शेडनेट मधील भाजीपालावरील महत्वाच्या किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण

डिजिटल बळीराजा-2    26-Dec-2020
|

vff_1  H x W: 0

महत्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रणः

शेडनेट मध्ये भाजी पिकावर अनेक कीडीचा उपद्रव दिसुन येतो. त्याचा वेळेवर बंदोबस्त केला नाही, तर पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते.

) मावाः या किडीच्या नियंत्रणासाठी मॅलीथिऑन (.%) द्रावणाची फवारणी करावी.

) पांढरी माशीः या किडीच्या नियंत्रणासाठी १० लि पाण्यात २० मिली डायमेथोएट (३०%) प्रवाही किंवा २० मिली क्विनॉलफॉस (२० %) प्रवाही मिसळुन फवारणी करावी. पिकाची काढणी झालयावर पिकाचे सर्व अवशेष नष्ट करावेत किंवा जाळुन टाकावेत.

) फुलकिडेः या किडीचा प्रादुर्भाव दिसताच पानावरील फुलकिडयांच्या नियंत्रणासाठी १० लि. पाण्यात मीली सायपरमेथ्रीन (२५% प्रवाही) मिसळुन फवारणी करावी.

) पाने कुरतडनारी अळी फळे पोखरणारी अळीः या किडीच्या नियंत्रणासाठी कार्बारील २५ ग्रॅम १० ली. पाण्यात मिसळुन -१० दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

महत्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रणः

) मर रोगः हा प्रामुख्याने रोपवाटीकेत रोपांवर येणारा रोग आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम या औषधाने बीजप्रक्रीया करावी ( ग्रॅम/ किलो बियाणे या प्रमाणे) किंवा कॉपर ऑक्सिक्लोरीडी ३० ग्रॅम १० ली. पाण्यात मिसळुन हे द्रावण रोपांच्या ओळीमध्ये विळयाने रेषा पाडुन मुळाजवळ ओतावे.

) भुरी रोगः या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लि. पाण्यात २० ग्रॅम गंधक (वेटेबल सल्फर) मिसळुन फवारावे.

) पानांचा करपा आणि पानावरील ठिपकेः या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लि. पाण्यात ३० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोरीडी किंवा २० ग्रॅम मॅन्कोझेब या प्रमाणात फवारणी करावी.

) बोकडयाः ढोबळी मिरची टोमॅटोवर येणारा अत्यंत महत्वाचा रोग आहे. या रोगाचा प्रसार पांढ-या माशीमुळे होतो. यामध्ये पानाचा आकार अतिलहान होऊन फांदयाची संख्या वाढते. रोगग्रस्त झाडावर फुले अजीबात लागत नाहीत. उपायः रोपवाटीकेत आणि शेडनेट मधील पीकावर १५ दिवसांच्या अंतराने आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करावी.