भाजीपाला राेपवाटिका व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    26-Oct-2020
|

baliraja_2  H x
 
भाजीपाला उत्पादनामध्ये जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्येही भाजीपाला पिके माेठ्या प्रमाणात घेतात. त्यामध्ये मिरची, वांगी, टाेमॅटाे , लसूण, काेबी, फ्लाॅवर, वाटाणा, भेंडी, वाल, वेलवर्गीय भाजीपाला पिकांचा समावेश हाेताे. भाजीपाला पिकांम ध्ये मिरची, वांगी, टाेमॅटाे, कांदा, काेबी, फ्लाॅवर इ. पिकांची प्रथम राेपे तयार करून नंतर शेतात लागवड केली जाते. राेपे तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाफ्याचे सपाट वाे, गादीवाे असे प्रकार पडतात. गादीवाफ्यावर बियाणे पेरण्यापासून राेपांची लागवड हाेईपर्यंत विविध प्रकारची काळजी घ्यावी लागते. यात राेवटिकेसाठी जागेची निवड काेठे व कशी करावी, बी कसे पेरावे, उगवण झाल्यावर पाणी कसे द्यावे, राेपवाटिकेम ध्ये राेपांचे पीकसंरक्षण आणि लागवडीपूर्वी राेपांना करावयाची प्रक्रिया इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात. सदर लेखात याच बाबींची शास्त्रीय माहिती देण्याचा ऊहापाेह केलेला आहे.
 
ज्या भाजीपाला पिकांचे बियाणे अतिशय लहान व वजनाने हलके असते, अशा पिकांची लहान जागेवर प्रथम राेपे तयार करतात व त्यांची विशेष काळजी घेतली जाते. अशा जागेला भाजीपाला राेपवाटिका असे म्हणतात. या राेपवाटिकेत पेरण्यापासून, राेपे लागवडीस येईपर्यंत राेपांची निगा राखण्यासाठी उपाययाेजना केल्या जातात, त्यास भाजीपाला राेपवाटिका व्यवस्थापन असे म्हणतात. भाजीपाला पिकामध्ये टाेमॅटाे, वांगी, मिरची, ढाेबळी मि रची, कांदा, ब्राेकाेली, नवलकाेल, ुलकाेबी इत्यादी पिकांची राेवाटिकेमध्ये राेपे तयार करतात.
 
राेपवाटिकेसाठी जागेची निवड कशी करावी? 
भाजीपाला पिकांची राेपवाटिका तयार करताना खालील  बाबींचा विचार करावा.
 •  राेपवाटिकेसाठी निवडलेली जागा चांगली निचरा हाेणारी असावी आणि पाणी साठून न राहणारी असावी.
 •  निवडलेल्या जागेला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा.
 •  निवडलेली जागा पाण्याच्या स्त्राेताजवळ असावी. की ज्यामुळे वेळेवर राेपवाटिकेला पाणी देणे सुलभ जाते.
 •  निवडलेली जागा ही प्राणी आणि पक्ष्यांपासून सुरक्षित असावी.
 •  निवडलेल्या जागेची जमीन सुपीक आणि राेगकिडींच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी.
 •  निवडलेल्या जागेचा सामू शक्यताे 7.0 असावा.
 
चांगली जाेमदार राेपे मिळविण्यासाठी जमिनीची प्रक्रिया
 
राेगजंतूंच्या प्रादुर्भावासाठी जमिनीची प्रक्रिया
 •  जमिनीचे साेलाेरायझेशन : ही प्रक्रिया शक्यताे मे-जून महिन्यात करावी. जमीन भरपूर ओली करावी. संपूर्ण राेपवाटिकेची जागा पाॅलिथीन पेपरने (200 गेज) झाकावी. 5-6 आठवड्यांनी पेपर काढून मग राेपवाटिका तयार करावी.
 •  फॉरमाॅलिन प्रक्रिया : ही प्रक्रिया बियाणे पेरण्यापूर्वी 15- 20 दिवस अगाेदर करावी. 1.5 ते 2.0% फॉरमाॅलिन द्रावण तयार करून प्रतिचाैरस मीटर क्षेत्रासाठी 4 ते 5 लिटर द्रावण जमिनीत ओतावे. त्यानंतर ती जागा पाॅलिथीन पेपरने झाकून घ्यावी.
 
राेपवाटिकेसाठी वाफा कसा तयार करावा?
 •  राेपवाटिकेसाठी वाफा हा पीक आणि हंगामानुसार तयार करावा.
 •  राेपवाटिकेसाठी शक्यताे गादी वाफा तयार करावा. परंतु रब्बी हंगामात राेपवाटिका सपाट वाफ्यावर केली तरी चालते.
 •  राेपवाटिकेमध्ये गादी वाफा शक्यताे 3ु2 मीटर लांबीरुंदीचा तयार करावा. त्यांची उंची 15 सेंमी ठेवावी. तसेच दाेन वाफ्यांमध्ये 30 ते 40 सेंमी माेकळी जागा ठेवावी की ज्यामुळे राेपवाटिकेमध्ये खुरपणी किंवा निंदणी करणे साेपे जाते.
 •  राेपवाटिकेमध्ये गादीवाे शक्यताे पूर्व-पश्चिम करावे व बियाणांची पेरणी दक्षिण-उत्तर करावी.
 •  गादीवाे तयार केल्यानंतर बियाणांची पेरणी शक्यताे ओळीमध्ये करावी, परंतु बियाणे ेकून करू नये (बियाणे विस्कटून करू नये). त्यामुळे राेपवाटिकेमध्ये खुरपणी व्यवस्थित करता येत नाही. राेपे एकसारखी तयार हाेत नाहीत. त्याचप्रमाणे राेप अगदी नाजूक सुईसारखी तयार हाेतात. आणि अशी राेपे लागवडीनंतर शेतामध्ये मरण्याचे प्रमाण वाढते.
 •  ज्या ठिकाणी राेपांची गर्दी झाली आहे त्या ठिकाणी मर राेगाचा प्रादुर्भाव जाणवताे. म्हणून बियाणे ओळीमध्ये पेरावे.
 • दाेन ओळींमध्ये 5 सेंमी अंतर ठेवावे व 1 सेंमी खाेलीवर बियाणे पेरावे. जास्त खाेलीवर बियाणे पेरल्यास उगवणीवर परिणाम हाेताे.
 
राेपवाटिकेमध्ये विषाणूमुक्त राेपे कशी तयार करावी?
 
टाेमॅटाे किंवा वांगी, मिरची या पिकांवर लिफ कर्ल हा विषाणू राेग पांढऱ्या माशीर्माफत पसरताे. आणि त्यांची सुरवात राेपवाटिकेपासून हाेते. आणि संपूर्ण पीक काढणीपर्यंत राहताे. त्यासाठी राेपवाटिकेमध्ये खालील बाबींचा विचार करावा.
 
 •  जमीनप्रक्रिया करावी, ज्या ठिकाणी राेपवाटिका करावयाची तेथील जागा कार्बाेफ्युराॅन 3 ते 5 ग्रॅम चाै.मी. या प्रमाणात औषधाची प्रक्रिया करावी.
 •  त्याचप्रमाणे इमॅडाेक्लाेप्रिड 2.5 ग्रॅम प्रतिकिलाे या प्रमाणात बियांस प्रक्रिया करावी.
 •  ज्या ठिकाणी राेपवाटिका तयार केली ती संपूर्ण राेपवाटिका नायलाॅन नेटने झाकावी.
 •  राेपवाटिकेमध्ये राेपांची काळजी घ्यावी आणि 1.5 मिली मेटॅसिस्टीक किंवा माेनाेक्राेटाेाॅस प्रतिलिटर पाण्यात घेऊन 7 दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. शेवटचा फवारा राेपे काढण्यापूर्वी दाेन दिवस अगाेदर घ्यावा.
 •  लागवडीसाठी निराेगी व जाेमदार राेपांची निवड करावी.
 
राेपवाटिकेमध्ये राेपांची काळजी घेताना काेणत्या बाबींचा विचार करावा?
 
 • राेपवाटिकेमध्ये राेपे तयार करताना बियाणांस बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी कॅप्टन किंवा बावीस्टीन 2-3 ग्रॅम प्रतिकिलाे याणांस चाेळावे.
 • बियाणांची पेरणी ओळीमध्ये करावी आणि पातळ परंतु याेग्य अंतरावर एका ओळीमध्ये बियाणे पेरावे. बियाणे 1 सेंमी खाेलीवर टाकावे.
 • राेपवाटिकेमध्ये बियाणे पेरल्यानंतर हलकी आणि अलगदपणे मातीने बियाणे झाकावे.
 • शक्यताे राेपवाटिकेचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी नाॅयलाॅन नेटचा वापर करावा.
 • बियाणांची पेरणी झाल्यानंतर वाॅटर कॅनच्या साह्याने पाणी द्यावे. त्यामुळे बियाणे पेरलेल्या जागेपासून हलणार नाही आणि राेपांची गर्दी हाेणार नाही.
 • राेपवाटिकेमध्ये याेग्यवेळी तणे काढून टाकावीत आणि राेपवाटिका तणमुक्त ठेवावी.
 • राेपे तयार हाेण्याचा कालावधी हा पिकांनुसार वेगवेगळा असताे, परंतु शक्यताे राेपांची 15-20 सेंमी उंची झाल्यावर राेपे तयार झाली असे समजावे.
 • राेपवाटिकेमध्ये राेपे कणखर हाेण्यासाठी लागवडीपूर्वी काही दिवस अगाेदर राेपांना पाण्याचा ताण द्यावा.
 • राेपांची लागवड करण्यापूर्वी राेपे कीटकनाशकाच्या /बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत.
 • राेपांची लागवड झाल्यानंतर ताबडताेब पाणी द्यावे.
 • राेपांची लागवड शक्यताे सायंकाळच्या वेळी करावी.
  
भाजीपाला राेपवाटिकेचे फायदे
 
 • भाजीपाला पिकांची राेपवाटिका तयार केल्यामुळे थाेड्या जागेत याेग्य वातावरण पुरवून बियाणांची उगवणक्षमता तसेच वाढ चांगली हाेण्यास मदत हाेते.
 • राेपवाटिकेमुळे माेठ्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी थाेड्या जागेत राेपे तयार करता येतात. आणि देखभाल, पाणी व्यवस्थापन आणि राेपांची कीड व राेगांपासून संरक्षण कमी खर्चात आणि कमी वेळेत करता येते.
 • ज्या भाजीपाला पिकांचे बियाणे अतिशय महागडे असते अशी पिकांची राेपवाटिका फायदेशीर ठरते.
 • ज्या ठिकाणी राेपांची लागवड करावयाची आहे त्यासाठी भरपूर वेळ मिळताे आणि राेपे तयार झाल्यावर त्या ठिकाणी लागवड करणे फायदेशीर ठरते.
 
 
प्रा. धनश्री पाटील, डाॅ. मधुकर भालेकर व  
डाॅ. शिल्पा गायकवाड
अखिल भारतीय सम न्वित भाजीपाला
संशाेधन प्रकल्प, मुकृवि, राहुरी.