आरोग्यदाई गुलकंद बनवा घरच्या घरी

डिजिटल बळीराजा-2    11-Dec-2020
|
आरोग्यदायी गुलकंद बनवा घरच्याघरी
   आयुर्वेदात अनेक वनस्पतीबद्दल, झाड पाल्याबद्दलची माहिती आपल्याला पहायला मिळते.प्रत्येक ऋतूमध्ये त्या वनस्पतींचा कसा उपयोग करावा याची माहिती दिलेली आहे. आज आपण अश्याच एका आपल्या जवळच्या वनस्पतीची (झाडाची) आपल्या आरोग्यासाठी कसा उपयोग होतो ते पाहणार आहोत.
   गुलकंद हा गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यापासून बनलेली अतिशय उपयुक्त असा पदार्थ आहे. गुलकंदाचे सेवन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. आयुर्वेदिक महत्व असणारा गुलकंद खूप  मोठ्या प्रमाणावर केल्यास उत्तम जोडधंदा बनू शकतो. आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलाबाच्या फुलाच्या पकाळ्यापासून तयार केला जाणार गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र आरोग्यासाठीही त्याचे फायदे होतात. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते.
   गुलकंद बनवण्यासाठी लागणारे साहित्य
 
   गुलाबच्या पाकळ्या - २०० ग्रॅम
   साखर- १०० ग्रॅम / खडी साखर (चवीनुसार)
   छोटी वेलची- १ टीस्पून
   बडिशेप - १ टीस्पून
गुलकंद बनविण्याची कृती
-गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल गुलाबांचा वापर करावा. जेणेकरून गुलकंदाला रंग आणि चांगला सुगंध येईन. (देशी गुलाबाच्या तुलनेत विदेशी गुलाबांना सुगंध नसतो.) -गुलाबाची फुले घेऊन त्यांच्या निरोगी पाकळ्या वेगळ्या कराव्यात. गुलाबाच्या पाकळ्या धुवून काचेच्या भांड्यात ठेवाव्यात.
 
-पाकळ्यांचे बारीक तुकडे करावे. एक काचेची बरणी घेऊन त्यामध्ये एक थर पाकळ्या व एक थर साखर/ खडीसाखर असं काचेच्या बरणीमध्ये भरावे.  -त्यानंतर इतर सर्व साहित्या यात मिसळून झाकण लावून ४ ते ५ दिवस उन्हात ठेवावी. मध्ये मध्ये हे मिश्रण हलवत राहावे. उन्हामुळे साखरेचे पाणी होईल व त्या पाण्यात पाकळ्या चांगल्या मुरतील.
 
-जेव्हा गुलाबाच्या पाकळ्या मऊ झाल्यात असे दिसेल तर गुलकंद २१ ते २५ दिवसांमध्ये खाण्यासाठी तयार झालेला असेल.
(गुलकंद तयार झाल्यावर कुठलाही सुकामेवा म्हणजेच बदाम, अक्रोड, काजू, शेंगदाणे यांचे तुकडे त्यात टाकु शकतो.)
 
 
nm_1  H x W: 0
 
गुलकंद खाण्याचे फायदे:
गुलकंद आणि दुध अशा दोन्हीही आरोग्यदायी गोष्टींच्या संयुक्‍त सेवनाने खूप फायदे बघायला भेटतात ते खालील प्रमाणे.
 

gulkand_1  H x  
अल्सर आणि सूज यावर उपाय:
-गुलकंदाचे सेवन केल्याने पित्त प्रकोप होत नाही. पोटातील उष्णता कमी करण्याचे काम गुलकंद करतो. 
-गुलकंदामुळे आतड्याचा अल्सर तसेच सूज यावर उपचार करून त्वरित आराम मिळतो.
-अल्सरची समस्या ब-याचदा पोट व्यवस्थित साफ न झाल्याने उद्भवते. गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बी चे जास्तीत जास्त स्त्रोत आढळून येतात.
-वैज्ञानिकदृष्ट्या व्हिटॅमिन बी हे अल्सरवर सर्वात जास्त प्रभावी औषध मानले जाते. तर अशाप्रकारे घरच्या घरी बनवलेल्या गुलकंदापासून तुम्ही तोंडात झालेल्या जखमा, अल्सर किंवा फोड बरे करु शकता.
 पचन क्रिया सुधारते:
-गुलकंदामुळे यकृताची ताकद वाढते. तसेच भूक आणि पचन सुधारण्यासही मदत होते.
-पोटाचे विकार, समस्या कमी होतात.
-आयुर्वेदात पित्तदोषामुळे उत्पन्न होणाऱ्या सर्व विकारांच्या उपचारासाठी गुलकंद सेवन करण्यास सांगितले जाते.
 
डोळ्यांसाठी :
- सध्याच्या काळात सतत संगणक, लॅपटॉप, मोबाईल समोर बसून असल्याने डोळ्यांची निगा म्हणावी तशी राखता येत नाही. पण डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गुलकंद फारच लाभदायक असतो.
- वैज्ञानिक अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की गुलकंद खाल्ल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत मिळते.
-गुलकंद आपल्याला डोळ्यांच्या इतर गंभीर आजारांपासून दूर ठेवण्यास मोलाची मदत करतो.
- दुधात व्हिटॅमिन अ असल्यामुळे त्याच्यासोबत गुलकंदाचे सेवन केल्याने अनेक प्रभावी फायदे आपल्या आरोग्यात दिसून येतात.
 
 त्वचेसाठी उपयुक्‍त :
-डाग दूर होण्यास मदत होते. चेहऱ्याची सूज आणि डोळे लाल होणे कमी होते.
-तोंड आल्यास गुलकंदाचे सेवन करावे. तसेच हिरड्या सुजल्यास यावरही गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरते.
-दररोज गुलकंद खाल्ल्याने त्वचा उजळते. र्क्त शुद्ध होतेम त्यामुळे ब्लॅकहेड्स,पिपल्सच्या समस्या दूर होतात.
 
 लठ्ठपणा दूर ठेवण्यासाठी : 
 
- लडठपणामुळे त्रस्त असलेले लोक विविध खाद्यपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करुन वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात.
 
- पोटाचे आरोग्य ठीक नसेल तर आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. योग्यरित्या पचनक्रिया न झाल्याने लोकांना बद्वकोष्ठते सारख्या त्रासांना सामोरे जावे लागते.
-. बद्यकोष्ठता दूर करण्यासाठी मॅग्नेशियम पोषक तत्वांची आवश्यकता असते जे की गुलकंदमध्ये असतात. त्यामुळे या दोन्ही समस्यांवर नियंत्रण मिळवायचं असल्यास तुम्ही दररोज दुधात गुलकंद टाकून त्याचे सेवन करू शकता.
 
 मासिक पाळीमध्ये प्रभावी :
- ज्या स्त्रियांना पाळीच्या काळात अतिरक्तस्त्राव होतो तसेच ल्युकोरिया सारख्या समस्या उद्‌भवतात त्यावर गुलकंद उपयुक्‍त आहे.
 
शरीराला फायदेशीर/ उष्णता कमी करते:
- शरीराला एनर्जी देणारे हे टॉनिक आहे. गुलकंदाच्या सेवनाने शरीर ताजेतवाने राहते. तसेच गारवा मिळतो.
- उन्हामुळे येणारा थकवा; आळस, शरीरातील जळजळ दूर होते.
- उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्‍त येते. यातून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी दोन चमचे गुलकंद खावा.
-याच्या सेवनाने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर होतो.
 
- गुलकंदामुळे सतत लघवीचा त्रास होत असेल तर तो कमी होतो.
- गुलकंद सेवन केल्याने थकवा, सुस्तपणा, खाज तसेच अंगदुखी आणि ज्वलनामुळे होणाऱ्या आजारांमध्ये आराम पडतो.
 
गरोदर महिलांना उपयोगी:
 
- गरोदर महिलांसाठी याचे सेवन खूपच फायदेशीर ठरते.
-गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गुलकंद खाण्याने फायदा होतो.
 
स्मरणशक्तीसाठी उपयोगी:
-ज्यांना सतत विसरण्याची सवय असते त्यांनी दररोज दुधासोबत एक चमचा गुलकंद खावे. यामुळे मेंदूचे कार्य जलद होते.
-त्याचे नियमित सेवन आरोग्यदायी ठरू शकते त्याचबरोबर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो.
- दुधात गुलकंद मिसळून त्याचे सेवन केल्याने स्मरणशक्‍तीसाठी होणारे लाभ खूपच असतात.
- गुलकंदात असणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म स्मरणशक्‍ती मजबूत बनवण्यात सकारात्मकतेने प्रभावी ठरतात.
- गुलकंद थंड असल्यामुळे ते तुम्हाला डोकं शांत ठेवण्यासही लाभदायक ठरतं.
 ताणतणावापासून दूर राहण्यासाठी :
- ताणतणावामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता खूप जास्त पटीने कमी होते.
-त्यामुळेच कितीतरी भयंकर आजारांच्या संक्रमणाच्या जाळ्यात आपण सहज ओढले जातो.
- गुलकंदमिश्रित दुधाचे सेवन केल्याने आपण ताणतणावाच्या समस्येपासून दूर राहतो. त्यामुळ दररोज रात्री गुलकंद घातलेल्या दुधाचे सेवन केले पाहिजे.
लेखक:
प्रा. नारायण जी. जाधव व प्रा. प्रणिता पी. सहाणे
सा. प्राध्यापक, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय,
गुंजाळवाडी पठार, संगमनेर
फोन नं.- 9561651551