टाेमॅटाे लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

डिजिटल बळीराजा-2    23-Oct-2020
|
 
बळीराजा_1  H x
 
भाजीपाल्यांच्या पिकांध्ये टाेमॅटाे पिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रामध्ये टाेमॅटाे हे जास्त आर्थिक माेबदला देणारे पीक आहे. सध्या टाेमॅटाेचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील तीनही हंगामांत टाेमॅटाेची लागवड हाेत असल्याने बाजारात बाराही महिने टाेमॅटाे मिळतात. टाेमॅटाे ही सर्वसामान्य लाेकांच्या आवडीची व शरीरपाेषणाच्या दृष्टीने उपयुक्त फळभाजी आहे. राेजच्या आहारात टाेमॅटाेचा अंतर्भाव असताेच. त्याव्यतिरिक्त टाेमॅटाेपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ उदा. केचप, साॅस, सुप, चटणी, टाेमॅटाे प्युरी व टाेमॅटाे पेस्ट इ. बनविता येतात. त्यामुळे टाेमॅटाेवर आधारित प्रक्रिया उद्याेगास राज्यातच नव्हे, तर देशातही माेठा वाव आहे. टाेमॅटाेला संरक्षक अन्न असे म्हटले जाते. कारण टाेमॅटाेधील लायकाेपीन या अल्कलाइड रंगद्रव्यामुळे शरीरातील पेशी मरण्याचे प्रमाण कमी हाेते. टाेमॅटाे आहारदृष्ट्या आराेग्यासाठी हितकारक आहे.
 
हवामान
 
टाेमॅटाेपिकास स्वच्छ, काेरडे, कमी आर्द्र्रता व उष्ण हवामान चांगले मानवते. साधारणपणे 160 सें. ग्रे. ते 250 सें. ग्रे. तापमानात बी उगवण चांगली हाेते, तर 210 सें. ते 240 सें. तापमान पिकाच्या वाढीस अनुकूल ठरते. टाेमॅटाे पीक जरी वर्षभर घेता येत असले तरी हवामानातील तापमानाचा विचार करून पीक घेतल्यास उत्पादनात निश्चित वाढ दिसून येते. बियांची उगवण तसेच झाडांची वाढ 200 सें. ग्रे. ते 260 सें.ग्रे. तापमानात चांगल्या प्रकारे हाेते. फळधारणेसाठी 180 सें. ग्रे. ते 220 सें. ग्रे. तापमान फारच उपयुक्त आहे.
 
जमिनीची पूर्वशागत
 
हलक्या ते भारी जमिनीत टाेमॅटाे पीक घेता येते. साधारणपणे हलक्या, मुरमाड जमिनीत पीक लवकर तर भारी जमिनीत उशिरा येते. उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते काळ्या जमिनीत किंवा पाेयट्याच्या जमिनीत पीक चांगले येते. जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक 6 ते 7 असावा. जमीन भुसभुशीत करून घ्यावी व जातीच्या वाढीच्या प्रकारानुसार सरी काढावी. हलक्या जमिनीत पीक लवकर येते, तर भारी जमिनीत फळांचा ताेडा उशिरा सुरु हाेताे, परंतु उत्पादन अधिक मिळते. जास्त पावसाच्या भागासाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. व त्यास याेग्य उतार द्यावा. म्हणजे पावसाचे पाणी या पिकात साठून राहणार नाही. क्षारयुक्त, चाेपण व पाण्याचा निचरा न हाेणारी जमीन लागवडीसाठी टाळावी. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व ुलगळ हाेते. अगाेदरच्या हंगामात टाेमॅटाेवर्गीय पिके उदा. वांगी, मिरची ही पिके घेतलेल्या जमिनीत टाेमॅटाे हे पीक घेण्याचे टाळावे. त्यामुळे राेगकिडींचा जास्त प्रादुर्भाव हाेताे. तसेच निमॅटाेड असलेल्या जमिनीत हे पीक घेऊ नये.
सुधारित वाण
 
  • भाग्यश्री : या जातीच्या फळांत लायकाेपीन या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असून, बियांचे प्रमाण कमी आहे. फळे लाल गर्द रंगाची भरपूर गर असलेली प्रक्रिया उद्याेगास चांगली आहेत. या जातीचे सरासरी उत्पादन 40 ते 45 टन प्रतिहेक्टर मिळते.
  • धनश्री : फळे मध्यम गाेल आकाराची, नारंगी असतात. या जातीचे सरासरी उत्पादन 40 ते 45 टन प्रतिहेक्टर मिळते. ही जात स्पाॅटेड विल्ट आणि लीफकर्ल व्हायरस (बाेकड्या) या विषाणूजन्य राेगास कमी प्रमाणात बळी पडते.
  • फुले केशरी : फळे अधिक बीटा कॅराेटीनयुक्त (5.86 मि ग्रॅ/100 ग्रॅ) तसेच नारंगी रंगाची, अंडाकृती असतात. ही जात विषाणूजन्य राेगास कमी प्रमाणात बळी पडते. उत्पादन 50-55 टन प्रतिहेक्टर मिळते.
  • राजश्री : फळे नारंगी लाल रंगाची असतात. या संकरित वाणाचे उत्पादन 50 ते 55 टन प्रतिहेक्टर मिळते. ही संकरित जात लीफकर्ल व्हायरस (बाेकड्या) या विषाणूजन्य राेगास कमी बळी पडते.
  • फुले राजा : फळे नारंगी लाल रंगाची असतात. ही संकरित जात लीफकर्ल व्हायरस (बाेकड्या) या विषाणूजन्य राेगास कमी बळी पडते. उत्पादन 55-60 टन प्रतिहेक्टर मिळते.
  • फुले जयश्री : ही चरी टाेमॅटाे जात आहे. फळे नारंगी लाल रंगाची व गाेलाकार असतात व विषाणूजन्य राेगास मध्यम प्रतिकारक्षम आहे. उत्पादन 53-55 टन प्रतिहेक्टर मिळते.
राेपवाटिका
 
टाेमॅटाेची लागवड ही तीनही हंगामांत करता येते. खरीप हंगामासाठी मे-जून, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते ऑक्टाेबर व उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये बियाणांची पेरणी करावी. साधारणपणे सरळ जातीसाठी टाेमॅटाेचे 400 ग्रॅ बियाणे, तर संकरित जातींसाठी 125 ग्रॅ बियाणे हेक्टरी पुरेसे हाेते. राेपवाटिका तयार करण्यासाठी एका हेक्टर लागवडीसाठी तीन गुंठे क्षेत्रावर 3 मीटर लांब 1 मीटर रुंद व 15 से.मी. उंच या आकारमानाचे गादीवाे तयार करावेत. वाा चांगला भुसभुशीत करून घाेळून त्यातील दगड ढेकळे कचरा काढून टाकावा व प्रत्येक वाफ्यात एक घमेले चांगले कुजलेले शेणखत, 50 ग्रॅ ब्लायटाॅक्स (काॅपर ऑक्सिक्लाेराइड) व 100-150 ग्रॅ सुफला मिसळून घ्यावा व वाा सपाट करून घ्यावा.
 
चार बाेटांच्या अंतरावर बाेटाने वाफ्याच्या रुंदीशी समांतर रेघा पाडाव्यात. रेघा जास्त खाेल नसाव्यात. अशा ओळींमध्ये बी पातळ पेरावे व हलक्या हाताने ते बी मातीने झाकून टाकावे. वाफ्याला बी उगवेपर्यंत शक्यताे झारीने पाणी द्यावे. त्यानंतर वाफ्यात पाटाने पाणी द्यावे. गादीवाफ्यावर दाेन राेपांच्या ओळीमध्ये जमिनीत कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची 1 ग्रॅ/लि. पाण्यात मि सळून जिरवणी करावी. राेपवाटिकेमध्ये राेग-किडी नियंत्रणासाठी मॅन्काेझेब 20 ग्रॅ अधिक डायमेथाेएट 10 मिली/10 लि. पाणी या प्रमाणात उगवण झाल्यावर दर 10 दिवसांच्या अंतराने आलटूनपालटू न 2-3 वेळा फवारावे. खरीप हंगामामध्ये जून-जुलै, रब्बी हंगामामध्ये ऑक्टाेबर-नाेव्हेंबर व उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी- फेब्रुवारीमध्ये राेपांची पुनर्लागवड करावी. पुनर्लागवडीपूर्वी इमि डॅक्लाेप्रीड 5 मिली अधिक मॅन्काेझेब 20 ग्रॅ प्रति 10 लि. पाण्यात मिसळून या द्रावणात राेपांची मुळे 10-15 मिनिटे बुडवावीत. लागवड करण्यापूर्वी वाफ्यांना पाणी द्यावे. वाफ्यामध्ये पाणी असताना ओल्यातच राेपांची लागवड करावी. मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी व राेगट राेपे लागवडीसाठी वापरू नयेत. राेपे लावताना राेपांच्या खाेडावर दाब देऊ नये. त्यामुळे नाजूक खाेड पिचते व नंतर दगावतात. लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर 10 दिवसांच्या आत जी राेपे मेली असतील त्या ठिकाणी नवीन राेपांचे नांगे भरून घ्यावेत. टाेमॅटाेची राेपे हंगामानुसार 3 ते 5 आठवड्यांत लागवडीसाठी तयार हाेतात. लागवडीच्या 4 ते 5 दिवस अगाेदर पाणी हळूहळू कमी करावे व लागवडीच्या आदल्यादिवशी वाफ्यांना पुरेसे पाणी द्यावे.
 
पूर्वशागत व लागवड
 
लागवडीसाठी जमीन उभी आडवी खाेलगट नांगरून घ्यावी व कुळवणी करतेवेळी 20 टन चांगले कुजलेले शेणखत प्रतिहेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्या, लव्हाळा गाठी चांगल्याप्रकारे वेचून जाळून टाकाव्यात. टाेमॅटाेच्या लागवडीचे अंतर साधारणत: बुटक्या ते मध्यम पसारा असणाऱ्या जातीसाठी 75 ते 90 सें.मी. सरी काढून लागवड 30 ते 40 सें.मी.वर करावी. उंच वाढणारे व अधिक पसारा असणाऱ्या वाणांसाठी 90 सें.मी. सरी काढून लागवड 45 सें.मी.वर करावी.
 
खतांचा वापर
 
टाेमॅटाे हे पीक रासायनिक तसेच जाैविक खतांना चांगला प्रतिसाद देते. लागवडीसाठी क्षेत्र तयार करताना चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 20 टन शेतामध्ये मिसळावे. रासायनिक खतां ध्ये सरळजातीसाठी 150 किलाे नत्र, 75 स्फुरद व 75 किलाे पालाश प्रतिहेक्टरी द्यावे, तर संकरित वाणांसाठी 300 किलाे नत्र, 150 किलाे स्फुरद व 150 किलाे पालाश प्रतिहेक्टरी वापरावे. त्या रासायनिक खतांपैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या अगाेदर वाफ्यात टाकावे. उरलेल्या निम्म्या नत्राच्या 3 ते 4 समान मात्रा 15,25,40 व 55 दिवसांच्या अंतराने द्याव्यात. खते टाकल्यावर ताबडताेब पाणी द्यावे. राेपांची लागवड वरंब्याच्या बगलेत वाफ्यांना अगाेदर पाणी देऊन करावी. त्यावेळी राेपांची मुळे सरळ खली राहतील याची काळजी घ्यावी.
 
आंतरमशगत व पाणी नियाेजन
 
टाेमॅटाेपिकाला 3 ते 4 खुरपण्या अथवा सध्या बाजारामध्ये विविध तणनाशके उपलब्ध आहेत त्यापैकी याेग्य तणनाशकाच्या शिफारशीप्रमाणे वापर करून शेत तणमुक्त ठेवावे. रब्बी हंगामात साधारणपणे 5 ते 7 दिवसांनी पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात 3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावे. खरीप हंगामात पावसाच्या प्रमाणानुसार पाणी द्यावे. हलक्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात व भारी जमिनीत पाण्याच्या कमी पाळ्या द्याव्यात. पीक फुलाेऱ्यात असताना व फळांची वाढ हाेताना पाण्याचा नियमित वापर करावा. दाेन पाण्याच्या पाळ्यांत माेठा खंड पडू देऊ नये. अन्यथा फुलगळ व फळगळ किंवा फळे तडकणे हे धाेके निर्माण हाेतात. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाण्याची बचत हाेऊन दर्जेदार फळे मिळतात व तणांचे प्रमाणही मर्यादित राहते.
 
झाडांना आधार व भर देणे
 
टाेमॅटाेची लागवड केल्यानंतर साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यानंतर झाडांवर फळे वाढू लागल्यानंतर वजनामुळे झाडाच्या फांद्या जमिनीला टेकतात. काही फळांचा जमिनीशी संपर्क येताे. त्यामुळे झाडावर किडी व राेगांचा प्रादुर्भाव हाेताे. फळे खराब हाेतात, वरच्या बाजूची फळे उघडी पडतात. यासाठी झाडांना वेळीच अधार देणे महत्त्वाचे आहे. सध्या माेठ्या प्रमाणावर वापरात असलेली तारा व बांबू या पद्धतीत सरीच्या दाेन्ही बाजूला 6 ते 9 फुट उंचीचे जाड बांबू अथवा लाकडाचे डाम तिरपे राेवावेत. जमिनीपासून 1 मीटर उंचीवर दाेन्ही खांबांवर तार ओढावी व घट्ट बांधून घ्यावी व मध्ये बांबूने आधार द्यावा. झाडाची उंची 30 सेीं. झाल्यानंतर झाडाच्या खाेडाला सैलसर सुतळी बांधून ती तारेला बांधावी. त्याचबराेबर झाडांच्या लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांत झाडांना मातीची भर द्यावी. यासाठी समाेरील अर्धी सरी फोडून झाडाच्या बाजूस माती लावावी. त्यामुळे झाडाच्या खाेडाला आधार मिळताे व मुळ्या फुटण्यास मदत हाेते व मातीतील हवेचे प्रमाण याेग्य राहण्यास मदत हाेते. मातीची भर देताना झाड मातीमध्ये जास्त गाडणार नाही याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे झाडांच्या उंचीनुसार तारा बांधाव्यात. या तारांना झाडांच्या फांद्या जशा वाढतील त्याप्रमाणे सुतळीणे बांधून घाव्यात.
 
फळांची काढणी
 
लागवडीनंतर साधारणत: 60 ते 75 दिवसांनी वाणांनुसार फळे काढणीस तयार हाेतात. बाजारपेठेचे अंतर व वाहतुकीचे साधन लक्षात घेऊन फळांची ताेडणी करवी. लांबच्या बाजारपेठेसाठी डाेळा पडण्यास सुरुवात झालेली फळे ताेडावीत. जवळच्या बाजारपेठेसाठी गुलाबी रंगाची किंवा लाल रंगाची पक्व फळे ताेडावीत. ताेडलेली फळे सावलीत ठेवावीत व त्यांची बाजारपेठेच्या मागणीनुसार वर्गवारी करावी. खराब, सडलेली, फुटलेली, दबलेली, फळे निवडून काढावीत. चांगली निवडलेली फळे लाकडी खाेक्यात लिंबाचा पाला, वर्तानपत्रांचा वापर करून आकर्षक दिसतील अशा पद्धतीने एकावर एक थर देऊन भरावीत किंवा सध्या प्लॅस्टिक क्रेटसही वाहतुकीस खूप लाेकप्रिय झालेले आहेत. साधारणपणे सरळ जातीपासून 300 ते 400 क्विटल प्रतिहेक्टरी तर संकरित वाणांपासून 550 ते 600 क्विटल प्रतिहेक्टरी उत्पन्न मिळू शकते. 
 
राेग व कीड व्यवस्थापन
 
टाेमॅटाेवर भाजीपाला पिकांधील जवळजवळ सर्व राेग व किडी आढळतात. त्यासठी जर शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड नियंत्रण राखल्यास बऱ्यापैकी किडींचा बंदाेबस्त करता येताे. टाेमॅटाेवर राेगांचा तर फुलकिडे, पांढरी माशी, फळ पाेखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळताे.
 
मर
 
हा बुरशीजन्य राेग आहे. या राेगामुळे झाड अचानक वाळायला लागते. झाड उपटले असता मुळे कुजलेली दिसतात. राेपवाटिकेतील राेपे मरगळलेली, माना पडलेली दिसतात. यासाठी ब्लायटाॅक्स (काॅपरऑक्सिक्लाेराइड) 25 ग्रॅ 10 लिटर पाण्यात मिसळून राेपांच्या ओळीत खुरप्याने रेघा ओढून राेपांच्या मुळांजवळ ओतावे.
 
करपा
 
करपा हा लवकर येणारा व उशिरा येणारा करपा असताे. याम ध्ये पानांवर पिवळसर डाग पडून नंतर गाेल काळे तपकिरी ठिपके दिसतात. नंतर पाने वाळतात. यासाठी डायथेन एम-45 हे औषध 25 ग्रॅ 10 लिटर पाण्यात मिसळून दाेन ते तीन फवारण्या कराव्यात.
 
विषाणू राेग
 
विषाणू राेगांध्ये अनेक वेगवेगळे राेग आहेत. परंतु टाेमॅटाे या पिकावर प्रामुख्याने करपा (स्पाॅटेड विल्टा व्हायरस) व पर्णगुच्छ (लिफकर्ल वहायरस) हे प्रमुख विषाणू राेग आढळतात. या राेगांची लागण अगदी राेपवाटिकेमधून सुरुवातीपासून हाेण्याची शक्यता असते. हे राेग अनुक्रमे फुलकिडे, पांढरी माशी या किडीुंळे प्रसार पावतात. त्यासाठी या किडींचा सुरवातीपासूनच बंदाेबस्त केल्यास या घातक राेगांचे प्रमाण कमी ठेवता येते. शेतामध्ये हे राेग आढळल्यास कमी प्रमाणात असतानाच राेगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. या किडींच्या बंदाेबस्तासाठी डायमेथाेएट 15 ते 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आठवड्याच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
 
फळे पाेखरणारी अळी
 
ही अळी प्रथम पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पाेखरून आत शिरते व गर खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी डायथाेएट 15 ते 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात. क्विनाॅलाॅस 20 मिली/नाेव्हॅलीराॅन 15 मिली/10 लि., हेलीओथीस न्युक्लिअर पाॅलिहायड्राेसीस व्हायरस (एचएएनपीव्ही विषाणू ) 200 मिली प्रति 200 लि. पाण्यातून सायंकाळी फवारावे.
 
नागअळी (लिफ मायनर)
 
या किडीच्या अळ्या पानांच्या पापुद्र्यात शिरून मधील हिरवा भाग पाेखरून खातात. त्यामुळे पाने पांढरी पडतात व पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम हाेताे. यासाठी राेपे लागवड करताना लागण झालेल्या राेपांची कीडग्रस्त पाने काढून टाकावीत. राेपांवर वरचेवर कडू लिंबाच्या पानांच्या अर्काच्या (1 लिटर रस 9 लिटर पाण्यात) 2 ते 3 फवारण्या कराव्यात. पिकावर या अळीचे प्रमाण वाढल्यास डेल्टामेथ्रीन या औषधाच्या 4 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून 1 ते 2 फवारण्या कराव्यात.