परदेशी भाजीपाला : अधिक उत्पादन, उच्चप्रत व जादा आर्थिक फायद्यासाठी पूर्वनियाेजित बाबी

डिजिटल बळीराजा-2    29-Oct-2020
|

Exotic vegetables_1 
 
भाजीपाला हा माणसाच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. तथापि, कृषी अर्थव्यवस्तेत हातभार लावणाऱ्या भाजीपाला पिकांच्या क्षमतेची जाणीव मात्र शेतकऱ्यांना अलीकडे हाेऊ लागली आहे. परदेशी भाजीपाला लागवडीपासून कमी कालावधीत मिळणारे हे्नटरी जास्त उत्पादन, लागवडीखाली निरनिराळ्या प्रकारच्या भाज्यांची निवड करण्याचा पर्याय, शरीरपाेषणास लागणारी उपलब्ध पाेषक अन्नद्रव्ये, मर्यादित कालावधीत आर्थिक फायदा आणि निर्यातीस याेग्य अशा बाबी उपलब्ध असल्याने याप्रकारची भाजीपाला लागवड शेतकऱ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे.
 
महाराष्ट्रात निरनिराळ्या प्रकारचे हवामान उपलब्ध असल्याने वर्षभर सर्व प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेता येऊ शकते, परंतु महाराष्ट्रात अजूनही काही उपयुक्त अशा परदेशी भाजीपाल्याची ओळख शेतकऱ्यांना व ग्राहकांना झालेली नाही असे जाणवते. या परदेशी भाज्यांची शास्त्राेक्त तांत्रिक माहिती, तसेच बियाण्यांची ओळख बहुतेक शेतकऱ्यांपर्यंत पाेचणे गरजेचे हाेते. तेव्हा सन 1994 पासून महाराष्ट्रात अजूनही काही उपयुक्त अशा परदेशी भाज्यांची शेतकऱ्यांना व ग्राहकांना ओळख व्हावी म्हणून कृषी मासिके, कृषीवृत्तपत्रिका व प्रत्यक्ष चर्चा करून या भाज्यांची ओळख चालू केली असून, या भाज्यांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त असे मराठी भाषेतील पुस्तक ‘परदेशी भाजीपाला लागवडीचे उच्चतंत्रज्ञान’ प्रकाशित केलेले आहे. या सर्व प्रयत्नांमुळे आता शेतकरी खरीप आणि हिवाळी हंगामात लेट्यूस, ब्राेकाेली, झुकिनी, चेरी टाेमॅटाे, लिक, रेड कॅबेज, चायना कॅबेज, मधूमका, बेबी काॅर्न, टर्निप, कॅरट, अ‍ॅस्परागस, ग्रीन्स इ. यांसारख्या भाज्यांची लागवड लहान-मध्यम क्षेत्रावर बाहेरील क्षेत्रावर करू लागले आहेत. या भाज्यांना उत्तम प्रत मिळण्यासाठी हिवाळी हंगामात जास्त लागवड हाेऊ लागली आहे. तसेच काही शेतकरी वर्षभर या भाज्यांचा पुरवठा हाेण्यासाठी पाॅलिहाउसमध्ये लागवड करू लागले आहेत.
 
परंतु यामध्ये असे निरीक्षणास दिसून आले, की लागवड केलेल्या भाज्या विक्रीसाठी मार्केटकमध्ये दिसतात तेव्हा त्या भाज्यांची प्रत समाधानकारक नसते म्हणजेच शेतकऱ्यांनी लागवडीबाबत थाेडी जास्त काळजी घेतली, तर नक्कीच उच्चप्रतीचा भाजीपाला पिकवू शकतील. लागवड केलेल्या भाज्यांची प्रत व जादा उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी लागवडीपूर्वी घेण्यात येणाऱ्या परदेशी भाजी लागवड संबंधीची संपूर्ण तांत्रिक माहिती म्हणजे बियाणे जात, राेपे तयार करणे, पुनर्लागण कशी करणे, दाेन राेपांतील दाेन ओळीतील अंतर किती ठेवणे, जमिनीची पूर्व मशागत कशी करावी, आदी. वाफे कसे तयार करावेत, पाणी व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग आणि विक्रसाठी बाजारपेठेत माल पाठविणे या संबंधीची माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे लागवड हाेणाऱ्या भाजीस दरराेज किती पाणी द्यावे लागेल हे सुत्राच्या सहाय्याने काढून घेणे इ. आवश्यक आहे.
 
आता सुधारित तंत्रज्ञान वापरून परदेशी भाज्यांची लागवड केल्यास उत्पादन आणि प्रत यामध्ये वाढ हाेते. काही परदेशी भाज्यांची लागवड खरीप व हिवाळी हंगामात करता येते. यासाठी लागणारी मुख्य निविष्ठा म्हणजे बियाणे. आता निरनिराळ्या परदेशी सीड कंपन्यांनी परदेशी भाजीपाला लागवडीसाठी उच्च दर्जाचे संकरित बियाणे प्रत्येक हंगामासाठी महाराष्ट्रात सहज उपलब्ध केलेले आहे. शेतकऱ्यांनी हंगामाप्रमाणे बियाण्यांची निवड करून विकत घेणे आवश्यक आहे.
 
भाजीपाला (पारंपरिक/परदेशी) नाशवंत असल्यामुळे काढणीनंतर त्यांचा उपयाेग श्नय तित्नया लवकर हाेण्याच्या दृष्टीने निश्चित बाजारपेठेची सभियता किंवा शहरानजिक लागवड आणि दळणवळणाच्या सुविधा या गाेष्टी परदेशी भाजीपाल्याच्या यशस्वी उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. सर्वसाधारणपणे पाण्याचा चांगला निचरा हल्नया-मध्यम, गाळाच्या पाेयट्याच्या, सेंद्रिय घटकांनी युक्त जमिनीत परदेशी भाजीपाला पिके उत्तम येत असल्याने अशा प्रकारच्या जमिनीची लागवडीसाठी निवड करावी.
 
अन्नद्रव्याची जास्तीत जास्त उपलब्धता हाेऊन सुरुवातीच्या काळात राेपांची जाेमदार वाढ आणि भरघाेस उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने जमिनीचा सामू 6.5 ते 7.0चे दरम्यान आवश्यक आहे. या करिता लागवडीपूर्वी जमिनीचे मातीपरीक्षण करून घेणे जरूरीचे आहे.
 
जमिनीची पूर्वमशागत झाल्यानंतर राेपांची पुनर्लागण करण्यासाठी गादीवाफे तयार करून घ्यावेत. लेट्यूस, ब्राेकाेली, झुकिनी, लिक,  चेरी टाेमॅटाे, रेड व चायना कॅबेज यांची लागवड राेपे तयार करून गादीवाफ्यावर पुनर्लागण करतात. याकरिता गादीवाफ्याची रुंदी 60 सें.मी. ठेवून वाफे तयार करावेत. नेहमी उच्च प्रतीचा भाजीपाला मिळण्यासाठी या भाज्यांची लागवड गादीवाफ्यांवरच करणे अत्यावश्यक आहे.
 
पुढील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे गादीवाफे तयार झाल्यानंतर प्रत्येक वाफ्यावरील माती सिल्व्हर पॅरा्नसाॅइड रसायनाने निर्जंतुक करणे गरजेचे आहे. यामुळे राेपांचे मातीतील किडी/बुरशीमुळे संरक्षण हाेते. सिल्व्हर पॅराॅ्नसाइड रसायन 35 मि.लि. एक लिटर पाण्यात मिसळून याप्रमाणे द्रावण तयार करून झालीने 1 लिटर द्रावण प्रती चाै.मी. जागेत प्रमाणे झारीने टाकावे. द्रावण टाकण्यापूर्वी वाफे आदल्या दिवशी पाण्याने भिजवून घ्यावेत. द्रावण टाकल्यानंतर 6-7 तासांनी राेपांची पुनर्लागण किंवा बियाणे टाेकणी करता येते.
 
वाफ्यांमधील मातीचे तापमान नियमित राहण्यासाठी व तणनियंत्रित राहण्यासाठी प्रत्येक वाफ्यावर प्लॅस्टिक माल्चिंगचा उपयाेग करावा व नंतर पुनर्लागण करावी.
 
राेपांची पुनर्लागण झाल्यानंतर राेपांची जलद वाढ हाेण्यासाठी राेपांना पाणी आणि खतांची आवश्यकता असते. याकरिता राेपांना नि त्यांच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेत पाणी किती लिटर प्रत्येक दिवशी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे, हे पाणी निश्चित करण्याच्या सूत्राने काढून तेवढेच पाणी माेजून पिकास देणे आवश्यक आहे.
 
जास्त अथवा कमी प्रमाणात पाणी दिल्यास वाढीवर परिणाम हाेताे व काढणीस उशीर हाेताे. त्याचप्रमाणे विद्राव्य खतांच्या मात्रा एकदम ठिबकमधील पाण्याबराेबर न देता शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा विभागून राेपांच्या वाढीच्या अवस्थेनुसार ठिबक संचमधून पाण्याबराेबर देण्याची दक्षता घ्यावी. याकरिता लागवडीपूर्वी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ते काढणीपर्यंत विद्राव्य खतांच्या मात्रांचा तपशील तयार करून ठेवावा. सदरचा तक्ता तयार करताना सदर भाजीपाला पिकास काेणकाेणत्या सूक्ष्म आम्लद्रव्यांची गरज भासते याचा अभ्यास करून ती सूक्ष्म अन्नद्रव्ये विद्राव्य खताच्या मात्रेबराेबर पाण्यातून ठिबक संचाद्वारे पिकास द्यावीत. सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकास कमतरता भासल्यास पिकावर अनुकूल परिणाम हाेताे. उदा. बाेराॅन-ब्राेकाेली पिकास कमी पडल्यास खाेडावर व ब्राेकाेलीच्या गड्ड्यावर कुजकट व भुरकट रंगाचे डाग दिसतात व गड्ड्यांची प्रत कमी हाेते. त्याचप्रमाणे ब्राेकाेली पानांची वाढ नेहमीसारखी न हाेता ती अरुंद व खुरटलेली दिसतात आणि ब्लेड व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यास वरील विकृती तयार हाेते.
 
राेपांची पुनर्लागण झाल्यानंतर लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये दरराेज फिरून राेपांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. राेपांवर काही किडींचा अथवा राेगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास वेळीच शिफारस केलेल्या कीडनाशकांची फवारणी सकाळी करावी. जेणेकरून किडे व राेगांचे नियंत्रण वेळीच हाेऊ शकेल. तसेच क्षेत्र तणमुक्त ठेवावे. ही बाब अतिमहत्त्वाची आहे.
 
पुढे राेपांची वाढ हाेऊन भाजीपाला काढणीस तयार हाेताे. या वेळी लागवड केलेल्या भाजीपाल्याची काढणी केव्हा करावी याचे निरीक्षण करावे. सहसा लेट्यूस, ब्राेकाेली या भाजीपाल्याची काढणी लेट्यूसचा गड्डा 0.450 ते 0.500 ग्रॅमपर्यंत तसेच ब्राेकाेली भाजीचं फुलसुद्धा 0.450 ते 0.500 ग्रॅमपर्यंत तसेच ब्राेकाेली भाजीचं फुलसुद्धा 0.450 ते 0.500 ग्रॅम पर्यंत असावे. याच्यावर वजनाची भाजी गड्डे काढणी केल्यास विक्रीसाठी अडचण हाेते.
 
भाजीपाल्याची काढणी अयाेग्य व चुकीच्या वेळी करणे, काढणी केलेला माल उन्हात ठेवणे, प्रतवारी न करणे, पॅकिंग व्यवस्थितरीत्या न करणे, वाहतुकीला हाेणारा विलंब तसेच काढलेला भाजीपाला जास्त वेळ साठवून ठेवणे इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करून या बाबींचा संपूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे. भाजीपाल्याची काढणी ऊन उतरल्यावर सायंकाळी करावी व काढणी केलेला 
 
भाजीपाला सावली असलेल्या शेडमध्ये किंवा पॅकिंग हाउसमध्ये गाेळा करावा. तेथे काढलेला भाजीपाला स्वच्छ करून प्रतवारी करून पॅकिंगसाठी तयार करावा. लेट्यूस, ब्राेकाेली व इतर गड्डा असलेला भाजीपाला प्रत्येक गड्डा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून कराेगेटेड बाॅ्नसेसमध्ये पॅक करावा. त्याचप्रमाणे झुकिनी व इतर भाजीपाला टिश्यूपेपरमध्ये गुंडाळून काेराेगेटेड बाॅ्नसेसमध्ये पॅकिंग करावे. पॅकिंग केलेला माल लगेच रात्रीच्या तापमानात बाजारात पाठवावा. दिवसा पॅकिंग केलेल्या मालाची वाहतूक करू नये. सर्व भाज्यांची प्रत समाधानकारक राहत नाही. उदा. ब्राेकाेली गड्डा जास्त तापमानामुळे पिवळ्या रंगाचा हाेताे व अशा गड्ड्यांना बाजारभाव मिळत नाही.
 
लेट्यूस, ब्राेकाेली, झुकिनी यासारखा भाजीपाला 5 किलाेपर्यंत प्रत्येकी एका काेराेगेटेड बाॅ्नसमध्ये भरून पॅक करावा. सध्याच्या काळात सर्वच स्तरांतील गिऱ्हाइकांना भाजीपाला विकत घेताना एका प्रतीचा भाजीपाला पाहिजे असताे. म्हणून जास्तीत जास्त या परदेशी भाज्यांची प्रत टिकून राहण्यासाठी प्रत्येक भाजीपाला उत्पादकाने भाजीपाला साठवणूक, वाहतूक, विक्रीव्यवस्था व श्नय असल्यास भाजीपाला निर्यात करणे या काढणीनंतरच्या ज्ञानाची माहिती वेळीच करून घेणे व त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे.
 
खेडाेपाडी किंवा माेठ्या शहरांपासून दूरच्या ठिकाणी बरेचसे लहान शेतकरी परदेशी भाज्यांची लागवड लहान क्षेत्रामध्ये करत असतात. भाजीपाला काढणीनंतर त्यांच्याकडे साठवण करण्यासाठी काेणतीच साेय नसते. म्हणजे शीतगृहाची साेय नसते. अशा वेळी त्यांनी भाजीपाला साठवणीसाठी शून्य उर्जा लागणारे शीतकक्ष (कूल चेंबर) तयार करणे आवश्यक आहे. शीतकक्ष हे विटा, वाळू आणि वाळा/उसाचे पाचट या सहज उपलब्ध हाेणाऱ्या वस्तूंपासून तयार करता येते.
 
परदेशी भाजीपाल्याचे मार्केटिंग शेतकऱ्याने आपल्या हातात ठेवणे गरजेचे आहे. उत्पादक ते ग्राहक याेजना राबवल्यास अधिक आर्थिक फायदा मिळवू शकताे व जास्तीत जास्त रुपयांचे उत्पादन शेतकरी घेऊ शकताे. यासाठी गरज आहे ती दूरदृष्टी, नियाेजन व संघटित हाेऊन काम करण्याची. जमाना आहे ब्रँडिंगचा. आपल्या मालाचे प्रमाणीकरण करून बाजारात पाठवला तर चांगले दाम मिळेल यात शंका नाही. गरज आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी परदेशी भाजी पिकवण्याचे तंत्र अमलात आणण्याची व संगठीत हाेऊन सर्वसामान्य लाेकांपर्यंत हा विचार पाेचवणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्याची आर्थिक पत सुधारेल व देशातील लाेकांचे स्वास्थ्य उत्तम राहील.