स्प्राऊटिंग ब्रोकोली

डिजिटल बळीराजा-2    16-Mar-2020
|

brokoli_1  H x
ब्रोकोलीची लागवड यशस्वी होण्यासाठी जमीन, हवामान, रोपे तयार करणे, सुधारित जाती, लागवड, पाणी व खत व्यवस्थापन आंतर मशागत किड व रोग नियंत्रण काढणी व --- कारक संबंधी माहिती गरजेची असून तीचा उहापोह या लेखात केला आहे.
स्प्राऊटिंग ब्रोकोली आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी आणि फुलकोबी यांचे ‘कुळ, जाती आणि स्पेसीज एकच आहेत. स्प्राऊटिंग ब्रोकोली ही भाजी इटली देशात अनेक शतकापासून लागवडीखाली असून तेथील सर्व लोकांना परिचयाची आहे आणि या भाजीचा उपयोग भाजी आणि सॅलडसाठी होत आहे. 
 
स्प्राऊटिंग ब्रोकोली या भाजीचा फक्त ‘ब्रोकोली’ या नावानेच उल्लेख केला जातो. तर अमेरिकेत ही भाजी ‘इटालियन ब्रोकोली’ या नावाने परिचयाची आहे. या भाजीचे मूळ स्थान इटली आहे. 
 
ब्रोकोली आहारात वापरण्याची पद्धत 
 
ब्रोकोली गड्ड्याचा रस काढून शरीर आरोग्य जपण्यासाठी पेय म्हणून, तर सुप तयार करून वापरतात. भारतामध्ये मुख्यत्वे करून ब्रोकोलीचे हिरवे सॅलड या स्वरूपात आहारात उपयोग करतात, त्याचप्रमाणे ब्रोकोली तुकडे बटरमध्ये फ्राय करून, ब्रोकोली पराठा तयार करून, ब्रोकोली रस व सुप तयार करून दररोजचे आहारात वापरत असतात. 
 
ब्रोकोली- औषधी गुणधर्म 
 
ब्रोकोलीच्या गड्ड्यामध्ये महत्त्वाची अँटी-ऑक्सीडंट्स (अपींळ-जुहळवरपीीं) तीव्र स्वरूपात उदा. क्युर्सिटिन (र्टीशीलशींळप), बेटा कॅरोटिन (इशींर उरीेींशपश), इनडोलस् (खपवेश्रशी), जीवनसत्त्व ‘क’ (तळींराळप उ), ल्युटेन (र्ङीींशळप), ग्ल्युकोरेट (ॠर्श्रीलेीरींश), सल्फोराफेन (र्डीश्रहिेीरहिरपश) असल्याने ब्रोकोली हे शरीर आरोग्य पोषणास उत्तम भाजी असल्याने शरीरातील वरील अँटी-ऑक्सीडंट्सच्या तीव्रतेमुळे कॅन्सर (कर्करोग) मोठ्या आतड्याचा, लिव्हरचा आणि ब्रेस्टकॅन्सर होऊ न देण्याचे नियंत्रण करतात. त्याचप्रमाणे या भाजीत कॅलरीज्चे प्रमाण अतिशय कमी असल्याने परंतु जीवनसत्त्वे अ, क, के, बी-6 आणि इ, फोलीक आम्ल आणि खनिजे- पोटॅशियम, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम यांचे प्रमाण जास्त असते. या सर्व घटकांची शरीर आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेनचे प्रमाण जास्त असल्याने पोटातील अल्सरचे नियंत्रणासाठी याचा फार उपयोग होतो. याशिवाय शरीरात ट्युमर झाल्यास या घटकामुळे ट्युमरचा आकार लहान होण्यास मदत होते. 

brokoli_1  H x
हवामान : 
 
ब्रोकोलीचे उत्पादन थंड हवामानात अतिशय उत्तम प्रकारे घेता येते. हिवाळी हंगामात या पिकाची लागवड उत्तम प्रकारे फायदेशीर होते. तसेच ज्या भागात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी सुद्धा ब्रोकोलीची लागवड करता येते. महाराष्ट्रातील पांचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड या सातारा जिल्ह्यातील गावामध्ये उन्हाळ्यात देखील ब्रोकोलीची लागवड यशस्वी होते. तसेच पुण्याच्या आसपासच्या भागात ब्रोकोलीची लागवड शेतकरी उन्हाळ्यात सुद्धा करतात. 
 
दिवसाचे 20 अंश ते 25 अंश सें. ग्रे. तापमान रोपांची वाढ होण्यासाठी आवश्यक असून गड्डा तयार होते समयी तापमान 15 अंश ते 20 अंश सें. ग्रे. असणे जरुरीचे आहे. तापमानामध्ये वाढ झाल्यास तयार झालेला गड्डा घट्ट राहत नाही. 
 
हरितगृहामध्ये वर्षभर ब्रोकोलीची लागवड करण्यासाठी हरितगृहात रोपांची जोमदार वाढ होणेसाठी दिवसाचे तापमान 20 अंश ते 25 अंश सें. ग्रे. निश्चित करावे आणि सापेक्ष आर्द्रता 70% नियंत्रित करावी. गड्डे लागणीचे वेळेस रात्रीचे व दिवसाचे तापमान अनुक्रमे 15 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअस आणि 20 अंश से. ते 25 अंश से. आणि 70% सापेक्ष आर्द्रता नियंत्रित करावी. 
 
जमीन 
 
जमीन चांगल्याप्रकारे पाण्याचा निचरा होणारी, मध्यम रेती मिश्रित सेंद्रिय खतेयुक्त जमीन या पिकाच्या लागवडीसाठी चांगली असते. जमिनीचा सामू 5.5 ते 6.8 चे दरम्यान आवश्यक आहे. जमिनीची पूर्व मशागत करणेसाठी जमीन ट्रॅक्टरचे साहाय्याने अंदाजे 40 सें.मी. खोली उभी-आडवी नांगरून, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीचे वेळी 40 आर क्षेत्रासाठी 12 ते 15 मे. टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून टाकावे. 
 
लागवड करणेसाठी सरी-वरंबे किंवा गादी वाफे तयार झाल्यावर लागवडीचे क्षेत्र सिल्व्हर पेरॉक्साइड या रसायन द्रव्याने निर्जंतुक करावे. सिल्व्हर पेरॉक्साइड 35 मि.लि. प्रती लिटर पाण्यात प्रती चौरस मीटर क्षेत्रावर टाकावे. प्लास्टिक पेपर झाकण्याची गरज नसते. द्रावण टाकल्यानंतर 6-7 तासानंतर लागवड करता येते. याचप्रमाणे रोपे तयार करण्यासाठी तयार केलेले गादी वाफेसुद्धा वरील पद्धतीने निर्जंतुक करावे. 
 
हरितगृहामध्ये लागवड करणेसाठी हरितगृहात शिफारस केलेले माध्यम सुद्धा सिल्व्हर पेरॉक्साइड या रासायनिक द्रव्याने निर्जंतुक करावे. त्यानंतर 60 सें.मी. रुंद, 30 सें.मी. उंच व दोन गादीवाफ्यामध्ये 40 सें.मी. अंतर ठेवावे. एकूण 40 आर हरितगृहामध्ये 40 मीटर लांबीचे 100 गादी वाफे होतात. 
 
रोपे तयार करणे - ब्रोकोलीची रोपे 1) गादी वाफे तयार करून बी पेरणे, 2) प्लास्टिक ट्रे वापरून बी टोकून रोपे तयार करणे. 
1. गादी वाफे तयार करून बी पेरणे पद्धत: ब्रोकोलीचे रोपे गादीवाफ्यावर बी पेरून रोपे तयार करून लागवड करतात. गादी वाफे 1 मी. रुंद, 20 सें.मी. उंच व 10 मी. लांब आकाराचे तयार करण्यासाठी प्रथम जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करून घ्यावी व त्यानंतर योग्य त्या आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्यात अंदाजे 10 ते 15 कि. ग्रॅ. चांगले कुजलेले शेणखत, 50 ग्रॅम फोरेट, आणि 100 ग्रॅम फॉलीडॉल पावडर टाकून मातीत मिसळून घ्यावे. संपूर्ण गादीवाफे सिल्व्हर पेरॉक्साइड द्रव्याने निर्जंतुक करावे. नंतर 6-7 तासांनी बी पेरावे. वाफ्याच्या रूंदीच्या समांतर 5 सें.मी. अंतरावर 2 सें.मी. खोलीच्या रेषा आखून त्यामध्ये अतिशय पातळ प्रमाणात बियांची पेरणी करावी. बारीक गाळलेल्या शेणखताने बी झाकून घ्यावे. बी पेरलेल्या गादी वाफ्यांवर पाणी दिल्यानंतर प्लास्टिक पेपरने झाकून घ्यावे. बियांची उगवण चालू झालेली दिसताच वाफ्यांवरून प्लास्टिक पेपर काढून टाकावा. बी 5-6 दिवसात उगविलेल्या दिसतात. 40 आर (1 एकर) लागवडीसाठी संकरित जातीचे बियाणे 125 ग्रॅम लागले. 1 ग्रॅम बियाण्यामध्ये 300 ते 350 बिया असतात. रोपवाटिकेत रोपांच्या वाढीच्या काळात तापमान 20 अंश ते 22 अंश सें.ग्रे. असणे आवश्यक आहे. म्हणजे बियांची उगवण व रोपांची वाढ व्यवस्थित होईल. रोपवाटिकेस पाणी देतांना कॅल्शिअम नायट्रेट व पोटॅशियम नायट्रेट यांचे मिश्रण प्रत्येक 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांचे अंतराने द्यावे. त्याचप्रमाणे रोपांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर 8 ते 10 दिवसांनी मॅलेथिऑन किंवा रोगोर 1 मि.लि. + बावीस्टीन 1 ग्रॅम किंवा डायथेन एम-45 औषध 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 1.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. 
 
2) प्लास्टिक ट्रेमध्ये रोपे तयार करताना : ट्रेमध्ये निर्जंतुक कोकोपीट माध्यम भरून बी टोकावे. वरीलप्रमाणेच ट्रे मधील बी उगवून आल्यावर रोपांची काळजी घ्यावी. पुनर्लागणीसाठी रोपे 20-25 दिवसात तयार होतात. म्हणजे रोपांना 5-6 पाने असून रोपांची उंची 12 ते 15 सें.मी. असते.
 
सुधारित जाती 
 
ब्रोकोली पिकामध्ये हिरवे गड्डे, जांभळे गड्डे, फिकट हिरवे गड्डे आणि पांढर्‍या रंगाचे गड्डे असे प्रकार आहेत पण अमेरिकन आणि इतर युरोपिन भागात आणि भारतात हिरव्या गडद रंगाच्या गड्डयांचे वाणच अधिक लोकप्रिय झालेले असून याच हिरव्या रंगाच्या संकरित जातींची लागवड होत आहे. जांभळे रंगाचे वाण कडाक्याची थंडी सहन करू शकतात आणि ऐन हिवाळ्यात काढणीस येतात. हा प्रकार सुद्धा हिरव्या वाणाबरोबर लावावा. या गड्ड्यांना बाजारपेठ सुद्धा चांगली मिळेल. सॅलडमध्ये जास्त प्रमाणात याचा उपयोग होईल. 
 
बाजारपेठेत गड्ड्यांना गडद हिरवा रंग, बारीक फुलोरायुक्त मुलायम, घट्ट फुल असणार्‍या जातींना चांगली मागणी आहे. इटालियन ग्रीन ब्रोकोलीमधील जातींचीच लागवडीसाठी मागणी असते. ब्रोकोलीच्या रॉयलग्रीन, एव्हरग्रीन, ड ॅन्यूब, अव्हेला, युग्रीन सलीनास, पिलोग्रेम, ग्रीन माऊंटेन, ग्रँड सेंट्रल, प्रिमियम क्रॉप, प्रिमियम पुसा ब्रोकोली आणि निरनिराळ्या परकीय सीड कंपनींच्या संकरित जातीचे बियाणे भारतात / महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. बियाणे विकत घेताना त्याच्या उत्पादनाची माहिती, गड्डा काढणीस लागवडीपासून किती दिवसांत काढणीस तयार होतो हे सुद्धा महत्त्वाचे असल्याने सर्व बाबींची माहिती माहित करून नंतरच बियाणे विकत घ्यावे. 
 
महाराष्ट्रामध्ये ब्रोकोली लागवड करणेसाठी ‘पालम समृद्धी’ ही जात चांगली असून जास्त उत्पादन देणारी आहे. या जातीचा मुख्य गड्डा 300 ते 400 ग्रॅमचा असून गड्डा हिरव्या रंगाचा व घट्ट असतो. दुसरी जात पुसा केटीएस-1 ही मध्यम उंचीची असून गड्डे अतिशय घट्ट व गडद हिरव्या रंगाचे असतात. गड्ड्याचा व्यास 6 ते 15.4 से.मी. असून वजन 350 ते 450 ग्रॅम असते. 
 
लागवड 
 
पारंपरिक पद्धतीमध्ये ब्रोकोली रोपांची पुनर्लागण सरी-बरंबा पद्धतीने 45 सें.मी. दोन ओळीत व 45 सें.मी. दोन रोपांत अंतर ठेवून लागवड करतात. (45 सें.मी. बाय 45 सें.मी.) एकूण 19753 रोपांची लागवड प्रती 40 आर क्षेत्रात होते. काही ठिकाणी 3 मी बाय 3 मी. आकाराचे सपाट वाफे तयार करून त्यात वरीलप्रमाणे लागवड करतात. अतिशय सुपिक क्षेत्र असल्यास रोपांची लागवड 45 सें.मी. बाय 30 सें.मी. अंतरावर करतात. कारण रोपांची जोमदार वाढ होऊन खोडे पोकळ होत नाहीत. 
 
पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये गड्ड्यांची काढणी एका वेळेस न येता, गड्ड्यांचा व्यासाचा आकार सुद्धा एक सारखा आढळत नाही. 
 
उच्च प्रतीचे गड्डे, जास्त उत्पादन, गड्ड्यांचा आकार एक सारखा मिळण्यासाठी ब्रोकोली रोपांची पुनर्लागण गादी वाफ्यावर दोन ओळीमध्ये 30 सें.मी. बाय 30 सें.मी. अंतरावर करावी. म्हणजे दोन रोपांतील अंतर 30 सें.मी. आणि दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. 40 आर क्षेत्रामध्ये अंदाजे 26660 इतक्या रोपांची लागवड होते. 
 
पुनर्लागण साधारणत: दुपारनंतर करावी आणि लागवड झालेल्या रोपांना ठिबक संचद्वारे पाणी द्यावे. रोपांची लागवड करणे पूर्वी रोपे 10 लिटर पाण्यात 12 मि.ली. मोनोक्रोटोफॉस टाकून तयार केलेल्या द्रावणात बुडवून घ्यावीत. 
 
हरितगृहांमध्ये ब्रोकोली रोपांची लागवड प्रत्येक गादी वाफ्यावर दोन ओळीत 30 सेंमी. व दोन रोपांत 30 सेंमी. अंतर ठेवून लागवड करावी. एकूण 26,660 रोपांची लागवड प्रती 40 आर आकारमानाच्या हरितगृहात होते. लागवडीचे अगादेर प्लास्टीक पेपरचे गादीवाफ्यावर आच्छादन करावे. 
 
पाणी व्यवस्थापन 
 
पारंपरिक लागवड केलेल्या रोपांना सरी पद्धतीने पाणी द्यावे. गादी वाफ्यावर लागवड केलेल्या रोपांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे आवश्यक आहे. यामुळे पिकाच्या उत्पादनाच्या वाढ होऊन गड्ड्यांची प्रत चांगली मिळते. पिकाला ठिबक पद्धतीने किती व कशाप्रकारे पाणी द्यावे ही बाब महत्त्वाची आहे. पिकाला दररोज किती लिटर पाण्याची संभाव्य गरज आहे हे प्रथम निश्चित करून दररोज पाणी देण्याचा कार्यक्रम निश्चित करावा. पिकास पाण्याची संभाव्य गरज काढण्याची पद्धत ‘झुकिनी’च्या प्रकरणात नमुद केलेली आहे.
 
खत व्यवस्थापन 
 
लागवडीचे क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी लागवड क्षेत्राचे जमिनीचे रासायनिक पृथक्करण रोपे लागवडीचे अगोदर करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे खतांच्या निश्चित मात्रा ठरविता येतात. साधारणत: ब्रोकोली पिकास 40 आर क्षेत्रास 60 किलो नत्र, 40 कि. ग्रॅ. स्फुरद आणि 70 कि. ग्रॅ. पालाश ही खते देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लागवड करणे पूर्वी मॅग्नेशियम सल्फेट 0.5 कि.ग्रॅ. / 10 चौ. मी. क्षेत्र या प्रमाणात जमिनीत मिसळून द्यावे. 
पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये ब्रोकोली पिकास स्फुरद व पालाश खतांच्या मात्रा व नत्राची अर्धी मात्रा जमिनीची पूर्व तयार करताना लागवड पूर्वी द्यावी. नत्राची राहिलेली अर्धी मात्रा दोन समान हप्त्यात लागवडीपासून 30 दिवसांनी व 45 दिवसांनी द्यावी. 
 
आच्छादनाचा वापर करणे 
 
गादी वाफ्यावर लागवड करताना गादी वाफ्यावर प्लास्टिक पेपरचे आच्छादन करावे. यामुळे रोपाच्या मुळांजवळील भागात तापमान नियंत्रित राहण्यास, तणांचे नियंत्रण आणि बाष्पीभवन कमी प्रमाणात होण्यास उपयोग होतो. शिवाय पिकाची उत्तम प्रत मिळण्यास मदत होते. 
 
वर शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा पिकास वाढीच्या अवस्थेनुसार खालीलप्रमाणे विभागून द्याव्यात. वरील प्रकारची खते खालीलप्रमाणे द्यावीत (40 आर क्षेत्रासाठी) 
 
रोपांची वाढीची अवस्था युरिया सिंगल सुपर म्युरेट ऑफ सोडियम बोरॅक्स 
 
अवस्था        फॉस्फेट    पोटॅश        मॉलिब्डे 46:0:0          0:16:0         0:0:60 लागवडीचे    65.0           250               116
अगोदर जमिनीत कि. ग्रॅ. कि. ग्रॅ.         कि. ग्रॅ.मिसळून द्यावे. लागवडीनंतर 32.500 --- --- 1.60 430 दिवसांनी कि. ग्रॅ. कि. ग्रॅ. कि. ग्रॅ.खुरपणी झाल्यावर लागवडीनंतर 32.500 0.00 0.00 1.60 4.0045-50 दिवसांनी कि. ग्रॅ. कि. ग्रॅ. कि. ग्रॅ.गड्डे लागणे चालू झाल्यावर मुख्य गड्ड्यांची 65 0.00 0.00 0.00 0.00काढणी झाल्यावर कि. ग्रॅ.पानांच्या बेचक्यातून येणार्‍या गड्ड्यांची वाढ होणेसाठी
मुख्य गड्ड्याची काढणी झाल्यावर पानांच्या बेचक्यातून येणार्‍या गड्ड्यांची वाढ होणेसाठी 40 आर क्षेत्रास 30 किलो नत्र द्यावे. (65 किलो युरिया) तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे द्यावे.
 
जमिनीच्या रासायनिक पृथ्थकरण अहवालाप्रमाणे मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत मिसळून द्यावीत. लागवडीपासून अंदाजे 25-30 दिवसांनी या अन्नद्रव्यांनी कमतरता असल्यास झाडाची खोडे पोकळ झालेली आढळून येतात. तसेच गड्डा काढणीस तयार झालेल्या अवस्थेतसुद्धा गड्डा कापला असता लहान लहान खोडे पोकळ झाल्याचे आढळून येतात आणि गड्ड्याचा हिरवा रंग फिकट होत जातो. गड्ड्यावर भुरकट रंगाचे डाग पडतात. अशा प्रकारच्या गड्ड्यांना बाजारात भाव मिळत नाही. बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास खोड पोकळ होते आणि गड्ड्याचा रंग रंग फिकट होेणे ही लक्षणे पिकावर आढळून येतात याचे नियंत्रण करणेसाठी लागवड झाल्यावर 25-30 दिवसांनी 40 आर क्षेत्रास 4 कि.ग्रॅ. बोरॅक्स (सोडियम टेट्रा बोरेट) जमिनीत मिसळून द्यावे. त्याचप्रमाणे लागवड झाल्यापासून 60 दिवसांनी पुन्हा 4 कि.ग्रॅ. बोरॅक्स जमिनीतून द्यावे. 
 
ब्रोकोली पानांच्या पाल्याची नेहमी सारखी वाढ न होता ती अरुंद व खुरटलेली दिसतात. झाडांचा शेंडा खुरटलेला राहतो व गड्ड्ा भरत नाही. मॉलिब्डेट या सुक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही विकृती आढळून येते. विशेषत: आम्लीय जमिनीत (सामू 5.5 चे खाली) ही विकृती दिसून येते. नियंत्रणासाठी 40 आर क्षेत्रास 1.6 कि.ग्रॅ. अमोनियम किंवा सोडियम मॉलिब्डेट जमिनीत लागवडीपासून 30 दिवसांनी आणि 60 दिवसांनी मिसळून द्यावे. अशा विकृतीला व्हिपटेल असे म्हणतात. 
 
ठिबक सिंचन द्वारा खत व्यवस्थापन 
 
उच्च प्रतीचे गड्डे, जास्त उत्पादन मिळणेसाठी खतांच्या मात्रा विद्राव्य खते वापरून ठिबक सिंचनाद्वारे पाण्याबरोबर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खाली दर्शविल्याप्रमाणे विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे देण्याची शिफारस करीत आहे. 
 
खताच्या मात्र 40 आर क्षेत्र लागवडीसाठी आहेत. 
 
1) टाकी क्र. 1 विद्राव्य खताचे नाव एक दिवसाआड 15 दिवस 
पोटॅशियम नायट्रेट - 13:0:45 0.513 कि.ग्रॅ. 
कॅल्शियम नायट्रेट - 15:5:0:0:18:6 (सीए) 12.043 कि.ग्रॅ. 
लोह (इ.डी.टी.ए.) 178 ग्रॅम
 
टाकी क्र. 2 विद्राव्य खताचे नाव एक दिवसाआड 15 दिवस 
पोटॅशियम नायट्रेट 0.513 कि.ग्रॅ.
मोनो पोटॅशियम फॉस्फेट 0:52:34 2.564 कि.ग्रॅ.
मॅग्नेशियम सल्फेट 4.445 कि.ग्रॅ.
बोरॉन 178 ग्रॅम 
मॉलिब्डेनम 71 ग्रॅम 
 
खतांच्या मात्रा पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी साधे पाणी द्यावे. 
 
2. टाकी क्र. 1 विद्राव्य खताचे नाव एक दिवसाआड 13 दिवस 
पोटॅशियम नायट्रेट - 13:0:45 1.150 कि.ग्रॅ. 
कॅल्शियम नायट्रेट - 15:5:0:0:18:5 (सीए) 5.515 कि.ग्रॅ. 
लोह (इ.डी.टी.ए.) 205 ग्रॅम 
 
टाकी क्र. 2 विद्राव्य खताचे नाव एक दिवसाआड 13 दिवस 
पोटॅशियम नायट्रेट 1.150 कि.ग्रॅ.
मोनो पोटॅशियम फॉस्फेट 0:52:34 1.480 कि.ग्रॅ.
मॅग्नेशियम सल्फेट 5.128 कि.ग्रॅ.
बोरॉन 205 ग्रॅम 
मॉलिब्डेनम 82 ग्रॅम 
 
खतांच्या मात्रा पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी साधे पाणी द्यावे. 
 
3. टाकी क्र. 1 विद्राव्य खताचे नाव एक दिवसाआड 20 दिवस 
पोटॅशियम नायट्रेट - 13:0:45 1.303 कि.ग्रॅ. 
कॅल्शियम नायट्रेट - 15:5:0:0:18:5 (सीए) 2.653 कि.ग्रॅ. 
लोह (इ.डी.टी.ए.) 133 ग्रॅम 
 
टाकी क्र. 2 विद्राव्य खताचे नाव एक दिवसाआड 20 दिवस 
पोटॅशियम नायट्रेट 1.303 कि.ग्रॅ.
मोनो पोटॅशियम फॉस्फेट 0:52:34 0.961 कि.ग्रॅ.
मॅग्नेशियम सल्फेट 3.333 कि.ग्रॅ.
बोरॉन 133 ग्रॅम 
मॉलिब्डेनम 53 ग्रॅम 
 
खतांच्या मात्रा पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी साधे पाणी द्यावे. 
 
टाकी क्र. 1 आणि टाकी क्र. 2 मध्ये तयार झालेले विद्राव्य खतांचा तीव्र द्रावणाचा सामू 5.5 ते 6.8 चे दरम्यान असणे आवश्यक आहे. द्रावणाची आम्लता वाढविण्यासाठी टाकी क्र. 3 मधील नायट्रिक आम्लाचा वापर करावा. पाण्याची विद्युत धारका 1 पर्यंत असावी. 
 
माइक्रोला सूक्ष्म अन्न द्रवरूप खतांची फवारणी 
 
स्प्राऊटिंग ब्रोकोली या पिकाची निरोगी आणि संतुलीत वाढ होण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, तसेच पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, गड्ड्यांची प्रत, आकार, वजन आणि चव वाढविण्यासाठी माइक्रोलाची पहिली फवारणी लागवडीपासून 30 दिवसांनी आणि दुसरी फवारणी गड्डा धरणेचे वेळी सायंकाळच्या वेळी पानांच्या दोन्ही बाजूंवर करावी. फवारणीसाठी माइक्रोला 2.5 मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. गड्डा वाढण्याच्या काळात सुजला 19:19:19 विद्राव्य खत 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर 3-4 वेळा 15 दिवसांचे अंतराने फवारणी करावी. 
 
आंतरमशागत 
 
रोपांची पुनर्लागण झाल्यापासून 30 दिवसांनी वाफ्यावरील सरीमधील गवत-तण काढून माती 3-4 सें.मी. खोलीपर्यंत खुरप्याने हलवून घ्यावी. माती हलवितांना रोपांना मातीचा आधार द्यावा. तसेच पुन्हा 20-25 दिवसांनी खुरपणी करून वाफे / सर्‍या तणमुक्त स्वच्छ ठेवाव्यात. 
 
 
हरितगृहातील व बाहेरील क्षेत्रावर गादी वाफ्यावर केलेल्या लागवडीसाठी लागवडीपूर्वी प्लास्टिक पेपरचे आच्छादन केल्यास फायदेशीर ठरते. तणांची वाढ होत नसल्याने व जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होत असलेले झाडांची वाढ व उत्पादन समाधानकारक मिळून उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात. 
 
कीड, रोग आणि नियंत्रण 
 
अ) कीड
 
1. काळी माशी किंवा मस्टर्ड सॉफ्लाय 
 
लक्षणे : ही माशी पानांच्या पेशीत अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या काळ्या रंगाच्या असून अळ्या कोवळ्या रोपांची पाने खातात. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास खाने खाऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. रोपांची वाढ खुंटते. रोपांचा शेंडा अळ्यांनी खाल्ल्यास रोपाला गड्डा धरत नाही. एकंदरित उत्पादन बर्‍याच प्रमाणात घटते. 
नियंत्रण : नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 0.5 मि.ली. किंवा क्लोरापायरी फॉस 0.5 मि.ली. किंवा मॅलॅथिऑन 1 मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणात औषधांच्या 10-12 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारणी करावी. 
 
2. मावा 
 
लक्षणे : हिरव्या किंवा पांढर्‍या रंगाचे बारीक किडे पानातील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे पाने सुरकतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि कालांतराने वाळून जातात. यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होऊन ब्रोकोली गड्ड्याची प्रत चांगली नसते. 
नियंत्रण : नियंत्रणासाठी मिथोमिल 1 मि.ली. किंवा अ‍ॅसिफेट - 1 ग्रॅम किंवा रोगोर 0.75 मि.ली. किंवा कार्बोसल्फान 1 मि.ली. प्रती लिटर पाणी या प्रमाणात घेऊन वरील औषधांच्या आलटून पालटून 3-4 फवारण्या 10-12 दिवसांचे अंतराने कराव्यात. त्याचप्रमाणे नियंत्रणासाठी 4% निमार्कचा फवारणीसाठी उपयोग करावा. ब्रोकोलीच्या प्लॉटमध्ये मधून मधून मोहरी पिकाची लागवड करावी. मोहरीचे झाडांवर मावा आकर्षित होऊन ब्रोकोली पिकावरील माव्याचे प्रमाण कमी होते. 
 
3. चौकोनी ठिपक्याचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) 
 
लक्षणे : या किडीची अळी पानांच्या खालच्या बाजूस राहून पानांना भोके पाडून पानांतील हरितद्रव्य खाते. पानांच्या फक्त शिरा शिल्लक राहतात. ही कीड सप्टेंबर पासून मार्च महिन्यापर्यंत कार्यक्षम असते. 
 
नियंत्रण : नियंत्रणासाठी रोपवाटिकेतील रोपांवर मोनोक्रोटोफॉस 1.2 मि.लि. किंवा क्विनॉलफॉस 0.5 मि.ली. 8 ते 10 दिवसांचे अंतराने तसेच रोपांचे स्थलांतर केल्यापासून 10-12 दिवसांचे अंतराने 5 ते 6 फवारण्या कराव्यात. त्याचप्रमाणे प्रत्येक 25 ओळी सोडून मोहरी पिकाची लागवड एका ओळीत करावी. बी पेरणेचे अगोदर वाफे सिल्व्हर पेरॉक्साइड द्रव्याने निर्जंतुक करावे. 
 
ब) रोग 
 
1) रोपे कोलमडणे (डँपिंग ऑफ) 
 
लक्षणे - या रोगामुळे रोपे जमिनीच्या लगतच्या भागात कुजून अचानक कोलमडतात. हा रोग बुरशी-पिथीयम, फायटोप्थेरा, रायझोक्टोनियामुळे होतो. विशेषत: उष्ण आणि दमट हवेत तसेच रोपवाटिकेत पाण्याचा निचरा चांगला नसल्यास हा रोग लवकर बळावतो. नंतरच्या काळात रोपे रोगग्रस्त झाल्यास जमिनी लगतचा भाग भुरकट, कठीण होऊन सुकतो. 
नियंत्रण : बी पेरणेपूर्वी गादी वाफे सिल्व्हर पेरॉक्साइड रसायन द्रव्याने निर्जंतुक करावे. बी उगवून आल्यावर 10-12 दिवसांचे अंतराने डायथेन एक-45 औषध 2.5 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात घेऊन 2-3 वेळा ड्रेंचिंग करावे. 
2) घाण्या रोग (ब्लॅक रॉट)
 
लक्षणे : हा अणूजीव रोग असून घाण्यारोग किंवा काळीकूज हा रोग कोबी वर्गीय पिकाची लागवड असलेल्या क्षेत्रात आढळतो. उष्ण आणि दमट हवामानात या अणूजीवी रोगाची लागण फार झपाट्याने होते. पानाच्या मुख्य आणि उपशिरामधल्या मागात पानाच्या कडा मरून इंग्रजी व्ही. या आकाराचे पिवळे डाग दिसू लागतात. लागण झालेला भाग कुजून वाळून जातो. रोगट भागातील पानांच्या शिरा काळ्या पडतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास झाडाच्या अन्न व पाणी वाटून नेणार्‍या पेशी कुजून खोड, शिरा आतून काळ्या पडतात असा भाग मोडून पाहिल्यास त्यातून काळपट द्रव निघतो आणि त्याला दुर्गंधी येते. अशी रोपे गड्डा न धरताच वाळून जातात. संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उशीरा रोग आल्यास गड्डा सडण्याचे प्रमाण जास्त असते. 
नियंत्रण : रोगाची मुळाकडे लागण होऊ नये म्हणून बी मर्क्युरिक क्लोराइडच्या द्रावणात (1 ग्रॅम औषध आणि 1 लिटर पाणी या प्रमाणात) 30 मिनिटे भिजत ठेवून नंतर सावलीत सुकवून घ्यावे, रोग प्रतिबंधक जातींची लागवडीसाठी निवड करावी. 
 
3) करपा किंवा काळे डाग (ब्लॅक स्पॉट) 
 
लक्षणे - या बुरशीजन्य रोगाची लागण बियाण्यातून होते. पाने, देठ आणि खोडावर वर्तुळाकार किंवा लांब गोल डाग दिसू लागतात. हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला भाग करपलेल्या सारखा काळपट दिसतो. जास्त दमट आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास गड्ड्यावर डाग दिसतात. 
 
नियंत्रण : नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक जातींची लागवडीसाठी निवड करावी. रोग प्रतिकारक जातींचे बियाणे उपलब्ध असते. डायथेन एम-45 हे औषध 2.5 ग्रॅम किंवा बावीस्टीन 1 ग्रॅम किंवा बेनोमिल 1 ग्रॅम किंवा रूबीगन 0.35 मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात घेऊन औषधाच्या आलटून पालटून 10-12 दिवसांचे अंतराने 3-4 फवारण्या कराव्यात. 
 
4) भुरी (पावडरी मिल्ड्यू) 
 
लक्षणे - या बुरशीजन्य रोगाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात जोमाने आढळून येते. जून झालेल्या पानावरील वरच्या भागावर पांढरे ठिपके प्रथम आढळून येतात. हे पांढरे ठिपके हळूहळू मोठे होऊन एकमेकात मिसळून पानाच्या दोन्ही खालील आणि वरील बाजूस पसरतात. शेवटी पाने पिवळी पडून करड्या रंगाची होऊन वाळून जातात. यामुळे उत्पादनावर आणि प्रती वर फार प्रतिकूल परिणाम होतो. 
 
पण बाजारपेठेत मागणीप्रमाणे गड्ड्यांची काढणी करावी. 40 आर क्षेत्रातून विक्रिलायक 8 ते 9 मे. टन पर्यंत गड्ड्यांचे उत्पादन मिळते. पारंपरिक लागवड पद्धतीपेक्षा गादी वाफ्यावर लागवड, ठिबकमधून विद्राव्य खतांचा पाण्याबरोबर वापर केल्यास अतिशय चांगल्या प्रतीचे गड्डे काढणीस मिळतात. हरितगृहात केलेल्या लागवडीपासून 12 ते 14 मे. पर्यंत टन गड्ड्याचे उत्पादन
मिळते. 
 
पॅकिंग 
 
ब्रोकोलीच्या गड्ड्यांची काढणी झाल्यावर गड्ड्यांच्या आकारमानाप्रमाणे किंवा वजनाप्रमाणे प्रतवारी करून गड्डे स्वच्छ करावेत. गड्डे वायूवीजनासाठी छिद्रे असलेल्या करोगेटेड बॉक्सेस मध्ये 3 किंवा 4 थरापर्यंत भरावेत. विक्रीसाठी गड्डे पाठविताना पॅकिंग केलेल्या बॉक्सेसची रात्री तापमान कमी असल्याने वाहतूक करावी किंवा प्लास्टिक ट्रेमध्ये सभोवती बर्फ ठेवून तापमान कमी करून अशी क्रेटमध्ये वाहतूक करावी. 
 
पॅकिंग बॉक्सेसमधील तापमान वाढल्यास गड्ड्यांचा हिरवा रंग फिकट-पिवळसर होऊन गड्ड्यांची प्रत कमी होते व अशा गड्ड्यांना बाजारपेठेत मागणी नसते. ज्या ठिकाणी पूर्व शीतकरण व शीतगृहाची सोय असेल तेथे ब्रोकोली गड्ड्यांची काढणी झाल्यावर गड्ड्यांमध्ये असलेली उष्णता बाहेर काढून टाकण्यासाठी गड्ड्यांचे पूर्व शीतकरण 0 ते 2 अंश से. ग्रे. तापमानात करून घेणे आवश्यक असते. त्यानंतर प्रतवारी करून करोगेटेड बॉक्सेसमध्ये गड्ड्यांचे पॅकिंग करून सर्व पॅकिंग केलेल्या बॉक्सेस रेफरिजरेटेड व्हॅनमधून 0 ते 2 अंश से.ग्रे. तापमानात विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवाव्यात अशा वाहतुकीमुळे गड्ड्यांची प्रत सुरक्षित राहते. 
 
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणारे दोष विकृती
 
1) व्हिपटेल - ब्रोकोली पानांची वाढ नेहमीसारखी न होता ती अरुंद व खुरटलेली दिसतात. झाडाच्या शेंड्यावरील पाणी खुरटलेली असून वाढ खुंटते आणि गड्डा भरत नाही. मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही विकृती उद्भवते. विशेषतः अम्लीय 4.0 ते 4.5. 
 
नियंत्रण - या रोगाच्या नियंत्रणासाठी कॅराथेन दोन ग्रॅम किंवा कॅलॅक्झिन 2 मि.ली. किंवा बेनोमिल 1 ग्रॅम किंवा थायोवेट, 2 ग्रॅम रणीगन 0.35 मि.ली. किंवा बेलेटॉन दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन औषधाच्या आलटून पालटून 3-4 फवारण्या 10-12 दिवसांचे अंतराने कराव्यात. 
 
5) केवढा (डाऊनी मिल्ड्यू)
 
लक्षणे : पानांच्या वरिल बाजूस अनियमित आकाराचे पाणीयुक्त पिवळे ठिपके आढळून येतात. पानांच्या खालील बाजूससुद्धा रोगाचे चट्टे आढळून येतात. चट्ट्यांवर पांढर्‍या गुलाबी रंगाची केवड्याची वाढ आढळून येते. गड्यांतून फुलांचे दांडे वर येतात. या रोगांमुळे त्यांच्यावर काळपट पट्टे दिसतात आणि रोग बळावल्यास सबंध गड्डा नासून जातो.
 
नियंत्रण - नियंत्रणासाठी झाडांवर डायथेन एम-45 औषध 2.5 ग्रॅम किंवा रोडोमिल 1.5 ग्रॅम किंवा अ‍ॅलाइटी 3 ग्रॅम, किंवा कवच 1.5 ग्रॅम किंवा 1 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या औषधांचे द्रावण आलटून पालटून तीन-चार वेळा दहा-बारा दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
 
काढणी व उत्पादन
 
जातीपरत्वे ब्रोकोलीचा गड्डा 60 ते 70 दिवसांत लागवडीपासून काढणीस तयार होतो. विक्रीचे दृष्टीने व चांगला बाजारभाव मिळण्याचे दृष्टीने गड्ड्याचा व्यास 8 ते 15 सेंटिमीटर असतानाच काढावा. गड्डा घट्ट असून गड्ड्यातील कळ्यांचे फुलात रूपांतर होणे पूर्वीच गड्ड्याची काढणी करावी. अशा गड्ड्यांची प्रत अतिशय चांगली असून या अवस्थेत गड्ड्यातील फुले उमलत नाहीत. गड्ड्यांची काढणी सकाळी अथवा सायंकाळी (ऊन गेल्यावर) करावी. तयार घडी साधारणपणे 15 सेंटिमीटर लांबीचा दांडा ठेवून कापून घ्यावेत. मुख्य गड्डा काढून घेतल्यानंतर खाली पानांच्या बेचक्यातून येणारे गड्डे पोसायला वाव मिळतो. प्रत्येक गड्ड्याचे वजन सरासरी 300 ते 400 असणे आवश्यक आहे. याच आकाराच्या व वजनाच्या गड्ड्यांची मागणी गिर्‍हाईकाकडून असते. 300-400 ग्रॅम पेक्षा सुद्धा जास्त वजनाचे गड्डे झाडावर तयार होतात.
 
साठवणूक
 
ब्रोकोलीच्या गड्ड्यांची काढणी झाल्यानंतर खोलीच्या तापमानात गड्डा दोन दिवसांपर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतो. परंतु गड्डे पूर्वशीतकरण झाले नंतर शीतगृहात 0 अंश सेल्सिअस तापमानात व 95 ते 98 टक्के सापेक्ष आर्द्रतेत दोन ते तीन आठवडेपर्यंत चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतो.
 
महाराष्ट्रामध्ये ब्रोकोली लागवडीचे क्षेत्र व उत्पादन वाढणेसाठी प्रथम खालील बाबींचा विचार करणे जरुरीचे आहे.
 
1. शेतकर्‍यांपर्यंत लागवडीचे तंत्रज्ञान उपलब्ध होणे.
 
2. ब्रोकोलीचे बियाणे निरनिराळ्या तापमानात लागवडीसाठी उपलब्ध होणे. सध्या परकिय सीड कंपन्यांनी प्रसारीत केलेले बियाणे वापरत आहोत.
 
3. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शेतकर्‍यांना ब्रोकोली/ इतर परदेशी भाजींच्या लागवडीचे मार्गदर्शन व महत्त्व योग्य तांत्रिक अधिकार्‍यांकडून होणे. 
 
4. प्रत्येक तालुका ठिकाणी पूर्वशीतकरण व शीतगृहांची उपलब्धता होणे गरजेचे आहे.
 
5. लागवडीपासून मिळालेले परदेशी भाज्यांचे उत्पादन विक्री करणेसाठी बाजारपेठ उपलब्ध होणे अतिशय गरजेचे आहे. कारण महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या दृष्टीने सध्या असलेली बाजारपेठ फायद्याची नाही.
 
6. हंगामाप्रमाणे ब्रोकोली / परदेशी भाज्यांची लागवड करून शेत्र वाढणार नाही. त्याकरिता प्रत्येक शेतकर्‍यांकडे कमीत कमी एक हजार चौ.मी. आकारमानाचे हरितगृह असणे आवश्यक आहे. त्याकरिता हरितगृहावर केंद्र शासनाची अनुदानाची 50 टक्के सवलत वाढवून ती जास्तीत जास्त प्रमाणात होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ठिबक सिंचन पद्धतीवर सुद्धा अनुदान वाढवून सदरचे अनुदान शेतकर्‍यांना लगेच मिळावयास हवे. 
 
वरील बाबींचा सखोलपणे विचार केल्यास व कार्यवाही झाल्यास नक्कीच परदेशी भाज्या खालील क्षेत्र महाराष्ट्रात वाढण्यास सुरुवात होईल.