ऊस रोप वाटीकेतील अननस रोगाचे निर्मुलन

डिजिटल बळीराजा-2    07-Mar-2020
|


sugarcane_1  H
 
 
 
ऊसाची सरासरी उत्पादकता व साखर उता-यासह उत्पादनखर्च वाढीवर परिणाम करणा-या ज्या जैविक, अजैविक घटकांचा अभ्यास केला जातो. त्यातील रोग व किडी या जैविक घटकांचा परिणाम हा नक्कीच लक्षात घेणे गरजेचे आहे. ऊस वाढीच्या प्राथमिक अवस्थेतच या रोगांचा हल्ला संपुर्ण रोपवाटीकेचे नुकसान करणारा ठरतो. त्यामुळे अननस रोगाचे निर्मुलन करण्यासाठीच्या उपाययोजनांकडे शेतक-यांना लक्ष पुरवावे लागणार आहे. 
ऊस हे भारतातील किंबहुना महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक म्हणून सर्वश्रृत आहे. त्याने शेतक-यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडवुन आणलेला आहे. राज्यातील 10 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवडीचे प्रमाण असणारा ऊस सध्याच्या वाढत्या तापमान व जलसंपत्तीचे दुर्भिक्ष याच्या द़ृष्टचक्रात अडकलेला दिसतो. ऊसाची सरासरी उत्पादकता व साखर उता-यासह उत्पादनखर्च वाढीवर परिणाम करणा-या ज्या जैविक, अजैविक घटकांचा अभ्यास केला जातो. त्यातील रोग व किडी या जैविक घटकांचा परिणाम हा नक्कीच लक्षात घ्यावा लागतो. 
 
पारंपारीक उस लागवड करीत असतांना हेक्टरी येणारा बेणेखर्च, वाहतूक, बेण्याची उगवणक्षमता यांचा विचार करतांना राज्यातील शेतीसाक्षर होत असणारा हुशार शेतकरी आता कोकोपीट मध्ये एकडोळा ऊस रोपवाटीका तयार करुन त्यातील रोपांची महिना सव्वामहिना अंतराने शेतात पुर्नलागवड करीत आहे. त्यामुळे सध्या उस एकडोळा रोपवाटीका हा एक नवा कृषीजन्य व्यवसाय म्हणून मुळ धरत आहे. विविध स्तरावरच्या रोपवाटीकांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या ऊस रोपांची किंमत अनेकदा अकिफायतशीर असल्याने सर्वसामान्य शेतक-यांना ती परवडत नाही. तसेच जे काही जिज्ञासू शेतकरी स्वत:च्या शेतावर रोपवाटीका तयार करतात. त्यांच्या उगवण्याच्या अवस्थेमध्ये अनेक ठिकाणी अननस रोगांचा प्रार्दुभाव दिसुन आलेला आहे. ऊस वाढीच्या प्राथमिक अवस्थेतच या रोगांचा हल्ला संपुर्ण रोपवाटीकेचे नुकसान करणारा ठरतो. त्यामुळे अननस रोगाचे निर्मुलन करण्यासाठीच्या उपाययोजनांकडे शेतक-यांना लक्ष पुरवावे लागणार आहे.
 
 
sugarcane_1  H
 
रोगाचे कारण:- 
 
1. हा रोग सिरोटोसायस्टिस पॅरॉडॉक्सा या कवक बुरशी मुळे होतो. 
 
2. खांडलेले बेणे शिळे झाल्यावर लावणे, रोगग्रस्त, कमी दर्जाचे कोकोपीट वापरावे. हवामान थंड किंवा दमट असणे, मृतवत असणा-या काडीकच-याचे प्रमाण अधिक असणे. तसेच निचरा न करता सततचे पाणी देणे, हया गोष्टी रोग वाढीसाठी पोषक असतात. 
 
3. ही बुरशी सॅप्रोफायटिक असुन यांचा प्रसार माध्यमाव्दारे, मृदेव्दारे होतो. यांचे बिजाणु केळी, कोको, नारळ, तेल्यामाड इ. च्या कचपटावर वर्षानुवर्षे गुजराण करतात व पोषक वातावरणात संबंधित पिकांवर आपला प्रार्दुभाव दाखवितात. 
पाईनापल रोग हे नांव का? 
 
लागण करुन प्रार्दुभाव ग्रस्त झालेल्या उस बेण्यास कोकोपीट मधुन बाहेर काढल्यावर पिकलेल्या भागाचा वास घेतल्यास तो अननससारखा येतो. त्यामुळे या रोगास अननस रोग असे म्हटले जाते. सर्वप्रथम प्लोरीडा अमेरीका प्रांतात मोठया प्रमाणावर प्रार्दुभाव नोंदवला गेला. 
 
sugarcane_1  H
लक्षणे : 
 
1. रोपामधील मुलभुत पेशीवर ही बुरशी हल्ला चढवते त्यामुळे या बुरशीच्या प्रार्दुभावामुळे खांडलेले ऊस बेणे लालसर-तांबुस व पुढे काळपट पडते. डोळा सडण्याची प्रक्रिया घडते. 
 
2. ऊसाचा एक डोळा लागण केल्यानंतर कोकोपीट/जमीन 2-3 आठवडयामध्ये पोषक वातावरणात त्याचे लक्षणे दिसतात. डोळा अतिखोल दाबणे, कमी तापमान, अंकुर येण्यासाठी अधिक कालावधी या गोष्टी रोगाचे प्रमाण वाढवतात. 
 
3. अंकुर व रोगाचा प्रसार याचे प्रमाण व्यस्त असते. 
 
4. उष्ण जलप्रक्रिया केलेल्या ऊस बेण्यावर देखील याचा प्रार्दुभाव होतो. 
 
5. अंकुर न झालेले डोळे बाहेर काढल्यास त्यात काळया रंगाच्या पोकळया निर्माण झालेल्या दिसतात. अंकुर झालेल्या रोपांचे शेंडे 6-12 सें.मी. वाढल्यानंतर वरुन खाली वाळू लागतात. शेंडयावर पिवळे-तांबुस-करडे करपल्याप्रमाणे ठिपके पडतात. ठिपक्यांचे प्रमाण वाढून रोप वाळते व गळते. 
 
6. किण्वण प्रक्रियेमुळे ऊसाच्या बेण्याला इथिल अ‍ॅसिटेट याचा अल्कोहोल दारुसारखा वास येतो. 
 
7. उभ्या ऊसात याचा प्रार्दुभाव होत असला तरी, उगवण्याच्या स्थितीत रोपांचे अंकुरण न झाल्यामुळे होणारे नुकसान खुप मोठे असते. 
 
sugarcane_1  H
 
उपाययोजना:- 
 
अ. प्रतिबाधात्मक उपाय : 
 
1. प्रमाणित, सशक्त, अनुवंशिकरित्या शुध्द, जाड, एकसारख्या कांडया असणारे 9-10 महिन्याचे कोवळ उत्कृष्ठ उगवणक्षमता असणारेच ऊस बेणे वापरावे. जुनं, खोडव्याचे, अधिक वयाचेे बेणे वापरल्यास उगवणक्षमता कमी होतांना आढळते. 
2. बेणे खांडल्यावर 0.1 टक्के बाविस्टीन 100 पीपीएम जीए-3 या संजीवकाची बीजप्रक्रिया 15 मिनीटांसाठी करावी. जेणेकरुन ऊस वाणावरील रोग किडीच्या सुप्त अवस्थेचे निर्मुलन होवून जिब्रेल्मिक अ‍ॅसिड हया संजीवकामुळे उगवणक्षमता झपाटयाने वाढेल. 
 
3. वरील बीजप्रक्रियेनंतर 10 मिनीटानंतर स्फुरद विरघळणारे जीवाणू व अ‍ॅसीटोबॅक्टर यांची प्रमाणित बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर बेणे ट्रे मध्ये योग्य खोलीवर दाबावे. 
 
4. प्लॅस्टिक ट्रे मध्ये 42 कपाचा ट्रे वापरावा. त्याचे निच-याचे छिद्र तपासावे. कोकोपीट हे माध्यम एकुण वापरातांना ते प्रमाणित कपंनीचे असावे. त्याचा पीएच ;सामूद्ध 6.5 - 7.5 असावा. ते निर्जंतूक केलेले असावे त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण 20:1 असावे. त्याचा ईसी 600-700 मायकोमोहोस एवढाच असावे. 
 
5. कोकोपीट मध्ये कोणतेही नत्र किंवा स्फुरद खते त्यासाठी 25 कि.ग्रॅ. कोकोपीटसाठी 2.5 कि.ग्रॅ. एसएसपी व 1 कि.ग्रॅ. युरीया मिसळावा. 
 
6. पाण्याचे सुयोग्य नियोजन करावे. त्यासाठी हवामानाचा अंदाज घ्यावा भारभार पाणी टाळावे. गरजेनुसार स्प्रिंकलर अथवा सरीने दोन किंवा एक दिवसाआड पाण्याचा छिडकावा करावा. 
 
रासायनिक उपाययोजना : 
 
1. ऊस रोपाची दररोज पहावी करावी. व अननस रोगाची लक्षणे दिसतात. 2 ग्रॅम - 1 लिटर पाण्यात बाविस्टीन म मॅलॅथिऑन यांचे मुरवण प्रत्येक रोपाभोवती करावे. त्यानंतर पाण्याचा सिंचनचा ताण दयावा. गरजेनुसार वरील फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. 
 
2. दोन-तीन पानांवर ऊस-रोपे आल्यानंतर प्रमाणित सुक्ष्म अन्नद्रव्याची फवावणी करावी. 
 
3. प्रोपोकोनॅझोल ;टील्टद्ध याची 25 मिली ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात फवारणी केल्यास रोगाचा प्रार्दुभाव कमी होवून उस बेण्याची उगवणक्षमता वाढल्याचे निष्कर्ष आहेत. ;कोमस्टॉकएटॉल 1984द्ध 
 
4. एकदा रोगप्रार्दुभाव झालेले कोकोपीट, माती ही पुन्हा ऊस रोपवाटीकेसाठी वापरु नये. 
वरीलप्रमाणे अननसरोगाचे ऊस रोपवाटीकेत निर्मुलन करण्यास भांडवल व वाहतूक बेणे खर्चात बचत रोपे लागण्यासाठीचा काळापर्यंत बचत, पाणी तणनाशक यांची बचत, होवून कमी खर्चात पूर्ण उगवण झालेली सशक्त ऊस रोपे पुर्नलागवडीसाठी मिळू शकतील. 
 
श्री. पी. पी. खंडागळे, डॉ. के.एस. रघुवंशी व डॉ. एस.एम. पवार
वनस्पती रोग शास्त्र विभाग, म.फ.कृ.वि. राहुरी, जि.अ.नगर