हवामान बदलानुसार द्राक्षावरील रोगांचा प्रादुर्भाव व त्यांचे व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    25-Feb-2020
|

grape_1  H x W:
 
 
द्राक्षवेलीवरील एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन येणार्‍या फुटीवर निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगांचे वेळीच नियंत्रण केले नाही तर द्राक्षाच्या पिकाचे फार मोठे नुकसान होते. हे टाळण्याकरिता योग्यवेळी बुरशीनाशकांची बागेच्या अवस्थेनुसार फवारणी व रोगांचे प्रभावी नियंत्रण होण्यासाठी व्यवस्थापन योग्यवेळी करणे गरजेचे आहे. 
 
द्राक्षवेलीवरील एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन येणार्‍या फुटीवर निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगांचे वेळीच नियंत्रण केले नाही तर द्राक्षाच्या पिकाचे फार मोठे नुकसान होते. हे टाळण्याकरिता योग्यवेळी बुरशीनाशकांची बागेच्या अवस्थेनुसार फवारणी करणे आवश्यक असते. द्राक्षवेलीवर केवडा, करपा, भुरी व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तेव्हा रोगांचे प्रभावी नियंत्रण होण्यासाठी रोग व्यवस्थापन योग्यवेळी करणे गरजेचे आहे. तरी केवडा रोगाचा प्रादुर्भाव ऑक्टोबर छाटणीनंतर पहिले 30 दिवस यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो, तर भुरीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर महिन्यात दुसर्‍या पंधरवड्यात आढळून येतो, तसेच ढगाळ हवामानातही भुरी वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यानुसार हवामानाचा अंदाज घेऊन बागेच्या अवस्थेनुसार व पीएआय विचारात घेऊन निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी बुरशीनाशकांच्या फवारणीचे नियोजन करणे आवश्यक आहे.
 
द्राक्षावरील रोगाच्या नियंत्रणासाठी हवामानाच्या अंदाजानुसार फवारणीचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याकरिता पुढील बाबींचा काळजीपूर्वक विचार करून रोग नियंत्रण करणे जरुरीचे आहे.
 
1)वातावरण पाहून फवारणीचे नियोजन करा
 
ऑक्टोबर महिन्यात बहुतांश छाटण्या झाल्यानंतर रोगांचा धोका आपोआप कमी होत असतो. परंतु ज्या बागेत छाटण्या झालेल्या नाहीत अशा ठिकाणी नवीन येणार्‍या पालवीवर फवारणी केली जात नाही. त्यामुळे तेथे द्राक्षावरील सर्व रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो व हेच रोग छाटण्या झालेल्या बागेवर येतात.
 
2)डाउनीचा प्रादुर्भाव लक्षात घ्यावा
 
सर्वसाधारणपणे 15 ऑक्टोबरनंतर तापमान कमी होण्यास होतो. त्यानुसार अशा होणार्‍या बदलांनुसार रोगांचा धोकाही बदलत असतो. ऑक्टोबर महिन्यात तापमान 30 अंशांपेक्षा जास्त असेल व अशावेळी पाऊस झाल्यास तापमान 27 अंश ते 28 अंशांपर्यंत खाली गेले आणि पाऊस झाला की डाउनीचा धोका वेगाने वाढतो. अशावेळी डाउनीच्या योग्य फवारण्या झाल्यास रोग नियंत्रणात राहतो. त्याकरिता पाऊस बरोबर तापमानाकडे लक्ष ठेवून फवारणीचे निर्णय घेणे आवश्यक आहे.
 
3)फुटीच्या वाढीवर लक्ष द्या
 
तापमान कमी झाले, तर फुटीची वाढ मंदावते. सकाळच्या वेळेस तापमान साधारणपणे 21 अंश ते 24 अंश असते. परंतु तापमान 15 अंशांपेक्षा कमी झाल्यास नवीन फुटीची वाढ मंदावते. अशावेळी फुटीच्या वाढीची गती कमी झाली की डाउनीचा धोका कमी होतो व दोन फवारणीतील अंतर वाढवणे शक्य होते. रोग नियंत्रणासाठी सकाळचे तापमान पाहून फवारणीचा निर्णय घ्यावा. फुटीच्या वाढी कमी करण्यासाठी फवारणी घेतल्यास डाउनीचे नियंत्रण करत नाही परंतु डाउनीचा धोका निश्चितच कमी करतात. 
 
4)धुरळणी जास्त उपयोगी 
 
ज्यावेळी नवीन फुटी येत असतात व त्या कोवळ्या असताना पाऊस होत असेल तर त्यावेळी फवारणीऐवजी धुरळणी जास्त उपयोगी पडते.
 
5)आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर 
 
कोवळ्या वाढत्या फुटींवर बुरशीनाशकांची फवारणी केल्यास चांगल्या प्रमाणात आंतरप्रवाही होते व पाने जुन झालेली असताना फवारणी केली असता कमी प्रमाणात आंतरप्रवाही होते. जुन्या पानांवर आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी केली असता ते बाह्य बुरशीनाशकाप्रमाणे काम करते. म्हणूनच वाढत्या फुटींवर आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर जास्त प्रमाणात होणे आवश्यक आहे.
 
6)नियमित बागेची पाहणी महत्त्वाची
 
पानांवर रोग नाही मात्र घडांवर दिसून येतो. कारण कॅनॅपी व्यवस्थापन व फवारणीचे कव्हरेज फार महत्त्वाचे आहे.
5 ते 7 पानांच्या अवस्थेत फूट असताना वातावरणात कमी आर्द्रता असल्यास एकाच आंतरप्रवाही बुरशीनाशकापाठोपाठ घेतलेल्या दोन फवारण्या वाढत्या घडापर्यंत बुरशीनाशक आंतरप्रवाही होऊन पोहोचते. घडाला सुरक्षित ठेवण्यास हे फायदेशीर व चांगल्या दर्जाचे स्प्रेडर्स मिसळल्यास चांगली मदत होते.
 
द्राक्षवेलीवर केवडा, करपा, भुरी व तांबेरा या रोगांचा हवामान बदलानुसार प्रादुर्भावात बदल होत असतो. त्यामुळे या रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

grape_1  H x W:
 
केवडा (डाउनी मिल्ड्यू)
 
द्राक्षावरील हा महत्त्वाचा बुरशीजन्य रोग असून, महाराष्ट्रामध्ये लागवडीखाली घेतल्या जाणार्‍या जवळजवळ सर्व जातींवर हा रोग मोठ्या प्रमाणात येतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्षावेलींची पाने, केवड्यासारखी दिसत असल्याने या रोगास केवडा म्हणतात. काही भागात यास साखर्‍या असेही म्हणतात.
 
लक्षणे
 
या रोगामध्ये पानाच्या वरच्या बाजूस पिवळसर तेलकट ठिपके दिसतात आणि पानाच्या खालच्या बाजूस मखमली किंवा टर्किश टॉवेलसारखी वाढ दिसते. पानाचे देठ, तणाव, फुलोरा यावरही बुरशीची पांढरट बीजे तयार झालेली दिसतात. त्यानंतर हे भाग तपकिरी पडून वाळतात व गळतात. दमट हवामानात ठिपक्यांच्या, परंतु पानांखालील बुरशीची पांढरट वाढ दिसते. या पांढरट ठिपक्यांच्या ठिकाणी नंतर तपकिरी रंग येतो. पाने वाळतात आणि गळून पडतात. पानांप्रमाणेच वेलीच्या कोवळ्या शेंड्यावर व तणावे यावर रोगाची पांढरट बुरशी वाढते आणि शेंड्याची वाढ खुंटते. त्याचप्रमाणे मोहराचा दांडा आणि घडाचा देठ यावरही रोगाचा प्रादुर्भाव होतो. तो ठिसूळ बनून गळून पडतो.
 
grape_1  H x W:
 
अनुकूल हवामान 
 
या रोगाच्या वाढीसाठी आणि प्रसारासाठी तापमान, आर्द्रता आणि पानांवरील ओलसरपणा या तीनही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बुरशीची बीजे तयार होण्यास 12-13 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. तर बीजे रुजण्यास 18-24अंश सेल्सिअस तापमान अनुुकूल ठरते आणि बुरशीच्या वाढीसाठी 24-26 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते व तेव्हाच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो व आर्द्रताही 85%च्यावर उत्तम असते. 
 
रोगाची लागण व प्रसार
 
केवडा हा बुरशीजन्य रोग प्लाझमोपारा व्हिटिकोला या बुरशीपासून होतो. जून-सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांत केवडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. तसेच या रागेास आर्द्रता 70-100% अनुकूल असते.
 
उपाय
 
1)केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला दोन्ही छाटणीनंतर रोगट पालापाचोळा आणि काड्या एकत्र जमा करून बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकाव्यात. त्याचप्रमाणे झाडावरची साल काढून घ्यावी. त्यानंतर छाटणी झाल्यावर लगेच 1-2 दिवसांच्या आत 1 टक्का बोर्डोमिश्रण किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात घेऊन सर्व काड्या, ओलांडे आणि खोडावर फवारावे.
 
2)उत्तम निचरा असलेल्या जमिनीतच द्राक्षबागेची लागवड करावी.
 
3)द्राक्षाच्या योग्य जातीची निवड करून शिफारशीत अंतरावर द्राक्षबागेची लागवड करावी. 
 
4)हवामानाचा अंदाज घेऊन योग्यवेळी छाटणी करावी.
 
5)द्राक्षपिकास लेबलक्लेम असलेली आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके केवडा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बागेच्या अवस्थेनुसार व पीएचआय विचारात घेऊन आवश्यकतेप्रमाणे शिफारशीत प्रमाणानुसार गरजेनुसार फवारावे.
 
 क्र.  बुरशीनाशक  प्रमाण पीएचआय 
काढणी
पूर्वकाळ दिवस 
  1  मॅन्कोझेब 75 डब्ल्यूपी 1.5 ते 2.0 ग्रॅम प्रति. लि.  
66 
  2.  प्रोपीनेब 70 डब्ल्यूपी 3.0 ग्रॅम प्रति लिटर  
40(फळधारणा झाल्यानंतर
वापर टाळावा)
 
 3.  कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 ग्रॅम प्रतिलिटर  
 42 (फळधारणा
70डब्ल्यूपी झाल्यानंतर वापर टाळावा)
 
4.   
 फोसेटील
1.4 ते 2.0 ग्रॅम प्रतिलिटर 
एल 80 डब्ल्यूपी
 
30 
 5.  
 सायमोक्झॅनिल+   
0.5 ते 0.75 ग्रॅम प्रतिलिटर 66
मॅन्कोझेब 8+64 डब्ल्यूपी +2.0 ग्रॅम प्रतिलिटर
 
 
 6.  डायमेथोमॉर्फ 50 डब्ल्यूपी     0.5 ते 0.75 ग्रॅम प्रतिलिटर 66
मॅन्कोझेब 75 डब्ल्यूपी +2.0 ग्रॅम प्रतिलिटर
 
 
 7.  इप्रोव्हॅलीकार्ब+प्रोपीनेब   2.25 ग्रॅम प्रतिलिटर 55 5.5+61.25 डब्ल्यू   
  8.  मॅडीप्रोपॅमीड    23.4% एससी 0.8 मिली प्रतिलिटर   5 
 
2. भुरी (पावडर मिल्ड्यू)
 
लक्षणे 
 
द्राक्षावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अनसिनुला निकेटर या बुरशीमुळे होतो. ही बुरशी पानांच्या वरील बाजूस पांढरट बुरशीची वाढ होते. पानांवरील रोगट भाग प्रथम पिवळसर पांढरा दिसतो. नंतर भुरकट पांढरा दिसतो. प्रादुर्भावामुळे द्राक्षवेलींच्या पानांची वाढ कमी प्रमाणात होते. भुरी रोगाचा प्रादुर्भाव पानांचे व घडाचे देठावरही येतो. घड फुलावर असताना रोग आल्यास फळधारणा नीट होत नाही. फळावरही रोग येतो. फळावर बुरशी वाढत राहते व परिपक्व होणारी फळे फाटू लागतात. 
 
अनुकूल हवामान
 
सूर्यप्रकाश तीव्रता कमी, ढगाळ वातावरण, पानांवर दव पडणे, हवेचे तापमान 20 ते 24 अंश से. भुरी रोगाला अनुकूल असते. पावसाळ्याच्या दिवसांत पाऊस पडला नाही आणि ढगाळ वातावरण तसेच 20-24 अंश से. तापमानात रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो व तापमान 35 अंश से. पुढे गेल्यास बीजे रुजू शकत नाहीत. त्यामुळे रोगाला आळा बसतो. तापमान 40 अंश से. पुढे गेल्यास बुरशीचा नाश होतो व हवेतील आर्द्रता 40 ते 100% असताना रोगाचा प्रसार लवकर होतो.
 
भुरी रोगाचा व कॅनॉपीचा जवळचा संबंध आहे. कॅनॉपी विरळ अथवा हवा खेळती राहिल्यास भुरी कमी प्रमाणात येते, परंतु कॅनॉपी दाट झाल्यास व हवा खेळती नसल्यास भुरीचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. द्राक्षवेलीवर फुलोरा अवस्थेपासून घडात 8% साखर येईपर्यंत वाढू शकतो. साधारणपणे 8% साखर मण्यात उतरेपर्यंत वातावरणानुसार भुरी रोग येण्याची शक्यता असते. वेलीवरील वांझ फुटी सावलीत असतील, तसेच कॅनॉपीमध्ये जास्त गर्दी झाली, की सावलीत राहिलेल्या पानांवर, घडांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढतो. मण्यांत पाणी भरण्यास सुरुवात झाली 8% पेक्षा जास्त साखर झाल्यावर मण्यावर भुरी येत नाही. मात्र मण्याच्या देठावर भुरी येऊ शकतो. ऑक्टोबर छाटणीनंतर नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून 35 ते 40 दिवसांनंतर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते.
 
द्राक्ष फुलोर्‍यात गळ होते. फळधारणा व्यवस्थित हात नाही. घडाच्या देठावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास देठ तुटतात. घडामध्ये आठ टक्क्यांच्या पुढे साखरेचे प्रमाण गेल्यास द्राक्षमण्यावर भुरी येत नाही. मात्र मण्याच्या देठावर भुरी येऊ शकतो. ऑक्टोबर छाटणीनंतर नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून 35 ते 40 दिवसांनंतर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते.
  
द्राक्ष फुलोर्‍यात गळ होते. फळधारणा व्यवस्थित होत नाही. घडाच्या देठावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास देठ तुटतात. घडामध्ये आठ टक्क्यांच्या पुढे साखरेचे प्रमाण गेल्यास द्राक्षमण्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, पण अगोदरच प्रादुर्भाव झाला असल्यास मण्यांवर भुरकट थर दिसून पक्व होणार्‍या मण्यांवर चिरा पडतात. द्राक्षमणी वाळतात व सडतात.
 
भुरी रोगाचे एकात्मिक नियंत्रण
 
1)द्राक्षबागेचे रोगासंबंधी नियमित सर्वेक्षण करावे.
 
2)बागेची स्वच्छता महत्त्वाची, तसेच एप्रिल व ऑक्टोबर छाटणीनंतर सर्व अवशेष एकत्र गोळा करून जाळून नष्ट करावे.
 
3)द्राक्षवेलीवर एखाददुसरे अतिरोगग्रस्त आणि पूर्ण भुरकट झालेले पान आढळल्यास ते काढून घ्यावे आणि जाळून नष्ट करावेत. म्हणजे पानांवरील बुरशीबीजे हवेमार्फत पसरणार नाहीत.
 
4)कॅनॉपी व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे. बागेला भरपूर खेळती हवा व सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. फुटींची संख्या मर्यादित ठेवावी. तसेच फवारणीची कव्हरेज देखील भुरी रोग नियंत्रणास आवश्यक आहे. 
 
5)द्राक्षपिकास लेबलक्लेम असलेली आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके भुरी रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बागेच्या अवस्थेनुसार व पीएचआय विचारात घेऊन आवश्यकतेप्रमाणे शिफारशीत प्रमाणानुसार गरजेनुसार फवारणे.
 
 क्र.  बुरशीनाशक  प्रमाण पीएचआय
काढणीपूर्व
काळ-दिवस
 1 हेक्झाकोनॅझोल   5 ईसी 1.0 मि.लि. प्रतिलिटर  60
 2  डायफेनोकोनेझॉल  25 ईसी 0.5 मि.लि. प्रतिलिटर
  45
 3  मायक्लोब्युटानील  10डब्ल्यूपी 0.4 मि.लि. प्रतिलिटर
  30
 4 सल्फर 80 डब्ल्यूपी 2.5 मि.लि. प्रतिलिटर
  -
 5  टेट्राकोनॅझोल 3.8 डब्ल्यू 0.75 मि.लि. प्रतिलिटर
  30
 6  मेट्राफिनॉन 50 एससी  250 मि.लि. प्रतिलिटर 22 
 7
फ्ल्युक्झपायरॉक्झड
 25%+ 200 मि.लि. प्रतिलिटर
60 पायरॅक्लोस्ट्रॉबीन 25% एससी
 
 
भुरी रोगाचे नियंत्रण करताना बागेच्या फुलोरा अवस्थेपासून फळधारणेपर्यंत व फळधारणा झाल्यानंतरची बागेची अवस्था विचारात घ्यावी. तसेच ट्रायझोल गटातील बुरशीनाशकामध्ये 5 ग्रॅ/लि नुसार पोटॅशियम बायकार्बोनेट एकत्र करून फवारणीसाठी वापरल्यास चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते.
 
3) करपा : (अ‍ॅन्थ्रेक्नोज) बुरशीजन्य करपा
 
लक्षणे : या रोगाची लक्षणे प्रथम कोवळ्या फुटीच्या शेंड्यावर तसेच कोवळ्या पानावर दिसतात. पानांवर गोल, लहान, गोलाकार, गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. नंतर ठिपक्यांचा मध्यभाग राखाडी आणि कडा गर्द तपकिरी होतात. कधीकधी ठिपक्यांचा मधील भाग वाळून जातो आणि त्यामुळे पानास छिद्रे पडलेली दिसतात. त्याचप्रमाणे कोवळ्या काड्या, घडांचे दांडे आणि तणाचे यावर लहान फिकट तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. हळूहळू हे ठिपके लांबट आणि खोलगट होतात.
 
जिवाणूजन्य करपा -बॅक्टेरियल ब्लाईट
 
लक्षणे : या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे पानांखाली पिनाग्रासारखे ठिपके दिसतात. असे ठिपके उपशीरा आणि मुख्यशीरांच्या बाजूला जास्त दिसतात. या ठिपक्यांचा आकार गोलाकार असतो आणि त्याच्याभोवती गोल पिवळे वलय दिसते. नंतर हे ठिपके पानाच्या वर दिसतात. नवीन फुटीवर, कोवळ्या घडावर आणि पानाच्या देठावरसुद्धा या रोगाची लक्षणे दिसतात. कालांतराने हे ठिपके कोनाकृती करड्या रंगाचे दिसतात आणि त्याचे रूपांतर पुढे काळ्या चट्ट्यात होते. हे ठिपके एकमेकांत मिसळून पाने करपतात आणि पानगळ सुरू होते.
 
रोगाचा प्रसार 
 
वेलींमध्ये जिवाणूंचा प्रवेश छाटणी, शेंडा मारणे, घडांची विरळणी तसेच गर्डलिंगच्या वेळी केलेल्या जखमांमधून होतो. हे जिवाणू रोगट वेलींच्या छाटणीच्या तसेच गर्डलिंगच्या हत्यारामार्फत रोगाचा प्रसार होतो. रोगट काड्या रोपे तयार करण्यासाठी वापरल्यास निरोगी क्षेत्रातही रोगाचा प्रसार होतो. 
 
अनुकूल हवामान 
 
हवेचे तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस व आर्द्रता 80%च्या पुढे असल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. अधूनमधून पाऊस पडणे व थोडे उष्णतामान रोगाच्या वाढीस अनुकूल असते.
 
उपाय 
 
1)निरोगी बेण्यांचा वापर करावा.
 
2)रोगट फांद्या व फूट जाळून टाकावी.
 
3)छाटणीची व गर्डलिंगची हत्यारे वापरताना ती निर्जंतुक करून घ्यावी. (3 ग्रॅम ताम्रयुक्त बुरशीनाशक/लिटर)
 
4)करपा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बागेच्या अवस्थेनुसार व पीएचआय विचारात घेऊन आवश्यकतेप्रमाणे बुरशीनाशकांची शिफारशीत प्रमाणानुसार गरजेनुसार फवारणी करावी.
 
 
 क्र.
बुरशीनाशक  
 प्रमाण पीएचआय काढणीपूर्व
काळ-दिवस
  1. प्रोपीनेब   70 डब्ल्यूपी 3.0 मि.लि. प्रतिलिटर  40
 2
 कॉपर ऑक्सीक्लोराई 
 50 डब्ल्यूपी 2.5 मि.लि. प्रतिलिटर
 
42(फळधारण झाल्यानंतर
वापर टाळावा
  3.  कार्बेन्डॅझिम 50 डब्ल्यूपी   1.0 मि.लि. प्रतिलिटर  50
  4. कार्बेन्डॅझिम   12%+डब्ल्यूपी 1500 ग्रॅम प्रतिहेक्टर  66 मॅन्कोझेब 63%डब्ल्यूपी
  5.  थायोपिनेट मेथिल 70 डब्ल्यूपी    0.71 ते 0.95 ग्रॅम प्रति लिटर  50(फुलोरा अवस्थेनंतर वापर टाळावा.)
 
4. तांबेरा 
 
द्राक्ष पिकावर तांबेरा या रोगाची लागण ही केवडा व भुरी रोगापेक्षा कमी प्रमाणात आढळून येते. डॉगरीज खुंटावर तांबेरा या रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तसेच या रोगाची वाढ पूर्ण झालेल्या द्राक्षवेलीच्या पानांच्या खालील बाजूस होते. यांचे असंख्य लहान पिवळसर केशरी रंगाचे ठिपके दिसतात. संपूर्ण द्राक्षपिकाची पाने ठिपक्यांनी भरलेली दिसतात. अशी पाने पुढे करपल्यासारखी होऊन गळून पडतात. तांबेराचे ठिपके पानाच्या देठाच्या कोवळ्या फुटीवर, घडाच्या दांड्यावरही दिसतात. या रोगामुळे द्राक्षवेलीची वाढ खुंटते. या ठिपक्यांत अलैंगिक बीजे भुकटीच्या स्वरूपात असतात. अशी बीजे वर्षभर वेलीच्या हिरव्या ऊतीमध्ये जिवंत राहू शकतात. योग्य हवामान तयार झाल्यास या बिजांचा प्रसार होऊन रोगाची लागण सुरू होते. राज्यात या रोगाचा प्रादुर्भाव या वर्षी वाढल्याचे आढळून आलेले आहे. तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तांबेरा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कॉपरयुक्त बुरशीनाशकांच्या फवारण्या गरजेनुसार करणे आवश्यक आहे. 
 
नियंत्रण 
 
द्राक्षवेलीवरील तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपरयुक्त बुरशीनाशकांच्या फवारण्या 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा कॉपर हायड्रॉक्साइड 1.5 ग्रॅम प्रतिलीटर पाण्यातून फवारणी करावी.
 
अशा रीतीने द्राक्षबागेसाठी लेबलक्लेम असलेली आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके केवडा, भुरी, करपा व तांबेरा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बागेच्या अवस्थेनुसार व पीएचआय विचारात घेऊन आवश्यकतेप्रमाणे शिफारशीत प्रमाणानुसार गरजेनुसार फवारणी केल्यास निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेण्यास कुठलीही अडचण येणार नाही. 
                                                                                                         
 
                                                        डॉ. राकेश सोनवणे, डॉ. मंगेश बडगुजर,
डॉ. जितेंद्र ढेमरे व श्री. शिवाजी गायकवाड
                                                                         कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत,
ता. निफाड, जि. नाशिक