पूर्वहंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान

डिजिटल बळीराजा-2    27-Oct-2020
|
 
uus_1  H x W: 0
 
राज्यातील ऊस शेती व त्यावर आधारित साखर कारखानदारी ही ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय विकासाचे प्रतीक ठरलेली आहे. त्यामुळे ऊस हे महाराष्ट्रातील एक म हत्त्वाचे नगदी पीक म्हणता येईल. महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या पन्नास वर्षांत साखर कारखानदारीबराेबर उसाचे क्षेत्र, साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली आहे. सातारा, सांगली आणि काेल्हापूर जिल्ह्यांमध्ये एकरी 100 टनांपेक्षा जास्त उसाचे उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनीची तपासणी केली असता अशा जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 1 ट्नयापेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. या शेतकऱ्यांनी सुधारित तंत्राबराेबरच जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी हिरवळीची खते, कंपाेस्ट खते आणि शेणखतांचा वापर केलेला आढळला आहे. त्यामुळे उसाची उत्पादकता वाढविणे श्नय झाले आहे.
 
महाराष्ट्रात एकूण ऊस लागवडीखालील क्षेत्रापैकी 20- 25 टक्के क्षेत्र पूर्वहंगामी उसाखाली असते. खरीप हंगामातील ककाढणीनंतर किंवा पूरबुडीत क्षेत्रामध्ये पूर ओसरल्यानंतर पूर्वहंगामी लागण करता येते. तसेच उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसणाऱ्या ठिकाणी पूर्वहंगामी ऊस 6 ते 7 महिन्यांची वाढ झालेली असल्यामुळे हे पीक पाण्याचा ताण चांगल्याप्रकारे सहन करू शकते.
 
पूर्वहंगामी उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी सप्तपदी तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामध्ये जमिनीचे आराेग्य व सुपीकता, सुधारित जातींचे शुद्ध व निराेगी बियाणे, लागवड तंत्र, अन्नद्रव्य व्यवस्थापन, ठिबक सिंचनाचा वापर, तणनियंत्रण व यांत्रिकीकरण आणि पीकसंरक्षण या तंत्राचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकेल.
 
उसासाठी जमीन व पूर्वमशागत
 
पूर्वहंगामी उसाचा कालावधी 15 महिने व त्यानंतर एक किंवा त्यापेक्षा जास्त खाेडवे पीक घेतले जात असल्यामुळे उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. अशा जमिनीची खाेली 2 फुटांपेक्षा अधिक असावी. तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमाण 0.5 टक्के असावे. पूर्वहंगामी ऊस घेण्यापूर्वी जमिनीमध्ये तागाचे किंवा धैंचाचे पीक घ्यावे आणि सप्टेंबर महिन्यात जमिनीमध्ये गाडावे. त्यानंतर राेटावेटरने जमिनीची मशागत करावी.
 
भारी जमिनीतील 2 फूट खाेलीवरील जमिनीचा कठीण थर फाेडण्यासाठी दर 3 वर्षातून एकदा सब साॅइलरचा वापर करावा. मातीची तपासणी करून त्याप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापनाची दिशा ठरवावी. शेवटच्या पाळीअगाेदर हे्नटरी 25 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या साहाय्याने भारी जमिनीत 120 -150 सें.मी. व मध्यम जमिनीत 100-120 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी 2.5 फुटांच्या व भारी जमिनीसाठी 3 फुटांच्या सलग सऱ्या पाडाव्यात. दाेन सऱ्यांमध्ये ऊस लागवड करून एक सरी रिकामी साेडून पुन्हा दाेन ओळी ऊस लागवड करावी. रिकाम्या ओळीत आंतरपीक घेतलेच पाहिजे. पाण्याची कमतरता असल्याने ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. मशगतीवरील खर्च कमी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीनेच उसाची मशागत करावी. त्यासाठी दाेन सरीतील अंतर 150 सें.मी. (पाच फुटांपर्यंत) ठेवावे. आंतरमशागतीसाठी लहान ट्रॅ्नटरचा वापर करावा.
 
उसाच्या सुधारित जाती व बेणेनिवड
 
पूर्वहंगामी उसाची लागवड करण्यासाठी ुले-265, काे86032 या मध्यम पक्वतेच्या आणि फुले-10001, काे94012, काेसी- 671, व्हीएसआय 12121 आणि काेल्हापूर विभागासाठी काे- 92005 या सुधारित व अधिक ऊस आणि साखर उतारा देणाऱ्या जातींची निवड करावी. लागणीसाठी बेणेमळ्यात वाढविलेले 9 ते 10 महिने वयाचे निराेगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरावे. उत्पादनात विशेष घट न येता ुले- 265 आणि काे- 86032 या वाणांचे पाचपेक्षा अधिक खाेडवे शेतकऱ्यांनी घेतले आहेत. जास्तीत जास्त खाेडवा घेण्यासाठी हे दाेन्ही वाण फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.
 
ऊसाची लागवड
 
पूर्वहंगामी उसाची लागवड 15 ऑक्टाेबर ते 30 नाेव्हेंबर याकालावधीत करावी. ऊस लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणेच वापरावे. दर तीन वर्षांनी ऊस बेणे बदलावे. उसाची लागवड एक डाेळा किंवा दाेन डाेळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डाेळा पद्धतीने करावयाची असल्यास दाेन डाेळ्यांतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. शक्यताे काेरड्या पद्धतीने लागण करावी. डाेळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दाेन डाेळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दाेन टिपरींमधील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवून डाेळे दाेन्ही बाजूस येतील हे पाहून लागवड करावी. यासाठी मध्यम जमिनीत ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल, मात्र टिपरी खाेल दाबली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लागणीसाठी हेक्टरी दाेन डाेळ्यांची 25,000 ते 30,000 टिपरी लागतील. एक डाेळा पद्धतीने तयार केलेल्या राेपांची लागवड करावयाची असल्यास सरीतील अंतर 4 फूट ठेवावे. दाेन राेपांतील अंतर मध्यम जमिनीत 1.5 ूट व भारी जमिनीत 2 फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी 13,500 ते 14,000 राेपे लागतील. मध्यवर्ती ऊस संशाेधन केंद्र, पाडेगाव यांच्याकडे उसाच्या विविध जातींचे मूलभूत बियाणे/राेपे उपलब्ध आहेत. 
 
ऊस लागणीच्या पद्धती
 
लांब सरी पद्धत
 
या लागण पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवतात. या पद्धतीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवता येते. जमिनीच्या उतारानुसार 40 ते 60 मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी. पाणी देताना 2 ते 3 सऱ्यांना एकत्र पाणी द्यावे. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4 टक््नयांपर्यंत असल्यास उताराच्या दिशेने सरी काढावी व उतार 0.4 टक््नयांपेक्षा जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागण कारावी. सलग पद्धतीमध्येही ठिबक सिंचनाचा वापर करावा. टंचाईच्या काळात सरी आड सरी पाणी देणे या पद्धतीत फायदेशीर ठरते. या पद्धतीमध्ये आवश्यक तेवढेच पाणी देता येते. त्यामुळे जामि नी खराब हाेण्याचे प्रमाण कमी हाेते. पिकाची वाढ जाेमदार हाेते. लांब सरीमुळे जास्तीत जास्त क्षेत्राचा वापर हाेताे व उत्पादनात वाढ हाेते. आंतरमशागत सुलभतेने करता येते. 
 
पट्टा पद्धत : (2.5 X 5 फुट किंवा 3 X 6 फुट)
 
जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. मध्यम जमिनीत 2.5 फुट व भारी जमिनीत 3 फुट अंतरावर रिझरच्या साहाय्याने सलग सऱ्या पाडून दाेन सऱ्यांमध्ये उसाची लागण करून तिसरी सरी माेकळी साेडावी. म्हणजे दाेन जाेडओळीत 5 फुट किंवा 6 फूट पट्टा रिकामा राहील. ठिबक सिंचनासाठी आणि अधिक उत्पादनासाठी ही पद्धत फायदेशीर ठरली आहे. या पद्धतीत भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे उसाची वाढ जाेमदार हाेते व उत्पादनात वाढ हाेते.
 
ऊस पिकावर अनिष्ठ परिणाम न हाेता आंतरपिकाचे उत्पादन मिळते व तणांचा प्रादुर्भाव कमी दिसताे. बिबट्याचा वावर असलेल्या भागात ठिंबक सिंचन पद्धतीनेच पाणी द्यावे. ऊस शेतातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत याेग्य आहे. कारण यात यंत्राच्या साहाय्याने ऊसताेडणी करता येते. पट्ट्यामुळे पीकसंरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते. ऊसबांधणीनंतर दाेन ओळींमध्ये एक सरी तयार हाेते. त्या एका सरीला पाणी देऊन उसाच्या दाेन्ही ओळी भिजवता येतात. त्यामुळे पाण्याची 45 टक्के बचत हाेते.

bene_1  H x W:  
 
बेणेप्रक्रिया
 
हिवाळी हंगाम असल्याने बियाणे उगवण्यावर परिणाम हाेताे. उसाची उक्षवणक्षमता वाढविण्यासाठी उसाचे बियाणे 100 पीपीएम इथ्रेलच्या (25 मिली+100 लिटर पाणी) द्रावणात रात्रभर भिजू द्यावे. काणी राेगाचा बंदाेबस्त करण्यासाठी तसेच कांडीवरील खवले कीड व पिठ्या ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी 100 ग्रॅम कार्बेंडॅझिम व 300 मि.ली. मॅलॅथिऑन किंवा डायमि थाेएट 100 लिटर पाण्यात मिसळून बेणे 10 मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर अ‍ॅसिटाेबॅक्टर 10 किलाे व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत 1.25 किलाे 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी 30 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जीवाणू खताच्या प्रक्रियेमुळे 50 टक्के नत्र व 25 टक्के स्फुरद खतांची बचत हाेते व उत्पादनात वाढ हाेते.
 
एकात्मिक खतव्यवस्थापन
 
पूर्वहंगामी उसासाठी दुसऱ्या नांगरटीपूर्वी हेक्टरी 25 टन चांगले कुजलेले शेणखत अगर कंपाेस्ट खत टाकून जमिनीत मिसळावे. शेणखत अगर कंपाेस्ट खत उपलब्ध नसल्यास ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यांसारखे हिरवळीचे पीक घेऊन जमिनीत गाडावे. उसाची लागण करण्यापूर्वी हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सरीमध्ये मेटिरायझियम अ‍ॅनिसाेपीली+ बीव्हेरीया बॅसियाना या जैविक बुरशीचा प्रत्येकी 25 किलाे 250 किलाे शेणखतात मिसळून सरीमध्ये मिसळून द्यावे.
 
पूर्वहंगामी उसासाठी रासायनिक खतांचे व्यवस्थापन तक्ता क्र. 1 प्रमाणे करावे. तसेच युरियाचा वापर करताना निंबाेळी पेंडीचा 6ः1 या प्रमाणात वापर करावा. जमिनीचे मातीपरीक्षण करून घेतल्यानंतर सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी गरजेनुसार हेक्टरी 25 किलाे फेरस सल्फेट, 20 किलाे झिंक सल्फेट , 10 किलाे मॅंगेनिज सल्फेट व 5 किलाे बाेरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (10 : 1 प्रमाणात) 5 ते 6 दिवस मुरवून सरीत द्यावे.
 
रासायनिक खते  

uus_1  H x W: 0 
 
• अ‍ॅसेटाेबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू या जिवाणूखतांची बीजप्रक्रिया केल्यास नत्रखताची मात्रा 50 टक्के व स्फुरद खताची मात्रा 25 % कमी करून द्यावी.  

uus_1  H x W: 0 
 
पूर्वहंगामी उसातील आंतरपिके
 
पूर्वहंगामी उसामध्ये रब्बी हंगामातील बटाटा, कांदा, लसूण, पानकाेबी, फुलकाेबी, वाटाणा, टाेमॅटाे, हरभरा इ. आंतरपिके घेता येतात. उसामध्ये कांद्याच्या राेपांची लागण सरीच्या दाेन्ही बाजूस 10-15 सें. मी. अंतरावर दुसऱ्या पाण्याच्यावेळी करावी.
मध्यवर्ती ऊस संशाेधन केंद्र, पाडेगाव येथील प्रयाेगावरून पूर्वहंगामी उसात बटाटा किंवा कांदा ही आंतरपिके फायदेशीर असल्याचे आढळले आहे.
 
ऊस पिकामध्ये ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येताे व बाळबांधणीच्यावेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळबांधणी करता येते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत हाेते.
 
पाणी व्यवस्थापन
 
ऊस लागवडीपासून माेठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या 8 सें.मी. खाेलीच्या द्याव्यात. त्यानंतर 10 सें.मी. खाेलीच्या पाणी पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी, पावसाळ्यात 14 ते 15 दिवसांनी व हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याच्या जास्त वापरामुळे जमीन क्षारयुक्त बनतात व अतिरिक्त पाण्याचा निचरा हाेऊन पाण्याबराेबर अन्नद्रव्यांचाही ऱ्हास हाेताे. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी हाेते.
 
ठिबक संचाचा वापर करावयाचा असल्यास पट्टा पद्धत किंवा रुंद सरी पद्धत वापरून लागवड करावी. ठिबक सिंचनामुळे 50 % पाण्याची बचत हाेते. तसेच ठिबक संचाद्वारे खते दिल्यास खतांम ध्ये 20 % पर्यंत बचत हाेऊन ऊस उत्पादनात 15 ते 20 % वाढ हाेते. सबसरफेस (भुपृष्ठाखालील) ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास बाष्पीभवनाद्वारे हाेणारा पाण्याचा ऱ्हास कमी हाेताे, तणांचा प्रादुर्भाव कमी हाेताे, पाण्याची माेठ्या प्रमाणात बचत हाेते. कीड व राेगांचा प्रादुर्भाव कमी हाेताे. उसाची वाढ एकसारखी हाेऊन उत्पादनात वाढ हाेते.
 
उन्हाळी हंगामातील अवर्षण परिस्थितीत उसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींचा वापर करावा, एक आड सरीतून पाणी द्यावे. दर तीन आठवड्यांनी 2 % मुरेट ऑफ पाेटॅश व 2 % युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी. बाष्पीभवन कमी करण्यासाठी 6 ते 8 % केवाेलीन या बाष्पराेधकाची फवारणी करावी. ऊस पीक तणविरहित ठेवावे. लागवडीच्या ऊस पिकात तसेच खाेडव्याच्या पिकास हेक्टरी 5 ते 6 टन पाचटाचे आच्छादन करावे.
 
पीक संरक्षण
 
पूर्वहंगामी उसामध्ये खाेड किड, कांडी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फुले ट्रायकाेकार्डची 10-15 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारणे करावीत. पाेंग्यातील पिठया ढेकूण या किडीच्या बंदाेबस्तासाठी मिथिल डिमेटाॅन 25 टक्के प्रवाही 32 मि.ली. किंवा डायमिथाेएट 30 टक्के प्रवाही 26 मि.ली. किंवा मॅलॅथिऑन 50 टक्के प्रवाही 20 मि.ली. यापैकी काेणतेही एक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

ठिबक_1  H x W:  
 
लाेकरी माव्याच्या नियंत्रणासाठी काेनाेबाथ्रा,  मायक्राेमस, डिफा अशा मित्र किटकांची उपलब्धता नसल्यास फोरेट 10 टक्के दाणेदार हेक्टरी 15 ते 20 किलाे या प्रमाणात 9 महिन्यापर्यंतच्या उसास वापरावे किंवा मिथील डिमेटाॅन 25 टक्के प्रवाही किंवा डायमिथाेएट 30 टक्के प्रवाही यापैकी काेणतेही एक किटकनाशक प्रत्येकी 10 लिटर पाण्यात 15 मि.ली. या प्रमाणात मिसळून आलटून पालटून आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा फवारावे. तसेच काणी व गवताळ वाढ या राेगाचे प्रमाण कमी करण्यासाठी उसाची लागण करताना उस बेण्यास (100 ग्रम 100 लिटर पाण्यामध्ये) कार्बेंडेझीम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. हवामान बदलामुळे नवीन किडींचा प्रार्दुभाव आढळून आल्यास त्याचे बंदाेबस्तासाठी कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.
  
ठिबक_1  H x W:
 
ऊस ताेडणी
 
पूर्वहंगामी उसाची ताेडणी 14 ते 15 महिन्यानंतर करावी. सध्या प्रचलित ुले 265 आणि काे 86032 या जातींचा वापर केल्यास हेक्टरी 200 टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन मिळते.
 
 
 
डाॅ. सुभाष घाेडके, मृदशास्त्रज्ञ डाॅ. भरत रासकर,  
ऊस विशेषज्ज्ञ मध्यवर्ती ऊस संशाेधन केंद्र, पाडेगाव,
ता. फलटण-415521, जि. सातारा