16-151 संजिवके 1

डिजिटल बळीराजा-2    11-Mar-2020
|


sugarcane_1  H
 
उस पीकाला हवा, पाणी, सूर्यप्रकाश , तापमान, खते इ. त्यातलाच एक प्रकार म्हणजे संजिवके.
 
वैशिष्टे : 
 
*अत्यंत सूक्ष्म प्रमाणात तयार होतात.
 
*पान,मुळे,खोड यांच्या कोवळ्या अंकुरात होतात. तेथून जीते कार्य असते तिथे वाहून नेली जातात.
 
*बीजाचा रुजावा,कोम्ब येणे, पालवी फुटणे, मुळे सुटणे, कांड्याची संख्या, लांबी,जाडी , साखर प्रमाण इ. बाबी संजिवकान्च्या विशिष्ट सन्तुलनामुळे घडते.
 
*संजिवाकाचे संतुलन चांगले असेल तर जमिनीत दिलेल्या खताचे, पाण्याचे शोषण होते, गाळपा योग्य उसाची संख्या वाढते.
*फ़ोटोसिन्थेसिस होऊन टनेज वाढते.
 
* कांही महत्वाचे
 
संजिवके म्हणजे NPK सारखे पोषण द्रव्ये नव्हे.
  
संजिवके म्हणजे सूक्ष्म द्रव्ये नव्हे.
 
संजिवके म्हणजे कीटक नाशक किंवा जंतु नाशक नव्हे.
 
संजिवके म्हणजे जीवाणु किंवा सेंद्रिय ख़त नव्हे.
 
#ऊसामध्ये खालिल संजिवके वापरता येतात.
 
1. ऑक्झिन्स उदा IBA NAA
 
2. जिबरेलिन उदा GA4 GA7 GA3
 
3. सायटोकायनिन उदा 6BA
 
4. ट्रायकन्टेनाल 
 
5. पोलारिस
 
6. ग्लायाफोसेट
 
अलीकडे सागर वनस्पतीचे अर्क उपलब्ध झालेले आहेत. आस्कोफायलम नोडुसम या वनस्पति पासून तयार करतात. त्यामध्ये संजिवाके आणि पोषण द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.
 
उसाचे पेराची लांबी, जाडी आणि संख्या वाढवण्याचे काम संजिवकाचे फवारणिने शक्य होते.
 
प्रोजिब व 6 बीए चे मिश्रणास *प्रामालिन* असे म्हणतात. हे अत्यंत प्रभावी आहे. कांडयाची लांबी, जाडी आणि संख्या वाढवते.
जिबरेलिन मुळे साखरेचे प्रमाण कमी होत नाही. पोषण द्रव्या बरोबर जिबरेलिन फवारणी केली तरी चालते.जिबरेलिन आणि 6बीए ची एकत्रित फवारणी ऊसासाठी उत्कृष्ट संजीवन होय