बीट टोमॉटो चकली

डिजिटल बळीराजा-2    29-Dec-2020
|

fgh_1  H x W: 0

 

साहित्य: चकली भाजणी २ वाटी, तेलाचे मोहन पाव वाटी, बीट १, टोमॉटो २,
मीठ १ चमचा, हिंग पाव चमचा, लालतिखट १ चमचा, हळद पाव चमचा, ओवा अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, पांढरे तीळ १-२ चमचे, लागले तर पाणी, तळणी साठी तेल.

कृती:

१. बीट तुकडे थोडंसं पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक करून घेणे आणि गाळून रस काढून घेणे.
२. याप्रकारे टोमॉटोचा (पाणी न घालत) रस काढून गाळून घेणे.
३. भाजणी मध्ये मीठ, हिंग, हळद, लालतिखट, जिरे, ओवा, पांढरे तीळ घालून एकसारखे करा.
४. कडकडीत मोहन घाला आणि एकसारखे करा
५. बीट टोमटो रस घालून घट्टसर मळून घ्या.
६. थोडे थोडे मळलेले पीठ घेऊन, जरासा पाण्याचा हात लावून चकल्या करा.
७. मध्यम आचेवर तळून घ्या.