सेवानिवृत्ती नंतर शेतीत आनंदवन फुलविणार्‍या श्री. आनंदराव पिंजरकर यांची यशोगाथा

डिजिटल बळीराजा-2    07-Mar-2020
|
 
श्री. आनंदराव पिंजरकर हे सार्वजनिक बांधकाम विभागात विभागीय भांदारोल या पदावर कार्यरत होते. सन 2013 मधे ते सेवानिवृत्त झाले. पुढील आयुष्य आरामात क्यातीत करण्या ऐवजी त्यांनी शेतीत काम करण्याचे ठरविले.
  
ध्येयाचा ध्यास असला की कामाचा त्रास वाटत नाही या उक्तीप्रमाणे श्री. आनंदराव पिंजरकर यांनी अथक परिश्रमाने तरुणांना ही लाजवेल अशा उत्साहामध्ये शेतीत नंदनवन फुलविले.
 
* पिकांची विविधता - पारंपारिक पिकांपेक्षा नवे काही करण्याच्या ध्यासानी त्यांनी आराखडा करून श्री. आनंदराव पिंजरकरयांनी डाळिंब (2 एकर), अँपल बोर (तिस गुंठे), शेवगा (70 झाडे), केशर आंबा (1 एकर) , गुलाब (5 गुंठे) अशी लागवड केली.
 
* श्री. आनंदराव पिंजरकर यांचा दिनक्रम सकाळी शेतातील कामामाधुनच सुरू होतो आणि अगदी सायंकाळपर्यंत ते शेती कामामध्येच व्यस्त असतात. लागवड केलेल्या पिकांची अगदी बारीक सारीक गोष्टींची नोंद त्यांनी ठेवली आहे. अगदी लागवडी पासून फवारणी, खते, लागलेला खर्च या सगळ्या गोष्टींची तंतोतंत लेखी नोंद त्यांनी केली आहे.

rose_1  H x W:
 
* गुलाबातून ताझे उत्पन्न : सहा बाय पाच फुटांवर गुलाबाची 250 झाडे लावली होती. मागणीनुसार पुरवठा अपुरा पडू लागल्याने 50 नव्या झाडांची लागवड वाढवली आहे. सध्या दररोज 300 ते 400 फुलांचे उत्पादन मिळते. वाशीम शहरात एका फुल विक्रेत्यासोबत प्रति नाग 2 ते 3 रुपये असा दर निश्चित केला आहे. त्यामुळे वेगळी बाजारपेठ शोधण्याची गरज भासली नाही. या पिकातून दररोज ताजे उत्पन्न हाती येते. त्यातून दैनंदिन खर्चाला मदत होते.


groundnut _1  H
 
* भुईमुगाचे उत्पन्न : केशर आंब्याच्या बागेमध्ये भुईमुगाचे अंतरपीक घेतले. भुइमुगमधुन 30 गुंत्यात सुमारे 10 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. सिताफळ, द्राक्ष, चिकू, करवंद यांचीही लागवड केली आहे. आगामी काळात सर्वच झाडांपासून मिळकत सुरू होईल. पर्पारिक शेतीत सोयाबीन, तूर आहे.