अशी वाढवूया द्राक्षाची गुणवत्ता व टिकाऊ क्षमता

डिजिटल बळीराजा-2    24-Feb-2020
|

grape_1  H x W:
द्राक्ष हे महत्त्वाचे निर्यातक्षम; परंतु अल्पकाळ टिकणारे फळ आहे. द्राक्षाची गुणवत्ता व टिकाऊक्षमता वाढवण्यासाठी संजीवकांचा वापर, तसेच व्हर्टीकल्चरल उपाययोजना करणे गरजेचे आहे. द्राक्षाची निर्यात व टिकाऊक्षमता खालील बाबींवर अवलंबून असते.
 
द्राक्ष हा अनेक वर्षे जगणारा, बळकट, पानझडी वेल असून, शाखायुक्त तणाव्यांनी चढतो. कोवळ्या फांद्यांचा रस चर्मरोगावर व पाने घशाच्या विकारांवर उपयुक्त असतात. सुके फळ शामक, थंडावा देणारे, मधुर, लघवी साफ करणारे, भूक वाढवणारे असून तहान, कडकी, कफ वगैरे विकारांवर गुणकारी असते. पक्व फळ उत्तम खाद्य असून काही प्रकारांपासून उत्तम मद्य बनवतात. काही जातींच्या फळांपासून मनुका, बेदाणे (किशमिश) बनवतात. खते, गुरांचा खुराक, स्थिर तेल, टॅनीन, अ‍ॅसिटिक आम्ल इ. पदार्थ फळांपासून उपलब्ध होतात, तर ‘द्राक्षासव’ व ‘द्राक्षारिष्ट’ ही द्राक्षापासून बनवलेली औषधे आहेत. द्राक्षापासून आसव, रस, सरबत, मद्य, व्हिनेगर, जेली, लोणची, मुरंबा, बेदाणा व मनुका इ. प्रक्रिया पदार्थ तयार करतात.
 
द्राक्ष हे महत्त्वाचे निर्यातक्षम; परंतु अल्पकाळ टिकणारे फळ आहे. द्राक्षाची गुणवत्ता व टिकाऊक्षमता वाढवण्यासाठी संजीवकांचा वापर, तसेच व्हर्टीकल्चरल उपाययोजना करणे गरजेचे आहे. द्राक्षाची निर्यात व टिकाऊक्षमता खालील बाबींवर अवलंबून असते.
 
1)मण्यांची संरचना (देठाची जाडी) : 
 
देठाची आणि राचीसची संघटनक्षमता हे घटक द्राक्षाची साठवणुकीची काळमर्यादा निश्चित करतात. देठ व राचीसचे असणारे कमकुवत संघटन हे मणी गळण्यासाठी कारणीभूत असतात, म्हणून फळकाढणीपश्चात मण्यांची गळ थांबवण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक असते. 
 
2)मण्यांच्या गळीची कारणे : मण्यांच्या गळीची कारणे प्रामुख्याने दोन प्रकारची आहेत.
 
1)कोरडी गळ (ड्राय ड्रॉप) व
2)ओली गळ (वेट ड्रॉप)
 
ओली गळ देठामध्ये एबीए (अइअ-अबसिसीन) या वृद्धीरोधक संजीवकाच्या वाढीमुळे होते आणि इथ्रेल या संजीवकामुळे कोरडी गळ होते. तसेच देठातील ओक्झीनचे प्रमाण कमी झाल्याने मण्यांची गळ होते.
 
मण्यांची गळ कमी करणे 
 
फळकाढणीअगोदर 8 ते 10 दिवस 5-100 पीपीएम (छअअएनएए नेप्थालिक अ‍ॅसिटिक आम्ल) फवारल्यास काढणीपश्चात मण्यांची गळ कमी होते. मण्यांची गळ कमी करण्यासाठी देठ जाडसर असणे आवश्यक असते. त्यामुळे सुकवा धरण्यास वेळ लागतो. देठांची जाडी वाढवण्यासाठी 3-4 व 6-7 मि.मी. जाडी आकाराचे मनी असताना 4-50 पीपीएम जीए 3 (ॠअ3 जीब्रेलिक आम्ल)+1-2 पीपीएम सीपीपीयू (उझझण फोरक्लोरफॅनुरॉन) या संजीवकांची फवारणी करावी. 75, 90 किंवा 105 दिवसांनंतर एकदाच कॅल्शियम नायट्रेट 0.5 ते 1 टक्के तीव्रतेच्या द्रावणात घडाची बुडवणी करावी. यामुळे मण्यांच्या पेशींचा ताठरपणा वाढतो आणि मण्यांची पेशीभित्तिका वाढल्याने टिकाऊ क्षमता वाढते.
 
2. मण्यांच्या आवरणाची जाडी 
 
जाडसर आकार असलेले मणी पाण्याचा अपव्यय कमी करण्यास मदत करतात आणि मणी ताजे राहतात व ताजेपणा अधिक काळ टिकतो. मण्यांच्या आवरणाची जाडी वाढवण्यासाठी 4-50 पीपीएम जीए3 (ॠअ3 जिब्रेलक आम्ल)+1-2 पीपीएम सीपीपीयू (उझझण फोरक्लोरफॅनुरॉन) या संजीवकांचे मिश्रण 3-4 व 6-7 मि.मी. जाडी आकाराचे मणी असताना फवारावे.
 
3) गुणोत्तर प्रमाण (पानांचे, मण्यांचे, घडांचे) योग्य ठेवावे. योग्य गुणोत्तर प्रमाण मण्यांच्या सुरकतेपणावर नियंत्रण ठेवते.
 
4) विरळणीवेळी मण्यांना होणारी इजा टाळावी.
 
5) साठवणूक काळात व वाहतुकीत मण्यांची गळती कमीत कमी होईल याची काळजी घ्यावी.
 
1)घडांची पहाटे (20 अंश सेल्सिअस तापमानाच्या अगोदर) तोडणी करावी.
 
2)फक्त सैल घड आणि एकसंध रंग असलेले मणी असणारे घडच निवडावेत.
 
3)गोडी : एकूण विद्राव्य घटक व आम्लता यांचे गुणोत्तर जवळपास 30 असावे.
 
4)साठवणूक : शीतगृह तापमान मर्यादा (नियंत्रण) 0.5 ते 0.5 अंश सेल्सियस आणि सापेक्ष आर्द्रता 93-97 टक्के असणे आवश्यक असते.
 
संजीवकांचा द्राक्ष गुणवत्ता आणि टिकाऊक्षमता वाढवण्यामध्ये होणारा उपयोग 
 
 क्र.   संजीवक   तीव्रता   वापरण्याची वेळ   उद्देश
 1  नेप्थालिक अ‍ॅसिटिक   5-100 पीपीएम   फळकाढणी अगोदर काढणी पश्चात आम्ल (छअअ) 8-10   मण्यांची गळ कमी
 2  जिब्रेलिक आम्ल    4-50 पीपीएम+   3-4 व 6-7 मि.मी. देठांची जाडी ॠअ3+1-2पीपीएम   जाड आकाराचे मनी वाढवण्यासाठी फोरक्लोरफॅनुरॉन झझण उर(छज3)2) असताना
 3  कॅल्शियम नायट्रेट   0.5 ते 1 टक्के 75,   90 किंवा 105 मण्यांच्या पेशींचा उर(छज3)2)दिवसांनंतर एकदाच  ताठरपणा, पेशिभित्तिका वाढवण्यासाठी
 
 
 
डॉ. विनायक शिंदे-पाटील, सहायक प्राध्यापक,
( डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय,विळद घाट, अहमदनगर) 
मोबाइल : 9422221120