कडबा कुट्टीचे महत्व

डिजिटल बळीराजा-2    27-Dec-2020
|

dfgh_1  H x W:

बरेच शेतकरी हिरवा चारा ज्यामध्ये मक्का , नेपियर गवत जसे को-3, को-4 अशे, शेतातून कापणी केल्यानंतर जसेच्या तसे कुट्टी न करता जनावरांना खावू घालतात, असे केल्यास जनावरे फक्त लुशलुशीत पानांचा भाग खावून चावण्यास अवघड असलेला खोडाचा भाग तसाच न खाता सोडून देतात यामुळे कमीतकमी 30- 40% चारा वाया जातो.

पोषक पदार्थाचा विचार केल्यास पानाप्रमाणेच खोडामध्येपण जीवनसत्व असतात. अश्याच पद्धतीने वाळलेला चारा ज्यामध्ये प्रामुख्याने ज्वारीची / बाजरीची कडबी वापरली जाते ,ती जनावरांना देण्यापूर्वी कडबा कुट्टी मशीनमध्ये बारीक कात्रुन घ्यावे. त्यानंतरच जनावरांना खावू घालावे. यासाठी चार्‍याची नासाडी थांबविण्यासाठी व चारा पुर्णपणे उपयोगात आणण्यासाठी सदैव चारा कुट्टी करूनच जनावरांना खाण्यासाठी द्यावा.

हिरवा किंवा वाळलेला चारा 1-1.5 इंच कात्रून घ्यावा. चारा कुट्टी करण्यासाठी कोयत्याचा किंवा कडबा कुट्टी यंत्राचा वापर करावा. कडबाकुट्टी यंत्र विजेच्या मोटारीवर चालवून किंवा हाताने चरका फिरवूनपण चारा कुट्टी करू शकतो. एकदा का जनावरांना कुट्टी केलेला चारा आवडला तर नंतर ती तसलाच चारा खाण्यास उत्सुक असतात.अश्या कुट्टी केलेल्या चार्‍यात जनावरांना त्याच्या आवडीचा मऊ चार्‍याचा भाग वेचून खाता येणार नाही. त्या साठी सर्व दूधकार शेतकरी आपल्या जनावरांच्या संख्येनुसार कडबाकुट्टी मशीन निवडावी व दररोज वाळलेला तसेच हिरवा चारा कुट्टी करूनच द्यावा.