द्राक्ष बागेची उभारणी आणि फवारणीसाठी योग्य यंत्राची निवड व यांत्रिकीकरणाचे महत्व

डिजिटल बळीराजा-2    13-Mar-2020
|

grape_1  H x W:

द्राक्ष बागेची उभारणी :
 
द्राक्ष बागहे काही वर्षांपूर्वी श्रीमंतांचे पीक म्हणून ओळखले जायचे त्याला कारण त्यात द्राक्ष बाग लागवड व उभारणी मध्ये येणारासुरुवातीचा खर्च वाव नंतर हवामानामुळे उत्पादनात असलेली अनिश्चितता हे मुख्य कारण होत. 
 
 द्राक्ष बागेसाठी सुरुवातीस येणार्‍या खर्चामध्ये द्राक्ष वेलींना वळण देण्यासाठी लागणार्‍या वळण पद्धतीचा येणारा खर्चही मोठा असतो. यामध्ये येणारा हा खर्च योग्य वळण पद्धत व लागणारे साहित्य योग्य प्रमाणात वापरले तर बचत करता येऊ शकते त्या संबंधीचा हा उहापोह
 
सर्वसाधारणपणे द्राक्ष बागेसाठी प्रचलित वळण पद्धतीची खालील प्रमाणे वर्गवारी करता येईल.
 
1) मांडव पद्धत :
 
2) वाय पद्धत
 
3) टेलीफोन पद्धत
 
4) विस्तारित वाय पद्धत
 
5) मिनी वाय पद्धत

1) मांडव पद्धत :
 
हि पद्धत सर्वात जुनी आहे. ह्या पद्धतीमध्ये फक्त उभे लोखंडी किंवा सिमेंटचे खांब उभे करता येतात व त्यावर जीआय किंवा एस एस वायरमध्येजाळे पसरविले जाते. ह्या पद्धतीमध्ये येणारा खर्च हा वाय पद्धतीपेक्षा कमी असतो कारण लागणारे साहित्य मुख्यतः लोखंडी किंवा सिमेंटचे खांब कमी असतात. ह्या पद्धतीमध्ये सूर्यप्रकाश चांगल्या रीतीने जमिनीवर पोहचत नसल्याने बागेतील आद्रता वाढते व तसेच हवाही चांगल्या प्रकारे खेळती राहू शकत नाही. ह्या पद्धतीचा अजून एक तोटा असा कि बागेतील कामासाठी मजूर जास्त प्रमाणात लागतात. तसेच फवारणीसुद्धा वेलींच्या वरच्या भागावर व्यवस्थित पोहचत नाही.

2) टेलिफोन पद्धत :
 
ह्या पद्धती येणारा खर्च हा मांडव पद्धतीपेक्षा कमी असतो परंतु ह्या पद्धतीमध्ये वेळी विस्ताराला मर्यादा येतात व झाडांवर अपेक्षीत असे काड्यांचे प्रमाण ठेवता येत नाही व तसेच बर्‍याचदा द्राक्षांचे घड सूर्य किरणात उघडे पडतात ह्यामुळे हि पद्धत जास्त प्रमाणात शेतकर्‍यांकडून अवलंबली गेली नाही व अवलंबली जात नाही.

3) वाय पद्धत :
 
हि पद्धत सर्वात प्रचलित अशी वळण पद्धत आहे. जरी ही वळण पद्धत उभारणीसाठी खर्च दुसर्‍या पद्धतीपेक्षा जास्त येत असेल परंतु ह्या पद्धतीमुळे खालील प्रमाणे होणार्‍या फायद्यांमुळे शेतकरी ह्या पद्धतीला जास्त प्राधान्य देतात.
 
अ. अंतर्गत मशागत व इतर व्यवस्थापनाची कार्ये मजुरांकडून व यांत्रिकी पद्धतीने सुलभपणे करता येतात.
 
ब. आपण द्राक्षांच्या घडांचे सूर्यकिरणांपासून चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतो (वाय पद्धतीचा कोन सूर्य
किरणांची दिशा व द्राक्ष ओळींची दिशा यानुसार ठरवून ) . सर्वसाधारणपणे भारतीय हवामानात कोन 110 ते 130 च्या दरम्यान अवलंबता येतो.
 
क. ह्या पद्धतीमध्ये द्राक्षवेलींना सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळण्यास मदत होते. तसेच द्राक्षबागेमध्ये हवा मुबलक प्रमाणात खेळते राहते त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
 
ड. हि पद्धत विशिष्ट हवामानात जर दाक्षवेलीवर प्लास्टिक किंवा घरांपासून संरक्षण करण्यासाठीचे नेट आच्छादित करावयाचे असल्यास सोयीस्कर आहे तसेच हि वळण पद्धत (आच्छादनाखालील द्राक्ष शेती ) ह्या नवीन पद्धतीसाठी फायदेशीर ठरत आहे.

4) विस्तारित वाय पद्धत :
 
हि पद्धत ’मांडव व वाय’ पद्धत यांचा मेळ घालून उभी करता येते. ही वळण पद्धत शेतकरी ’वाय ’ पद्धतीचा कोन वाढवून वाय च्या तोंडाकडील लोखंडी अँगल हे शेजारील ओळीतील लोखंडी अँगलला जी. आय किंवा एस एस वायरने जुळवता येते. म्हणजेच ही पद्धत मांडव साऱखीसुद्धा वापरता येऊ शकते. ही पद्धत फक्त प्रायोगिक तत्वावर वापरली जाते. प्रचलित अशा प्रकारे ह्या पद्धतीचा वापर सहसा केला जात नाही.
 
वर नमूद केलेल्या वळण पद्धती वेगवेगळ्या द्राक्षजातीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात उभारणीचे साहित्य वापरून किफायशीर रित्या उभारता येतात. ह्या मध्ये वळण पद्धतीचे डिझाईन बदल न करता वापरण्यात येणार्‍या साहित्यामडे बदल करून शेतकरी आपआपल्या आर्थिक कुवतीनुसार उभारणी करू शकतो.
 
ह्या वळण पद्धतीमध्ये टेबल ग्रेप्स (खाण्याचे द्राक्ष ) साठी वेळी विस्तार जास्त असल्या कारणाने त्यानुसार उभारणीचे साहित्य वापरले जाते तसेच वाईन द्राक्ष वेलींचा विस्तार कमी असतो त्यामध्ये कमी खर्चात वळण पद्धतीची उभारणी करता येते.
 
द्राक्ष बागेसाठी किफायतशीर वळण पद्धती उभारणीसाठी खालील बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते.
 
1) वळण पद्धतीमध्ये वापरात येणारे लोखंडी किंवा सिमेंटचे खांब ह्यांची साईज प्रमाणापेक्षा जास्त नसावी.
 
2) द्राक्ष ओळींतील दोन खांबामधील अंतर हे जमिनीच्या प्रकारानुसार ठरवावे. जर मध्यम ते हलकी जमीन असेल तर अंतर जास्त ठेवण्यास हरकत नही (25 फुटापर्यंत ) व अशा जमिनीत खांब जमिनीत कमी प्रमाणात गाडावे.(1.5 फुटापर्यंत). जर जमीन भारी (काळी) असेल तर जमिनीत खांब योग्य अशा खोलीवर (2 फुटापर्यंत ) गाडावे व तसेच दोन खांबातील अंतर हे सुद्धा कमी असावे (20 फूट). जर दोन खांबातील अंतर प्रमाणापेक्षा जास्त ठेवले तर भविष्यात डअॠॠखछॠ चा प्रश्न उद्भवू शकतो.
 
3) जी. आय किंवा स्टेलनेस स्टील (एस. एस. वायर) तारेचे अंतर्गत जाळे हे प्रमाणापेक्षाजास्त नसावे. आपण वेलींचा विस्तार कशाप्रकारे करणार आहोत त्यानुसार तार वापरावी.
 
वरीलप्रमाणे द्राक्षबागेसाठी योग्य वळण पद्धत व लागणारे साहित्य योग्य प्रमाणात वापरले तार शेतकरी बांधवांच्या खर्चात नक्कीच बचत होऊ शकते. सर्वसाधारणपणे वळण पद्धत पिकाच्या पूर्ण कालावधीसाठी (15-20 वर्षे ) टिकू शकते.
 
प्रचलित अशा ’वाय’ वळण पद्धतीचा खर्च (टेबल ग्रेप्स ) साठी 4.5 ते 5.5 लाख इतका येतो. वळण पद्धतीसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे असावे.
 
1. बाहेरील खांब -  50x  50x 5mm  (m.s . angle)
 
2. आतील खांब - 40x 40x5mm m. s. किंवा 35x 35x5mm (m.s. -angel)
 
3. बाहेरील ताणाचा हुक - 16 mm पिळबार
 
4. ताणाची वायर - 10 gange s.s.. wire double loop 
 
5. आतील वायर - 14 to 17 Q> gange s.. s, wire  

साधारणपणे बाहेरील खांबावर सलगपणे 200 फुटापर्यंत ओळींचे अंतर असावे. जर ओळींचे अंतर 200 फुटापेक्षा जास्त असेल तर मध्ये स्वतंत्रपणे अजून एक मुख्य खांब उभा करणे आवश्यक आहे. ह्यामुळे ीरससळपस चा प्रश्न उद्भवत नाही.
 
द्राक्ष शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्त्व
 
द्राक्ष शेतीमध्ये वर्षभर अंतर्गत वेली व्यवस्थापन, मशागतीची कामे चालू असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे फवारणी व दुसरे बागेतील छाटणी, विरळणी, शेंडा मारणे, द्राक्ष घड जीए व तत्सम द्रावणात बुडवणे इ. मजुराकडून करून घेतले जातात. यामध्ये भारतामध्ये सध्याच्या घडीला फवारणी या कामामध्ये यांत्रिकीकरण झालेले आहे. व इतर कामांमध्ये यांत्रिकीकरण खूप कमी प्रमाणात आहे याला खालील कारणे सांगता येतील.
 
भारतात द्राक्ष शेतीमध्ये फवारणी व सिंचन या कामामध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेली आहे त्यामुळे हे काम कमीत कमी मजूर व किफायतशीरपणे केले जातात यामुळे खर्चामध्ये मोठी बचत होते व तसेच वेळेचीही बचत होते. त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्त क्षेत्रावर व्यवस्थापन केले जाते.
 
द्राक्षामध्ये खाण्याची द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या शेती अंतर्गत भौगोलिक सलगता कमी असल्याकारणाने यांत्रिकीकरणाला बंधने येतात. याउलट युरोपियन देशांमध्ये द्राक्ष शेती ही मोठ्या क्षेत्रावर म्हणजे पाचशे ते हजार एकरावर सलग अशा भौगोलिक सलगता असणार्‍या क्षेत्रावर केली जाते व मुख्यतः वाईन जातीची द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने यांत्रिकीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते.
 
भारतामध्ये सध्या अच्छादित द्राक्ष शेती म्हणजे पूर्ण द्राक्षबागेवर प्लास्टिक कव्हर उभारतात. द्राक्ष बागेला अवेळी पाऊस, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तींपासून नुकसान टाळून उत्पादन घेण्यासाठी शेतकरी वर्गाचा पण वाढत आहे. यामध्येसुद्धा यांत्रिकीकरणाला बराच वाव आहे. जेणेकरून आपल्याला हवे असते तेव्हा प्लास्टिक कव्हर ठेवता येते किंवा बाजूला करता येते पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार.