केवडा:
केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला दोन्ही छांटनीनंतर रोगट पालापाचोळा आणि काड्या एकत्र जमा करून बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकाव्यात. त्याचप्रमाणे झाडावरची साल काढून घ्यावी. त्यांनतर छांटनी झाल्यावर लगेच १-२ दिवसाच्या आत १ टक्का बोर्डोमिश्रण किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशक ३ ग्राम प्रतिलिटर या प्रमाणात घेऊन सर्व काड्या, ओलांडे आणि खोडावर फवारावे.
उत्तम निचरा असलेल्या जमिनीतच द्राक्ष बागेची लागवड करावी.
द्राक्ष्याच्या योग्य जातीची निवड करून शिफारसीत अंतरावर द्राक्षबागेची लागवड करावी. हवामानाचा अंदाज घेऊन योग्यवेळी छांटनी करावी.
द्राक्षपिकास लेबलक्लेम असलेली आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके केवडा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बागेच्या अवस्थेनुसार व पीएचआय विचारात घेऊन आवश्यकतेप्रमाणे शिफारसीत प्रमाणानुसार गरजेप्रमाणे फवारावे.
भुरी:
द्राक्षबागेची रोगासंबंधी नियमित सर्वेक्षण करावे.
बागेची स्वच्छता महत्वाची असते, तसेच एप्रिल व ऑक्टोबर छांटनीनंतर सर्व अवशेष एकत्र गोळा करून जाळून नष्ट करून टाकावेत.
द्राक्षवेलीवर एखाददुसरे अतिरोगग्रस्त आणि पूर्ण भुरकट झालेले पान आढळल्यास ते काढून घ्यावे, आणि नष्ट करून टाकावेत. म्हणजे पानांवरील बुरशीबीजे हवेमार्फत पसरणार नाहीत.
कॅनोपी व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे. बागेला भरपूर खेळती हवा व सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. फुटींची संख्या मर्यादित ठेवावी. तसेच फवारणीची कव्हरेज देखील भुरी रोग नियंत्रणास आवश्यक आहे.
द्राक्षपिकास लेबलक्लेम असलेली अंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके भुरी रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बागेच्या अवस्थेनुसार व पीएचआय विचारात घेऊन आवश्यकतेप्रमाणे शिफारसीत प्रमाणानुसार गरजेप्रमाणे फवारावे.
भुरी रोगाचे नियंत्रण करताना बागेच्या फुलोरा अवस्थेपासून फळधारणेपर्यंत व फळधारणा झाल्यानंतरची अवस्था विचारात घ्यावी. तसेच ट्राएझोल गटातील बुरशीनाशकामध्ये ५ ग्राम/लिटर नुसार पोट्यांशियम बायकार्बोनेट एकत्र करून फवारणीसाठी वापरल्यास चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते.
करपा:
रोगट फांद्या व फुट जाळून टाकावीत.
छांटनीची व गर्डलिंगची हत्यारे वापरताना ती निर्जंतुक करून घ्यावीत. (३ ग्राम ताम्रयुक्त बुरशीनाशक/ लिटर)
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बागेच्या अवस्थेनुसार व पीएचआय विचारात घेऊन आवश्यकतेप्रमाणे शिफारसीत प्रमाणानुसार गरजेप्रमाणे फवारणी करावी.