अळींबी लागवड..

डिजिटल बळीराजा-2    26-Dec-2020
|

bjj_1  H x W: 0

अळींबी हे नैसर्गिक अन्न असून तिची वा शेणखत, कुटाराने भरलेल्या ट्रेमध्ये किंवा प्लास्टिक पिशव्यांच्या आधारे केलेल्या बेडवर करता येते. भारतामध्ये आळींबीची लागवड यशस्वी उद्योग होऊ पहात आहे. धिंगरी अळंबी अल्प जागेत, कमी आर्थिक भांडवलात, अल्प साधनांतून उपलब्ध साधनांतून चांगला आर्थिक फायदा मिळवून देते.ळींबी उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी शास्त्रीय माहिती येणाऱ्या काळात सुरक्षित युवकांना वरदान ठरणार आहेत. आधुनिक पद्धतीने आळींबी ची लागवड केल्यास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. धिंगरी अळींबी मध्ये (मशरूम) अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म आहेत. यात विशिष्ट गुणांमुळे दररोज आहारात मशरूमच्या अंतर्भाव झाला आहे. ळींबी प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. ताज्या आळींबी मध्ये 3.6 % तर सुकवलेल्या प्रथिनांचे 36% असते.आळींबीतील प्रथिना मध्ये शरीर वाढीसाठी आवश्यक त्या सर्व अमोनो आम्लाचा समावेश असून ती भाजीपाल्यातील प्रथिनांनपेक्षा उच्च प्रतीची व पचनास हलकी असतात. याबरोबर जिवाणू, विषाणू व बुरशी प्रतिकारक असलेली प्रथिने आळींबी मध्ये असतात. आळींबीत थॉयमिन रिबोफ्लेवीन निकोटीन आम्ल कोलिक आम्ल सारखे जीवनसत्वे मिळत असतात. जीवनसत्व (बि-२) मुळे शर्करायुक्त पदार्थाचे सेवन ,पचन रक्तवाहिन्यांचे आकुंचन कमी होणे व लहान मुलाच्या मुलांच्या वरीवरी रोग निवारण्यास मदत होते. “क” जीवनसत्वामुळे लहान मुलांना स्कर्वी रोग नायसीन व पेटँथीनिक आम्लमुळे त्वचेचे रोग निवारण्यासाठी तसेच हाता-पायांच्या तळव्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते.

अळींबीच्या सेवनातून स्पुरद, पालाश, कॅल्शिअम, लोह व तांब यासारख्या खाजगी खनिजांचा पुरवठा होत असतो. यात स्निग्ध पदार्थ नाम मात्र असून लोनोलिक आम्ल जास्त तर कोलेस्ट्रॉल अजिबात नाही म्हणून हृदयरोग्यांकरिता उत्कृष्ट अन्न होऊ शकते. अळींबीमध्ये असलेल्या विविध औषधी ते गुणधर्मामुळे प्रामुख्याने लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, मधुमेह,कर्करोग, हृदयरोग, दमा, फुफ्फुसाचे रोग विषाणूजन्य तसेच जिवाणूजन्य रोग प्रतिबंध अगर उपचारास विशेष उपयोग होतो म्हणून आळंबीची हेल्थफूड असे म्हणतात. आपल्याकडे ज्या प्रमुख अळींबीची लागवड केली जाते. त्यात प्रामुख्याने धिंगरी आळींबी भाताचा पेंड्यावरील आळींबी आणि बटन आहेत. बटन आळींबीच्या लागवडीसाठी जास्त खर्च येतो. धिंगरी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा मिळवून देते. अळींबीच्या रंग,रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार विविध जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत. या जातीची लागवड उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर वर्षभर करता येते. आपल्याकडील वातावरणात परिणामकारक व फायदेशीर उत्पन्न देणाऱ्या क्लुरोटस सजोरकाजू, प्लू.सँपीडस यासारख्या प्रमुख जाती आहेत.

जागेची निवड :- अळींबीच्या उत्पादनासाठी उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल अशा पक्के किंवा कच्चे बांधकाम असलेली खोली किंवा रोड असावेत. या जागेत तीव्र व थेट सूर्यप्रकाश येणार नाही व हवा नेहमी खेळती राहील याची काळजी घ्यावी.

आळींबी उत्पादनासाठी साहित्य व माध्यम :- अळींबीच्या उत्पादनासाठी पिष्ठमय पदार्थ अधिक असणाऱ्या घटकांचा आवश्यकता असते. भाताचा पेंढा, गव्हाचे काड (कुटार), गव्हांडा, उसाचे पाचट, कापसाचे काड, सोयाबीन कुटार, वाळलेले गवत, शेतातील पिकांचे अवशेष कोणत्याही पिकाच्या वनस्पतीचा पालापाचोळा इत्यादी घटकांचा वापर करता येतो. ३० × ४५ सेंटिमीटर किंवा ४५ ×६० सेंटिमीटर आकाराच्या (१५० गेज) पॉलिथिन पिशव्यात तूर किंवा हरभरा, डाळीचे पीठ, आळींबीचे बी (स्पाँन) काड भिजवण्यासाठी टाकी, फार्मालीन, कार्बेन्डाझिम व लागवडीसाठी योग्य जागा स्प्रे पंप.

लागवडीसाठी वातावरण :-

आळींबीसाठी २० ते ३० डी. सेल्सिअस तापमान (अनुकूल २४ ते ३६ अंश सेल्सिअस) आणि ८० ते ८५ टक्के आद्रता व दररोज दोन ते तीन तास खेळती हवेची आवश्यकता असते. खोलीचे तापमान व आर्द्रता नियंत्रण करण्यासाठी जमिनीवर आजूबाजूला गोणपाटाचे आवरण लावून ते नेहमी ओले रहावे या करिता स्प्रे पंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी.

पेंडा प्रक्रिया :- वर्षभरपेक्षा जास्त जुना असलेला गव्हांडा, भात पेंडा किंवा ईतर पिकांचे काडाचे ४ ते ५ सेंटीमीटर लांबी चे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात १० तास बुडवून ठेवावेत. त्यानंतर पोते पाण्यातून काढून त्यातील जादा पाण्याचा निचरा करावा. आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी १०० लिटर पाण्याचा १०० ते १२५ मिली फार्मालीन आणि ७.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळावे. भिजलेल्या पेंड्यात पण ७० ते ७५ टक्के आद्रतेचे प्रमाण असावे.

दुसरे पद्धतीत पेंडा निर्जंतुकीकरण करण्यासाठी १२ ते १४ तास पाण्यात बुडून ओला करावा. त्यानंतर पोते बाहेर काढून त्यातील जास्तीचे पाणी निघून जाऊ द्यावे. त्यानंतर पोते ८० अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात ६० ते ९० मिनिटे बुडवून ठेवावे. या नंतर पोते बाहेर काढून जास्तीचे पाणी निथळून द्यावे. बॉयलरच्या साह्याने सुद्धा पेंड्याचे निर्जंतुकीकरण करता येते. या प्रक्रियेमध्ये बॉयलरच्या साह्याने पाण्याची वाफ तयार करण्यात येते. ही वाफ एका बंद खोलीत ओल्या केलेल्या काडामध्ये १ तास सोडली जाते. जास्तीची वाफ बाहेर जाण्यासाठी खोलीच्या वरील बाजूस एक व्हेंटिलेटर ठेवण्यात येते.अँटोक्लेव्हींग विजेवर किंवा गॅस वर असून चालणाऱ्या स्वयंचलित यंतत्रामध्ये पाण्याचे बाष्प तयार केले जाते. प्रकल्पाच्या क्षमतेनुसार विविध आकाराचे अँटोक्लेव्हीं उपलब्ध आहेत.

यामध्ये ओल्या काडाची पोती भरावीत पेंडाच्या काड्यांचे निर्जंतुकीकरण करण्याकरिता यामध्ये बाष्प १५.पौंड वाफेच्या दाबाला २० मिनिटे ठेवावे. त्यानंतर यंत्र बंद करून थंड होऊ द्यावे ही पद्धत थोडी खर्चिक आहे पण त्यामुळे काड पूर्णपणे निर्जंतुक होतात. त्यामुळे च्या वाढीच्या काळात हानीकारक जीवजंतू चा बेडवर प्रादुर्भाव होत नाही.

लागवड /बेड भरणे :- निवडलेल्या योग्य आकाराच्या प्लास्टिक पिशवीला मध्ये छिद्र पाडावेत यामुळे पिशवी पेंड्याने भरल्यानंतर आत हवा आणि तापमान याचा समतोल राखला जातो.

निर्जंतुकीकरण केलेल्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये थर पद्धतीने भरावे. पिशवीत पेंडा, कांड भरताना ८ ते १० सेंटिमीटर जाड थर भरून त्यावर अळिंबीचे (स्पॉन) पसरावे या पसरलेल्या बियांवर थोडे डाळीचे पीठ टाकावे. यांचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या २ टक्के असावेत. अशा पद्धतीने ४ ते ५ थर देऊन पिशवी ३/४ भरावी. थर भरताना तळहाताने काड थोडेसे दाबावे. पिशवी भरल्यानंतर दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे पेंड्यात आळिंबी बी मिसळावे प्रमाण २०० ग्रॅम प्रति १० किलो ओल्या पेंडा असे असावे. (२% )पिशवीच्या पृष्ठभागावर २० ते २५ ठिकाणी छोट्या खेळणे किंवा दाबनाने छिद्र पाडावेत. व या पिशवीच्या मांडणीवर स्वच्छ व बंदिस्त ठिकाणी ठेवाव्यात.

बुरशीची वाढ:- निर्जंतुक केलेल्या काडाने व स्पॉनने भरलेल्या पिशव्या लागवडीच्या खोलीत ठेवून २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान ८० ते ८५ टक्के आर्द्रता निर्माण करावी. बुरशीची पांढरट वाढ सर्व पृष्ठभागावर दिसून आल्यावर प्लास्टिकची पिशवी काढून टाकावी. साधारणतः १५ दिवस पेंडामध्ये बुरशीची पांढरट वाढ झालेली दिसते. बुरशीच्या तंतुमय वाडीने पेंडा घट्ट झालेला दिसतो यालाच बेड असे म्हणतात .

धिंगरी आळिंबीचे शत्रू :- धिंगरी आळिंबीवर रोगांचा व किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळला नाही. परंतु याच्या वाढीकरिता वापरण्यात येणाऱ्या पिकांचे काड/ भुसा पिकांचे अवशेष पावसात भिजल्यामुळे पाण्यात ओले झाल्यामुळे त्यावर निसर्गतः इतर बुरशींची वाढ होते त्याकरिता अशा काड्यांचा उपयोग धिंगरी आळिंबी लागवडीकरिता केल्यास व काड माध्यम निर्जंतुकीकरण प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यास बेडमध्ये काडा वरील इतर बुरशी अळिंबीच्या बुरशीशि अन्नद्रव्याकरिता स्पर्धा करतात. या बुरशीच्या रंग हिरवा आणि काळसर असतो बाहेरील वातावरणापेक्षा काडाच्या बेडचे तापमान व दमटपणा जास्त असल्यामुळे या बुरशी वाढतात आळिंबीच्या बेडवर ट्रायकोडमी, म्युकर, पेनिसिलियम, स्कलेरोशिम, अँस्पर्जीलस इत्यादी बुरशीची वाढ दिसून येते. या बुर्शींचि वाढ बेडवर झाल्यास आळींबिचे पिक उत्पादन येत नाही.इतर बुरशींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी माध्यमात वापरण्यात येणाऱ्या काडाचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून प्रादुर्भाव टाळता येतो.धिंगरी आळींबि बेडवर किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व प्रादुर्भाव आढळल्यास ०.०२ % किंवा २ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून याची बेडवर फवारणी करावी. ही फवारणी शक्‍यतो आळंबीची काढणी झाल्यानंतर करावी. आळिंबी लागवडीच्या प्रत्येक कामात काटेकोरपणे स्वच्छता ठेवणे ही रोग व किडींना दूर ठेवण्याची गुरुकिल्ली समजावी.

पिक निगा:- आळंबीचे पिशवी काढलेले बेड मांडणीवर योग्य अंतरावर ठेवावेत. बेडवर दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. खोलीमध्ये जमीन व भिंतीवर पाणी फवारून तापमान व हवेतील आर्द्रता नियंत्रित करावे. दररोज २ ते ३ तास खोलीत ताजी हवा खेळवावी. साधारणता ८ दिवस पेंडाच्या बेडच्या सर्व बाजूने लहान-लहान आळींबीची कोंब निघतात ना दिसते. पुढील ३ ते ४ दिवसात त्याची झपाट्याने वाढ होऊन आळंबी काढण्यास तयार होते विकसित आळंबीचे कडा वाकण्यापूर्वी पिळ देऊन किंवा धारदार चाकूने कापून काढावीत. लहान-मोठी सर्व आळिंबी एकाच वेळी काढून घ्यावी. पहिली काढणी पिशवी भरल्यापासून २० ते २५ दिवसात करावी काढणीपूर्वी अळंबी वर १ दिवस आगोदर पाणी फवारू नये. यामुळे आळंबीची कोरडी व तजेलदार राहते.

उत्पादन:- हिले पीक निघाल्यानंतर संपूर्ण पेंड्या वरील साधारणता एक सेंटिमीटर थर खरडून घ्यावा. त्यावर आवश्‍यकतेनुसार २ ते ३ वेळा पाणी फवारावे. त्यानंतर ८ ते १० दिवसात दुसरे पीक येते. पीक ३ ते ४ काढणीत पूर्ण होते. पहिल्या पिक काढणीचे पिक नेहमी जास्त असते. साधारणपणे ३ किलो ओल्या काडाच्या पेंड्याच्या (१ किलो वाढलेले) एका बेडपासून ५० ते ६० दिवसात १ किलोपर्यंत ताज्या ओल्या अळिंबीचे उत्पादन मिळते.

साठवणूक:- ताजी आळींबीचे पालेभाजी प्रमाणे अल्पकाळ टिकणारे व नाशवंत आहे. ताजी अळंबी छिद्र असलेल्या प्लास्टिक पिशवी मधून विकाव्या. छिद्र पडलेल्या प्लास्टिक पिशवी मध्ये १ दिवस राहू शकतात फ्रिजमध्ये ३ ते ५ दिवस ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमानावर राहू शकतात. ताज्या अळींबीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे आळींबी कडक उन्हात वाळवून त्याची साठवणूक करता येते. आळींबीची साठवणूक २५ अंश सेल्सिअस तापमान हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ५० % चे खाली व मोकळी व खेळती हवा, वाहता वारा यामुळे लवकर होते. मेकँनिकल डीहायड्रेटरचा वापर करून, सोलर ड्रायरचा वापर करून आळींबी उन्हामध्ये २-३दिवसांत पुर्णपणे वाळते.

अळिंबी लागवड करताना काय करावे आणि काय करू नये:- अळिंबीचे बेड तयार करताना काडाचे निर्जंतुकीकरण व्यवस्थित करावे. काडाचे बेड जास्त ओले किंवा कोरडे वापरू नये. कोरडे झाल्यास त्यावर थोडे पाणी शिंपडावे जास्त ओली असल्यास पाण्याचा निचरा होऊ द्यावा आळींबी चे बीज खात्रीलायक ठिकाणावरूनच खरेदी करावे. नेहमी उत्तम प्रतीचे दर्जेदार स्पाँन वापरावे दूषित स्पाँन लागवडीकरिता अजिबात वापरू नये. अळींबी उत्पादन खोलीत आद्रता तापमान आवश्‍यक तेवढेच राखण्यास प्राधान्य द्यावे. कोरडे हवामान असल्यास ओले गोणपाट आळींबीच्या सभोवताल बांधून त्यावर पाणी शिंपडावे. खोलीचे तापमान कमी करण्यासाठी जमिनीवर व बाजूच्या भिंतीवर पाणी फवारावे.( दिवसातून ३ ते ४ वेळा) बेडवर दिवसातून २ ते ३ वेळा पाणी फवारावे. तोडणी अगोदर पाणी फवारू नये .अळींबीची तोडणी स्वच्छ हाताने किंवा धारदार चाकूने करावी. अळींबीच्या खोलीत प्रवेश करताना चपला जोडे बाहेर काढून ठेवावीत. खोलीत वापरण्यास वेगळी चप्पल ठेवावी. खोलीत खेळती हवा राहण्यासाठी खोलीच्या खालच्या बाजूस व वरच्या बाजूस एक झरोके ठेवावे या झरोक्यावर ५० ते ६० मेशचि तारेची/ प्लॅस्टिकची जाळी बसवावी, यामुळे फोरीड किंवा स्कायरीड माशी खोलीत शिरणार नाही.

-- आशुतोष सुरेंद्र चिंचोळकर (९१४६९६६२२२)

-- सचिन भा.सेलगावकर (९३७३५७८७७४)