आजच सुरू करा दालचिनी मिश्रित दुधाचं सेवन, या आजारांना ठेवा दूर!

डिजिटल बळीराजा-2    11-Mar-2020
|
 
cinnamon_1  H x
 
 
दुध हे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर मानलं जातं. आणि जेव्हा दालचिनीसारख्य आयुर्वेदिक औषधासोबत हे सेवन केलं जातं तेव्हा याचे फायदे दुप्पट होतात. दालचीनीचं पावडर दुधात मिश्रित केल्यावर दुधाचे अॅंटी-बॅक्टेरिअल गुण वाढतात. याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू लागते. त्यामुळे डायबिटीज, जाडेपणा आणि इम्यून सिस्टीम करण्यात या दुधासारखा दुसरा पर्याय नाहीये.
 
दालचिनी घालतेलं दूध तयार करण्यासाठी आधी दूध गरम करा. त्यात दालचीनीचा थोडासा तुकडा टाका. दुधाला चांगली उकडी येऊ द्या. हवं असेल तर तुम्ही गोडव्यासाठी यात एक चमचा मधही टाकू शकता.
 
दालचिनी घातलेल्या दुधाचे फायदे
 
हाडांमध्ये होणाऱ्या वेदना आणि कमजोरी दूर करण्यासाठी दुधात एक चमचा दालचीनी चूर्ण आणि एक चमचा मध टाकून रोज सेवन करावं. कॅन्सरसारख्या घातक आणि जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठीही दालचिनी घातलेल्या दुधाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
 
दालचिनी घातलेलं दुधामध्ये कॅन्सरशी लढणारे गुण असतात. तसेच या दुधामुळे घशाच्या वेगवेगळ्या समस्या जसे की, घसा दुखणे, घसा खवखवणे या समस्याही दूर होतात. इतकेच नाही तर या दुधाचे तुमच्या त्वचेला आणि केसांनाही अनेक फायदे होतात. त्वचा आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या या दुधाने दूर होतात. 
 
टाइप २ डायबिटीजसाठी फायदेशीर दूध
 
टाइप २ डायबिटीजने हैराण असलेल्या रुग्णांनी जर दालचिनी घातलेलं दूध सेवन केलं तर अनेक फायदे होतात दालचिनी घातलेल्या दुधाच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. याचा फायदा डायबिटीजचा आजार कमी करण्यासाठी होतो. खासकरून रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप दालचिनी मिश्रित केलेलं दूध सेवन करा. याने तुम्हाला फार चांगली झोप लागेल. याने तुमची झोप न येण्याची समस्याही दूर होईल.
 
'हे' फायदे वाचल्यावर तुम्ही कधी चुकूनही फेकणार नाही मक्याचे चमकदार धागे!
 
आपल्यापैकी अनेकजण मका आवडीने खातात. पण मका खाताना त्यातील चमकदार बारीक धाग्यांकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात. मक्याच्या सालीसह हे धागेही कचरा म्हणून फेकले जातात.
 
या मुलायम आणि चमकदार धाग्यांना कॉर्न सिल्क म्हटलं जातं. कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच याने शरीरात ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित राहतं.
 
ताज्या किंवा वाळवलेल्या दोन्ही रूपात कॉर्न सिल्कचा वापर केला जाऊ शकतो. अनेक आजारांच्या औषधांमध्येही याचा वापर केला जातो. ब्लेडरमध्ये इन्फेक्शन, यूरिनरी सिस्टीममध्ये सूज, किडनी स्टोन, डायबिटीज, जन्मापासून हृदयाची समस्या, हाय ब्लड प्रेशर आणि चक्कर येणे असा समस्यांपासून सुटका मिळवण्याठी याचा वापर केला जातो. हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त लोकांसाठी मक्याचे हे धागे फायदेशीर आहेत. याने शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि शुगरचं प्रमाण कमी केलं जातं. 
जे मक्याचे धागे आपण न वापरता फेकून देतो, त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असत. हे एक चांगलं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि कार्डियोवस्कुलर रोगापासून याने बचाव होण्यास मदत मिळते. तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला होतो.
किडनीच्या समस्येवर घरगुती उपाय करायचा असेल तर कॉर्न सिल्कचा वापर करू शकता. याने यूटीआय, ब्लेडर, इन्फेक्शन, किडनी स्टोन, यूरिनरी सिस्टममध्ये सूज येणे अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते.