ऊस उत्पादनवाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर ठरणार फायदेशीर

डिजिटल बळीराजा-2    08-Nov-2020
|

us_1  H x W: 0
  
ऊस पिकाच्या जाेमदार वाढीसाठी पीकपाेषक अन्नद्रव्यांचा पुरवठा याेग्य प्रमाणात हाेणे महत्त्वाचे आहे. सध्याची पीक जाेपासना लक्षात घेतली, तर आवश्यक 16 अन्नद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या वापरासंबंधी जितकी काळजी घेतली जाते, तितकी काळजी कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्ययुक्त आणि लाेह, जस्त, मॅगेनीज, तांबे, बाेराॅन, मॅालिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतवापराबाबत घेतली जात नाही. महाराष्ट्रातील उसाखालील जमिनीत विशेषत: चुनखडीयुक्त जमिनीत जस्त आणि लाेह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची माेठ्या प्रमाणात कमतरता दिसून येते आणि अशा ठिकाणी उसावर केवडा पडलेला दिसून येताे. सर्वसाधारणपणे सूक्ष्म अन्नद्रव्यांची ऊसपिकावरील कमतरता लक्षणे लक्षात घेता नेमके काेणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे, हे पीकनिरीक्षणावरून ठाम ओळखणे अवघड जाते किंवा काही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता लक्षणांतील काही बाबी समान असल्यामुळे कमतरतेचा अंदाज करण्यात संभ्रम निर्माण हाेताे. जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मर्यादा पातळीच्या खाली गेल्यास पानांतील आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी हाेते आणि पिकावर कमतरता लक्षणे दिसून येतात. याचा परिणाम ऊस पीक वाढीवर आणि पर्यायाने ऊस उत्पादनावर हाेताे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न केल्याने हाेणारे प्रतिकूल परिणाम ताबडताेब दृश्यस्वरूपात नसतात. मात्र त्यांची कमतरता खूपच नुकसानकारक ठरू शकते. या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपस्थितीत पिके नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करतात. म्हणजेच एखादे अन्नद्रव्य हे दुसऱ्या अन्नद्रव्याची जागा घेऊ शकत नाही. वसंतदादा साखर संस्थेत झालेल्या मॄदसर्वेक्षण अहवालानुसार साधारण 70 टक्के जमिनीत जस्त, तर 30 टक्के जमिनीत लाेह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आली आहे.
 
सूक्ष्म अन्नद्रव्यांची ऊसपिकातील कार्ये आणि कमतरतेची लक्षणे
 
लाेह- कार्ये
· हरितद्रव्ये तयार करण्यासाठी उपयुक्त आहे
· पानांचा गडद हिरवा रंग बनविण्यास मदत करताे
· इतर मूलद्रव्यांच्या शाेषणात मदत करताे.
· झाडांच्या वाढीस व प्रजननास आवश्यक आहे
 
कमतरता लक्षणे
· नवीन पाने पिवळी दिसतात व शिरा हिरव्या दिसतात.
· लक्षणे प्रथमत: वरील भागातील पानांवर आढळून येतात.
· पाने पांढुरकी हाेऊन शेवटी वाळून जातात.
 
जस्त : कार्ये
· प्रथिने व वितंचके (एन्झाईम) निर्मितीस आवश्यक घटक आहे.
· पिकांच्या वाढ करणाऱ्या प्रेरकांच्या (ऑ्निसजन) वाढीसाठी आवश्यक
· वनस्पतीमध्ये इन्डाेल अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड (आएए) तयार हाेण्यासाठी ट्रिव्हाेफेनच्या निर्मितीची आवश्यकता असते व त्यासाठी जस्त आवश्यक असते.
· संप्रेरक द्रव्ये (हार्माेन्स) तयार हाेण्यास मदत करताे. प्रजनन क्रियेमध्ये आवश्यक आहे
 
कमतरता लक्षणे
· पानांत हरितद्रव्यांचा अभाव दिसू लागताे, शिरा हिरव्याच राहतात.
· करपलेले ठिपके व तांबडे डाग पानांच्या शिरा, कडा व टाेके यावर तसेच सर्व पानांवर विखुरलेल्या स्वरूपात दिसतात.
· उसामध्ये कांड्या आखूड पडतात
 
मॅगेनीज : कार्ये
· प्रकाशसंश्लेषण प्रकियेत मदत करताे.
· जैविकदृष्ट्या कार्यप्रवण असलेल्या पेशिजालामध्ये इतर भागापेक्षा जास्त प्रमाणात आढळताे.
 
कमतरता लक्षणे
· पानांत हरितद्रव्याचा अभाव असताे
· मुख्य व लहान शिरा गडद किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात, त्यामुळे पानांवर चाैकटीदार नक्षी दिसू लागते.
 
तांबे : कार्ये
· इतर सूक्ष्म द्रव्यांप्रमाणेच वनस्पतीना तांब्याची गरज फारच अल्प प्रमाणात आहे.
· तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त उपलब्ध झाल्यास अपायकारक ठरते.
· हरितद्रव्ये व प्रथिने तयार हाेण्यासाठी मदत करताे.
· लाेहाचा उपयाेग याेग्य प्रकारे हाेण्यासाठी मदत करताे.
· श्वसनक्रियेचे नियमन करण्यासाठी आवश्यक आहे. 
 
कमतरता लक्षणे
· पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात.
· वनस्पतीचे खाेड मऊ व लवचिक बनते.
· फुटव्यांची संख्या कमी हाेते.
· पानांवर हिरवे ठिपके दिसतात.
 
बाेराॅन : कार्ये
· कॅल्शियम विद्राव्य स्थितीत राहण्यास व त्याचे स्थलांतर हाेण्यास मदत करताे.
· नत्राचे शाेषण करण्यास मदत करताे.
· पेशी आवरणाचा घटक असून पेशी विभाजनास मदत करताे.
· पेशीमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त असलेल्या धनदलांचे क्षपण घडवून आणताे.
· आवश्यकतेनुसार साखरेचे स्थलांतर घडवून आणताे.
· वनस्पतीमध्ये पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक आहे.
 
कमतरता लक्षणे
· पाने ठिसूळ बनून गुंडाळली जातात.
· उसाचा शेंडा पिवळा पडताे. नंतर ताे तांबूस काळा पडून वाळून जाताे.
· शेंड्याकडील काेवळ्या पानांवर पाण्याचे लहान लहान पारदर्शी ठिपके दिसतात.
 
माॅलिब्डेनम : कार्ये
· आवश्यक तांबे किंवा जस्तापेक्षाही खूपच कमी प्रमाणात आहे.
· नैट्रेटक्षपक वितंचकासाठी फारच उपयुक्त आहे.
· अमिनाे आम्ले व प्रथिने तयार हाेत असताना नत्राचे प्रथम अमाेनिअममध्ये क्षपण घडवून आणणाऱ्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक आहे.
 
कमतरता लक्षणे
· पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात.
· पानांच्या वरच्या भागावर पिवळ्या रंगाच्या पट्ट्या दिसून येतात.
· काड्यांची लांबी व जाडी कमी हाेते.
 
सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त घनरून विद्राव्य खत
 
ऊस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी संशाेधनावर आधारित व्हीएसआय मायक्राेसाेल हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त घनरून खत तयार केले आहे. व्हीएसआय मायक्राेसाेलमध्ये लाेह (2.0%), मँगेनीज (1.0%), जस्त (5.0%), तांबे (0.5%) आणि बाेराॅन (1.0%) हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. व्हीएसआय मायक्राेसाेलच्या वापरामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेचा वेग वाढून हरितद्रव्यनिर्मित्तीत आणि प्रथिने व संप्रेरकेनिर्मित्तीत वाढ हाेते. पेशींची वाढ हाेऊन पेशीविभाजनात याचा सक्रिय सहभाग दिसून येताे. परिणामी ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात वाढ हाेते.
 
सदर खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे आणि सेंद्रिय आम्लयुक्त असल्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे, तसेच जमिनीतून देण्यास उपयु्नत आहे. महाराष्ट्रातील जमिनीतील अन्नद्रव्याचे महत्त्व आणि पिकाची गरज लक्षात घेऊन पिकांना त्वरित उपलब्ध हाेईल आणि विशेषत: ठिबक सिंचनाद्वारे देता येईल या हेतूने उत्पादित करण्यात आले आहे. एकरी 10 किलाे व्हीएसआय मायक्राेसाेलची मात्रा द्यावी. सदर विद्राव्य खत दाेन पद्धतीने देता येते. हे खत सेंद्रिय आम्लयुक्त असून पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असल्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे आणि जमिनीत देण्यास उपयुक्त आहे.
 
ठिबक संचाद्वारे प्रत्येक वेळी एकरी 2.5 किलाे 100 लि. पाण्यात विरघळून लागणीचेवेळी, लागणीनंतर 60 दिवसांनी, 120 दिवसांनी आणि 180 दिवसांनी असे चार वेळा साेडावे. किंवा ठिबक संच नसल्यास शेणखतात किंवा कंपाेस्ट खतात मिसळून लागणीचेवेळी एकरी 5 किलाे आणि ऊसबांधणीवेळी 5 किलाे या प्रमाणात जमिनीत चळी घेऊन द्यावे.
 
फवारणीसाठी उपयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त द्रवरूप खत
 
सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताची उसाच्या पानांवर फवारणी केल्यास अधिक प्रभावी परिणाम दिसून येताे. उसाच्या पानांवर मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यामुळे खताची पिकाला उपयुक्तता वाढते. पानांतील आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण याेग्य हाेते आणि परिणामी मुळांद्वारे आवश्यक अन्नद्रव्यांचे शाेषणसुद्धा वाढते आणि ऊस उत्पादनावर चांगला परिणाम हाेताे. यासाठी मल्टिमायक्राेन्युट्रियंट या द्रवरूप खताच्या उसाच्या पानांवर दाेन फवारण्या कराव्यात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या संशाेधनानुसार, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खताची निर्मित्ती करण्यात आली आहे. या द्रवरूप खतात लाेह (2.5%), मँगेनीज (1.0%), जस्त (3.0%), तांबे (1.0%), मॅालिब्डेनम (0.1%) आणि बाेराॅन (0.5%) ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. या मल्टिमायक्राेन्युट्रियंट द्रवरूप खताच्या दाेन फवारण्या केल्यास 8 ते 10 टन प्रति हे. ऊस उत्पादनात वाढ झालेली दिसून आली आहे. यासाठी लागणीनंतर अथवा खाेडवा राखल्यानंतर 60 दिवसांनी मल्टिमायक्राेन्युट्रियंट प्रतिएकरी 2 लि. मात्रा 200 लि. पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी लागणीनंतर अथवा खाेडवा राखल्यानंतर 90 दिवसांनी मल्टिमायक्राेन्युट्रियंट प्रतिएकरी 3 लि. मात्रा 300 लि. पाण्यात मिसळून करावी. काेणतीही इतर रसायने द्रवरूप खतात मिसळू नयेत. विशेषत: क्षारयुक्त किंवा चाेपण जमिनीत आणि चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि शाेषण कमी हाेते. अशावेळी मल्टिमायक्राेन्युट्रियंट द्रवरूप खताची फवारणी फायदेशीर ठरते.ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरुप खते संस्थेतून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात आणि मागणीनुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमार्फत देखील पुरविली जातात. साधारणतः प्रतिवर्षी 6000 हे. क्षेत्रावर याचा वापर हाेत असून ऊस उत्पादनात 8 ते 10 टन प्रति हे. वाढ दिसून येत आहे.
 
साधारणपणे ज्या जमिनीत उसापाठाेपाठ ऊस घेतला जाताे, सेंद्रिय खतांचा वापर फार कमी किंवा केला जात नाही फक्त रासायनिक खतांचा वापर केला जाताे अशा जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शाेषण जादा झाल्यामुळे जमिनीत कमतरता भासते. अधिक उत्पन्न देणाऱ्या ऊस जाती आणि नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खतांच्या अधिक वापरामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही गरज वाढत आहे. अशा ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खत देणे गरजेचे असते.