कांदा प्रक्रिया

डिजिटल बळीराजा-2    12-Dec-2020
|
   कांदा है भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे खरीप व रब्बी हंगामांत पिकवले जाते.जागतिक भाजीपाला उत्पादनामध्ये कांदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये कांद्याचे प्रमाण ६ टक्के आहे. कांदा सुद्धा नाशवंत पदार्थ आहे, पण भारतीय कांद्याचे काही वैशिष्टणय आहेत. अधिक तिखटपणा, अधिक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट यामुछे भारतीय कांद्याचे  पोषणमूल्ये अधिक आहेत. स्वादिष्ट चवीसोबत कांद्यामध्ये असलेला विशिष्ट झणझणीतपणामुल्ठे, कांदा विविध पदार्थ व औषधी गुणधर्मांसाठी वापरला जातो. कांद्यामधील घटक मोतीबिंदू, मूत्राशय, मुछव्याध, रक्तस्राव, कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्या संदर्भातील आजार यासाठी उपयुक्त आहेत. फ्लुईडाइज्ड बेड ड्रायिंग, व्हेक्युम मायक्रोवेव्ह ड्रायिंग, सोलार ड्रायिंग इ. तंत्राच्या मदतीने हवेचा वेग व तापमान नियंत्रित करून कांद्याचे मूल्यवर्धन केले जाते. कांद्याचे विविध प्रकारे मूल्यवर्धन करून नेहमी पेक्षा अधिक नफा शेतकरी मित्ठवू शकतील. कांद्याच्या दरावर अधिक उत्पादन, शासनाचे निर्यात धोरण इ. चा परिणाम होतो. त्यामुक्ठे कांद्याचे दर काही वेब्ठा चढे तर काही वेव्ठा अत्यंत कमी होतात. अशा वेल्स शेतकय्याने कमी बाजार भावात कांद्याचे विपणन टाछलले पाहिजे आणि आपल्या उत्पादनावर कमी अधिक प्रमाणात प्रक्रिया करून शेतीमाल विकला पाहिजे. प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित कांद्याचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढत आहे.
   कांदा निर्जलीकरणापासून विविध पदार्थ तयार करता येतात. जसे कांदा चकत्या, कांदा ग्रेव्ही,कांदा पावडर यासारखे पदार्थ तयार करता येतात. या पदार्थाना परदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कांद्यापासून तयार केलेल्या या पदार्थांची चवही कांद्याप्रमाणेच असल्यामु्ठे इतर खाद्य पदार्थामध्ये त्याचा वापर करणे सोपे जाते. कांद्यापासून जे विविध उपपदार्थ तयार केले जातात, त्यात प्रामुख्याने कांदा तेल, कांदा ज्यूस, कांदा चकत्या व पावडर, कांद्याचे लोणचे यासारखे पदार्थ तयार केले जातात.कांद्यापासून तयार केले जाणारे तेल, पेय, आईस्क्रीम, चॉकलेट, लोणचे, इत्यादी पदार्थामध्ये वापरतात. तर जगातील अनेक देशांमध्ये कांद्याचे लोणचे आवडीने खाल्ले जाते. जपानमध्ये कांदा हा ब्राइन  द्रावणामध्ये भिजवून नंतर गोड लोणच्यासाठी साखर व व्हीनेगरमध्ये बुडवून तर खारट लोणच्यासाठी  मीठ व व्हीनेगरच्या द्रावणात बुडवून हे लोणचे तयार केले जाते.
 
कांद्याचे निर्जलीकरण

नज._1  H x W: 0 
या प्रक्रियेदरम्यान कांद्यातील मुक्त पाणी बाष्पाच्या स्वरूपात काढले जाते. कांद्याचे सूक्ष्मजीवांपासून संरक्षण व्हावे यासाठी प्रक्रिया केली जाते. निर्जलित कांदे हवाबंद केनमध्ये निर्यात केले जातात. योग्य वेष्टन व साठवणूक तापमान असल्यास ६ ते १२ महिने हे कांदे टिकतात. निर्जलित कांद्यांना युरोप बाजारपेठेत प्रमुख मागणी आहे.
- निर्जलित कांद्याच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. निर्जलीकरण करण्यासाठी शक्यतो पांढरा व अधिक टी.एस.एस. असलेला कांदा वापरला जातो. उदा. बॉम्बे व्हाइट, पुसा व्हाइट. लाल कांद्याच्या प्रजातीमध्ये उदयपूर-१०१, पंजाब रेड इ.
- कांदा निर्जलीकरणासाठी कांद्याचा शेंडा व टोकाकडील भाग कापून साल काढून ४ ते ८ मि.मी.जाडीच्या चकत्या करतात.
-या चकत्या मिठाच्या द्रावणात २ तास भिजत ठेवून ५५-६० अंश सेल्शिअस तापमान असणान्या फ्ल्यूडाईज्ड बेड ज्रायरमध्ये ११-१३ तासांसाठी ठेवतात. या तापमानाला कांद्यातील आम्ल व साखर तीव्र स्वरूपात एकवटून सूक्ष्मजीवांपासून संरक्षित केले जाते.
 
-प्रक्रियायुक्त मालाचा उच्च दर्जा टिकविण्यासाठी तो हवाबंद डब्यात किंवा प्लास्टीक पिशव्यांमध्ये पॅक करतात.
 
- कांदा निर्जलीकरण केल्यास अनेक फायदे होतात. त्यात प्रामुख्याने सुकविलेल्या कांद्याचा वाहतूक खर्च तुलनेने कमी येतो.तसेच निर्जलीकरण केलेल्या कांद्याचे नुकसान होत नाही.परकीय देशांमध्ये कांदा चकत्या व पावडर यांचा उपयोग मांसाच्या हवाबंद पदार्थामध्ये, सॉस,सूप, चिली यासारख्या पदार्थामध्ये करतात.
कांदा ग्रेव्ही:

नज.म._1  H x W: 
साहित्य: कांदा: १ किलो, काल्ठीमिरी: ५ ग्रेंम, लवंग: ५ ग्रेंम, दालचिनी: ५ ग्रेंम, तेजपत्ता: १० ग्रेंम, तेल:५० ग्रेम, पाणी: ७५० ग्रेंम.
प्रक्रिया:
१. सपाट तवा किंवा कढईत कांद्याचे काप करून भाजून घ्यावे.
 
२. भाजलेल्या कांद्याची ग्राइंडर मध्ये पेस्ट बनवावी.
३. कढईत तेल तापवून त्यात काब्ठीमिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता टाकावा आणि त्यात कांद्याची पेस्ट परतवून घ्यावी.
४. या तयार ग्रेव्ही मध्ये ७५० मिली मिक्स करून १०-१५ मिनिटे साठी संथ अग्नीवर उकळून द्यावे.
 
५. गरम ग्रेव्ही १ किलो किंवा ५ किलोच्या प्याक साईझ मध्ये पेंक करावे.
 
६. ग्रेव्हीला हॉटेल्स, रेस्टॉरंटस, ढाबे अशा ठिकाणी प्रचंड मागणी आहे.
वाळलेला कांदा / पावडर:
 

नज.म.ज._1  H x
प्रक्रिया:
१. कांद्याचे सुमारे ५-६ मिलिमीटर जाडीचे काप करावेत.
२... काप केले ले कांदे ट्रे ड्रायर मध्ये ५५ अंश सेल्सिअस तापमानाला १४ तासापर्यत वाळवावा.
 
३. आशा प्रकारे निर्जलीकरण केलेल्या कांद्याला अधिक काक टिकवता येते.
४. वाब्ठवलेल्या कांद्याची ग्राईंडरच्या साहाय्याने पावडर करावी.
५. या पावडरला चाढणीने गाढ्बून हवाबंद पेंकेटस मध्ये पक करावे.
६. कांदा पावडर मुक्ठे शेतकन्यांना खूप नफा मिछवणे शक्य होईल.

तेल :
 
कांद्यापासून तेलसुद्धा तयार करता येते. प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो. काही उत्पादनांमध्ये प्रिझवेटिव्ह (संरक्षक) म्हणूनही त्याचा वापर केला
जातो...
 
 
सिरका / वाइन / सॉस :
कांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुके त्यांच्यावर प्रक्रिया करून व्हिनेगर (सिरका), सॉस आणि वाइन आदींची निर्मिती करता येते...
कांद्याच्या टाकाऊ भागावरील प्रक्रिया :
- कांद्याच्या घरगुती आणि औद्योगिक वापरातून उरलेला कचरा देखील प्रक्रिया करून वापरता येऊ शकतो.
- कांदा सालीतून रंग मित्ठवता येतात. ते नैसर्गिक रंग म्हणून वापरले जातात. रंग काढून उरलेला भाग फायबरचा चांगला स्रोत आहे.
- कांद्याच्या कोरड्या सालीमध्ये फ्लेवोनॉइड घटक असतात. त्यापासून स्वाद आणणारे घटक तयार करता येतात. कांद्याचा बाहेरील थर, मुह आणि पात यांचा बायो-गेसमध्ये पर्यायी ऊर्जा स्रोत निर्माण करण्यासाठी उपयोग करता येतो.