दुग्ध व्यवसायामध्ये - हिरव्या चार्याचे महत्व

डिजिटल बळीराजा-2    16-Mar-2020
|


cow_1  H x W: 0
 
 
ज्या दुग्ध व्यवसायिकाकडे लागवडीयोग्य जमीन आहे त्यांनी आपल्या गोठ्यातील जनावरांच्या हिरव्या चार्याच्या गरजेप्रमाणे वर्षभर हिरवा चारा उत्पादन कसे घ्यावे या माहितीचा समावेश या लेखात केला आहे.
 
पशूपोषणामध्ये हिरवा चारा उत्पादन हा एक महत्वपूर्ण भाग आहे. ज्या दुग्ध व्यवसायिकाकडे लागवडीयोग्य जमीन आहे त्यांनी आपल्या गोठ्यातील जनावरांच्या हिरव्या चार्याच्या गरजेप्रमाणे वर्षभर हिरवा चारा उत्पादन करावे. 
 
हिरव्या चार्याचे महत्व :हिरवा चारा पालेदार असतो. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे अशा चार्यातील विविध घटक पचनीय स्थितीत असतात. हिरव्या चार्यात क्यारोटीन या हरितद्रव्याचे प्रमाण जास्त असते. क्यारोटीनमुळे जनावरांना अ जीवनसत्वाचा पुरवठा होतो. अ जीवनसत्वाच्या अभावामुळे जनावरांना डोळ्याचे रोग होतात. हिरव्या चार्याच्या पुरवठयाने प्रजोत्पादन प्रक्रिया व्यवस्थित राहते व दुग्धोत्पादनात प्रगतीशिलपणे वाढ होते.
 
दररोज 8 लिटर दूध देण्यार्याजनावराला रोज हिरवा चारा मिळत असेल तर त्या जनावराला तयार खाद्य किंवा पेंड द्यायची आवश्यकता नाही. अशापद्धतीने तयार पेंड / खाद्य यावरील खर्च कमी होवून एकंदरीत नफ्यामध्ये वाढ होवू शकते. 
हिरवा चार्याचे प्रकार : हिरवा चारा , एकदल आणि द्विदल असा दोन प्रकारचा असतो. 
 
1.एकदल किंवा तृणवर्गीय चारा : 
 
या चार्यामध्ये कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स ) व तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असून प्रथिनांचे प्रमाण तुलनेने कमी असते . उ. दा. ज्वारी , मका , संकरीत नेपीयर ई. 
 
या पिकामुळे जनावरांना पूरक खाद्य व शक्ति प्राप्त होते.
 
2. द्विदल किंवा डाळवर्गीय चारा :
 
1 हा चारा प्रथिनसंपन्न असून सकस असतो.
 
2 या चार्यात खनिजे व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त असते.
 
3 तंतुमय पदार्थ व कर्बोदकांचे प्रमाण तुलनेने कमी असते.
 
4 हा चारा पाचक आणि रुचकर असतो.
 
5 सर्व प्रकारची जनावरे हा चारा आवडीने खातात. उ. दा. चवळी , शेवरी, ई.
 
 6 ह्या चार्यात कॅल्शियम , जीवनसत्व ‘अ’ आणि ‘ड’ चे प्रमाण जास्त असते. 
 
जनावरांच्या शरीरवाढीसाठी आणि दुग्धोत्पदनासाठी त्यांच्या आहारामध्ये प्रथिने व कर्बोदके या दोन्ही घटकांचा समावेश असणे गरजेचे असते यामुळे शेतकर्यांनी जनावरांच्या आहारात एकदल चारा आणि द्विदल चार्याचा योग्य प्रमाणात ( 50:50) समाविष्ठ करावा. यासाठी जनावरांना वर्षभर दोन्ही प्रकारचा हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी शेतकर्यांना विविध चार्याच्या प्रजाती तसेच लागवडी संबंधीची माहिती असणे गरजेचे आहे .
 
चारा पिकांची सविस्तर माहिती :
 
बहूवार्षिक चारा पिके 
 
1. हायब्रिड नेपियर
 
सुधारित वाण को-3, को-4, को-5, ए.पी.बी. एन., फुले यशवंत , फुले जयवंत , डि. एच .एन -6 पेरणीची योग्य वेळ फेब्रुवरी ते ऑगस्ट महिन्यामध्ये ( हिवाळा सोडून)ठोंबे प्रती हेक्टरी 30,000- 40,000 जमिनीचीतयारी , चार्याच्या ठोंबाची तयारी व पेरणीची पद्धत जमिनीची चांगल्या पद्धतीने नांगरणी केल्यानंतर सरी करून घ्यावे .दोन्ही सरीमधील अंतर चार्याच्या विविध वाणांनुसार शास्त्रीय पद्धतीने सांगितल्याप्रमाणे ठेवावे .दोन्ही सरीमधील अंतर कमीत कमी 2 फूट असले पाहिजे. दोन डोळे राहतील या पद्धतीने चार्याच्या काड्या ( ठोंबे ) कात्रून घ्यावीत.
 
 चार्याच्या ठोंबातील दोन डोळ्यापैकी एक डोळा 4-5 इंच जमिनीत शिरवावा व एक डोळा जमिनीवर असू द्यावा.एक ठोंब दुसर्या ठोंबापासून कमीत कमी 2 फूटावर जमिनीत थोडेशे आडवे करून (45 डिग्री माप) लावावे.खतांची मात्रा प्रती हेक्टरी 110 किलो नत्र + 50 किलो पालाश + 40 किलो स्फुरद जमीन भिजवणी उन्हाळ्यात 8- 10 दिवसाला एकदा तर हिवाळ्यात 15-20 दिवसाला एकदापहिली कापणी पेरल्यानंतर 60-75 दिवसालाकापण्या प्रती 40-45 दिवसाला एकदा याप्रमाणे वर्षातून 6-8 कापण्या. एकदा लागवड केल्यानंतर ह्या पिकापासून 3- 4 वर्षे हिरवा चारा मिळतो.उत्पादन प्रती हेक्टरी 250 - 400 मे. टन .
 
बहूवार्षिक चारा पिके 
 
2. प्यारागवत
 
पेरणीची योग्य वेळ जून , जुलै महिन्यामध्येठोंबे प्रती हेक्टरी 40,000
 
पेरणीची पद्धत सरी, सरीमधील तसेच दोन रोपातील अंतर 1 फूट खतांची मात्रा प्रती हेक्टरी 150 किलो नत्र + 60 किलो पालाश
जमीन भिजवणी उन्हाळ्यात 8- 10 दिवसाला एकदा तर हिवाळ्यात 15-20 दिवसाला एकदापहिली कापणी पेरल्यानंतर 75-80 दिवसालाकापण्या प्रती 40-45 दिवसाला एकदा याप्रमाणे वर्षातून 6-9 कापण्या.उत्पादन प्रती हेक्टरी 200 - 240 मे. टन . 
एकवार्षिक चारा पिके ,एकदल किंवा तृणवर्गीय चारा
 
1. चारा मक्का 
 
सुधारित वाण आफ्रिकन टॉल , विजय किसान , गंगा सफेदपेरणीची योग्य वेळ व पेरणीचे अंतर जून - जुलै (खरिप ),ऑक्टोबर - नोव्हेंबर ( रब्बी) ,जनवरी - मे (उन्हाळी) बियाणे 25- 30 सें. मी. अंतराने पेरावे बियाणे प्रती हेक्टरी 40-50 किलोखतांची मात्रा प्रती हेक्टरी 50 किलो नत्र + 50 किलो पालाश + 50 किलो स्फुरदजमीन भिजवणी उन्हाळ्यात 6-8 दिवसाला एकदा तर हिवाळ्यात10-12 दिवसाला एकदापहिली कापणी 50 टक्के तुरे आल्यानंतर कापणीला सुरुवात करावी .( पेरणीनंतर 60-75 दिवसाला ) . कापणी सुरू केल्यानंतर 30-35 दिवसात पीक संपवावे.उत्पादन प्रती हेक्टरी 40-60 मे. टन
द्विदल किंवा डाळवर्गीय हिरवा चार
 
 सुधारित वाण यू. पी.सी. -5286,इ सी. 4216आय. सी. 4216, श्वेता पेरणीची योग्य वेळ व पेरणीचे अंतर जून ते जुलै (खरिप जानेवारी ते मे (उन्हाळी) बियाणे 30 सें. मी. अंतराने पेरावे .बियाणे प्रती हेक्टरी 30 - 40 किलोखतांची मात्रा प्रती हेक्टरी 20 किलो नत्र + 60 किलो स्फुरदजमीन भिजवणी 12-15 दिवसाला एकदापहिली कापणी पेरल्यानंतर 55-60 दिवसाला (50 % फुलोर्या असताना.)कापण्या 1उत्पादन प्रती हेक्टरी 10-15 मे. टन ( खरिप ) , 20-30 मे. टन ( उन्हाळी )
 
डॉ. संजयकुमार विठ्ठलराव उद्धरवार ,विषय तज्ञ ( पशूविज्ञान
कृषि विज्ञान केंद्र ( उत्तर गोवा) आय. सी.ए. आर. - सी.सी. ए .आर.आय. जुने गोवे , गोवा 403402.