निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन

डिजिटल बळीराजा-2    20-Feb-2020
|

grape_1  H x W:
 
1. द्राक्ष निर्यातीची संधी
 
1 )महाराष्ट्रात द्राक्ष उत्पादन विपुल होते
2)उत्पादन आणि गुणवत्ता चांगली आली तर मागणी देशात आणि परदेशातही वाढते.
3)द्राक्षे जितकी दूर पाठवू तितकी त्यांची किंमत वाढते.
4)द्राक्ष निर्यात केल्यास अधिक उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे परकीय चलन मिळते.
5)युरोपियन आणि इतर देशातून द्राक्षास मागणी वाढत आहे
 
द्राक्षाची निर्यात करायची म्हणजे येथे पिकणारी द्राक्ष भारताबाहेर अन्य देशात विकायची. भारताशेजारी बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि जवळच श्रीलंका हे देश आहेत. यापैकी श्रीलंका हा देश वगळता इतर देशांत जमिनीवरून म्हणजे रेल्वे आणि ट्रकमधून वाहतूक होते. श्रीलंकेत मात्र आगबोटीने द्राक्षे पाठवावी लागतात.
 
या जवळच्या देशांशिवाय आखाती देश आणि युरोपातील काही देश आपल्या द्राक्षाची गिर्‍हाईके आहेत. आखाती देशातील, सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, सिरिया हे देश आणि युरोपमधील इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनी इत्यादी देशांचे द्राक्षाचे गिर्‍हाईक म्हणून समावेश होतो. अशा देशांची मागणीनुसार वर्गवारी केली तर असे दिसून येईल की, 
बेताची मागणी असलेले देश : बांगला देश, नेपाळ आणि श्रीलंका.
बर्‍यापैकी मागणी असलेले देश : इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी. 
 
उत्पादनात चांगली वाढ अपेक्षित 
 
सीडलेस द्राक्षाचे एक हेक्टर क्षेत्रातून आज जेवढे उत्पादन मिळते. त्यापेक्षा अनेक पटीने द्राक्षे परदेशात विकून मिळणार आहे. उत्पादन खर्चात मात्र त्यामानाने वाढ होणार नसल्याने हा व्यवसाय फायदेशीर होणार आहे.
आज सरासरी हेक्टरी 20 टन द्राक्ष उत्पादन मिळते. बागेतच विक्री केल्यास दर किलोस आज 15 दर मिळून 3 लाख रु. मिळतात. यातील 1 लाख रु उत्पादन खर्च वजा केल्यास 2 लाख रुपये शिल्लक राहतात.
 
देशातच पण दूरच्या ठिकाणी द्राक्षे विक्रीस पाठवली तर दर किलोस 20 रु. भाव मिळतो. पण खोकी भरणे, वाहतूक करणे आणि विक्री करणे या बाबींवर होणार्‍या खर्चाचा विचार केला तर द्राक्ष उत्पादकांचे हातात पडणार्‍या रकमेत भरीव वाढ होत नाही. द्राक्ष निर्यात करताना या खर्चात आणखी भर पडणार आहे. तरी विक्रीदर अधिक मिळाल्यामुळे फायदा वाढणार आहे.
 
द्राक्षाची गुणवत्ता
 
जी द्राक्षे निर्यात करावयाची आहेत, त्यांची गुणवत्ता पुढील बाबींवर अवलंबून आहे.
 
1) द्राक्ष घडाचा आकार : घड खूप लांबट अथवा गोल आकाराचा न उत्पादनात चांंगली वाढ अपेक्षित
सीडलेस द्राक्षाचे एक हेक्टर क्षेत्रातून आज जेवढे उत्पन्न मिळते. त्यापेक्षा अनेक पटीने द्राक्षे परदेशात विकून मिळणार आहे. उत्पादन खर्चात मात्र त्यामानाने वाढ होणार नसल्याने हा व्यवहार फायदेशीर होणार आहे.
 
आज सरासरी हेक्टरी 20 टन द्राक्ष उत्पादन मिळते. बागेतच विक्री केल्यास दर किलोस आज 15 दर मिळून 3 लाख रुपये मिळतात. यातील 1 लाख रु. उत्पादन खर्च वजा केल्यास 2 लाख रुपये शिल्लक राहतात.
 
देशातच पण दूरच्या ठिकाणी द्राक्षे विक्रीस पाठवली तर दर किलोस 20 रु. भाव मिळतो. पण खोकी भरणे, वाहतूक करणे आणि विक्री करणे या बाबींवर होणार्‍या खर्चाचा विचार केला तर द्राक्ष उत्पादकाचे हातात पडणार्‍या रकमेत भरीव वाढ होत नाही. द्राक्ष निर्यात करताना या खर्चात आणखी भर पडणार आहे. तरी विक्रीदर अधिक मिळाल्यामुळे फायदा वाढणार आहे. 
द्राक्षाची गुणवत्ता
 
जी द्राक्षे निर्यात करावयाची आहेत, त्यांची गुणवत्ता पुढील बाबींवर अवलंबून आहे.
 
1.) द्राक्ष घडाचा आकार : घड खूप लांबट अथवा गोल आकाराचा नसावा. सर्व घड एकाच आकारमानाचे असायला हवेत.
 
2.) घडाचे वजन : घड लहान-मोठे असण्याऐवजी ते समान वजनाचे असावेत. प्रत्येक घडाचे वजन 400 ते 600 ग्रॅम असावे. 
 
3). मणी : घडातील सर्व मणी एकसारखे वाढलेले असावेत. मण्यांचा आकार लांबट गोल असायला हवा. प्रत्येक मण्याचे वजन 3         3.5 ग्रॅम असावे. मण्यांची जाडी आणि लांबी एकास दोन या प्रमाणात असावी. (मण्यांची जाडी : व्यास 18 मि.मी. असणे योग्य       ठरते.) मणी संख्या 120-150.
 
4)रंग : घडातील सर्व मण्यांचा आणि उत्पादित सर्व घडांचा रंग एकसारखा, दुधी असायला हवा. घड अथवा मणी कोणत्याही बाजूने पहिला असता एकरंगी दिसणे आवश्यक आहे.
 
5)फळांतील गोडी : सर्व घडातील आणि सर्व मण्यांतील गोडी एकसारखी आणि इच्छित पातळीवरील असावी. कोणत्याही घडातील कोणताही मणी चाखून पाहिला तर त्याची गोडी सारखी असावी. रिफ्रॅक्टोमीटरने साखरेचे प्रमाण तपासले असता 18-20 हे रीडींग यायला हवे. गोडी प्रमाणेच फळातील आंबटपणाही कमी आणि आंबटपणाचे गुणोत्तर प्रमाण 35:1 ते 40.1 असे असावे. (फळात टी.एस.एस. किमान 18.0 टक्के असलाच पाहिजे.)
 
6.) चव : द्राक्षफळांची अभिप्रेत चव असावी. द्राक्ष आंबट अथवा एकदम गोड नसावीत. तर ती आंबट, गोड आणि मधुर असावीत. त्याचप्रमाणे द्राक्षे कडवट, तुरट, खारट अशा वेगळ्या चवीची नसावीत.
 
7.) तजेलदारपणा : द्राक्षे खाण्याच्यावेळी ती ताजी आणि टवटवीत दिसली पाहिजेत, पाहताक्षणी ती खावीशी वाटली पाहिजेत. द्राक्ष फळावर जी नैसर्गिक लव असते, ती टिकून राहिलेली असावी.
 
8.) टिकाऊपणा : द्राक्षे खाण्याचच्या वेळेपर्यंत ती चांगली टिकून राहिली पाहिजेत. घडातील मणी (एकही मणी) खराब व्हायला नको. सर्व मणी रोगरहित असले पाहिजेत. तसेच मणी सुकून जाता कामा नयेत. घडातील मणी घडातून आपोआप गळणारे नसावेत. तर ते हाताने तोडल्यानंतर सहजपणे वेगळे होणारे असावेत. तर ते हाताने तोडल्यानंतर सहजपणे वेगळे होणारे असावेत. या सर्व गुणवत्तेच्या बाबींबरोबरच इतरही काही महत्त्वाच्या बाबी आहेत. निर्यातक्षम द्राक्षासाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात.
 
द्राक्षात घातकी रेसिड्यूज (शेषांश) नसावेत
 
ही बाब महत्त्वाची आहे. ज्या देशात, विशेष करून युरापियन देशात द्राक्षात नको असलेले घटक आढळून आले तर ती द्राक्षे बाद करण्यात येतात. द्राक्षे खाताना ती साल आणि गर रसासह खाल्ली जातात. तेव्हा द्राक्षाच्या सालीत आणि गरात कोणताही नको असलेला घटक असू नये. द्राक्षे पिकवताना अनेक प्रकारची रसायने वापरावी लागतात. यात वेगवेगळी बुरशीनाशके, कीटकनाशके, तणनाशके, रासायनिक खते आणि पीक संजीवके वापरावी लागतात. यातील कोणत्याही एक अथवा अनेक घटकांचे प्रमाण त्या देशातील आरोग्यसंकेताच्या पातळीपर्यंतच असावे लागते. अशा रेसिड्यूज (शेषांश) राहता कामा नयेत त्याबद्दलचा संशय यायला नको. तसेच नमुना चाचणीत कोणताही घड काढून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्यास, त्यात घातक शेषांश आढळून यायला नको.
 
फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र हवेच
 
जागतिक पातळीवर एका देशातून दुसर्‍या देशांना कृषिमालाची निर्यात होत असताना कीड व रोगांचा प्रसार होऊ नये, तसेच त्यावर नियंत्रण राहावे म्हणून जागतिक अन्न संघटनेने सन 1951 मध्ये आंतरराष्ट्रीय पीकसंरक्षण करार केलेला आहे. हा करार आंतरराष्ट्रीय पीकसंरक्षक करार 1951 (इंटरनॅशनल प्लॅन्ट प्रोजेक्शन कॉन्व्हेन्शन 1951) म्हणून ओळखला जात असून भारत देश या कराराचा एक सदस्य देश आहे.
 
सदर करारातील तरतुदीनुसार अन्य देशात निर्यात करण्याकरिता ते माल कीड/रोगमुत असल्याचे प्रमाणपत्र (फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट) घेणे सर्व देशांना बंधनकारक आहे. सदरचे काम योग्य प्रकारे होण्याकरिता केंद्र शासनाने अधिसूचना क्रमांक 8-1/पीपीआय/दिनांक 26 नोव्हेंबर 1993 अन्वये केंद्र व राज्य शासनातील अधिकार्‍यांना फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट इन्शुरन्स अ‍ॅथॉरिटी म्हणून घोषित केलेले आहे. त्यामध्ये राज्यातील 11 अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट इन्शुरन्स अ‍ॅथॉरिटीज
 
क्र. जिल्हा अधिकार्‍यांचा हुद्दा कार्यालयाचा पत्ता
1. पुणे कृषि अधिकारी द्वारा कृषी आयुक्तालय, साखर संकुल 
(पीक संरक्षण) शिवाजीनगर, पुणे 411 005.
2. पुणे कृषी उपसंचालक द्वारा संचालक फलोत्पादन, कृषी 
आयुक्तालय, शिवाजी नगर, पुणे 5
3. नाशिक कृषि अधिकारी द्वारा जिल्हा अधिक्षक व कृषी अधिकारी यांचे 
कार्यालय, नाशिक.
4. नाशिक कृषि उपसंचालक द्वारा जिल्हा अधिक्षक व कृषी अधिकारी यांचे 
कार्यालय, नाशिक.
5. सोलापूर कृषी उपसंचालक द्वारा जिल्हा अधिक्षक व कृषी अधिकारी यांचे 
कार्यालय, सोलापूर.
6. सोलापूर कृषी अधिकारी द्वारा जिल्हा अधिक्षक व कृषी अधिकारी यांचे 
कार्यालय, नाशिक.
7. सांगली कृषी उपसंचालक द्वारा जिल्हा अधिक्षक व कृषी अधिकारी यांचे 
कार्यालय, सांगली.
8. सांगली कृषी अधिकारी द्वारा जिल्हा अधिक्षक व कृषी अधिकारी यांचे 
कार्यालय, सांगली.
राज्य शासनाचे अधिकारी
9. मुंबई उपसंचालक रिजनल प्लॅन्ट कारन्टाईन स्टेशन, 
शिवडी, मुंबई
10. नागपूर उपसंचालक सेंट्रल इन्टीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट सेंटर, नागपूर.
 
 
कृषिमालामध्ये फळे, फुले, भाजीपाला, बियाणे, रोपे इत्यादी कृषिमालांचा समावेश होतो. सदर मालाची निर्यात करण्यासाठी उत्पादक/ निर्यातदारास फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट अ‍ॅथॉरिटीकडून फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतीमाल निर्यातदारांना फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी खालील सर्वसाधारण कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
 
1.विहित केलेल्या प्रपत्र-1च्या नमुन्यात अर्ज, 2. आयात/निर्यातदार यांच्यात केलेल्या कराराची प्रत. (सेवा व शर्ती), 3. प्रोफॉर्मा इनव्हाईसची प्रत, 4. आयात निर्यात कोड नंबर, 5. धुरीकरण प्रमाणपत्राची प्रत, 6. विहित केलेली फी मूळ चलन.
निर्यातदारांनी कृषिमालाची निर्यात करण्यासाठी फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र मिळण्याकरिता वर नमूद केलेल्या संबंधित माहितीसह प्रत्यक्ष निर्यातीच्या 7 दिवस अगोदर फायटो सॅनिटरी इश्युइंग अ‍ॅथॉरिटीकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जाची छाननी करून त्याची फायटो नोंदवहीमध्ये नोंद करण्यात येते. त्यानंतर निर्यात करण्यात येणार्‍या मालाची प्रत्यक्ष पाहणी करून ती तपासणी करण्यात येते व तद्नंतर निर्यातदारास निर्यात करीत असलेल्या मालाकरिता फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देण्यात येते.
 
युरेपियन देशांना द्राक्षाची निर्यात करण्याकरिता फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देण्यापूर्वी द्राक्षात कीटकनाशकांचे उर्वरित अंश (पेस्टीसाइड रेसिड्यू) आहे की नाही हे तपासून ते क्षम्य मर्यादेच्या आत (टोलरन्स लिमिट) असेल तरच द्राक्षाची निर्यात करण्यास परवानगी देण्यात येते.
 
तसेच सन 2000-2001 या वर्षापासून अपेडा, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे द्राक्षे निर्यात करण्यापूर्वी द्राक्ष बागायतदाराने संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच द्राक्षामधील औषधांचे उर्वरित अंश तपासण्याकरता नमुने घेण्यासाठी संबंधित मंडळी कृषि अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
 
1.किटकनाशके उर्वरित अंश चाचणी प्रयोगशाळा, शिवाजीनगर, पुणे 411 005.
फोन नंबर : 5534348.
2.नॅशनल हॉर्टीकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, पोस्ट बॉक्स नंबर, 61, नवीन मुंबई-आग्रा रोड, नाशिक, फोन नंबर : 592523.
3.कीटकनाशके उर्वरित अंश चाचणी प्रयोगशाळा, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर, फोन नंबर : 43240.
4.रिलायबल अ‍ॅनालिटीकल लॅबोरेटरी, 221, अमर लेन, एस.टी. वर्कशॉप, ठाणे, 
फोन नंबर : 5476801
5.जीओकेम लॅबोरेटरी प्रा. लि. 26/27, राजा इंडस्ट्रियल इस्टेट, मुलुंड, मुंबई. 
फोन : 5690611
 
वरील प्रयोगशाळेत कृषी आयुक्तालयाने विहित केलेल्या प्रपत्रामध्ये माहिती भरून द्राक्षाचे नमुने द्यावेत. तसेच अपेडा यांनी द्राक्षातील औषधांचे उर्वरित अंश तपासण्याकरता निर्धारीत केलेल्या सर्व औषधांच्या तपासणीकरता फी भरण्यात यावी. सदर प्रयोगशाळेकडून अपेडा यांनी विहित केलेल्या नमुन्यात विश्लेषण अहवाल प्राप्त करून तो संबंधित फायटो सॅनिटरी अ‍ॅथॉरिटीकडे सादर करणे बंधनकारक आहे.
कृषिमालाची निर्यात करताना निर्यातदारांनी लक्षात ठेवावयाचे महत्त्वाचे मुद्दे
काय करावे
 
•विहीत नमुन्यात व वेळेत पी.एस.सी. (फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट) अ‍ॅथॉरिटीकडे अर्ज करणे तसेच अ‍ॅडिशन डिक्लेरेशन असल्यास तसे अर्जात नमूद करणे. 
•निर्यात होणार्‍या मालाच्या तपासणीसाठी पी.एस.सी. अ‍ॅथॉरिटीची वेळ व ठिकाण यांची माहिती करून घेणे.
•केंद्र व राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या पी. एस.सी. अ‍ॅथॉरिटीकडूनच फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र घ्यावे. 
•आयातदारांना त्वरित माल मिळण्यासाठी मूळ फायटो सॅनिटरी प्रमाणपत्रा पाठवण्यात यावे.
•निर्यातक्षम कृषिमालाचे धुरीकरण नोंदणीकृत पेस्ट कंट्रोल ऑपरेटरकडूनच करून घेणे.
काय करू नये
•अनधिकृत अधिकार्‍याकडून फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र स्वीकारू नये.
•जो माल निर्यात झालेला आहे अशा मालासाठी फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न करू नये.
अधिक माहितीसाठी निर्यातदारांनी संबंधित जिल्ह्याच्या फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देणार्‍या प्राधिकृत अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.
 
उत्पादन आणि गुणवत्ता
 
महाराष्ट्रात सीडलेस द्राक्षाचे उत्पादन समाधानकारक आहे. हेक्टरी 20 टनापासून 50 टनापर्यंत उत्पादन काढणारे बागाईतदार इथे आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत मात्र मोठी तफावत आहे. उत्पादन कमी पण गुणवत्ता चांगली. तसेच उत्पादन अधिक पण गुणवत्ता सुमार अशी स्थिती आहे. निर्यातक्षम द्राक्षाचे हेक्टरी 25-30 टनाचे आणि इच्छित गुणवत्तेचे उत्पादन काढणे अवघड नसले तरी ते सहजपणे जमणारे नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
 
निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेण्यासाठी पुढील बाबींतील प्रत्येक बाब समजून घ्यायला हवी.
 
1)द्राक्षाची जात : आपल्याकडे सीडलेस द्राक्षांच्या 4-5 जाती लागवडीखाली असल्या तरी त्यातील तास-ए-गणेश आणि थॉम्पसन सीडलेस या दोन जातींचीच प्रथम विचार करावा. याचे कारण अशा द्राक्ष मण्यांचा आणि घडांचा इच्छित आकार आणणे, तसेच त्यांचा टिकाऊपणा वाढवणे या जातीत कमी प्रयत्न करून शक्य आहे. विशेष करून मण्याची लांबी आणि जाडी 2:1 या प्रमाणात वाढविणे तसेच घडांचे कडक उन्हापासून आणि कडक थंडीपासून संरक्षक्ष करणे सोपे पडते. या जातीतील पानांचा आकार, जाडी आणि एकूण पर्णविस्तार मजबूत असल्यामुळे इच्छित वजन आणि गुणवत्ता साधणे सोपे पडते.
 
2)द्राक्ष वेलींचे वय : आपल्याकडे द्राक्षवेल वयाच्या दुसर्‍या वर्षापासून उत्पादन देऊ लागतात. लागवडीखालील वेलींचे वय 15 वर्षांपर्यंतचे आहे. वेली जसजशा जुन्या होत जातात, त्याप्रमाणे वयाच्या 6-7 वर्षांनंतर घड लागण्याच्या क्षमतेत बदल होत जातो. वेलीवर एका वेळी आणि एका आकारमानाचे घड लागण्याची क्षमता खालावते. याचा परिणाम घड पोसण्यावरही होतो. यासाठी ज्या द्राक्ष वेलींचे वय 3 ते 7 वर्षांचे आहे, तीच बाग निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी निवडावी. यापेक्षा अधिक वयांच्या वेलींवरील ओलांड्याचे नूतनीकरण करूनही हा हेतू साध्य करता येतो.
 
3)द्राक्ष बागेची जमीन आणि पाणी : दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी ही बाब विचारात घ्यायला हवी. आपल्याकडील अनेक द्राक्षबागातील जमिनीत चुनखडीचे आणि इतर क्षारांचे प्रमाण वाढलेले आहे. अशा जमिनीत द्राक्ष घडांचे पोषण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. शक्यतो त्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. अशाच द्राक्षबागांना यासाठी निवडावे. जमिनीप्रमाणेच बागांना द्यायचे पाणी क्षारमुक्त आणि क्लोराईडमुक्त असावे. जमीन चांगली पण पाणी खराब, तसेच जमीन खराब पण पाणी चांगले असल्यास दर्जेदार द्राक्षे पिकवायची आहेत, तेथील माती आणि पाणी प्रयोगशाळेत तपासून घेऊन त्याप्रमाणे खते आणि पाणी यांचा वापर केल्यास दर्जेदार द्राक्षे पिकवण्याचा मार्ग काढता येतो. केवळ अंदाजे किंवा अज्ञानाने ही बाब हाताळली तर उत्पादन आणि गुणवत्ता यांची खात्री नसते. या तीन बाबी मूलभूत असून त्यात ऐनवेळी सुधारणा अगर बदल करणे शक्य होत नाही. तरीपण या पायाभूत बाबी चांगल्या असतील तर पुढील बाबी नीटपणे हाताळता येतात आणि उद्दिष्ट साधणे सुकर होते. या बाबी म्हणजे घड निर्मितीपासून त्यांचे पोषण आणि संरक्षण करून ते तयार होईपर्यंतची जी कामे असतात त्यांचा समावेश होतो. यासंबंधीची तयारी कशी करायची, याबद्दलची माहिती पुढील प्रकरणातून सविस्तरपणे सांगितली आहे.
 
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या द्राक्षबागेचे वय 7-8 वर्षापेक्षा अधिक झालेले असेल तर अशा वेलींचे नूतनीकरण करून घ्यावे. नूतनीकरण करण्यासाठी जून आणि दुबळे ओलांडे कापून काढावेत आणि खोड शाबूत राखून नवीन ओलांडे वाढवून घ्यावेत. खोडे निकामी झालेली असतील तर खोडे तळाशी कापून नवीन खोडे तयार करून घ्यावीत. त्याचबरोबर इतर जातीची भेसळ झालेली असेल तर अशा इतर जातींचे बगल कलम करून घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत, निवड केलेल्या बागेत इतर जातींची भेसळ नसावी.
 
तिसरी बाब म्हणजे, द्राक्षबागेची जमीन अडचणीची नसावी. बागेसाठी जे पाणी वापरले जाते ते सुद्धा क्षारविरहित असावे. जमीन आणि पाणी लगेच बदलता येणार्‍या बाबी नाहीत, तरीपण या दोन्हींपैकी एक बाब सुलभ असेल तर दुसरी बाब सुधारता येते. निचरा न होणार्‍या, अधिक क्षार असणार्‍या जमिनीतून द्राक्षाचे उत्पादन घेताना अधिक त्रास घ्यावा लागतो. अधिक खर्च करावा लागतो आणि हा त्रास टाळण्यासाठी अगोदरच विचार केला पाहिजे. जमीन सुधारणेचे काम वेळेवर करता येत नाही. त्यासाठी चर खोदणे, हिरवळीचे पीक गाडणे, जीवाणू खत वापरणे असे मार्ग आहेत.
 
याप्रमाणे वरील तीन बाबी या मूलभूत आहेत आणि तितक्याच महत्त्वाच्या आहेत. द्राक्ष उत्पादनाचा हा पायाच आहे असे समजावे.
काढणीनंतरची हाताळणी
 
चांगल्या प्रतीची द्राक्षे पिकवणे हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच द्राक्षाची काढणी, हाताळणी, पॅकिंग, वाहतूक आणि साठवणूक हे काढणीनंतरचे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. प्रस्तुत लेखात या विषयात अनुसरून आजपर्यंत केलेल्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावरून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
काढणी
 
आपली द्राक्षे ज्या देशात पाठवायची आहेत, त्या देशांच्या गुणवत्ता निकषांप्रमाणे द्राक्षाची निवड करून काढणी करणे आवश्यक आहे. भारतातून द्राक्ष निर्यात प्रामुख्याने मध्य-पूर्व देश, इंग्लंड व इतर युरोपीय (हॉलंड, जर्मनी, बेल्जीयम, इत्यादी) देशांमध्ये केली जाते. मध्य-पूर्व देशांमध्ये निर्यातयोग्य लोकप्रिय द्राक्षाची जात म्हणजे सोनाका. लांबट मणी असलेल्या या द्राक्षांमध्ये एकसारखेपणा व गोडी असणे आवश्यक असते. मण्यांची लांबी जेवढी जास्त तेवढी ही द्राक्षे बाजारपेठेत लोकप्रिय ठरली आहेत. इंग्लंड व इतर युरोपीय देशांमध्ये थॉम्पसन सीडलेस जातीची द्राक्षे लोकप्रिय आहेत. लांब पल्ल्याच्या बाजारपेठेत सोनाका पाठवायची झाल्यास देठाच्या विरुद्ध बाजूस मण्यांचा आकार टोकदार नसून गोलाकार असल्यास द्राक्षाची ही जात युरोपीय देशांमध्येसुद्धा आपण पाठवू शकतो. मणी लांबट व टोकदार असल्यास, मण्यांच्या टोकाकडे साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने साठवणुकीमध्ये मणी काळे पडल्याचे निदर्शनास आले आहे.
 
इंग्लंड व इतर युरोपीय देशांसाठी आवश्यक असणारे द्राक्षाचे गुणवत्ता निकष पुढीलप्रमाणे आहेत :
 
मण्यांची फुगवण : 17 अंश मि.मी पेक्षा अधिक व्यास असावा. 
साखरेचे प्रमाण : इंग्लंडसाठी 17 अंश ते 19 अंश ब्रिक्स एवढे असावे.
इतर युरोपीय देशांसाठी 18 अंश ते 20 अंश ब्रिक्स ( या देशांमध्ये गोड द्राक्षांना अधिक पसंती आहे.) साठवणुकीमध्ये द्राक्षाची टिकाऊक्षमता ही त्यातील साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असल्याने हे प्रमाण 17 ब्रिक्स पेक्षा कमी असल्यास ती प्री-कुल केल्यानंतर अशा द्राक्षांना शीतगृहामध्ये तडे (क्रॅकिंग) जातात. तसेच ही द्राक्ष साठवणुकीत काळी पडतात.
घडाचा रंग : इंग्लंडसाठी घडातील मण्यांचा रंग दुधी-हिरवा असावा. इतर युरोपीय देशांमध्ये पिवळसर रंगाची द्राक्ष पसंत केली जातात. 
घडाचे वजन : 350 ते 750 ग्रॅम आवश्यक आहे.
इतर निकष : घड अति घट्ट किंवा अति मोकळा नसावा. घडाचा मुख्य दांडा व मण्याचे देठ हिरवेगार व लुसलुशीत असावेत. घड कीड-रोग विरहित असून त्यावर औषधांचे किंवा मातीचे डाग नसावेत. मण्यांमध्ये गराचे प्रमाण भरपूर असून बोटाने दाबल्यास मणी टणक असावा.
 
द्राक्ष काढणी करताना वरील गुणवत्ता निकषांव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायला हवेत.
द्राक्ष काढणी सकाळी लवकर उजाडल्यापासून ते 9 वाजेपर्यंत ऊन पडायच्या आत करावी. द्राक्ष सकाळच्या प्रहरी थंड असतात व द्राक्ष थंड असताना काढल्यामुळे त्यातून बाष्पीभवन कमी होते. अशी द्राक्ष साठवणुकीमध्ये टवटवीत व तजेलदार राहतात. प्री-कुलींग व शीतगृह बागेच्या जवळच असल्यास व काढणीनंतर द्राक्ष एक ते दीड तासाच्या आत प्री-कुल करणे शक्य होते.
 
बागेला पाट पद्धतीने पाणी दिल्यास द्राक्ष काढणीच्या वेळेस जमिनीत भरपूर ओल असेल तर बागेतील आर्द्रता वाढते. जेणेकरून पानांमधील बाष्पीभवन कमी होऊन पर्यायाने मण्यांमधील टर्नर प्रेशर वाढते. अशा अवस्थेत द्राक्ष काढल्यास साठवणुकीमध्ये मण्यांना केसाच्या जाडीच्या आकाराचे बारीक तडे जातात. म्हणून बागेला पाट पद्धतीने अथवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास वाफसा आल्याशिवाय काढणी करू नये. 
 
सकाळचे दव पडून घड ओले झाले असल्यास काढणी करण्याची घाई करू नये. अशावेळी घड पूर्णपणे कोरडा झाल्यावरच काढावेत. काढणी करण्यास थोडा उशीर झाला तरी हरकत नाही. ओले घड काढल्यास त्यात साठवणीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो.
 
द्राक्ष काढणीच्या अगोदरच्या दिवशी किंवा रात्री पाऊस पडल्यास काढरी 2 ते 3 दिवस थांबवावी. पावसामुळे मण्यांवर बुरशीजन्य रोेगांचा प्रादुर्भाव झाल्यास तो दोन-तीन दिवसांत दिसू लागतो. अशी द्राक्ष साठवणुकीमध्ये खराब होतात. 
घडाच्या देठाच्या वरच्या बाजूस असलेली गाठ ठेवून गाठीच्यावर घड वेलीवरून कापावा. घडाच्या वर गाठ ठेवल्यास घडातून बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते व घड हिरवागार व लुसलुशीत राहतो.
 
द्राक्ष वेलीवरून काढल्यानंतर घडांची हाताळणी अतिशय काळजीपूर्वक करावी. बागेतून पॅकिंगच्या ठिकाणी द्राक्षे आणण्यास प्लॅस्टिकचे क्रेट वापरले जातात. काढणीनंतर घड क्रेटमध्ये हळुवार ठेवावेत. हे क्रेट कायम स्वच्छ असावेत. क्रेटच्या तळाला वर्तमानपत्राचे कागद वापरू नयेत, कारण या कागदाची शाई द्राक्ष मण्यांना लागून मणी काळे पडतात. क्रेटच्या तळाला द्राक्षांना कुशनिंगसाठी बबल शीट अथवा नेटलॉन शीट वापरावेत. घड क्रेटमध्ये एका थरातच ठेवावेत. या कामासाठी 595 ×395×150 मि.मी. आकारमानाचे क्रेट वापरल्यास त्यात सात ते आठ किलो द्राक्षे बसू शकतात. पंधरा किंवा वीस किलोचे खोलगट क्रेट वापरल्यास घडांचे थरावर थर बसून खालची द्राक्षे दबली जातात. मणी देठापासून सुटे होण्यास सुरुवात होते व असे मणी साठवणुकीमध्ये खराब होतात.
 
काढणीनंतर द्राक्ष भरलेले क्रेट सावलीत ठेवावेत. सावलीत व उन्हात ठेवलेल्या द्राक्षांच्या तापमानात परिणामकारक फरक आढळून आला आहे.
 
वाहतूक 
 
काढणीनंतर वाहतूक ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. मण्यांवर वाहतुकीमध्ये इजा होण्याचा संभव असल्याने द्राक्षाची टिकाऊक्षमता कमी होण्यास अयोग्य पद्धतीने केलेली वाहतूक बर्‍याच अंशी जबाबदार ठरते.
काढणीनंतर द्राक्ष वाहतुकीची पूर्ण तयारी अगोदरच केलेली असावी. वाहतुकीअभावी द्राक्ष बागेमध्येच अधिक काळ पडून राहिल्यास एकतर द्राक्षाचे तापमान वाढत जाते व प्री-कुलींगला जसजसा उशीर होत जाईल तसतशी द्राक्षाची टिकाऊ क्षमता कमी होते.
 
द्राक्षाने भरलेले क्रेट वाहनामध्ये ठेवताना अथवा वाहनामधून खाली उतरवताना दक्षता घ्यावी. क्रेट काळजीपूर्वक व हळुवारपणे हाताळले गेल्यास द्राक्षांना कमीतकमी इजा होईल.
 
वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन पुढच्या, मागच्या व वरच्या बाजूने व्यवस्थित व एकसारखे झाकलेले असावे. पुढील व मागील बाजूने वाहन झाकले नसल्यास चालू वाहनामधे द्राक्षावरून गरम हवा फिरून द्राक्ष व त्याचे देठ सुकवण्यास सुरुवात होते. वाहतुकीमध्ये द्राक्ष झाकण्यास वापरलेली ताडपत्री हलक्या रंगाची व कायम स्वच्छ ठेवल्यास सूर्यकिरणे परावृत्त करण्यास मदत करते. द्राक्षाने भरलेल्या क्रेटवरून ताडपत्री टाकताना क्रेटच्या वरच्या बाजूस क्रेट व ताडपत्रीमध्ये अंतर असावे व क्रेट सर्व बाजूने ताडपत्रीने पूर्णपणे झाकलेले असावेत. यामुळे द्राक्षांवरून गरम हवा फिरण्यास प्रतिबंध होतो.
 
वाहतूक करताना वाहनाचा वेग संतुलित असायला हवा. वाहनाच्या चाकामधील हवेचा दाब प्रमाणापेक्षा अधिक असल्यास वाहन रस्त्यावरून आदळ-आपट करीत जाते व बसणार्‍या हादर्‍यांमुळे द्राक्षांना इजा होतात.
 
द्राक्ष हाताळणी
 
द्राक्ष हे अतिशय नाजूक फळ असल्याने त्याची हाताळणीपण तेवढीच काळजीपूर्वक करायला हवी. अन्यथा द्राक्ष मण्यांच्या सालीवर इजा होऊन अशी द्राक्ष साठवणुकीमध्ये खराब होतात. त्यासाठी काढणीनंतर द्राक्षाची हाताळणी कमीत कमी होणे इष्ट असते.
 
अ)बागेमध्ये पॅकिंग (फिल्ड पॅकिंग)
ब) मध्यवर्ती ठिकाणी पॅकिंग (सेंट्रलाइज पॅकिंग)
 
बागेमध्ये पॅकींग करताना क्रेटमधील मोकळ्या द्राक्षाची वाहतूक पूर्णपणे टाळली जाते. द्राक्षाची निसाई व बॉक्स पॅकिंग बागेत केल्याने द्राक्षाने भरलेल्या बॉक्सची वाहतूक करावी लागते. क्रेटच्या तुलनेत बॉक्समध्ये द्राक्ष हलण्यास अजिबात वाव नसल्याने द्राक्षांवर होणार्‍या इजा बर्‍याच अंशी कमी होऊन द्राक्ष दूरच्या बाजारपेठेत व्यवस्थितपणे पोहोचू ाकतात. बागेतील पॅकिंग पद्धतीमध्ये ही जरी जमेची बाजू असली तरी एकाच वेळेस वेगवेगळ्या बागांमध्ये पॅकिंग होत असल्याने गुणवत्ता नियंत्रण करणे कठीण होऊन बसते. तसेच बागेत पॅकिंग करताना आवश्यक तेवढी स्वच्छता पाळली जात नाही.
 
तुलनेने मध्यवर्ती पॅकिंग पद्धतीमध्ये गुणवत्ता नियंणि सुलभ होऊन उत्तम प्रतीची स्वच्छता पाळता येते. पण या पद्धतीमध्ये द्राक्षाची वाहतूक बागेतून मध्यवर्ती पॅकिंगच्या ठिकाणापर्यंत क्रेटमधून होत असल्याने द्राक्षाच्या सालीवर मोठ्या प्रमाणावर इजा होत असतात. त्याचे रूपांतर साठवणुकीमध्ये द्राक्ष खराब होण्यामध्ये होते. तसेच क्रेटमधून द्राक्ष वाहतूक करताना द्राक्ष सुकण्याचे प्रमाण अधिक असते.
 
द्राक्षाची प्रतवारी, वजन व पॅकिंग
 
काढणीनंतर बागेतून प्रतवारी व पॅकिंगसाठी द्राक्ष आणल्यानंतर द्राक्षाने भरलेले क्रेट हळुवारपणे व काळजीपूर्वक हाताळले जावेत. क्रेटची आदळआपट केल्यास द्राक्षांना इजा होण्याचा संभव अधिक असतो. प्रतवारी व पॅकिंगच्या ठिकाणी भरपूर उजेड व स्वच्छता असणे गरजेचे आहे.
 
प्रतवारी करताना कात्रीच्या सहाय्याने प्रत्येक घडातील नको असलेले मणी उदा. पाण्याचे मणी, दोडे मणी, डाग पडलेले मणी, बारीक मणी काढून टाकावेत. कारण घडातून अधिक मणी कात्रीने काढावे लागल्यास घडाला खूप ठिकाणी इजा होतात व त्यातून रोगजंतू आत जाण्यास सुरुवात होते. द्राक्षाच्या रंगानुसारदेखील प्रतवारी आवश्यक ठरते. एका बॉक्समधील सर्व घड जवळपास आकााने व रंगाने एकसारखेच दिसायला हवेत. याचे कारण इंग्लंड किंवा इतर युरोपीय देशांमधील ग्राहक हा चवीने खाण्यापेक्षा डोळ्यांनी खात असतो. याचा अर्थ चवीपेक्षा आकर्षक दिसण्याला अधिक महत्त्व दिले जाते. प्रतवारी करणार्‍या कामगारांनी पॉलिथीनचे (एच.डी.पी.ई.) हातमोजे वापरल्यास द्राक्षावरचे ‘लस्टर’ बर्‍याच अंशी रोखण्यास मदत होते.
 
वजन 
 
प्रतवारी केल्यानंतर द्राक्षाचे वजन अचूकपणे करायला हवे. शक्यतो इलेक्ट्रॉनिक वजन काटा वापरल्यास वजनातील कमी-जास्तपणा टाळता येतो. 
 
इंग्लंड व इतर युरोपीय बाजारपेठेसाठी सध्या तीन प्रकारचे बॉक्स प्रचलित आहेत. 4.5 किला, 5 किलो व 8.2 किलो पॅकिंग करताना द्राक्षाचे निव्वळ वजन अनुक्रमे 4.7 किलो, 5.2 किलो व 8.4 किलो असायला हवे. कारण मुंबईपासून द्राक्ष समुद्रमार्गाने इंग्लंड वइतर युरापेीय देशांना पोहोचायला तीन आठवड्यांच्या कालावधीत प्रत्येक बॉक्समध्ये थोड्याफार प्रमाणात द्राक्षांच्या वजनात घट होत असते.
 
पॅकिंग
 
चांगल्या गुणवत्तेची द्राक्ष जेव्हा व्यवस्थितपणे बॉक्समध्ये भरली जातात, तेव्हा त्या द्राक्षांची विक्रीक्षमता निश्चितपणे वाढते हे लक्षात ठेवायला हवे. तीच उत्कृष्ट प्रतीची द्राक्ष बॉक्समध्ये विस्कळीत पॅकिंग केल्यास त्याकडे ग्राहक आकर्षित होत नाहीत.
प्रथम म्हणजे पॅकिंगसाठी लागणारे सर्व साहित्य सावलीत, स्वच्छ ठिकाणी ठेवले पाहिजे. पुठ्ठ्याचे बॉक्स उन्हात ठेवल्यास कडक होऊन त्याचे तुकडे पडू लागतात.
 
पॅकिंगचे काम चालू असताना पॅकिंगचे कुठलेच साहित्य खाली जमिनीवर ठेवू नये. हे साहित्य रिकाम्या, स्वच्छ के्रेटमध्ये/ स्वच्छ टेबलावर ठेवावे. कामगारांना खाली बसण्यासाठी रिकाम्या बॉक्सचा वापर करू देऊ नये.
बॉक्स घडी करून तयार करण्यासाठी प्रथम बॉक्सचा आकार व्यवस्थित समजावून घेणे आवश्यक आहे. बॉक्स व्यवस्थितपणे तयार न केल्यास ते शीतगृहामध्ये दबले जातात.
 
बबल शीट बॉक्सच्या तळाला टाकताना हवेचे बबल असलेली बाजू खाली व सपाट बाजू वर करायला हवी. बबल शीट उलटी टाकल्यास त्याचा आवश्यक तो कुशनिंगचा परिणाम मिळत नाही.
 
द्राक्षाचे घड पाऊचमध्ये घडाच्या देठाला धरूनच ठेवावेत. हंडी आकाराच्या पाऊचमध्ये घड उभे व आयताकृती पाऊचमध्ये आडवे ठेवावे. 500ग्रॅमच्या वरचा घड असल्यास एका पाऊचमध्ये एक व 350 ते 400 ग्रॅमचे घड असल्यास एका पाऊचमध्ये दोन घड ठेवावेत. 4.5 किलोच्या एका बॉक्समध्ये 9 ते 10 पाऊच, 5 किलोच्या एका बॉक्समध्ये 10 ते 11 पाऊच असावेत. 8.2 किलोच्या एका बॉक्समध्ये 15 ते 18 पाऊच असावेत. पाऊचमध्ये द्राक्ष प्रमाणापेक्षा अधिक भरली जाऊ नयेत याची काळजी घ्यावी. इंग्लंड अथवा इतर युरोपीय देशांतील ग्राहक हा बाजारातून पूर्ण बॉक्स खरेदी न करता पाऊचमधून द्राक्ष खरेदी करत असल्याने प्रत्येक पाऊचमध्ये चांगल्याच प्रतीची द्राक्ष असणे आवश्यक आहे.
 
बॉक्समध्ये द्राक्ष भरताना बॉक्सचे वरील झाकण लावल्यावर आतील द्राक्षे दबणार नाहीत याची दक्षता घ्यावी. द्राक्षाची प्रतवारी, वजन व पॅकिंग करण्याची क्रिया कमीत कमी वेळात पूर्ण करण्यावरसुद्धा पुढील टिकाऊक्षमता बर्‍याच प्रमाणात अवलंबून असते.
1 कुलींग व स्टोरेज (साठवणूक)
2 कुलींग म्हणजे फळाची काढणी केल्यानंतर कमीतकमी वेळात त्याचे तापमान आवश्यक त्या मर्यादेपर्यंत कमी करणे. द्राक्षाला 3 कुलींगसाठी तर सेल्सियस तापमान व 95 टक्के सापेक्ष आर्द्रता असण्याची आवश्यकता असते. द्राक्षाचे तापमान 0 ते 2 अंश सेल्सियसपर्यंत आले की, द्राक्ष प्री-कुल झाले असे समजावे.
4कुलींग
 
कुठलेही फळ हे जीवित वस्तू असून झाडावरून काढणी केल्यानंतरसुद्धा त्यामध्ये शरीरशास्त्रीय विविध क्रिया चालू असतात. प्री-कुल करण्यामागील तीन प्रमुख उद्देश असे-
 
अ)द्राक्षाची सुकण्याची क्रिया कमी करणे.
ब) द्राक्षाचा नाश करणार्‍या बुरशींच्या वाढीस प्रतिबंध करणे.
क) द्राक्षाची श्वसनक्रिया (रेस्पीरेशन) कमी करणे.
 
तापमानाचा द्राक्ष सुकण्यावर होणारा परिणाम
 
आपल्याकडे द्राक्ष काढणीचा हंगाम उन्हाळ्यात येत असल्याने त्या वेळेस बाहेरील वातावरणाचे तापमान किमान 30अंश सेल्सिअसपासून ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत असते. अशावेळेस द्राक्षाचा काढणीपासून ते प्री-कुलींगसाठी जाण्यापर्यंतचा कालावधी टिकाऊ क्षमतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरतो. काढणीनंतर द्राक्ष प्री-कुलींगसाठी जाण्यास उशीर झाला तर घडाचा प्रमुख दांडा व देठ सुकण्यास सुरुवात होऊन सुकण्याचे प्रमाण अधिक असेल तर देठ कडक होऊन तुटायला लागतात. तसेच सुकल्यामुळे देठांचा व दांड्यांचा रंग तपकिरी होतो. हा रंग द्राक्षाच्या देखणेपणास मारक ठरतो. द्राक्ष प्री-कुलींगमध्ये जाण्यास खूपच उशीर झाला तर द्राक्षाचे मणीसुद्धा सुकायला सुरुवात होते. अशी द्राक्ष निर्यातीस अपात्र ठरतात.