स्विस चार्ड : परदेशी भाजीलागवड तंत्रज्ञान

डिजिटल बळीराजा-2    31-Oct-2020
|

bali_2  H x W:
 
स्विस चार्ड ही हिरव्या लाल रंगाच्या पानांची आणि लाल, हिरव्या, पांढऱ्या, पिवळ्या, केशरी, जांभळ्या देठाची परदेशी भाजी असून या भाजीची लागवड कुरकुरीत पानांसाठी, मांसलयुक्त पानांच्या देठासाठी केली जाते.
 
भारतात स्विस चार्ड या सॅलड भाजीची लागवड काश्मीरच्या भागात इतर सॅलड भाजीबराेबर हाेते. सध्या या भाजीची लागवड महाराष्ट्रात हाेत आहे. महाराष्ट्रात या भाजीचे क्षेत्र वाढवण्यास खूप वाव आहे.
 
उपयाेग
 
या भाजीच्या कुरकुरीत निरनिराळ्या रंगांच्या पानांचा आणि आकर्षक मांसल देठांचा उपयाेग इतर सॅलड भाज्यांच्या पानांत मिसळून कच्ची खाण्यासाठी, तर वाफवून भाजी तयार करण्यासाठी माेठ्या प्रमाणात करतात. मांसल पांढऱ्या देठांचा उपयाेग सूप तयार करण्यासाठी हाेताे. बाजारामध्ये माेठ्या शहरात या भाजीची मागणी चांगली असते.
 
पाेषक द्रव्ये
 
स्विस चार्ड ही भाजी आहाराच्चा दृष्टीने अतिशय पाैष्टिक असून त्यात अ, क आणि के जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांचे प्रमाण भरपूर असते. आहाराच्या दृष्टीने स्विस चार्डमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजद्रवे यांचे प्रमाण सॅलड भाजीमध्ये उपलब्ध असते.
 
सुधारित जाती
 
निरनिराळ्या परकीय सीड कंपन्यांनी अतिआकर्षक रंगांच्या पानाच्या आणि देठाच्या संकरित जाती प्रसारित केल्या आहेत.
काही प्रचलित जाती खालीलप्रमाणे : ·
 
• रेड स्विस चार्ड : सुरकुत्या असलेली हिरव्या पानांची आणि पानांच्या शिरा व देठ गडद लाल रंगाची संकरित जात .झाडाची उंची 15-20 सेंमी
• सिल्व्हर बिट : संकरित जातीच्या पानांचा रंग अतिशय गडद हिरवा, पाने कुरकुरीत, सुरकुत्या असलेली आणि देठ पांढऱ्या रंगाचे असतात. झाडाची उंची 20-25 सेंमी.
• ब्राईट लाइट : या संकरित जातीमध्ये पानांचे देठ लाल, पिवळे, पांढरे, हिरवे, केशरी, नारंगी अशा आकर्षक रंगांचे असून पाने गडद हिरव्या रंगाचे असतात. बाजारात या भाजीला माेठी मागणी असते. झाडाची उंची 20-22 सेंमी. असते.
• सिल्व्हर अडाे : हळू वाढीची संकरित जात असून पानांचे देठ आकर्षक पांढऱ्या रंगाचे असून पाने चकचकीत गडद हिरव्या रंगाची असतात. झाडाची उंची 18-21 सेंमी असते. थाेडे उष्ण तापमान सहन करू शकते.
• सेलिब्रेशन : या संकरित जातीच्या पानांचे देठ लाल, पिवळे, पांढरे, हिरवे, केशरी, नारंगी अशा आकर्षक रंगांचे असून पाने गडद हिरव्या चकचकीत रंगाचे असतात. झाडे सरळ वाढतात. झाडाची उंची 19-20 सेंमी असून ग्राहकांकडून या भाजीला नेहमी मागणी असते.
 
वरील संकरित जातीशिवाय स्विसचार्ड च्या एल्डीबॅराे, फाेर्डहुक जायंट, पेपरमिंट, रेनबाे, ब्रेसाँने, अम्पूअस अशा सुधारित जाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत.
 
जमीन  
 
bali_1  H x W:
 
बाहेरील क्षेत्रात लागवड करण्यासाठी अत्यंत हलकी, मध्यम, गाळाची, सेंद्रिय पदार्थयुक्त व याेग्य पाण्याचा निचरा हाेणाऱ्या जमिनीची निवड करावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.0 पर्यंत असावा. हिरवळीच्या खताचा वापर केल्यास पिकाची प्रत व उत्पादन चांगले मिळते.
 
bali_2  H x W:
 
निर्जंतुकीकरण करणे
 
बाहेरील लागवडीचे क्षेत्र, राेपे तयार करण्याचे क्षेत्र व हरितगृहातील मध्यम सिल्व्हर पॅराऑक्साइड 35 मिली प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून निर्जंतुक करावे. 6-7 तासांनंतर बी पेरणे किंवा राेपांची लागवड करता येते.
 
लागवडीचा हंगाम, बाहेरील क्षेत्रात लागवड
 
स्विस चार्ड या भाजीची लागवड महाराष्ट्रामध्ये हिवाळी (2 बी) हंगामात करणे आवश्यक आहे. लागवड सप्टेंबर ते जानेवारी महिन्याच्या 2 आठवड्यांपर्यंत करावी. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण साधारण आहे तेथे खरीप हंगामात जून - जुलैमध्ये लागवड करावी.
 
जमिनीची निवड केल्यानंतर जमीन उभी-आडवी नांगरून कुळवाच्या साहाय्याने भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या वेळी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत 10-12 मी. टन आणि 4 किलाे फाॅलीडाॅल मिसळून टाकावे. पारंपरिक लागवड पद्धतीत स्विस चार्डची लागवड करताना सपाट वाफे तयार करून घ्यावेत.
 
पिकाची उत्तम प्रत व एकसारख्या वाढीची पाने मिळण्याकरिता स्विस चार्ड राेपांची पुनर्लागवड गादीवाफ्यावर करण्याची शिफारस करावी. जमिनीची पूर्वतयारी झाल्यानंतर 60 सेंमी रुंद, 30 सेंमी उंच आणि दाेन गादीवाफ्यांत 30-40 सेंमी अंतर ठेवून गादीवाफे तयार करावेत. वाफ्यावर लागवड केलेल्या राेपांना ठिबक सिंचनद्वारा पाणी आणि विद्राव्य खतांच्या मात्रा द्याव्यात.
 
गादीवाफ्यावर राेपे तयार करणे
 
एक मीटर रुंदीचे व तीन मीटर लांब आणि 25-30 सेंमी उंच गादीवाफे तयार करून प्रत्येक वाफ्यात 10 किलाे शेणखत आणि 100 ग्रम फाॅलीडाॅल पावडर मिसळून मातीत मिसळून द्यावे. 5-7 सेमी रुंदीला समांतर 1.5 सेमी खाेलीवर
 
रेषा पडून त्यात बी पातळ पेरावे. हलक्या हाताने बी मातीने झाकून टाकावे. दरराेज वाफ्यांना हलके पाणी द्यावे. त्यानंतर सर्व वाफे प्लॅस्टिक पेपरने झाकून टाकावे. दरराेज वाफ्यांना हलके पानी द्यावे. बियांची उगवण हाेण्यासाठी तापमान 16 ते 23 डिग्री सेंटीग्रेड असणे आवश्यक असते. राेपांना पाणी देताना प्रतिलिटर पाण्यात 1.5 ग्रॅम पाेटॅशिअम नायट्रेट व 1.5 ग्राम कॅल्शिअम नायट्रेट मिसळून राेपण पाणी द्यावे. राेपांवर किडी व राेगांचा प्रादुर्भाव हाेऊ नये म्हणून राेपांवर दाेन वेळा अ‍ॅसिफेट 1 ग्रॅम अधिक बाविस्टीन 1 ग्राम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. तसेच राेपे उगवून आल्यानंतर 10 दिवसांनी व 20 दिवसांनी डायथेन एम-45 औषध 2.5 ग्राम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून प्रत्येक वाफ्यावर ड्रेचिंग करावे. राेपे 4-5 आठवड्यांनी 10-12 सेंमी उंच झाल्यावर राेपे पुनर्लागवडीसाठी तयार हाेतात. 40 आर क्षेत्रात लागवड करण्यासाठी 500 ग्रॅम बियाणे पुरेसे हाेते. 1 ग्रॅम वजनाच्या स्विस चार्ड बियाण्यांमध्ये 120-125 बिया असतात.
 
• प्लॅस्टिक ट्रेमध्ये काेकाेपीट वापरून बियाणे ठेवून राेपे तयार करता येतात.
• लागवड व लागवडीचे अंतर (बाहेरील क्षेत्रावर लागवड) · पारंपरिक पद्धतीने सपाट वाफ्यात बियांची टाेकण दाेन ओळींमध्ये 30 सेंमी ठेवून व दाेन राेपांतील अंतर 30 सेंमी ठेवून लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास बियाणे 2 किलाे लागते. तसेच राेपे तयार करून राेपाची पुनर्लागवड वरील अंतर ठेवून करावे. 40 आर क्षेत्रात 0.44 लाख राेपांची लागवड हाेते. लागवड पूर्ण झाल्यावर राेपांना हलके पाणी द्यावे.
 
गादीवाफ्यावर लागवड करण्यासाठी प्रत्येक वाफ्यावर दाेन ओळींत 45 सेंमी अंतर ठेवून दाेन राेपांच्या 20 सेंमी अंतर ठेवावे. 40 आर क्षेत्रात एकूण 0.44 लाख राेपांची लागवड हाेते.
 
खत व्यवस्थापन
 
स्विस चार्ड या पिकाची जाेमदार वाढ हाेण्यासाठी रासायनिक खतांच्या मात्रा 40 आर क्षेत्र लागवडीसाठी नत्र 40 कि ग्रॅम, स्फुरद-30 कि. ग्रॅम आणि पालाश 40 कि ग्रॅम देण्याची शिफारस केलेली आहे. लागवडीपूर्वी जमिनीने पृथ्नकरण घेणे आवश्यक आहे. वरील खतांच्या मात्रा खालील रासायनिक खते वापरून द्याव्यात.    

bali_1  H x W:  
 
गादीवाफ्यावर लागवड केलेल्या राेपांना तसेच हरितगृहात वाफ्यांवर लागवड केलेल्या राेपांना ठिबक संचामधून पाण्याबराेबर विद्राव्य खतांच्या मात्राराेपांच्या वाढीनुसार विभागून दिल्या जातात.
 
माइक्राेला सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची फवारणी : स्विस चार्ड झाडांच्या पानांची निराेगी आणि संतुलित वाढ हाेण्यासाठी नंतर, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच पानांची प्रत, आकार, चव आणि राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पहिली फवारणी लागवडीपासून 15 दिवसांनी आणि दुसरी फवारणी पानांची वाढ हाेत असताना यंकाळच्यावेळी करावी. फवारणीसाठी माइक्राेला 2.5 मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिसळून करावी. पाने वाढवण्याच्या काळात गवडीपासून 35-40 दिवसांनी सुजला 19:19:19 विद्राव्य खत 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिसळून पिकावर 10-12 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात.
 
आंतरमशागत
तणांचा बंदाेबस्त करून क्षेत्रात खुरपणी करून क्षेत्र स्वच्छ ठेवावे. नांगरणी करून राेपांची लागवड करावी.
 
आच्छादन
तणांचे नियंत्रण खुरपणी झाल्यावर वाळलेल्या गवताचे राेपांच्या मधील जागेत आच्छादन करावे.
 
पाणी व्यवस्थापन
राेपांची चांगली वाढ हाेण्यासाठी आणि उत्तम प्रतीचे उत्पादन मिळण्यासाठी, पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे आहे. पाण्याबराेबर विद्राव्य खते द्यावीत. पिकांची संभाव्य पाण्याची गरज किती आहे ते बघून तेवढेच पाणी द्यावे. ठिबक संच नसेल तेथे सरी पद्धतीने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी 4-6 दिवसांनी द्यावे.
 
काढणी
अंदाजे 55-60 दिवसांत पानांची उंची 12 ते 15 सेंमी उंच झाल्यावर पाने काढणीस तयार हाेतात. स्विस चार्ड पिकाची
 
काढणी दाेन प्रकारे करतात. बाहेरील 1-2 पाने पूर्ण वाढलेली गडद हिरव्या लाल रंगाची काेवळी असताना देठाच्या खाली धारदार चाकूने कापून पानांची काढणी करतात. नंतर पानांची स्वच्छता, प्रतवारी करून बंच तयार करतात. पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवितात. दुसऱ्या पद्धतीत सर्व पाने जमिनीपासून 4.5 सेंमी उंचीवरून धारधार चाकूने कापून पानांच्या आकारमानाप्रमाणे प्रतवारी करून स्वच्छ करून 10-12 पानांचा बंच तयार करून विक्रीसाठी तयार करतात.
 
झाडावरची सर्व पाने कापल्यानंतर 40 आर क्षेत्रास 40 कि ग्रॅम नत्र दाेन सामान हफ्त्यांत अनुक्रमे कापणी झाल्यानंतर 20 दिवसांनी व 35 दिवसांनी देऊन या पिकाच्या 3-4 कापण्या घेता येतात.
 
उत्पादन
 
उत्तम मशागत व व्यवस्थापन असल्यास बाहेरील क्षेत्रात केलेल्या लागवडीपासून पानांसहित प्रतवारी केलेल्या एका झाडाचे वजन सरासरी 225 ग्रॅम ते 250 ग्रॅम असते. 40 आर क्षेत्रामधून सरासरी 99 ते 110 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. प्रत्येक कापणीच्यावेळी 88 ते 90 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. हरितगृहात लागवड केलेल्या स्विस चार्डचे उत्तम मशागत व व्यवस्थापन असल्यास प्रतवारी केलेल्या प्रत्येक झाडाचे सरासरी वजन 350 ग्रॅम ते 450 ग्रॅमपर्यंत असते. 40 आर आकारमानाच्या हरितगृहातील लागवडीपासून सरासरी 154 ते 198 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
 
पॅकिंग
 
पॅकिंग करताना मेणाचे लायनिंग असलेल्या कराेगेटेड बाॅक्सेसमध्ये प्रत्येक बंच उभा व जवळजवळ ठेवून प्रत्येक बाॅक्समध्ये अंदाजे दाेन किलाे वजनापर्यंत पॅकिंग करावे. पूर्वशीतकरणाची व्यवस्था असल्यास बाॅक्सेसमधील बंच 9-10 डिग्री सें. ग्रे. तापमानात पूर्वशीतकरण करून घ्यावे व रेफ्रिजरेटर व्हॅनमधून 4 डिग्री सें. ग्रे. व 90-95 % सापेक्ष आर्द्रतेमधून विक्रीसाठी पाठवावे.
 
साठवणूक
 
खाेलीच्या तापमानात 3 ते 4 दिवसांपर्यंत स्विस चार्डची पाने चांगली राहू शकतात. प्लॅस्टिक क्रेटमध्ये ठेवलेले बंच चांगल्या प्रकारे साठविता येतात.
 
कीड, राेग आणि नियंत्रण कीड
 
• मावा : हिरव्या किंवा काळ्या रंगाचे अतिलहान आकाराचे कीटक पानांतील अन्नरस शाेषून घेतात. त्यामुळे पानांच्या कांदा वेड्यावाकड्या हाेऊन पाने निस्तेज हाेतात. पानांची वाढ खुंटते. या किडी व्हायरस राेग चांगल्या झाडावर पसरवितात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी निंबाेळी अर्क 4 % 4.5 मि. लि. किंवा अ‍ॅसिफेट 1 ग्रॅम किंवा माेनाेक्राेटाेफाॅस 1.5 मि. लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिसळून 8-10 दिवसांच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात.
 
• लीफ मायनर : अळी रंगाने पिवळट असून अळी पानांच्या खालच्या पापुद्र्याखाली राहून आतील मूळ पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. परिणामी, उत्पादनावर व पानांच्या प्रतीवर प्रतिकूल परिणाम हाेताे.
उपाय : प्रादुर्भाव झालेली पाने काढून टाकावीत. पीक लावल्यापासून सायपरमेथ्रीन 3 मिली किंवा अ2सिफेट 1 ग्रॅम किंवा फाॅस्फाेमिडाॅन 2 मिली किंवा डेसिस 0.5 मिली प्रतिलि. पाण्यात मिसळून 10-12 दिवसांच्या अंतराने वरील औषधांच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात.
 
राेग
 
भुरी (पावडरी मिल्ड्यू) : भुरी या राेगाचा प्रादुर्भाव वर्षभर आढळताे. पानांवर बऱ्याचदा पृष्ठभागावर पांढऱ्या भुकटीप्रमाणे बुरशीची वाढ हाेते. बुरशीची वाढ पानांच्या खालच्या बाजूस हाेते. याचा प्रादुर्भाव खाेडावर, पानांवर हाेताे. पूर्ण वाढीच्या झाडावर तपकिरी ठिपके दिसतात. पाने पिवळी हाेतात अशा प्रतीच्या पानांना बाजारपेठेत मागणी नसते.
उपाय : नियंत्रणासाठी बाविस्टीन 1 ग्रॅम किंवा केरथीन 1 ग्रॅम किंवा बाेनाेमिल 0.5 मिली. किंवा थायाेवीत 2 ग्रॅम किंवा बेलेटाेन 2 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून 8-10 दिवसांच्या अंतराने 3-4 फवारण्या कराव्यात.
 
स्लायमी साॅफ्ट राॅट
 
प्रथम पानांवर तेलकट फुगीर सडके डाग आढळतात. नंतर हे डाग तपकिरी रंगाचे हाेऊन सर्वत्र पसरतात. डाग बुळबुळीत चिकट हाेतात. उपाय : प्रत्येकवेळी याेग्य तेवढेच पाणी द्यावे. जमिनीतून पाण्याचा निचरा हाेणे आवश्यक आहे.
 
बियाणे उपलब्धता :
स्विस चार्ड या भाजीचे बियाणे खालील बियाणे डीलर्सकडे उपलब्ध हाेऊ शकेल.
 
• चंद्रशेष ट्रेडर्स, महालक्ष्मी मार्केट अ‍ॅग्रीकल्चर मार्केटिंग बाेर्ड कार्यालयासमाेर, गुलटेकडी, मार्केट यार्ड पुणे 411037.
माे. 9371017833
ओव्हांक ट्रेडिंग कंपनी पाेलिस चाैकीशेजारी, फुलमार्केटजवळ, मार्केट यार्ड. पुणे : 411037 , 02024337982