रवा मसाला डोनट

डिजिटल बळीराजा-2    26-Dec-2020
|


cvb_1  H x W: 0

लहान मुलांना, तरुणांना आणि वृद्धांनाही आवडणारा, झटपट होणारा, पटकन खाता येणारा आणि आरोग्यदायीही असणारा पदार्थ म्हणजे


साहित्य : १ वाटी रवा, कढीपत्ता, कोथिंबीर, दोन मिरच्या, भाजलेलं जिरं एक चमचा, अर्धा चमचा बडीशेप, आल्याचा छोटा तुकडा, चाट मसाला, हळद, एक उकडलेला बटाटा, मीठ, तेल, पाणी.

कृती : प्रथम कढईत रवा ५ मिनिटं भाजून घ्यावा. नंतर त्यात तीनपट पाणी घालून ते नीट मिसळावं. मग थोडं (१ चमचा) तेल घालावं. परत नीट मिसळून त्याला एक वाफ काढावी. दरम्यान दुसरीकडे उकडलेला बटाटा किसून घ्यावा. थंड झालेला रवा बाऊलमध्ये काढून त्यात किसलेला बटाटा, किसलेलं आलं, भाजलेलं जिरं, बडीशेप, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, चाट मसाला, मिरच्या चिरुन चवीनुसार मीठ सर्व एकत्र करून त्याचा छान गोळा करावा. या मोठ्या गोळ्याचे लहान लहान लिंबाएवढे गोळे करून ते गोल थापटून त्याला मध्ये भोक पाडून डोनटचा आकार द्यावा. नंतर हे डोनट गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. सॉस किंवा हिरवी चटणीसोबत खावयास द्यावेत. अतिशय रुचकर लागतात.