सप्टेंबर / ऑक्टोंबर छाटणी नंतरचे रोग कीड व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    29-Feb-2020
|


kid_1  H x W: 0


सप्टेंबर / ऑक्टोंबर छाटणी नंतर रोग व किडीचा प्रादुर्भाव झाल्यास नियोजनबद्ध व्यवस्थापन कसे करावे व त्याचबरोबर इतर महत्वाच्या सूचना, औषधाची माहिती व त्याचे प्रमाण या संबंधी सखोल माहिती या लेखात सादर केली आहे.

सगळीकडेच पाणी खूपच खराब झालेले आहे, असे पाणी स्प्रेसाठी वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. अशा पाण्याच्या वापराने बुरशीनाशकांची, कीटकनाशकांची, संजीवकांची क्रियाशीलता कमी होते. म्हणून प्रत्येकवेळी पाण्यात 100 लिटरला 25 ग्रॅम मॅक्झिसॉल मिसळा त्याचप्रमाणे स्टिकर व स्प्रेडर म्हणून 100 लिटरला 30 मिली या मात्रेमध्ये मॅक्झिट्वीन या स्टीकरचा उपयोग करा. इथून पुढच्या नियोजनात प्रत्येकवेळी मॅक्झिसॉल व मॅक्झिट्वीन लिहिलेले असणार नाही. तरी आपण त्याचा प्रत्येकवेळी वापर काळजीपूर्वक करावा. फवारणीसाठी पाणी कमी वापरत असाल, तर बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकांची एकरी मात्रा आंतरप्रवाही बुरशीनाशके ठराविक कालावधीनेच वापरा.


पुढे दिलेल्या बुरशीनाशक व कीटकनाशकांचा मात्रा प्रतिलिटरसाठी आहेत.
कटिंगनंतरचे दिवस बुरशीनाशक व कीटकनाशकांचे नाव व मात्रा

कटिंगनंतर लगेच 0.5% बोर्डो मिश्रण + 2 ग्रॅम/लिटर थायोन्यूट्री किंवा
कोसाइड 2 ग्रॅम/लिटर + इमिडाक्लोप्रीड 100 लिटरला 40 मिली + थायो न्यूट्री 2 ग्रॅम/लिटर
मिलिबग नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 100 लिटरला 40 मिली + क्लोरोपायरीफॉस 25% 2 मिली / लिटर
मुंग्या असल्यास अल्फामेथ्रीनचा उपयोग करा.

खोड व ओलांडे यावर चांगला स्प्रे बसावा याची काळजी घ्या.

 • कटिंगनंतर 6 वा दिवस कोसाइड 2 ग्रॅम / लिटर
 • उडद्या दिसत असल्यास स्प्रे घ्या.
 • कटिंगनंतर 9 वा दिवस बावीस्टीन 1 ग्रॅम / लिटर + कॅप्टाफ 1.5 ग्रॅम / लिटर
 • प्रत्येकवेळी मॅक्झिसॉल व मॅक्झिटवीन वापरा.
 • कटिंगनंतर 12 वा दिवस एम 45-2.5 ग्रॅम/लिटर + कोसाइड 1.5 ग्रॅम लिटर
 • कटिंगनंतर 14 वा दिवस बावीस्टीन 1 ग्रॅम/लिटर + कॅप्टाफ 1.5 ग्रॅम/लिटर सायट्रिक अ‍ॅसिडऐवजी 1000 लिटरला 25 ग्रॅम मॅक्झिसॉल वापरा.
 • खराब पाण्याचा बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. प्रत्येकवेळी याचा उपयोग करा.
 • कटिंगनंतर 15 वा दिवस 1) अ‍ॅक्रोबॅट 1 ग्रॅम/लिटर + एम 45 - 2.5 ग्रॅम/लिटर
        2) कर्झेट 3 ग्रॅम/लिटर
        3) मेलडी ड्युओ 3 ग्रॅम/लिटर
         ( वरीलपैकी एक + मॅक्झिसिलॅनॉल एकरी 200 मिली यात स्टीकर वापरू नका. )

 • कटिंगनंतर 17 वा दिवस एम 45-2.5 ग्रॅम/लिटर + स्कोर 100 लिटरला 50 मिली + कराटे 0.75 मिली/लिटर.
 • कटिंगनंतर 19 वा दिवस 1) झॅम्प्रो 2.5 मिली/लिटर
         2) कर्झेट 3 ग्रॅम/लिटर
         3) मेलडी ड्युओ 3 ग्रॅम/लिटर
         ( वरीलपैकी एक + मॅक्झिसिलॅनॉल एकरी 200 मिली यात स्टीकर वापरू नका.)

 • कटिंगनंतर 21 वा दिवस लिहोसीन 100 लिटरला 40 मिली + मायक्रोव्हिट 1 ग्रॅम / लिटर + मॅक्झिझींक 1 ग्रॅम / लिटर + बोरीक अ‍ॅसिड 0.5 ग्रॅम/लिटर + मॉक्झीव्हिटा 15 ग्रॅम 100 लिटर पाण्यासाठी मॅक्झिव्हीटा - एल 2 मि / लिटर.
 • कटिंगनंतर 22 वा दिवस मायक्रोव्हिट 1 ग्रॅम/लिटर + कॅप्टाफ 1.5 ग्रॅम / लिटर + मॅक्झिक्युअर 2 मि./लिटर (एकरी 500 मिली)
 • कटिंगनंतर 24 वा दिवस 1) अ‍ॅक्रोबॅट 1 ग्रॅम/लिटर + एम 45 - 2.5 ग्रॅम/लिटर
        2) कर्झेट 3 ग्रॅम/लिटर
        3) मेलडी ड्युओ 3 ग्रॅम/लिटर वरीलपैकी एक + मॅक्झिसिलॅनॉल एकरी 200 मिली यात स्टीकर वापरू                नका.
 • कटिंगनंतर 26 वा दिवस कसोइड 1.5 ग्रॅम/लिटर + स्कोर 40 मिली 100 लिटर पाण्यासाठी + मॅक्झिचिल 1.5 ग्रॅम/लिटर
 • कटिंगनंतर 28 वा दिवस कॅप्टाफ 1.5 ग्रॅम/लिटर + मॅक्झिक्युअर 2 मि./लिटर + मॅक्झिचिल प्री ब्लूम 1.5 ग्रॅम/लिटर
 • कटिंगनंतर 30 वा दिवस एम 45-2.5 ग्रॅम/लिटर + फॉलीक्युर 0.8 मि./ लिटर + मॅक्झिमॅग 1.5 ग्रॅम/लिटर + मॅक्झिकॅल 1.5 ग्रॅम/लिटर + करा
 • टे 0.75 मि. /लिटर
 • कटिंगनंतर 32 वा दिवस 1) अ‍ॅक्रोबॅट 1 ग्रॅम/लिटर + एम 45-2.5 ग्रॅम/लिटर
        2) कर्झेट 3 ग्रॅम/लिटर
        3) मेलडी ड्युओ 3 ग्रॅम/लिटर
        ( वरीलपैकी एक + मॅक्झिसिलॅनॉल एकरी 200 मिली/एकर )
 • कटिंगनंतर 34 वा दिवस कॅप्टाफ 1.5 ग्रॅम/लिटर + मॅक्झिक्युअर 2 मि / लिटर + मॅक्झिचिल प्री ब्लूम 1.5 ग्रॅम/लिटर + बोरीक अ‍ॅसिड 0.5 ग्रॅम/लिटर.
 • कटिंगनंतर 36 वा दिवस अ‍ॅन्ट्राकॉल 2 ग्रॅम/लि. + डोमार्क 0.75 मि./लिटर किंवा स्कोर 0.5 मि. / लिटर + मॅक्झिलोह 1.5 ग्रॅम/लिटर + मॅक्झिएमएन 1.5 ग्रॅम/लिटर
 • कटिंगनंतर 38 वा दिवस 1) झॅमप्रो 2.5 ते 3 मिली/लिटर
        2) मेलडी ड्युओ 3 ग्रॅम/लिटर
        3) कर्झेट 3 ग्रॅम/लिटर
        ( वरीलपैकी एक + मॅक्झिसिलॅनॉल एकरी 200 मिली )
 • कटिंगनंतर 40 वा दिवस कॅप्टाफ 1.5 ग्रॅम/लिटर + मॅक्झिचिल फ्लावरिंग 1.5 ग्रॅम / लिटर+स्फींटार 100 लिटरला 25 मिली + मॅक्झिझिंक 1 ग्रॅम/लिटर
 • कटिंगनंतर 42 वा दिवस एम 45-2.5 ग्रॅम/लिटर + मॅक्झिमिनोफॉस 2 मी / लिटर + थायोन्यूट्री एकरी 200 ग्रॅम + अ‍ॅक्रीसीयो 80 मिली एकरी
 • कटिंगनंतर 44 वा दिवस 1) अ‍ॅक्रोबॅट 1 ग्रॅम/लिटर + एम 45 - 2.5 ग्रॅम/लिटर
       2) झॅमप्रो 2 ते 3 मिली/लिटर
       3) मेलडी ड्युओ 3 ग्रॅम/लिटर
        ( वरीलपैकी+एक मॅक्झिसिलॅनॉल एकरी 200 मिली / एकर ) 
 • कटिंगनंतर 48 वा दिवस कॅप्टाफ 1.5 ग्रॅम/लिटर + मॅक्झिक्युअर 1.5 मि. /लिटर + मॅक्झिचिल फ्लावररिंग 1.5 ग्रॅम / लिटर + कराटे 0.75 मि./ लि.
 • कटिंगनंतर 52 वा दिवस अ‍ॅन्ट्राकॉल 2 ग्रॅम/लि. + मॅक्झिमिनोफॉस 2 मि/लिटर + लुना 0.6 मि/ लिटर
 • कटिंगनंतर 56 वा दिवस कॅप्टाफ 1.5 ग्रॅम/लिटर + मॅक्झिक्युअर 1.5 मि. /लिटर + मॅक्झिमॅग 1.5 ग्रॅम/लिटर + रीजन्ट 1.5 मि/लिटर + बोरीक अ‍ॅसिड 1 ग्रॅम/लिटर मॅक्झिक्युअर 2 मि./लिटर
 • कटिंगनंतर 60 वा दिवस झॅमप्रो 2.5 ते 3 मिली/लिटर + मॅक्झिसिलॅनॉल 200 मिली / एकर + प्रोक्लेम 20 ग्रॅम/100 लिटर पाण्यासाठी
 • कटिंगनंतर 64 वा दिवस डोमार्क 0.75 मिली/लिटर + मॅक्झिचिल व्हरायझन 2 ग्रॅम / लिटर + मॅक्झिव्हीटा एल 2 मिल/लिटर
 • अळी, मिलीबग, मुंग्यासाठी स्प्रे घ्या. जमिनीवर मुंग्यासाठी स्प्रे घ्या. खोड ओलांडे कीटकनाशकाने धुवून घ्या.
 • कटिंगनंतर 68 वा दिवस कॅप्टाफ 1.5 ग्रॅम/लिटर + मॅक्झिचिल ग्रेप व्हायझन 2 ग्रॅम / लिटर + मॅक्झिक्युअर 2 मी./लिटर + मॅक्झिव्हिटा-एल 2 मि. / लिटर.
 • कटिंगनंतर 72 वा दिवस फॉलीक्युअर 0.80 मि/लिटर + मॅक्झिकॅल बी प्लस 2 ग्रॅम / लिटर + कॉन्फीडॉर 0.4 मिली/लिटर + मॅक्झिव्हिटा-एल 2 मिली. /लिटर.
 • कटिंगनंतर 76 वा दिवस थायोन्यूट्री 1 ग्रॅम / लिटर + मॅक्झिकॅल 1.5 ग्रॅम / लिटर + मॅक्झिमॅग 1.5 ग्रॅम / लिटर + बोरीक अ‍ॅसिड 1 ग्रॅम / लिटर.
 • कटिंगनंतर 80 वा दिवस कोसाईड 2 ग्रॅम / लिटर + थायोन्यूट्री 1 ग्रॅम / लिटर + मॅक्झिचिल व्हरायझन 1.5 ग्रॅम / लिटर
 • मुंग्यासाठी जमिनीवर किटकनाशक स्प्रे करा.
 • कटिंगनंतर 84 दिवस कॅप्टाफ 1.5 ग्रॅम / लिटर + मॅक्झिझिंक 1.5 ग्रॅम / लीटर + बोरीक अ‍ॅसिड 1 ग्रॅम/ लिटर + मॅक्झिव्हिटा - एल 2 मि. / लिटर.
 • कटिंगनंतर 88 वा दिवस अ‍ॅक्रीसीयो एकरी 80 मिली + अप्लॉइड 1.25 मि. / लिटर + मॅक्झिक्युअर 2 मि / लिटर + मॅक्झिकॅल बी प्लस 1.5 ग्रॅम / लिटर
 • कटिंगनंतर 92 वा दिवस कोसाइड 1.5 ग्रॅम / लिटर + मॅक्झिलोह 1.5 ग्रॅम / लिटर + मॅक्झिएमएन 1.5 ग्रॅम / लिटर.
 • कटिंगनंतर 96 वा दिवस मॅक्झिब्रीक्स एकरी 1 लिटर + एकरी 250 ग्रॅम 0:52:34 + एकरी 150 ग्रॅम बोरीक अ‍ॅसिड + मॅक्झिव्हिटा - एल 2 मि/ लिटर.
 • कटिंगनंतर 100 वा दिवस लुना 0.6 मि/ लिटर + मॅक्झिचिल व्हरायझन 1.5 ग्रॅम / लिटर + मॅक्झिबायो-के एकरी 1 लिटर
 • कटिंगनंतर 104 वा दिवस थायोन्यूट्री 1 ग्रॅम/लिटर + मॅक्झिबायो-के एकरी 1 लिटर
 • कटिंगनंतर 104 वा दिवस थायोन्यूट्री 1 ग्रॅम / लिटर + मॅक्झिबायो - के एकरी 1 लिटर + मॅक्झिव्हिटा - एल 2 मि/लिटर

टिप

90-95 दिवसांच्या दरम्यान मॅक्झिझिंग + मॅक्झिलोह + मॅक्झिएमएन प्रत्येकी 1 ग्रॅम / लि. याचा स्प्रे घेतल्यास पांढर्‍या द्राक्षांना रंग चांगला येतो. रंगीत द्राक्ष जातीत वरील स्प्रे 10 ते 15 % मण्याना रंग आल्यावर स्प्रे घ्यावा.

महत्त्वाच्या सूचना

- 35 ते 40 दिवसांच्या कालावधीत थ्रीप्सवर लक्ष ठेवा.

- कटिंगनंतर लगेच मिलिबग नियंत्रणासाठी स्प्रे घ्या. बागेत मुंग्या होऊ देऊ नका.

- 70 व्या दिवशी मिलिबगसाठी ख्रोड व ओलांडे धुवून घ्या.
 
- 50 ते 70 दिवसांच्या दरम्यान अळी होणार नाही, याची काळजी घ्या.

- सनबर्निंग ही समस्या पोषण आणि संजीवकांच्या असमतोल वापराने वाढते.

- गर्डलिंग केल्यास सनबर्निंग वाढते.

- फवारणी यंत्राची स्वच्छता राखा.

- डाउनीसाठीच्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाचे आंतरप्रवाहीपण फुलोरा अवस्था पूर्ण होईपर्यंत चांगले राहते
.
- माइट्स व भुरीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणार्‍या गंधकाचा उपयोग करा.

- विस्तारात (उरपेिू) खूप गर्दी असल्यास 60 ते 70 दिवसांच्या दरम्यान काडीच्या तळातील एक दोन पाने काढावीत. विस्तारात सूर्यप्रकाश व हवा खेळती राहणे हे द्राक्षवेलीच्या निरोगी वाढीसाठी अत्यावश्यक आहे
.
- जमीन, पाणी आणि पान देठ पृथ:करण अवश्य करा, त्याचा द्राक्ष व्यवस्थापनात उपयोग करा.
 
- जमिनीचा सामू नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य उपाययोजनांचा अवलंब करा.

- आपण द्राक्षबागेत करीत असलेल्या प्रत्येक कामाची नोंद करून ठेवा.

- जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजे बाग रोग व किडींपासूनमुक्त ठेवणे.

- द्राक्ष पाने, घड व काडी यामध्ये पालाश, कॅल्शिअम व सिलीकॉन योग्य मात्रेमध्ये असल्यास भुरी रोग नियंत्रणात राहतो.

- प्रत्येक द्राक्षजात वेगळी आहे व त्याचे शरीरशास्त्र वेगळे आहे याचा विचार करून पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, रोग कीड व्यवस्थापन व संजीवकांचा वापर करावा.

- प्रत्येक पोषणद्रव्य महत्त्वाचे समजून संतुलित खत व्यवस्थापन करा.

- बागेत ड्रीपखाली कार्यक्षम मूळ वाढीसाठी प्रयत्न करा.

सध्या बाजारात असणार्‍या व डाऊनी नियंत्रणाचे काम कार्यक्षम करणारी काही महत्त्वाची बुरशीनाशके आणि त्यांच्या मात्र पुढे दिलेल्या आहेत.

1. अ‍ॅक्रोबॅट 400 ग्रॅम/एकर
 
2. मेलडीड्यओ 900 ग्रॅम/एकर

3. कर्झेट 800 ग्रॅम/एकर

4. रीबस 302 मिली/एकर

5. झॅम्प्रो 2.5 मि./लि.

6. प्रोफाइलर 3 ते 3.5 ग्रॅम./लि.

7. मॅक्झिक्युअर 2 मिली/लि.

8. एम-45 - 2.5 ग्रॅम/लि.

9. अ‍ॅट्रकॉल - 2 ग्रॅम/लि.

वरील माहिती ही कंपनीच्या लेबल क्लेमनुसार आहे.

एवढी सगळी कार्यक्षम अशी बुरशीनाशके बाजारात आहेत. त्यामुळे त्याचा वापर करताना तितकीच जागरुकता हवी. नाहीतर कशाही पद्धतीने याचा वापर केलात तर त्याचे वाईट परिणाम आपणाला भोगावे लागणार. याची जाण ठेवून त्याचा उपयोग करा.

भुरी नियंत्रणाची बुरशीनाशके

1. फॉलिक्युअर 80 मिली/100 लिटर पाण्यासाठी.

2. लुना 0.6 मी /लिटर
 
3. अ‍ॅक्रीसीयो एकरी 80 मिली
 
4. स्कोर 40 ते 50 मिली/100 लिटर पाण्यासाठी.

5. सिस्थेन 50 ग्रॅम/100 लिटर पाण्यासाठी.

6. कॉन्टाफ 100 मिली/100 लिटर पाण्यासाठी.

7. मॅक्झिक्युअर 2 मिली/लि.

याशिवाय थायोव्हिट, कुमुलस, कोसाव्हेट, नानथीऑन ही पाण्यात मिसळणारी गंधक असणारी बुरशीनाशके भुरी व माईट्सचे नियंत्रण करतात.

खरपा नियंत्रणाची बुरशीनाशके :

1. कोसाईड/इसाइड- 1 ते 1.5 ग्रॅम/लिटर
2. ब्लायटॉक्स 2 ते 2.5 ग्रॅम/लिटर
3. झायरम 3 ते 4 मिली/लिटर
4. बावीस्टीन 1 ग्रॅम/लिटर
5. ताकत 1.5 ग्रॅम/लिटर
6. लुना 0.6 मिली/लिटर
7. अ‍ॅक्रीसीयो एकरी 80 मिली
8. स्कोर 0.4 मिली/लिटर
 
 
प्रा. एन. बी. म्हात्रे