जातीवंत जनावरांची निवड व पैदास

डिजिटल बळीराजा-2    13-Mar-2020
|


cow_1  H x W: 0

दुग्धव्यवसायात भरपूर दूध उत्पादन करण्यासाठी चांगल्या जातीवंत दुधाळ जनावरांची निवड करणे गरजेचे आहे. भरपूर दूध उत्पादन हा आनुवंशिक गुणधर्म आहे. जातिवंत जनावरात तो हमखास आढळतो म्हणून अधिक दुधासाठी जातीवंत जनावरांची निवड करणे महत्वाचे आहे.
 
भारत स्वतंत्र झाल्यावर हरित क्रांतिच्या यशानंतर भारताने श्वेत क्रांतिचे उद्दीष्ट समोर ठेवले आणि त्याचेच फळ म्हणून जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून आपल्या देशाचे नाव घेतले जाते. तरिसुद्धा आपल्या उत्तम आरोग्यासाठी लागणारे किमान दुधाचे आपण उत्पादन करू शकलो नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे मेळघाटात बाल कुपोषणाचे वाढते प्रमाण म्हशींच्या जाती हया आपल्या देशात सर्वात जास्त असून गायींची संख्या सुद्धा भरपूर आहे.
 
शेतीमध्ये कितीही सुधारणा केली तरी सर्वसामान्य शेतकर्‍यास वर्षभर नेहमी काम उपलब्ध होऊ शकत नाही. याकरिता शेतकर्‍यांनी आपले लक्ष जोडधंद्यावर केंद्रित करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे शेतकर्‍यांकडे दुग्धव्यवसायासाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधा उदा. चारा, खाद्य, पाणी, जमीन उपलब्ध असते. त्यामुळे दुग्धव्यवसाय हा शेतकर्‍यास जोडदंधा म्हणून करणे सोयिस्कर ठरते. दुधाच्या वाढत्या मागणीने उत्पादित दुधाला हमखास बाजारपेठ मिळते. तसेच ते शासकीय दूध योजनेत किंवा दूध संकलन केंद्रावर स्विकारल्या जाते. जरी दूध विकले गेले नाही तरी त्यापासून खवा, दही, बासुंदी इत्यादि पदार्थ तयार होतात.
 
दुग्धव्यवसायात भरपूर दूध उत्पादन करण्यासाठी चांगल्या जातीवंत दुधाळ जनावरांची निवड करणे गरजेचे आहे किंबहुना आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर होणार किंवा नाही हे गुरांच्या निवडीवर अवलंबून असते. खर तर कुठल्याही गुरांची दूध देण्याची क्षमता ही त्याच्या मातेच्या व पिताच्या मातेच्या दूध देणाच्या अनुवंशिक गुणधर्मावर अवलंबून असते. जी जनावरे पुर्ण वेत काळात भरपूर दूध देतात, व्याहल्यानंतर जी योग्य कालावधीत गाभण राहतात, ज्यांचा भाकड काळ कमी आहे, (2-3 महिणे) आणि ज्यांचे पहिले वेत कमी वयात झाले आहे, अशा जनावरांना आपण चांगली जनावरे म्हणतो. भरपूर दूध उत्पादन हा आनुवंशिक गुणधर्म आहे. जातिवंत जनावरात तो हमखास आढळतो म्हणून अधिक दुधासाठी जातीवंत जनावरांची निवड करणे महत्वाचे आहे.
 
गावोगावी गुरांचे बाजार भरतात. शेतकरी पशुपालक काही कारणांमुळे आपली गुरे बाजारात विकायला नेतात. त्या विकायला आलेल्या गायीमध्ये काही चांगल्या दुधाळ गायी सुद्धा असतात. आर्थिक अडचण सोडविण्याकरिता किंवा चार्‍याची समस्या असल्यामुळे शेतकरी अशा दुधाळ गायी विकतो. आपण बाजारात गाय घेण्याकरिता जाण्याआधी खेडोपाडी कुणाकडे उत्द्भष्ट दुधाळ जनावरे विक्रीला आहेत, हयाची चौकशी करून ती विकत घेण्याचा प्रयत्न करावा. जर हे शक्य झाले नाही तर मात्र बाजारात जाऊन दुधाळ गायी विकत घ्याव्या. दुधाळ गायीची निवड करतांना काही कसोट्याा किंवा लक्षण समुह बघावे लागतात. दुधाळ जनावरांची निवड करतांना पुढील निवड पद्धतींचा वापर करता येतो.
 
cow_1  H x W: 0
1) जनावरांच्या बाह्यास्वरूपावरून
 
2) जनावरांच्या वंशावळीवरून
 
3) गुणपत्रकावरून
 
आजही आपले पशुपालक गुरांच्या नोंदी ठेवत नाहीत त्यामुळे गुरांची खरेदी विक्री ही त्यांच्या बाह्यास्वरूपावरून केली जाते. दुधाळ जनावरांची निवड करतांना पुढील बाबींचा विचार करूनच जनावरांची निवड करावी.
 
1) दुधाळ गुरे प्रथम किंवा द्वितीय वेतातील असावी कारण ते दिर्घकाळ कळपात राहू शकतात. दातांवरून गुरांच्या वयाचा अंदाज घेतल्या जावू शकतो.
 
2) गुरे आंधळी किंवा लंगडी नसावी.
 
3) गायीची कास मोठी आहे, हेच न पाहता गायीचे सकाळ, सायंकाळ व दुसरे दिवशी सकाळी दुध काढून सरासरी बघावी.
 
4) दुधाळ गुरे शांत स्वभावाची व गरीब असावी.
 
5) जर आपण गाभण गुरे घेणार असाल तर ती 10-15 दिवसात विणारी असावी म्हणजे लवकर उत्पादन सुरू होईल.
 
6) गुरांची कातडी चकचकीत, पातळ व लवचिक असावी. कातडीवरिल केस बाजुला केल्यास चामडी तेलकट दिसणारी असावी.
बाह्यास्वरूपावरून दुधाळ जनावरांची निवड आजही आपले पशुपालक गुरांच्या नोंदी ठेवत नाहित त्यामुळे गुरांची खरेदी-विक्री ही त्यांच्या बाह्यास्वरूपावरूनच केली जाते.

1) दुधाळ गुरांच्या नाकपुड्याा रूंद व मोठ्याा असाव्या यामुळे गुरांच्या श्वसन क्षमतेची कल्पना येते. नाकपुड्याांमधील भाग सदैव ओलसर असावा.
 
2) गुरांचा जबडा मजबूत असावा. जबडा मजबूत असला म्हणजे चारा खाण्याची क्षमता दिसून येते व त्यावरून दूध देण्याची क्षमता समजून येते.
 
3) दुधाळ जनावराची त्वचा पातळ, मऊ, चमकदार व सैल असावी. ती परजीवी द्भमींपासून मुक्त असावी.
 
4) खांदे बळकट असावेत छाती भरदार व रूंद असावी, पाठ सरळ व रूंद असावी.
 
5) बरगड्याा रूंद व बाकदार असाव्यात. दुधाळ गायीमध्ये शेवटच्या तीन बरगड्याा स्पष्ट दिसायला हव्यात.
 
6) पाठीमागील भाग त्रिकोणाद्भती असावा. गुरे उभी असतांना बाजुने त्याचा आकार पाचरी प्रमाणे असावा. म्हणेजे समोरचा भाग निमुळता व मागील कासेकडचा भाग जास्त प्रमाणात वाढलेला असावा. त्यावरून त्यांच्या जननेंद्रियाची वाढ पुर्ण झाली असल्याचा अंदाज करता येतो.
 
7) पोट मोठे व प्रमाणबद्ध असावे. पोटाचा घेर मोठा असावा.
 
8) पाय मजबूत व व्यवस्थित ठेवणीचे असावे. मागील पायांमध्ये अंतर जास्त असावे म्हणजे कास मावण्यास जागा मिळते. पुढील पायांमध्ये पण अंतर जास्त असावे, गुडघे एकमेकांस लागु नये.
 
9) मान लांब व सडपातळ असावी. लठ्ठमान चरबी वाढल्याचे दर्शविते. दुधाळ गुरांच्या अंगावर जास्त चरबी नसते कारण खाल्लेल्या खाद्याचे जास्तीत जास्त दुधात रूपांतर केल्या जाते.
 
10) जनावरे चारही पायावर नीट उभे असावे. चाल नेटकी असावी खरेदी करावयाचे जनावर नीट चालवून फिरवून पहावे, म्हणजे चालण्यात काही दोष असल्यास लक्षात येईल.
 
cow_1  H x W: 0
 
दुधाळ जनावरांची कास कशी असावी?
 
दुधाळू गुरांच्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे कास, दिर्घकाळ भरपूर दुध देण्यासाठी कास लांब, रूंद, मजबूत व उत्तम ठेवणीची असावी. कासेचा विस्तार मागील पायामध्ये वरपर्यंत व समोर जवळ जवळ नाभीपर्यंत असावा. कासेचा समोरील व मागील भाग

एकमेकास व्यवस्थित जोडलेला असावा. सडांचा आकार मोठा व दोन्ही सडाची लांबी एकसमान असावी. दुभत्या गुरांचा एकही सड बंद असू नये याची खात्री करून घ्यावी. कास व कासेसमोरील भागावरील रक्तवाहिन्या जाड व नागमोडी असाव्या यावरून कासेमध्ये भरपूर रक्त पुरवठा होतो हे दिसून येते. जितका रक्त पुरवठा भरपूर जास्त तितकेच उत्पादन अधिक कास रेशमासारखी मऊ व लवचिक असावी. पुर्ण दुध काढल्यानंतर कासेवर घड्याा किंवा वळ्याा पडाव्या.
 
गायींची वंशावळीच्या आधारे निवड
 
वंशावळीच्या आधारावर निवड करतांना जवळच्या संबंधित गुरांच्या उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. उदा. वळुच्या जननीचे उत्पादन, जनक वळूची अनुवंशिकता व वळुच्या संबंधीत कालवडीचे उत्पादन याचा विचार करावा लागतो. गुरांच्या दुध उत्पादनात आढळणार्‍या विविधतेपैकी 20 ते 30 टक्के विविधता अनुवंशिकतेमुळे असते म्हणून उत्तम अनुवंशिकता असलेल्या गुरांपासून निर्माण होणार्‍या नवीन पिढीची उत्पादनक्षमता काही मर्यादेपर्यंत ठरविता येते.
 
cow_1  H x W: 0
गुणपत्रकावरून जनावरांची निवड
 
या पद्धतीमध्ये दुग्ध जनावरे विषयांतील तज्ञ मंडळींकडून परिक्षक म्हणून ओळखून घ्यावित. या पद्धतीमध्ये जनावरांच्या वेगवेगळ्याा शरीराच्या भागाला महत्व देऊन गुण देतात. उदा. दुधाळ गायीसाठी तिच्या कासेला, दुग्ध शिरेला, तिसर्‍या बरगड्याांना व पाठीच्या कण्याला गुण देतात
.
गुरे पैदासीच्या पद्धती
 
गुरांच्या पैदासीसाठी अनुवंशिक शास्त्राचा अभ्यास करून उत्तम प्रतीची गुरे निर्माण करण्यासाठी पैदासीच्या निरनिराळ्याा पद्धती अमलात आणल्या जातात. जेणेकरून जनावरातील दूध उत्पादन, शरीर वाढीचा वेग व दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण या घटकांमध्ये सुधारणा होईल. गुरे पैदासीच्या मुख्य दोन पद्धती आहेत.
 
1) नैसर्गिक निवड पद्धत
2) द्भत्रिम पैदास पद्धत

1) नैसर्गिक पद्धतीद्वारे जनावरांमध्ये पैदास
 
या पद्धतीमध्ये गायींची व वळूची निवड केली जाते. उत्तम दुध देणार्‍या गायींना उत्तम अनुवंशिकता असलेल्या वळूकडून नैसर्गिकरित्या फळविले जाते. नैसर्गिक प्रजननासाठी वळूची निवड ही त्यांच्या आईच्या दूध उत्पादनावर आणि त्या वळुच्या स्वत:च्या कार्यक्षमतेवर केली जाते. जंगलात व डोंगराळ भागात जेथे जनावरे चरण्यासाठी मोकळी सोडली जातात अशा भागात गावठी गाईचा दर्जा सुधारण्यासाठी निवडक जातीवंत वळूचा वापर नैसर्गिक प्रजननासाठी केला जातो.
 
2) द्भत्रिम पैदास
 
द्भत्रिम पैदास ही मुख्यत्वेकरून दोन प्रकारात विभागली जाते.
 
1) आंतर पैदास
 
2) बाह्या पैदास
 
1) आंतर पैदास
 
आंतर पैदास म्हणजे जवळच्या नात्यातील संबंध असणार्‍या जनावरांपासून पैदास करणे.
 
2) बाह्या पैदास
 
बाह्या पैदासीच्या निरनिराळ्याा पद्धती असुन गायींमध्ये मुख्यत्वेकरून बहि : सकर व संकर पैदास पद्धतींचा वापर केला जातो.
 
1) बहि : संकर : या पद्धतीत एकाच जातीच्या पण निरनिराळे गुण असलेल्या गुरांच्या दोन वंशप्रकाराचे प्रजनन केले जाते.
2) संकर : संकर म्हणजे दोन निरनिराळ्याा जातीच्या गुरांचा संकर होय. अनुवंशिक दर्जा सुधारण्यासाठी निवडलेल्या गावठी जनावरांचा अनुवंशिक विकास घडविण्यासाठी ठराविक कळपात किंवा ठराविक परिसरात आलेल्या गावठी जनावरांचे संकरिकरण करावे परंतु संकरिकरण करण्यासाठी असा परिसर निवडावा की, ज्या ठिकाणी मान्यताप्राप्त जनावरांचा प्रजनन परिसर नसावा.
 डॉ. क्रांती प्र. खारकर, 
डॉ. वैशाली वि. बांठिया, 
डॉ. श्वेता र. लेंडे