वांगी लागवड तंत्रज्ञान

डिजिटल बळीराजा-2    21-Oct-2020
|

वांगी_1  H x W:

महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यांधून हे पीक घेतले जाते. आणि भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व इतर राज्यांतून वांग्याची लागवड केली जाते. वांग्यामध्ये खनिजे तसेच अ, ब, क ही जीवनसत्त्वे, लाेह व प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे आहे.
 
प्रामुख्याने त्या त्या परिसरातील ग्राहकांची मागणी असणारा तसेच बाजारपेठेत हमखास चांगला भाव मिळणारा वाण निवडणे गरजेचे असते. हा वाण भरपूर उत्पादन देणारा, राेगक फीड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा, तेथील हवामानाशी मिळतेजुळते घेणारा असावा. लागवड करताना प्रामुख्याने सुधारित व संकरित जातीची निवड, राेपवाटिका व्यवस्थापन, लागवड पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन व पीकसंरक्षण या बाबी महत्त्वाच्या आहेत.
 
जाती
 
 • मांजरी गाेटा : फळे मध्यम ते माेठ्या आकाराची, गाेल, जांभळट गुलाबी रंगाची, त्यावर पांढरे पट्टे असतात. फळांच्या देठावर काटे असतात. हा वाण चवीला रुचकर असून फळे चार ते पाच दिवस टिकू शकतात. सरासरी उत्पादन हेक्टरी 250 ते 300 क्विंटल मिळू शकते.
 • कृष्णा : हा संकरित वाण असून झाडे काटक असतात.
 • फळांचा आकार अंडाकृती, रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे पट्टे असतात. फळांच्या देठावर व पानांवर काटे असतात. सरासरी 400 ते 450 क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते.
 • फुले हरित : फळे माेठ्या आकाराची, हा वाण भरीत करण्यासाठी चांगला आहे. फळांचा रंग िफकट हिरवा व टाेकाकडे पांढरे पट्टे असतात. खरीप हंगामासाठी चांगला वाण आहे. सरासरी 200 ते 480 क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते.
 • फुले अर्जुन : संकरित वाण, फळे मध्यम आकाराची, फळांचा रंग हिरवा, त्यावर जांभळे व पांढरे पट्टे असतात. फळांचा आकार गाेलाकार व थाेडासा लांब असून देठावर भरपूर काटे असतात. हा वाण खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे. सरासरी 450 क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते. याशिवाय अन्य संस्था व खासगी कंपन्यांनी जाती विकसित केल्या आहेत.
 • हवामान : या पिकाला काेरडे आणि थंड हवामान चांगले मानवते. ढगाळ हवा आणि एकसारखा पडणारा पाऊस पिकाला अनुकूल नाही. अशा हवामानात किडी व राेगांचा ारच उपद्रव हाेताे. सरासरी 13 ते 21 अंश सेल्सियस तापमानात हे पीक चांगले येते. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. 17 अंश सेल्सियसच्या खाली तापमान गेल्यास वाढीवर परिणाम हाेताे. 21 अंश सेल्सियस ते 32 अंश सेल्सियस या तापमानात बियांची उगवण चांगली हाेते.
 • जमीन : वांगी हे पीक सर्वच प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत घेता येते, परंतु सुपीक मध्यम काळ्या आणि पाण्याचा चांगला निचरा हाेणाऱ्या जमिनीत वांग्याची झाडे जाेाने वाढतात. हलक्या जमिनीत सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते किंवा हिरवळीची खते वापरून अशा जमिनीत पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा करून ते पीक घेता येते. जमिनीचा सामू 5.5 ते 6.6 असल्यास पिकाची वाढ चांगली हाेते.

बलि_2  H x W: 0
 • बियाणे प्रमाण : कमी वाढणाऱ्या जातीसाठी हेक्टरी 400 ते 500 ग्रॅ बी पुरेसे हाेते. जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातीसाठी हेक्टरी 120 ते 150 ग्रॅ बी पुरेसे हाेते. पेरणीपूर्वी बियाण्यांस प्रतिकिलाे 3 ग्रॅ थायरम चाेळावे.
राेपवाटिका
 
 • वांग्याची राेपे तयार करण्यासाठी गादीवाे साधारणत: 3 बाय 2 मीटर आकाराचे करून गादी एक मीटर रुंद व 15 सेीं उंच करावी. प्रतिवाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दाेन पाट्या टाकावे व 200 ग्रॅ संयुक्त रासायनिक खत द्यावे. खत व माती यांचे मिश्रण करून गादीवाफ्यात समप्रमाणात पाणी मिळेल असे पाहावे. प्रतिवाफ्यात मर राेगाच्या नियंत्रणासाठी 30 ते 40 ग्रॅ काॅपर ऑक्झिक्लाेराइड वापरावे.
 • वाफ्याच्या रुंदीस समांतर 10 सें ी अंतरावर खुरप्याने 1 ते 2 सेीं खाेलीच्या ओळी करून त्यात पातळ बी पेरावे. सुरुवातीस वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. त्यानंतर पाटाने पाणी द्यावे. राेपाच्या जाेदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅ युरिया आणि 15 ते 20 ग्रॅ फोरेट दाेन ओळींमध्ये काकरी पाडून द्यावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे. किडी-राेगांच्या नियंत्रणासाठी 10 दिवसांच्या अंतराने शिारशीनुसार कीडनाशकांची फवारणी करावी.
 • लागवडीपूर्वी राेपांना थाेडा पाण्याचा ताण द्यावा. म्हणजे राेप कणखर हाेईल. लागवड करण्याआधी एक दिवस राेपांना पाणी द्यावे. राेप लागवडीसाठी 5 ते 6 आठवड्यांत तयार हाेते. राेपे 12 ते 15 सेीं उंचीची झाल्यावर लागवड करावी.
 • राेपांची लागवड : लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करावी व शेणखत मिसळावे. जमिनीच्या म गदुराप्रमाणे याेग्य अंतरावर सऱ्यावरंबे पाडावेत. हलक्या जमि नीत 75 x 75 सेीं लागवडीचे अंतर तर जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातींसाठी 90 x 90 सेीं अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळ्या जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी 90 x 75 सेीं व जास्त वाढणाऱ्या जातींसाठी 100 x 90 सेीं अंतर ठेवावे.
 • खत व्यवस्थापन : जमिनीच्या मगदुराप्रमाणे खतमात्रांचे प्रमाण कमी जास्त हाेऊ शकते. मध्यम काळ्या जमि नीसाठी हेक्टरी 150 किलाे नत्र, 75 किलाे स्फुरद व 75 किलाे पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्यावेळी द्यावे. उरलेले 75 किलाे नत्र दाेन समान हप्त्यांत विभागून 30 व 45 दिवसांनी द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने, दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि तिसरा शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
 • आंतरमशागत : खुरपणी करून पिकातील तण काढून टाकावे. लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी राेपांना मातीचा भर द्यावा. वेळाेवेळी खुरपणी करावी. पाणी नियाेजन जमीन व हवामानानुसार करावे. खरिपातील पिकास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. रब्बी आणि उन्हाळी पिकांस राेपलावणीनंतर त्वरित पाणी द्यावे. दुसरे पाणी 3 ते 4 दिवसांनी द्यावे. हिवाळ्यात आठ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे. फुले येण्याचा काळ व फळे पाेसण्याच्या काळात पाण्याचा ताण देऊ नये. वेळच्यावेळी पिकास गरजेनुसार पाणी द्यावे.

बलि_1  H x W: 0
 
पीक संरक्षण :
 • किडी : तुडतुडे, मावा, पांढरी माशी, काेळी, शेंडा व फळे पाेखरणारी अळी आदी.
 • राेग : बाेकड्या किंवा पर्णगुच्छ, मर व फळकुज हे राेग दिसून येतात. तुडतुडे पानांतील रस शाेषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी हाेतात, तसेच ते कीटक पर्णगुच्छ या विषाणूजन्य राेगाचा प्रसार करतात. मावा या किडीमुळे पाने पांढरट पडतात, तसेच पानांवर जाळे तयार हाेते आणि झाडाची वाढ खुंटते.
 
रस शाेषणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, पांढरी माशी) यांच्या नियंत्रणसाठी फोस्फामिडाॅन 40% एसएस 15 मिली किंवा फेनप्रापॅथ्रीन 30% ईसी 5 मिली या कीटकनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात. अधून-मधून निंबाेळी अर्काची फवारणी करावी. फवारणी करताना पावसाळी वातावरणात चिकट द्रव्याचा (0.1%) वापर जरुर करावा.
 
काेळीच्या नियंत्रणासाठी फेन प्राेपॅथ्रीन 30% ईसी 5 मिली किंवा डायकाेाॅल 18.5% ईसी 25 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. शेंडे व फळे पाेखरणारी अळी प्रथमत: काेवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे वाळतात आणि फळे आल्यावर फळे पाेखरतात. या अळीच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गाेळा करून नष्ट करावीत. किंवा खाेल खड्ड्यात पुरुन टाकावीत. तसेच 5% निंबाेळी अर्क किंवा सायपरमेथ्रीन 25% ईसी 4 मिली किंवा क्लाेराेपायरीाॅस 20% ईसी 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1% + टायझाेाॅस (संयुक्त कीटकनाशक) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

बलि_1  H x W: 0 
 
वांग्यामधील बाेकड्या व पर्णगुच्छ या राेगामुळे पानांची वाढ खुंटते. ती लहान आणि बाेकडल्यासारखी दिसतात. हा राेग अतिसूक्ष्म अशा घातक लसीमुळे (मायकाेप्लझमा) हाेताे. याचा प्रसार तुडतुड्याुंळे हाेताे. याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी. म्हणजे या राेगाचा प्रसार हाेणार नाही. तसेच ाॅस्ामिडाॅन 40% एसएल 15 मिली किंवा सायपरमेथ्रीन 25% ईसी 4 मिली या कीटकनाशकाच्या 10 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या घ्याव्यात. राेगट झाडे दिसताच ती उपटून नष्ट करावीत.
 • मर राेग : जमिनीतील फ्युजेरियम बुरशीमुळे हा राेग हाेताे. खालची पाने पिवळी पडून गळतात व राेगट झाडाची वाढ खुंटते. या राेगाच्या नियंत्रणासाठी पिकाची ेरपालट करणे, निराेगी झाडाचे बी वापरणे, तसेच प्रतिकारक जातीची लागवड करावी.
 • फळकुज किंवा पानांवरील ठिपके : फळकुज हा ामाॅप्सीस व्हेक्झाल नावाच्या बुरशीमुळे फळांवर आढळून येताे. फळावर खाेलगट तपकिरी काळसर डाग दिसतात. राेग फळाच्या आतील भागात पसरताे आणि फळे सडतात. या राेगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 10 ग्रॅ प्रति 10 लिटर पाण्यातून दहा दिवसाच्या अंतराने फवारावे.
 • उत्पादन : सरासरी उत्पादन हेक्टरी 200 ते 300 क्विंटलपर्यंत मिळू शकते. काही संकरित जातींचे 400 ते 500 क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळू शकते. दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी राेपवाटिका ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर व्यवस्थित काळजी घेतल्यास खात्रीशीर उत्पादन मिळते.
 • साठवणूक : सर्वसाधारण तापमानात हिवाळ्यात काढलेली फळे तीन-चार दिवस चांगली राहू शकतात. मात्र उन्हाळ्यात एक-दाेन दिवसांपेक्षा ती जास्त चांगली राहू शकत नाहीत.
 • शीतगृहात 7.2 ते 10 अंश सेल्सियस तापमान आणि 85 ते 95 टक्के आर्द्र्रता असल्यास वांगी एक आठवडाभर चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतात.