनीदाल मिल (5 अश्वशक्ती)
ग्राहकांच्या मागणीनुसार 5 अश्वशक्तीवर चालणारी अधिक क्षमतेची पंकृवि मिनीदाल मील विकसीत करण्यात आली. या यंत्राची क्षमता तुरीसाठी 250-300 व मुग, उडीद व हरब-यासाठी 300 ते 350 किलो प्रतीतास क्षमता आहे. या यंत्राची अंदाजे किंमत रू. 1,10,000/-आहे.
 
पंकृवि मिनीदाल मिल (1 अश्वशक्ती) 
पंकृवि मिनी दालमील करीता विदयापिठाचे अधिकृत निर्माते
 
 अ.क्र.   अधिकृत निर्माता   संपर्क
 1  मे. ओसाव इंडस्ट्रीयल प्रोडक्टस प्रा. लि.,  ओसाव काँम्लेक्स, जगाध्री रोड, अंबा लाकँट-133 001 (हरीयाना) 08814936888
 2  मे. श्री. जलाराम इंजिनिअरींग वर्क्स  डी.-5,एम. आय.डि.सी., फेज 2, अकोला 9422163388
 3  मे. मॉ दुर्गा प्लास्टीक प्रोडक्टस (मशीनरी डिविजन)  एम. आय.डि.सी., फेज 3, अकोला 9422163183
 4  मे. व्हि. के. मॅन्यफॅक्चरींग अॅन्ड मशिनरी सप्लायर्स  तुलसी काँम्प्लेक्स, कारेगाव रोड परभणी 9860549617
 5  मे. श्रीराम असोसिएटस  एम. आय.डि.सी., फेज 3, अकोला 9823090002
 
महत्वाचे:
ग्राहकांनी अधिकृत निर्मात्यांकडून दालमील खरेदी करते वेळी प्रात्यक्षिक पाहून, दालमील योग्य रित्या कार्य करते याची खात्री करून, यंत्राचा दर्जा पाहून समाधान झाल्यानंतरच दालमील खरेदी करावी.
 
 
प्रदिप बोरकर,
संशोधन अभियंता, कापणी पश्चातअभियांत्रिकी व तंत्रज्ञान,
डॉ. पंदेकृवि, अकोला (0724- 2258266)