बेदाण्याची गुणवत्ता टिकविण्याच्या दृष्टिकोनातून

डिजिटल बळीराजा-2    01-Feb-2020


बेदाणा _1  H x

 
 
 
बेदाण्याची गुणवत्ता टिकविण्यासाठी वाळवण्याच्या पद्धती व प्रक्रिया करणे कसे गरजेचे आहे या संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे.

द्राक्षाच्या एकूण उत्पादनापैकी 95 % उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते. भारतामध्ये एकूण उत्पादनापैकी 71% ताजी द्राक्ष खाण्यासाठी वापर केला जातो, तर 27% बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्षाचा वापर केला जातो.भारतात सर्वसाधारणपणे मनुकाची निर्मिती पारंपरिक पद्धतीने सावलीत केली जाते. महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात व कर्नाटकाच्या विजापूर व बागल जिल्ह्यात सर्वसाधारणपणे 200 टनापर्यंत मनुकाचे उत्पादन घेण्यात येते. अमेरिका (कॅलिफोर्निया), अफगानिस्थान, इराण इत्यादी देशात सुद्धा द्राक्षाच्या नैसर्गिक पद्धतीने वाळविण्याचा अवलंब करतात. या पद्धतीत कुठल्याही रासायनिक घटकाचा वापर करीत नाही. या दीर्घ कालीन पद्धतीची प्रक्रिया करून नंतरच मनुका बाजारात विक्रीसाठी आणला जातो.

 

  • मनुक्याची आयात व निर्यातीची माहिती खालील प्रमाणे :

 

वर्ष बेदाणा                                  

           निर्यात (मे.टन) आयात (मे.टन)
  • 2012-13 30,041.75 10,312.17
  • 2013-14 31,602.24 10,760.95
  • 2014-15 12,325.65 17,964.27
  • 2015-16 26,824.51 15,123.34
  • 2016-17 30,859.10 13,459.49
                                   

द्राक्ष्यांच्या जलद वाळविण्याच्या प्रक्रियेसाठी तेलाचा  अल्कलीधर्मीय द्रव्याचा वापर बेदाण्यामध्ये ठराविक आद्रता टिकविण्यासाठी केला जातो. सर्वसाधारणपणे द्राक्षाचा घड 15 मी. ली. इथाईल ओलिएट  आणि 25 ग्राम पोटॅशिअम कार्बोनेट (झेींरीीर्ळीा लरीलेपरींश) प्रति ली या मिश्रणात 2-4 मिनिटे बुडवून ठेवण्याची प्रक्रिया केली जाते या मुले बेदाण्यामध्ये आद्रतेचे प्रमाण, रंग आणि इतर गुणवत्ता राखण्यासाठी मदत होते.

 

  • वाळविण्याचा पद्धती:

 

बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्षाची वाळवण उन्हात, सावलीत किंवा यांत्रिक पद्धतीने केली जाते. द्राक्ष उन्हात वाळविण्यामुळे पर्यावरणातील घटकांचा (सूर्यकिरण,धूळ, इत्यादी) तसेच माती, लहान दगड, पाने यामुळे स्वच्छता व पर्यायाने गुणवत्तेवर परिणाम होतो. यासाठी नवीन अप्रत्यक्ष सौरऊर्जाची

पद्धत वाळविण्यासाठी विकसीत करण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रत्यक्ष लाभलेली परिस्थिती आणि सुविधांची उपलब्धतेनुसार बेदाणा तयार करण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर केला जातो.

 

  • वाळवणी पश्च्यात बेदाण्यासाठी प्रक्रिया :

 

प्रथमतः वाळलेल्या बेदाण्याचा रंग रूप व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून काळजी घेतली जाते. नंतर गुणवत्तेनुसार प्रतवारी केली जाते यासाठी प्रक्रिया केलेले बेदाणे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुतले जातात, यामुळे बेदाण्यात ओलावा निर्माण होऊन वरच्या भागाला तडे जाऊन किंवा जखम होऊन बेदाण्यातील विरघळणारी साखर पाण्यात मोठ्या प्रमाणात विरघळली जाते, व त्याचा गुणवत्तेवर परिणाम होतो. यासाठी पुन्हा बेदाणे वाळविणे सयुंक्तिक असते.

अन्न सुरक्षा नियमाप्रमाणे बेदाण्याची साठवण 70% पेक्षा जास्त आद्रतेमध्ये केल्यास सूक्ष्म

जंतूंची (बुरशी, ईस्ट) वाढ झपाट्याने होऊन बेदाणे लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच बेदाण्यामध्ये 20% पेक्षा जास्त आद्रता असल्याने ते खाण्यास योग्य राहत नाही, त्यासाठी कमी तापमानात (4 डिग्री ल) बेदाण्याची साठवण केल्यास उपयुक्त ठरेल. साठवणुकीच्या दरम्यान आद्रतेचे प्रमाण कमी झाल्याने बेदाणे चिकट, व टणक झाल्यामुळे खाण्याच्या तेलाची प्रक्रिया करणे महत्वाचे असून बेदाण्यावर तेलाचा पातळ थर दिल्याने आद्रता कमी होण्याच्या प्रमाणात घट होते. या प्रक्रियेमुळे खाण्यायोग्य, प्रदूषण विरहित, चवदार, पोषण मूल्यात वाढ आणि सूक्ष्मजीव विरहित बेदाणे निर्माण करणे शक्य झाले आहे.

 

  • भारतात द्राक्ष सुकविण्यासाठी प्रक्रिया खालील प्रमाणे केली जाते:

 

द्राक्ष काढणी (22 ब्रिक्स) पृष्ठभागातून ओलावा काढून टाकणे ग्रेडिंग: आकार आणि

रंग आधारित प्रतवार करणे

धूळ काढण्यासाठी स्वच्छ स्वच्छता आणि धुणे आवेष्टन (खाण्यायोग्य योग्य

पाण्याने गुच्छ धुणे पादार्थाची प्रत)

15 मी. ली. इथाईल द्राक्ष वाळवण ( द्राक्षाचा एक थर एक 4-6 0 से.

ओलिएट आणि ते दीड किलो प्रति चौ. फुट प्रमाणे तयार करणे तापमानावर साठवणूक

25 ग्राम पोटॅशिअम कार्बोनेट 14-16 % आद्रता असलेले द्राक्षाचे घड काढून टाकणे 

 

  • सेंद्रिय बेदाणे : अमर्यादित संधी

 

आज, ग्राहक आरोग्याबद्दल अधिक जागरूक आहेत आणि सुरक्षित आणि सेंद्रिय आहाराची मागणी करतात. सेंद्रिय मनुका उपलब्धता अधिक लोकांना पैसे देण्यासाठी आकर्षित करू शकते. जैविक पदार्थांसाठी स्वतंत्र बाजारपेठेत आहेत. सेंद्रीय द्राक्षाच्या उत्पादनासाठी अनुमती असलेल्या पद्धती स्वीकारल्या जाऊ शकतात आणि नैसर्गिक वाळवण प्रक्रिया करून सेंद्रीय मनुका तयार करण्यात मदत होईल. लहान शेतकरी गट पुढे येऊन सेंद्रीय मनुका उत्पादनासाठी स्थापित प्रक्रिया अवलंबू शकतात. यांची नवीन विभागामध्ये व्यापार करण्यास मदत होईल ज्या ठिकाणी संधी अमर्यादित आहेत.