ब्राेकाेली लागवड

डिजिटल बळीराजा-2    04-Nov-2020
|

3_1  H x W: 0 x
 
 
ब्राेकाेली पिकाला मुबलक प्रमाणात असणारी जीवनसत्त्वे, उच्च तंतुमयता आणि कमी उष्मांक या गुणधर्मांमुळे पाेषणमूल्यांचा मुकुटमणी म्हणून गाैरविले गेले आहे. कारण ब्राेकाेलीत हदयराेग, कर्कराेग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या अनेक जीवघेण्या राेगांचा प्रतिकार करण्याचे औषधी गुणधर्म आहेत. उत्तम दीर्घायुष्यासाठी एक स्वादिष्ट भाजी म्हणून तसेच ब्राेकाेलीचे सॅलॅड, सूप, बर्गर, पॅटीस इ. पदार्थही लाेकप्रिय आहेत. यामुळे ब्राेकाेलीचे महत्त्व खूपच वाढले आहे.
 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत राष्ट्रीय कृषी संशाेधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथून ब्राेकाेलीचे अधिक उत्पादन देणारी गणेश ब्राेकाेली ही नवीन जात विकसित करून शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रथमच प्रसारित केली आहे. ही जात लवकर येणारी (पुनर्लागवणीनंतर 40-50 दिवसांत पहिली ताेडणी) असून गड्डे 180-200 ग्रॅम वजनाचे असून हिरव्या रंगाचे घट्ट पर्णविरहित असतात. हेक्टरी 65 ते 70 क्विटल उत्पादन मिळत असून कीड राेगास कमी बळी पडते. या पिकास काेरडे व थंड हवामान मानवते. साधारणत: 15 ते 20 अंश तापमानात या पिकाची वाढ उत्तम हाेते. रेताड, मध्यम, काळी निचऱ्याची जमीन या पिकास चांगली असते. अतिहलकी, क्षारयुक्त, चाेपण, पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. जमिनीचा सामू 6.5 ते 7.0 असावा.
 
जमिनीची एक खाेल नांगरट करून ढेकळे फाेडून पूर्वमशागत करून घ्यावी. कुळवाच्या आडव्या दाेन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत 20 टन प्रतिहेक्टरी सर्वत्र चांगले पसरून जमिनीच्या उतारानुसार लागवडीसाठी सपाट वाफे तयार करावेत.
 
3_2  H x W: 0 x 
 
उत्तम उगवणशक्ती असलेले 400 ग्रॅम बियाणे प्रतिहेक्टरी पुरेसे हाेते. भुसभुशीत केलेल्या जमिनीत एक बैलगाडी चांगले कुजलेले शेणखत प्रतिगुंठा मिसळून द्यावे. बियाणे पेरणीसाठी 3 न् 1 मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. बियाणे पेरणीपूर्वी राेपांचे राेपवाटिकेत मर राेगांपासून नियंत्रणासाठी गादीवाफ्यावर ट्रायकाेडर्मा व्हीरीडी 40 ग्रॅम प्रतिचाैरस मीटर वापरावे. पेरणी करताना ओळींमध्ये 10 सें.मी अंतर ठेवून 1 ते 1.5 सें.मी. खाेल बियाणांची पातळ पेरणी करावी. बियांची पेरणी 25 सप्टेंबर ते 25 ऑक्टाेबर याकाळात करावी. बियाणे पेरणीनंतर बियांची उगवण हाेईपर्यंत आवश्यकतेनुसार सकाळी आणि सायंकाळी झारीने पाणी द्यावे. त्यानंतर राेपांचे कीड व कीडराेगांपासून नियंत्रणासाठी 15 ते 20 दिवसांनी 10 मि.लि. फ्लुफेनाेझुराॅन अ 20 ग्रॅम मेटॅलॅक्झील एमझेड-72 प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी करावी. राेपे लागवडीसाठी 4 आठवड्यांत तयार हाेतात.
 
पुनर्लागण करण्यासाठी निराेगी व एकसारखी वाढ झालेली जाेमदार राेपे घ्यावीत. राेपांची मुळे अ‍ॅझाेटाेबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जीवाणू (पीएसबी) प्रत्येकी 2.5 किलाेच्या द्रावणात बुडवून प्रतिहेक्टर लावावीत. राेपांची सपाट वाफ्यात दाेन ओळींमध्ये 60 सें.मी. आणि दाेन राेपांत 45 सें.मी. अंतर ठेवून 25 ऑक्टाेबरपर्यंत लागवड करावी आणि लागलीच हलके पाणी द्यावे.
 
लागवडीनंतर 15 दिवसांनी एक खुरपणी करून झाडांना मातीने आधार द्यावा. माेठे गड्डे मिळविण्यासाठी खाेडावर पानांच्या बगलेत येणारी फूट 1 ते 2 वेळा अलगद काढावी. ब्राेकाेली पिकाला हेक्टरी 65 कि. नत्र, 20 कि. स्फुरद, 30 कि. पालाश लागवडीच्यावेळी द्यावे आणि हेक्टरी 65 कि. नत्र लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावे. पाणी नियमित 8 ते 10 दिवसांच्या अंतराने द्यावे.
 
ब्राेकाेली पिकावर इतर काेबीवर्गीय इतर पिकाशी तुलना करता राेग व कीड यांचा प्रादुर्भाव कमी असताे. या पिकावर विशेषत: मावा, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव आढळल्यास किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथाेएट 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. चाैकाेनी ठिपक्यांच्या पतंगाच्या नियंत्रणासाठी 10 मि. लि. फ्लुफेनाेझुराॅन तसेच केवडा राेग नियंत्रणासाठी 25 ग्रॅम मेटॅलॅक्झील एफझेड 72, प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.
 
पक्वता आल्यावर ब्राेकाेलीचा गड्डा आणि हिरवागार दिसताे. गड्ड्यावर माेहरीच्या दाण्यांप्रमाणे गाेलाकार फुलांचा कळीचा भाग दिसू लागताे. तत्पूर्वी गड्डा काढल्यास गड्ड्याचे वजन कमी भरते आणि एक दिवसही उशीर झाल्यास गड्डा विस्कटताे. शिवाय चव कडवट लागण्यास सुरुवात हाेते. त्यामुळे गड्डा याेग्यवेळी काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ब्राेकाेलीची काढणी करताना गड्डा 10 ते 12 सें.मी. खाेड ठेवून काढावा. उत्पादन : 65 ते 70 क्विंटल प्रतिहेक्टरी.
 
3_3  H x W: 0 x
 
 
 
डाॅ. बी. ए. बडे, श्री. ए. एस. पाटील,
डाॅ. डी. बी. लाड, डाॅ. व्ही. एस. सुपे,
राष्ट्रीय कृषी संशाेधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे- 67