ऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

डिजिटल बळीराजा-2    09-Mar-2020
|

  


sugarcane_1  H

साधारणपणे ज्या जमिनीत सातत्याने ऊस लागवड असते, सेंद्रीय खतांचा कमी वापर, रासायनिक खतांचाच वापर केला जातो, अशा जमिनीतून सूक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण जादा झाल्यामुळे जमिनीत त्यांची कमतरता भासते. ऊस उत्पादन वाढीसाठी लक्षणे ओळखून शिफारशीत मात्रेमध्ये सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा.

ऊस पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे. सध्याची पीक जोपासना लक्षात घेतली तर आवश्यक 16 अन्नद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या वापरासंबंधी जितकी काळजी घेतली जाते तितकी काळजी कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्य आणि लोह, जस्त, मॅगेनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या वापराबाबत घेतली जात नाही.

राज्यातील उसाखालील जमिनीत विशेषत: चुनखडीयुक्त जमिनीत जस्त आणि लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येते, अशा ठिकाणी उसावर केवडा पडलेला दिसून येतो.
 
सर्वसाधारणपणे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उसावरील कमतरता लक्षणे लक्षात घेता नेमके कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे हे पीक निरीक्षणावरून ठाम ओळखणे अवघड जाते किंवा काही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता लक्षणातील काही बाबी समान असल्यामुळे कमतरतेचा अंदाज करण्यात संभ्रम निर्माण होतो.
 
जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मर्यादा पातळीच्या खाली गेल्यास पानातील आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते आणि पिकावर कमतरता लक्षणे दिसून येतात. याचा परिणाम ऊस पीक वाढीवर आणि पर्यायाने ऊस उत्पादनावर होतो.
सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर न केल्याने होणारे प्रतिकूल परिणाम ताबडतोब दृश्य स्वरूपात नसतात. मात्र त्यांची कमतरता उत्पादनावर परिणाम करते.
 
 सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपस्थिके नतीत पित्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करतात. म्हणजेच एखादे अन्नद्रव्य हे दुसर्‍या अन्नद्रव्याची जागा घेऊ शकत नाही.
 
वसंतदादा साखर संस्थेत झालेल्या मद सर्वेक्षण अहवालानुसार साधारण 70 टक्के जमिनीत जस्त आणि30 टक्के जमिनीत लोह या सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता दिसून आली आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची ऊस पिकातील कार्ये आणि कमतरतेची लक्षणेः
 
लोह - कार्येः
 
1) हरितद्रव्ये तयार करण्यासाठी उपयुक्त.
2) पानांचा गडद हिरवा रंग बनविण्यास मदत.
3) इतर अन्नद्रव्यांच्या शोषणात मदत करतो.
4) झाडांच्या वाढीस व प्रजननास आवश्यक.
  
*कमतरता लक्षणे :
 
1) नवीन पाने पिवळी दिसतात, शिरा हिरव्या दिसतात.
2) लक्षणे प्रथमत: वरील भागातील पानावर आढळून येतात.
3) पाने पांढूरकी होउन शेवटी वाळून जातात.

जस्त -
 
कार्ये ;
 
1) प्रथिने व वितंचके (एन्झाईम) निर्मीतीस आवश्यक घटक.
 
2) पिकांच्या वाढ करणार्‍या प्रेरकांच्या वाढीसाठी आवश्यक.
 
3) वनस्पतीमध्ये इंडोल सिटीक सिड (आ.ए.ए) तयार होण्यासाठी ट्रिव्होफेनच्या निर्मितीची आवश्यक असते. त्यासाठी जस्त आवश्यक.
 
4) संप्रेरक द्रव्ये (हार्मोन्स) तयार होण्यास मदत करतो. प्रजनन कियेमध्ये आवश्यक.
 
*कमतरता लक्षणे -
 
1) पानात हरितद्रव्यांचा अभाव दिसू लागतो, शिरा हिरव्याच राहतात.
 
2) करपलेले ठिपके व तांबडे डाग पानाच्या शिरा, कडा व टोके यावर तसेच सर्व पानांवर विखुरलेल्या स्वरूपात दिसतात.
 
3) उसामध्ये कांड्या आखुड पडतात.

मॅगेनीज -
 
कार्ये
 
1) प्रकाश संश्लेषण प्रकियेत मदत.
 
2) जैविक दृष्ट्या कार्यप्रवण असलेल्या पेशिजालामध्ये इतर भागापेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध.
 
*कमतरता लक्षणे-
 
1) पानात हरितद्रव्याचा अभाव.
 
2) मुख्य व लहान शिरा गडद किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात,त्यामुळे पानावर चौकटीदार नक्षी दिसते.

तांबे -
 
कार्ये
 
1) वनस्पतींना तांब्याची गरज फार अल्पप्रमाणात असते.
 
2) तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त उपलब्ध झाल्यास अपायकारक ठरते.
 
3) हरितद्रव्ये व प्रथिने तयार होण्यासाठी मदत.
 
4) लोहाचा उपयोग योग्यप्रकारे होण्यासाठी मदत.
 
5) श्वसनक्रियेचे नियमन करण्यासाठी आवश्यक.
 
कमतरता लक्षणे
 
1) पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात.
 
2) वनस्पतीचे खोड मऊ व लवचिक बनते.
 
3) फुटव्यांची संख्या कमी होते.
 
4) पानांवर हिरवे ठिपके दिसतात.

बोरॉन -
 
कार्ये
 
1) कॅल्शियम विद्राव्य स्थितीत राहण्यास व त्याचे स्थलांतर होण्यास मदत.
 
2) नत्राचे शोषण करण्यास मदत.
 
3)पेशी आवरणाचा घटक असून पेशी विभाजनास मदत.
 
4) आवश्यकतेनुसार साखरेचे स्थलांतर घडवून येण्यास